कोरोना संकटात इराण हतबल का झाला?


गभरात कोरोना वायरसच्या रोगराईचं संकट रौद्र रुप धारण करत आहेत. चीननंतर इटली, अमेरिका आणि इराण सर्वांधिक बाधित देश म्हणून चर्चेचा सोशल विषय झालेले आहेत. इराणचं हे संकट दूहेरी आहे. एकीकडे अमेरिकेचे आर्थिक निर्बंध तर दूसरीकडे देशातील अंतर्गत कलह; रोगराईवर नियंत्रण आणण्यास अडसर ठरत आहे. देशातील परंपरावाद्यांमुळे कोरोनावर मात करणं, इराणला अवघड जात आहे. दूहेरी संकटात सध्या इराण अडकला आहे.
कोरोना व्हायरसच्या जागतिक रोगराईत इराणियन तरुणाईपुढे अनेक संकटे आ वासून उभी राहिली आहेत. ट्विटरचा फेरफटका मारला तर त्यांचा व्यवस्थेवरचा राग दिसून येतो. तसं पाहिलं तर सरकारविरोधात बोलण्याच्या अधिकार कुठल्याही इराणियन नागरिकाला सरकारनं दिलेला नाही. तसं केल्यास कडक कायद्याचा फास आहेच. पण मध्य-आशियातील काही वेबसाईट्सवर अज्ञात नावाने अशा प्रतिक्रिया सर्रास पहायला मिळता आहेत. त्यातून इराणमध्ये नक्की काय घडतंय, याचा अंदाज वालणे शक्य आहे.
सा झाला शिरकाव?
फेब्रुवारीत कोम शहरातून पहिला झिरो पेशंट दिसला म्हणजे कोरानाची पहिली लागण झाली. या शहरात शिया पंथीयांचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. इथंच आहे सर्वोच्च धर्मगुरुंचे निवासस्थान. दरवर्षी जगभरातून 2 कोटी इराणियन तर 25 लाख विदेशी अनुयायी इथं भेट देतात. दर आठवड्याला हजारोच्या संख्येने भाविक शहरात विहार करतात. प्रमुख धर्मस्थळांना भेटी देत, हाताला बोसा (स्पर्श) घेऊन धर्मगुरुंना सन्मान देतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते इथूनच कोरोना वायरस पूर्ण देशात पसरला. मीडिया रिपोर्ट्स सांगतात की, 21 फेब्रुवारीला झालेल्या एका सोहळ्यात एका भाविकाला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसात अन्य एकासह त्या पेशंटचा मृत्यू झाला. हा पेशंट चीनच्या वुहानमधून आलेला होता. कोरोनामुळे झालेले देशातले हे पहिले दोन मृत्यू होते.
या घटनेनंतर कडक पावले उचलण्याऐवजी सरकारने अमेरिकेला जबाबदार धरले. देशाचे सर्वोच्च नेते खोमेनींनी कोरोनाला बायोलॉजिकल वार म्हणत ट्वीट केलं. तर राष्ट्रपती हसन रोहानी यांनी शत्रुंचे (अमेरिका) हे कारस्थान असून भीतीचं वातावरण तयार करण्याचे हे षडयंत्र असल्याचं सांगत कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू ठेवा, अशी घोषणा केली. दूसरीकडे सरकारी टीवीनं तर वायरसला अमेरिकेनं तयार केलेलं बायो वेपनम्हटलं.
दरम्यान 10 फेब्रुवारीत धार्मिक सोहळ्यात इस्लामिक क्रांतीची चाळिशी साजरी झाली. 19 फेब्रुवारीला देशात सार्वत्रिक निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला. विशेष म्हणजे पारसी नववर्षाच्या तुडुंब गर्दीत जल्लोश पार्ट्या झाल्या.
बीबीसीच्या मते सर्वोच्च नेत्यांच्या प्रतिनिधींनी याच दरम्यान अनेक वादग्रस्त भाषणे केली. परिणामी कोमच्या पवित्र धार्मिक स्थळी गर्दी वाढली.
बघता-बघता केवळ 16 दिवसात कोविड-19 इराणच्या सर्व 31 राज्यात पसरला. इतकं होऊनदेखील सरकारकडून पुरेशा उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत. प्रार्थनास्थळे, मॉल्स, व्यापारी बाजारपेठा सुरूच होत्या. मीडिया रिपोर्ट्स सांगतात की, असा रीतीने इराण हॉटस्पॉट होऊन कोरोना मध्य आशियाई मुस्लिम देशात पसरला.
