युथ फर्स्ट धोरण इग्लंडला कोरोना संकटातून बाहेर काढेल?

कोरोना वायरसच्या संक्रमणासंदर्भात मार्चमध्ये ब्रिटेनमधून आलेल्या दोन बातम्या जगभराचं लक्ष वेधून गेल्या आणि या विषाणुच्या दाहकतेची कल्पना यूरोपियन आणि अन्य देशांना आली. शाही कुटुंबातील प्रिन्स चार्ल्स आणि पंतप्रधान बोरिस जॉनसनना या विषाणूचा संसर्ग झाल्याची ही बातमी होती.
आज घडीला ब्रिटनमध्ये कोरोना वायरसचा शिरकाव होऊन 110 दिवस अर्थात तीन महीने उलटले आहेत. पण अजूनही तिथली परिस्थिती सावरली नाहीये. विरोधकांनी आरोप केला आहे की पंतप्रधान पुरेशा उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहेत. दूसरीकडे स्थानिक वृत्तपत्राने देखील सरकारच्या धोरणांची समीक्षा सुरू केली असून या अपयशावर ताशेरे ओढले आहेत.
शेवटचं वृत्त हाती आलं (11 मे) त्यावेळी ब्रिटेनमध्ये मृतांची संख्या 31,855 झालेली होती. तर 216,525 व्यक्ती संक्रमित झालेले होते. आदल्या दिवशी म्हणजे रविवारी एका दिवसात 269 लोक या जीवघेण्या वायरसचा बळी पडले.
अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या मते जगभरात संक्रमणाचा आंकडा 40 लाख आहे. तर मृतांची संख्या 277,000 झाली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक अमेरिका व ब्रिटेनचे पेशंट आहेत.
लॉकडाऊन उठविण्यास विरोध
मृतांच्या संख्येत अमेरिकेनंतर ब्रिटेनचा दूसरा नंबर लागतो. विदारक परिस्थिती असताना सरकारनं लॉकडाऊन उठवण्याचं धोरण स्वीकारलं. सर्वकाही आलबेल असल्याचं भासवत पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाला लॉकडाउन उठविण्यासंदर्भात सल्ले व सूचना मागविल्या. या निर्णयामुळे अनेकजण गोंधळात पडले. या धोरणाचा सर्वच स्तरांतून विरोध सुरू झाला.
महिनाभराच्या विश्रांतीनंतर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी 6 मे रोजी संसदेच्या कामकाजात सहभाग घेतला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते कीयर स्टैमर यांनी या रोगराईशी लढण्यास ब्रिटेनला अपयश आल्याचा ठपका ठेवला. त्याचवेळी राजधानीतील केयर होम्स या वृद्धाश्रमात शिरलेल्या कोरोना प्रकोपावर ते भडकले. यावेळी सरकारला इथं नेमके किती मृत्यू झाले याचा आकडाही सांगता येत नव्हता, अशी बातमी यूरोपियन वृत्तपत्रांनी दिलेली आहे.
वेळेत उपचार का सुरू झाले नाही, असा प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारला घेरलं. लॉकडाउन लावण्यास उशीर केला, त्यामुळे टेस्टला विलंब झाला. त्यातून संक्रमित लोकांची ओळख पटविण्यासही उशीर झाला. ब्रिटेननं पीपीई सप्लाय करण्यासही उशीर केला, असा आरोपही सरकारवर केला गेला.
उत्तरादाखल पंतप्रधानानी आर्थिक डबघाई पाहता लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात दबाव असल्याचं यावेळी जाहीर केलं. परिणामी त्यांना संसद व संसदेबाहेर प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. सरकारी धोरणाची ट्वीटरवर खिल्ली उडवली गेली. धोरणाची टर उडवत लोकांनी सरकारला गंभीर होण्याचा सल्ला दिला.
या संदर्भात पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा एक फोटो ट्विटरवर चांगलाच गाजला. फोटोत जॉनसन आपल्या ऑफिसकडे पायी जात आहेत. त्यांच्या हातात कॉफीचा कप असून ते एका अन्य व्यक्तीसोबत बागेतून चालत आहेत. दोघांनीही सुरक्षेच्या कुठल्याच शर्थी पूर्ण केल्याचं या फोटोत दिसत नाही. फोटोत एकूण चार व्यक्ती आहेत. त्यातला एकजण पंतप्रधानांना बोट उगारून सल्ला देतोय, तर दूसरा हसतोय.
नेटिझन्सनी या फोटोवरून पंतप्रधानांना चांगलच सुनावलं. देशात काही लोकांना स्पेशल प्रीवीलेज मिळत आहेत, अशा स्वातंत्र्याचा सन्मान कला पाहिजे, अशा उपहासात्मक पोस्ट टाकल्या गेल्या. हजारों मीम्स तयार केले गेले. तरुणांकडून जॉनसन यांचा समाचार घेतला जात होता. मृतांचे खच पडले असताना असं वागणं वेडेपणा आहे, अशी टीका सुरू होती.
लॉकडाऊन उठल्यास मृतांचा आकडा वाढेल अशी भीती ब्रिटेनचे शास्त्रज्ञ व तज्ज्ञ व्यक्त करत होते. दूसरीकडे गेल्या दोन आठवड्यापासून लॉकडाऊनचं काटेकोर पालन होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. अशावेळी सरकारी धोरणाचा मोठा फटका बसू शकतो अशी साशंकता व्यक्त केली गेली. अखेर रात्री पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या भाषणात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत कायम राहील अशी घोषणा केली.
भीतीचं वातावरण
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना आणि स्मोकिंग संदर्भात महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. धुम्रपान केल्यानं त्या धुरातून दूसऱ्या व्यक्तीला वायरसच्या संक्रमणाचा धोका होतो. स्मोकिंगमुळे श्वसन नलिकेवर परिणाम होतो, त्यातून हा आजार बळावण्यास मदत मिळेल, असं डब्लुएचओनं जाहीर केलेलं आहे.
डेली मेलनं एप्रिल अखेरीस या संदर्भात विविध 26 सर्वेक्षणाचे आकडे देऊन दावा केलाय की, ब्रिटेनमध्ये उपचारासाठी येणारे 14.4 टक्के पेशंट स्मोकर आहेत. आकडेवारी सांगते की, चीनमध्ये तब्बल 52 टक्के लोक स्मोकिंग करतात. ब्रिटेनच्या या निष्कर्षातून चीनमध्ये अधिक काळ कोरोना टिकून राहण्यास स्मोकिंग मोठं कारण असू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
या भीतीतून जगभरातील लोक मोठ्या संख्येने सिगारेट सोडत आहेत. त्यात तरुणांचं प्रमाण लक्षणीय आहे. ब्रिटेनमध्ये हा आकडा जवळपास 24 लाखांच्या घरात आहे. तर 3 लाख तरुणांनी कायमचं स्मोकिंग सोडलं असून 5 लाख लोकांनी आपली सिगारेटची तलफ दाबून ठेवल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळते.
या संदर्भात एका अन्य रिपोर्ट्समधून धक्कादायक आकडेवारी बाहेर आली. जगभरात अनेक लोक घरात कोंडून आहेत. त्यांच्यात एकलकोंडा व फ्रस्ट्रेशनचं प्रमाण वाढलं आहे. स्टे होम आणि क्वारंटाईनमुळे तरुणांमध्ये स्मोकिंगचं प्रमाण वाढलं आहे.
मृतांत सर्वाधिक आशियायी
बीबीसीनं प्रकाशित केलेला एका रिपोर्ट सांगतो की, ब्रिटेनमध्ये कोरोनाची लागण होऊन होणाऱ्या मृतांमध्ये आशियायी नागरिक लक्षणीय आहेत. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशींचा मृतामध्ये समावेश आहे. गोऱ्या लोकांच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पट असल्याचं रिपोर्ट सांगतो. राहण्याची तोकडी जागा, संसाधनांची कमतरता, मागचे आजार हे तीन प्रमुख कारण याला जबाबदार असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं.