इराक, अफगाणिस्तान, बहरीन, कुवैत, ओमान, लेबनान, दुबई, पाकिस्तान, जॉर्जिया, एस्टोनिया, बेलारूस, अज़रबैजान, कतर आणि आर्मेनिया सारख्या तब्बल 16 देशांनी दावा केला की कोरोना इराणमार्फत आच्या देशात आला. मलेशिया, सौदी, तुर्कस्थान व अन्य मुस्लिम देशांनी प्रार्थनास्थळे तात्काळ बंद केली. पण इराणमध्ये मस्जिदा व धार्मिक स्थले सुरू होती. ही कृती कोरोनाचा प्रादूर्भाव हाहाकार होऊन फैलावण्यास कारणीभूत ठरली. राष्ट्रव्यापी लॉकडाऊन सुरू व्हायला 11 एप्रिल उजाडावं लागलं. तो पर्यंत सर्त्र हाहाकार माजला होता. शेवटचे वृत्त हाती आले (3 मे) त्यावेळी कोरोनामुळे देशात 6,203 मृत तर 97,424 संक्रमित झालेले होते.
4 मे ला सरकारने गेल्या तीन दिवसापासून नव्या पेशंटची नोंद झाली नसल्याचे सांगत लॉकडाऊनची सवलत जाहीर केली. तसंच कमी संक्रमित झोनमधील 132 शहरातील मस्जिदा सामूहिक प्रार्थनेसाठी खुल्या केल्या जातील व तिथं सर्व नमाज होईल, असंही जाहीर केलं.
परिस्थिती भयान असताना सरकारने घेतलेला निर्णय बहुतेक इराणियन लोकांना आवडला नाही. काही अपवाद वगळता, अनेकांनी या बद्दल नाराजी वर्तवली आहे. कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या मस्जिदी पुन्हा उघडणे धोक्याचं मानलं जात आहे. परंतु सरकारपुढे ते हतबल आहेत.
इराणचे सरकार देशातील परंपरावाद्यापुढे झुकलं आहे, अशी चर्चा युरोपियन प्रसारमाध्यमे करत आहेत. रमजान सुरू झाल्यापासून सामूहिक प्रार्थनेसाठी मस्जिदी खुल्या कराव्यात, अशी मागणी इस्लामिस्ट परंपरावाद्याकडून सातत्याने होत होती. या दबावाला बळी पडत सरकारने ती मागणी मान्य़ केली असावी. परिणामी लॉकडाऊन काळात इराणी नागरिक-तरुण हतबल झालेले दिसून येतात. ते सरकारच्या विविध धोरणावर टीका करत आहेत.
नोव्हेबर महिन्यात इंधन दरवाढीविरोधात लाखों तरुणांनी रस्त्यावर येऊन आंदोलनं केली होती. त्यावेळी सरकारने अनेक तरुणांना तुरुगांत डांबलं होतं. अजूनही त्यांची सुटका झालेली नाही. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव गडगडले, परंतु इराणमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. यावर इराणी तरुणांनी सोशल मीडियातून सरकारला धारेवर धरले.
दुसरीकडे लॉकडाऊनमुळे जगातील अन्य देशासारखी बेरोजगारीची कुऱ्हाड इराणियन तरुणांवर देखील कोसळली आहे. मीडल इस्ट मॉनिटर या वेबसाईटच्या मते लॉकडाऊन काळात लाखों इराणियन लोकांचे रोजगार गेले आहेत. सरकारने काही सवलती जाहीर केल्या पण त्यात तरुण कुठेच नाहीत.
2017 साली अमेरिकेने ठरल्याप्रमाणे न्यूक्लिअर कार्यक्रम रोखत नसल्याचा आरोप करत इराणवर प्रतिबंध लादले. अमेरिकेच्या भीतीपोटी कुठलाच देश इराणला कोरोना रोगराईच्या काळात मदत करत नाहीये. पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे इराणची कोंडी झालेली आहेत. अमेरिकेनं या स्थितीचा फायदा उचलत इराणची कोंडी आणखीन घट्ट केली आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक निवेदन जारी करत अमेरिकन प्रतिबंधामुळे हेल्थकेयर सिस्टमला मोठा धक्का पोल्याचं सांगतिलं आहे. संकटसमयी अमेरिकेपुढं गुडघे टेकणं इराणला मान्य नाही. अशावेळी आपली व राष्ट्राची लाज राखणं इराणचं कर्तव्य आहे. कुठलाही देश अशावेळी आपल्या सोयीचीच निर्णय घेईल, यात दूमत असू शकत नाही.  
इराणनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आपत्कालीन निधीसाठी 5 अब्ज डॉलर्सची मागणी केली. परंतु या विनंतीचा पाठपुरावा झाला नाही. गेल्या महिन्यात रशियाकडून थोडीसी मदत मिळली होती.