नॉटिंघम यूनिवर्सिटीच्या पेन्डामिक सायन्सचे एमेरिटस प्रोफ़ेसर प्रो. कीथ नील यांनी मृतांचे सरकारी आंकडे दिशाभूल करणारे आहेत, असा आरोप केला आहे. अर्थातच आशियायी लोकांची ही आकडेवारी मोठी असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लंडनमध्ये कृष्णवर्णीय आणि आशियायी मूळ असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या एकूण वर्किंग जनसंख्येच्या तुलनेत 34 टक्के आहे. फूड रीटेल, हेल्थ आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात ही लोकं काम करतात. बीबीसीचा रिपोर्ट सांगतो की, भारतीय, बांग्लादेशी आणि पाकिस्तानी लोकांना हा धोका 30 ते 80 टक्क्यांपर्यंत आहे. त्याचं प्रमुख कारण दाट वस्त्यात ते राहतात. सरकारने या आकड्याची शाहनिशा करण्याचे आदेश काढले आहेत.
तरुणांवर वैक्सिनचे प्रयोग
जगात कोरोना वायरसवर लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही देशांनी हे वैक्सिन शोधून काढल्याचा दावादेखील केलेला आहे. काही ठिकाणी वैक्सिनचा प्रयोग आपल्यावर स्रवप्रथम करावा, अशी विंनती करत काही तरुण पुढे आल्याच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. आता एडिनबर्ग यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी कोरोनावर मात मिळवण्यासाठी तरुणांचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे. या संदर्भात रिसर्चरनं एक आश्चर्यकारक उपाय सूचवला आहे.
या शास्त्रज्ञांना वाटते की, तरुणांना संक्रमित करून वृद्धांना या आजारापासून वाचवणे कोरोनाविरोधात लढण्यातला उपाय असू शकतो. कारण तरुण कमी रिस्क झोनमध्ये येतात. त्यांची इम्यूनिटी पावर अधिक असते, ते संक्रमित झाले तर त्यांना वाचवता येऊ शकते पण त्या तुलनेत वृद्धांना वाचवणे अशक्य आहे.
कोरोना रोगराईच्या काळात वृद्धांची देखभाल व काळजी अती गरजेचं असल्याचं वैज्ञानिक सांगतात. रिसर्चर पॉल मैकिग आणि हेलेन कोल्होन म्हणतात, या रोगराईवर तेव्हाच ताबा मिळवता येऊ शकतो, जेव्हा मोठ्या जनसंख्येचा इम्यूनिटी स्तर तिथे पोहोचावा, जिथे वायरसचा रिप्रोडक्शन रेट एकपेक्षा कमी होईल. रिप्रोडक्शन रेट म्हणजे एक कोरोना पेशंट किती जणांना संक्रमित करू शकतो, याच्याशी संबंधित आहे. रिसर्चर सांगतात, नैसर्गिक स्वरूपात प्रतिरोधक क्षमता प्राप्त केल्यास ही रोगराई मानवाचं काहीच करू शकणार नाही.
काहीही असो पण तूर्तास या रोगराईपासून सुटका कशी करावी, असा विचार जगभर केला जात आहे. लस येईल त्यावेळी येईल; परंतु सध्यातरी फिजिकल डिस्टसिंगहाच एकमेव या रोगराईवर ताबा मिळवण्यास सक्षम उपाय दिसून येत आहे.

कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे) 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: युथ फर्स्ट धोरण इग्लंडला कोरोना संकटातून बाहेर काढेल?
युथ फर्स्ट धोरण इग्लंडला कोरोना संकटातून बाहेर काढेल?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7Bvflz-KgviJCHb7RwkZN2iC8us3LBHMB2_pbToKrZGTscARXksA3hy_HSgm5-AlOAmzeXJO3ttNejxE7ND_OGVO-G6NkoIc9qE8JXtsFH4nP6as4kPECYyJnb3CMIiARYcarx9DNAgKO/s640/England.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7Bvflz-KgviJCHb7RwkZN2iC8us3LBHMB2_pbToKrZGTscARXksA3hy_HSgm5-AlOAmzeXJO3ttNejxE7ND_OGVO-G6NkoIc9qE8JXtsFH4nP6as4kPECYyJnb3CMIiARYcarx9DNAgKO/s72-c/England.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_14.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_14.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content