तरुणाईचा रोष
फेब्रुवारीइराणनं आपल्या इस्लामिक क्रांतीचे 40 वर्षे पूर्ण केली. एक इस्लामिक रिपब्लिक म्हणून आज इराणची ओळख आहे. गेल्या चार दशकपासून दोन पिढ्या या क्रांतीत बीज रुपाने उगवल्या. पहिली पिढी धाक आणि परंपरावाद्याच्या सावटाखाली वाढली. जागतिकीकरणाची थेट लाभार्थी झाल्याने आर्थिक बलदंडता त्यांना लाभली.
थोडक्यात, ही पिढी धार्मिक सोयी-सुविधांचे फळ चाखत वाढली. पण येणारी दुसऱ्या पिढीनं तंत्रज्ञानाच्या कुशीत डोळे उघडले. वयात येता नवे प्रश्न, नवी अव्हानं आणि नवा देश त्यांच्यासमोर उभा होता.
मध्य आशियायी मुस्लिम देशात वाढती अस्थिरता, इस्रायलचा फैलावणारा अतिरेक त्यात तग धरु पाहणारे पॅलेस्टिनी, आयसिसच्या कचाट्यातून सुटू पाहणारे, इराकी व सिरियन, गृहयुद्धात अडकलेले अफगाण, पाकिस्तान आणि जगभरात वाढणारा इस्लाम फोबिया आदी घटना या इराणीयन पिढीच्या जगण्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आघात करून गेलेल्या आहे. त्या पचवत देशासाठी काहीतरी करू पाहणारी ही पिढी पाश्चात्त्य शिक्षण घेऊन युरोपियन राष्ट्राशी स्पर्धा करू पाहतेय. परंतु देशातील परंपरावादी व आदर्श शासन पद्धती डसर ठरत आहेत.
इराणमध्ये 1979च्या क्रांतीला एक प्रकारचे जनमत म्हणून पाहिलं गेलं. इराणनं इस्लामी आदर्शांनी शासन केलं पाहिजे, ही अट स्वत:ला घालून घेतली. या चाळीस वर्षांत जगभरात परिस्थिती कमालीची बदलली. तंत्रज्ञान व माहितीच्या अवाढव्य रूपाने जगाला बदलण्यास भाग पाडलं. उद्योग, शिक्षण, रोजगाराची साधने बदलली. जगात तंत्रज्ञानावर आधारित नवीन प्रणाली विकसित झाली. जगभरात लोकशाही सासन प्रणाली अमलात आली. इराणमध्ये मात्र आजही एकहाती सत्ता आहे.
निवडणुका होतात पण, सर्वोच्च नेते राष्ट्रासंबंधी अखेरचे निर्णय घेतात. गेल्या चार दशकापासून हीच परिस्थिती आहे. नव्या पिढीतले इराणियन या राज्य व्यवस्थेला पुरते कंटाळले आहेत. जुनाट कल्पना त्यांना आता नको आहेत. कालबाह्य कायदे, राज्यव्यवस्था बदलाची मागणी करत आहेत. गेल्या काही वर्षांत या सक्तींना झुगारणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी एक मोठी जनंसख्या चर्चेच्या पटलावर आली. ही पिढी सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या संघर्षाशी दोन हात करत अस्तित्वाच्या क्रायसिसचा सामना करत आहे.
विविध स्वरूपात देशावर आलेल्या संकटाच्या काळात देशातील नागरिक आपल्या सरकारसोबत आहेत. परंतु बेरोजगारी व महागाईनं नागरिक ग्रस्त झालेले आहेत. उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नसल्याने तरुणाई हवालदिल आहे. या समस्यांना देशातील कुठल्याच मीडियात जागा मिळत नाहीये. सरकारी माध्यमे शासनाची तळी उचलत आहेत. अशा हतबलतेच्या परिस्थितीत इराणियन लोकं ऑनलाईन प्लैटफॉर्मवर राग काण्याशिवाय काहीच करू शकत नाही.
क्रांती नकोशी
ट्विटरच्या फेक प्रोफाईलवरून इराणियन्स, प्रोटेस्ट, रिवोल्यूशन आदी हैशटैग वापरुन तरुणाई रोष प्रकट करत आहेत. अमेरिकेवर टीका करत आहेत. क्रांतीनं आमच्यासाठी काय केलं? ती आता असह्य आहे, असं सांगत आहेत. अनेकांना पाश्चात्त्य देशात नोकरीसाठी जायचं आहे. अनेकजण सांस्कृतिक क्षेत्रात करिअर करू पाहत आहेत. बहुतेकांना खेळ, संगीत आणि कला विश्वात रस आहे. काहींना गल्फमध्ये रोजगाराची संधी शोधायची आहे. परंतु आदर्श शासन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय संबंधात सुव्यवस्था इराणी तरुणांना अडसर ठरत आहे.
क्रांतीच्या चाळिशीच्या पार्श्वभूमीवर अल झजिरानं एक स्पेशल स्टोरी प्रकाशित केली. त्यात तरुण म्हणतात, देशातील नवी आव्हाने नव्या संकटाना आमंत्रण देत आहेत. तरुण फ्रस्ट्रेड असून त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. परिणामी हे धोरण ब्रेन ड्रेन वाढीण्यास कारणीभूत ठरली आहे. अनेक सुशिक्षित तरुण संधी मिळेल ती स्वीकारून देश सोडून जात आहेत. पण देशात या समस्याबद्दल ब्र उच्चारण्याची परवानगी नाही. बंद दाराआड तरुणाईच्या स्वप्ने तिष्ठत पडली आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून देशाला कोरोना संकटाने घेलं आहे. त्यामुले तरुणाईच्या प्रश्नात वाढ झालेली आहे. जगात चोहीकडे अनिश्तिता, हतबलता पसरली आहे. यात इरामी तरुण आपली स्वप्ने मरताना पाहत आहेत. आधीच आर्थिक निर्बध त्यात कोरोनाच्या संकटामुळे येणारी वर्षे त्यांना अंधारात दिसत आहेत.
वायरसमुळे लोकं मोठ्या प्रमाणात मरत आहेत. सरकार ही माहिती दडवत असल्याचा दावा अनेक पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी केला आहे. मृतदेहाचे खच पडल्याचे वीडिओ लिक होऊन वायरल झाली. बीबीसीच्या मते मेडिकल स्टाफची कमतरता असल्यानं अंत्यविधीत अडचणी येत आहेत. ही दाहक परिस्थिती पाहून अनेक तरुण-तरुणीचे गट कोरोना वॉरीयर्सबनून बाहेर पडले आहेत. त्यांनी मृतदेहाचे अंतिम विधीची कार्य हाती घेतलं.
रोज सहा-सात तास काम करत आहेत. सामूहिक कबरीत मृतदेह मातीसह लोटले जात आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपल्याच बांधवांचे, मित्रांचे व आप्त-स्वकीयांचे विक्षिप्त मृतदेह पाहवत नसल्याचे अनेक तरुणांनी अल जझिराकडे म्हटलं आहे. बहुसंख्य प्रोफेशनालिस्ट तरुणांनी ऑनलाईन शिकवणीचे कार्य हाती घेतलं आहे. अनेकजण सेवाभावी संस्थेच्या वतीने अन्नदानात सहभागी झाले आहेत. जगभरातील तरुणाई असाहयता, हतबलता आणि अनिश्चितने ग्रासलं आहे. ही परिस्थिती इराणमध्ये अधिक दाहकतेनं दिसत आहे.
क्रांतीच्या चाळिशीत मूलभूत धोरणं इराणसाठी संकट ठरतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंपरावाद्याच्या फाजिल आग्रहामुळे इराण वेगळा विचार करू शकत नाहीये. पाश्चात्य अभ्यासकांच्या मते कोरोना इराणच्या क्रांतीचा शेवट करू शकते. काहीही असो इराण आपणच विणलेल्या जाळ्यात अडकला आहे. लोक बदलाची मागणी करत आहेत. इराणनं वेळीच परिवर्तन स्वीकारलं नाही तर त्याचं भविष्य दुर्दैवी असू शकतं.

कलीम अजीम
पुणे
(सदरील लेख दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित झाालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,43,इस्लाम,38,किताब,18,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,276,व्यक्ती,7,संकलन,62,समाज,234,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: कोरोना संकटात इराण हतबल का झाला?
कोरोना संकटात इराण हतबल का झाला?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnlp_rjH49bptXlwB1vN6SLwAVPFt_0K11JONxpHTF8rAmuc3cibCFDBeWouPCifPuaGAGzIKs0o53-jczOjIiEkNrNFRpVtDvveoK2d_NNuKAhw9ZSvxAYwryhre1eKi3CYuiipWIBOlE/s640/Iran+Covid19.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgnlp_rjH49bptXlwB1vN6SLwAVPFt_0K11JONxpHTF8rAmuc3cibCFDBeWouPCifPuaGAGzIKs0o53-jczOjIiEkNrNFRpVtDvveoK2d_NNuKAhw9ZSvxAYwryhre1eKi3CYuiipWIBOlE/s72-c/Iran+Covid19.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content