मे महिन्याच्या 24 तारखेला न्यूयॉर्क टाइम्सच्या एका बातमीनं जगभराचं लक्ष आपल्य़ाकडे
खेचलं. वृत्तपत्रानं पहिल्या पानावर कोरोना वायरसनं मृत झालेल्या जवळपास लाखभर अमेरिकन
लोकांची नावं प्रकाशित केली होती.
या बातमीचं शीर्षक होतं ‘यूएस डेथ नियर 100,000 ऐन इनकैलकुलैबल लॉस.’ अमेरिकेत जवळपास एक लाख माणसं दगावली. आर्थिक नुकसान तर मोठेच आहे. कुठल्याही फोटोशिवाय बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
या बातमीचं शीर्षक होतं ‘यूएस डेथ नियर 100,000 ऐन इनकैलकुलैबल लॉस.’ अमेरिकेत जवळपास एक लाख माणसं दगावली. आर्थिक नुकसान तर मोठेच आहे. कुठल्याही फोटोशिवाय बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
कोरोना संकटापुढे महाशक्ती
म्हणवणाऱ्या अमेरिकेने गुडघे टेकले आहे. सर्व पातळीवर अपयश येत असल्यानं विषण्ण मनाने
राष्ट्रपतींनी एकदा म्हटलं होतं, ‘आम्हाला प्रार्थनेची सर्वाधिक गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रार्थनास्थळे उघडण्याचा
निर्णय घेत आहोत.’
जगात सर्वशक्तिमान समजला जाणाऱ्या देशाच्या त्याहून शक्तिमान समजल्या जामाऱ्या राष्ट्राध्यक्षाचे हे उदगार. कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या देशाच्या यादीत अमेरिका वरच्या स्थानी आलेला आहे. लॉकडाऊन हवं की नको यावर ट्रम्प यांनी बराच गोंधळ घातला. विरोधकांच्या सूचनाकडे दुर्लक्ष केलं आहे. जनतेच्या जिवापेक्षा आंतरराष्ट्रीय वर्चस्ववादाच्या राजकारणात ट्रम्पंचा अधिक रस दिसून येतोय, असा विरोधकांचा आक्षेप आहे.
जगात सर्वशक्तिमान समजला जाणाऱ्या देशाच्या त्याहून शक्तिमान समजल्या जामाऱ्या राष्ट्राध्यक्षाचे हे उदगार. कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या देशाच्या यादीत अमेरिका वरच्या स्थानी आलेला आहे. लॉकडाऊन हवं की नको यावर ट्रम्प यांनी बराच गोंधळ घातला. विरोधकांच्या सूचनाकडे दुर्लक्ष केलं आहे. जनतेच्या जिवापेक्षा आंतरराष्ट्रीय वर्चस्ववादाच्या राजकारणात ट्रम्पंचा अधिक रस दिसून येतोय, असा विरोधकांचा आक्षेप आहे.
वाचा : अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
जॉबलेस अमेरिका
लॉकडाऊन काळात लेबर मार्केटवर
सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाहीये. नोकऱ्या गमावल्याच्या बातम्या रोजच धडकत आहेत. परिणामी बेरोजगारी भत्ता पदरात पाडून
घेण्यासाठी सरकारी कार्यालयासमोर
लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यात तरुण-तरुणीची संख्या सर्वाधिक आहे.
देशव्यापी ताळेबंदीत ज्यांच्या
नोकऱ्या गेल्या, त्यांना सरकारने बेरोजगारी भत्ता देऊ केला
आहे. त्यासाठी 28 मे पर्यंत तब्बल 40 मिलियन जॉबलेस लोकांनी मदतीसाठी सरकारकडे याचना केली आहे. सरकारी मदत मिळावी म्हणून अर्ज भरणारे दिवसेंदिवस
वाढत आहेत. दि गार्डियनच्या मते अमेरिकेत गेल्या आठवडाभरात 30 लाख युवक जॉबलेस झाले. मागील तीन महिन्यात अमेरिकेत बेरोजगारांची
संख्या एकूण 3.86 कोटी झाली आहे.
कोविड पेन्डामिक, टाळेबंदी आणि त्यातून येऊ
घातलेल्या महामंदीच्या संकटावरून रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्समध्ये रोजच संघर्ष पहायला
मिळतोय. अमेरिकेसाठी हे निवडणूक वर्ष
आहे. ट्रम्प राष्ट्रपती पदासाठी
दुसऱ्यांदा इच्छुक
आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. एकीकडे भांडवलदारांना
खुश ठेवायचं तर दुसरीकडे मतदार, अशा डबल कसरतीत ट्रम्प व्यस्त आहेत.
विरोधी पक्षाच्या मागणीवरून
सरकारनं संघर्षरत राज्य आणि संक्रमित विभागासाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव मंजूर केला.
परंतु रिपब्लिकन नेत्य़ांचं म्हणणं आहे की, मागच्या सवलतीमुळे अर्थव्यवस्था
किती प्रभावित होईल, त्यावरून नवीन सवलतींवर विचार केला जाईल. मीडिया रिपोर्ट सांगतात की,
एप्रिल-जूनच्या तिमाहीत
देशाच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 38 टक्क्यांची घसरण येऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की ही आत्तापर्यंतची सर्वाती मोठी
घसरण असेल.
भविष्य भयानक
जॉबलेस संदर्भात प्रकाशित
झालेला न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट सांगतो की, देशात बेरोजगारीचं संकट भविष्यात भयानक रूप धारण करू शकते.
सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये
14.7 टक्क्यांनी बेरोजगारी वाढली. या महिनाभरात 2 कोटीपेक्षा अधिक लोकांनी आपला जॉब गमावला होता. तज्ज्ञांच्या मते मागील
महामंदीनंतर नोकरी गमावल्याचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. फेडरल रिजर्व्हचा अंदाज सांगतो
की, मे महिन्याच्या शेवटी ही सरासरी 20 ते 22 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
या शिवाय सेल्फ बिझनेस, फ्रिलांसर आणि लघुउद्योजकांचा आकडा मोठा आहे. तुर्तास सरकारकडे
त्यांची कुठलीच आकडेवारी नसल्यानं त्यांची नेमकी महिती मिळत नाहीये. ही मंडळी मदत केंद्रात
भत्त्यासाठी रजिस्ट्रेशनही करू शकत नाही. त्यांच्यासाठी अटी शिथिल कराव्यात अशी मागणी
केली जात आहे.
फ्लोरिडा, दक्षिण कैरोलिना आणि टेक्सास प्रांतात सर्वाधिक बेरोजगारी गणली
गेली आहे. या तीन राज्यात मोठ्या प्रमाणात तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यासंदर्भात 29 मे रोजी प्रकाशित झालेली एक बातमी धक्कादायक होती. बोईंग विमान
कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून
काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 6 हजार 770 लोकांची नोकरी जाणार आहे तर उर्वरित 5 हजार 520 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती
घेण्यास सांगण्यात आलं. भविष्यात अजून नोकऱ्या जाऊ शकतात, असंही कंपनीकडून कळविण्यात आलं आहे.
कृष्णवर्णीय व महिला सर्वाधिक
जॉबलेस
न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट सांगतो की, लॉकडाऊन काळात नोकऱ्या गमावणाऱ्यामध्ये
महिलांची संख्या लक्षणीय आहे. आकडेवारी सांगते की, मेच्या सुरुवातीला 11 दशलक्ष पुरुषांच्या तुलनेत सुमारे 11.5 दशलक्ष स्त्रियांनी नोकऱ्या गमावल्या. हॉस्पिटॅलिटी, रिसेप्शनिस्ट,
मेडिकल सर्विस, हॉटेलिंग, सर्विसिंग इत्यादी क्षेत्रातले हे जॉब आहेत.
शिवाय कुठलेही कारण न देता नोकरीवर न येणाऱ्या सर्वाधिक महिलाच आहेत, असा गार्डियनचा
रिपोर्ट सांगतो. एकीकडे कौटुंबिक हिंसा तर दुसरीकडे नोकरीचं गेल्याचं भय नव्या आजारांना
आमंत्रण देत आहे, असं निरिक्षण डाटा एनालिसिस फर्मनी नोंदवलं आहे. कृष्णवर्णीय लोकांनादेखील
सर्वाधिक नोकरी जाण्याचा फटका बसला आहे. त्यातही महिलांची संख्या लक्षणीय आहे.
दि गार्डियनचा रिपोर्ट सांगतो
कि जॉबलेस होण्यात आफ्रिकन वंशाच्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. रिपोर्ट म्हणतो की प्रत्येक मंदीच्या काळात
नोकऱ्यांना घेऊन ही मंडळी असुरक्षित असते. तज्ज्ञ सांगतात की या लोकांसाठी कोविड-19नं घेऊन आलेलं संकट नवं नाहीये. त्यांच्या मते प्रत्येक संकटात गोऱ्या लोकांच्या तुलनेत कृष्णवर्णीयांचा बेरोजगारीचा दर सरासरीपेक्षी दुप्पट असतो.
कोरोना संकटात कृष्णवर्णीय
लोकांशी उघडपणे भेदभाव होतोय, अशा अनेक बातम्या मीडियातून प्रकाशित झाल्या. यावरून माजी राष्ट्रपती
बराक ओबामा यांनी ट्रम्प सरकारला धारेवर धरलं होतं. गेल्या आठवड्यात एका कृष्णवर्णीय तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यु झाला होता. यावरून सध्या अमेरिकेत वांदग सुरू आहे.
ठिकठिकाणी जाळपोळ,
दंगे-धोपे सुरू आहेत.
या घटनेनं अमरिका सध्या अस्थिरतेतून जात आहे. कृष्णवर्णीयांचा आरोप आहे की, हा वर्णद्वेषी हल्ला आहे. I Can't breathe हे आंदोलन देशव्यापी रूप घेत आहेत.
या घटनेनं अमरिका सध्या अस्थिरतेतून जात आहे. कृष्णवर्णीयांचा आरोप आहे की, हा वर्णद्वेषी हल्ला आहे. I Can't breathe हे आंदोलन देशव्यापी रूप घेत आहेत.
घटनेच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यात हजारो आफ्रिकन
वंशीय तरुण रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. आत्ताही ठिकटिकाणी आंदोलनं होत आहेत. अमेरिकेत
सातत्यानं वर्णद्वेशी हल्ले वाढली आहेत. मानवी हक्क संघटनेच्या मते ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर असा हल्ल्य़ात
वाढ झाली आहे. वांशिग्टन पोस्टच्या मते 2015 पासून आत्तापर्यत पोलिसांच्या तावडीत असताना
4,450 वर्णद्वेशी हल्ले झाले आहेत. बहुतेक घटनात पीडित मृत झाले आहेत.
कोरोना संकटाच्या काळात वर्णद्वेशी
हल्ल्यावरून अशा प्रकारचे आंदोलन होणे, सरकारची प्रतिमा डागाळणारी घटना आहे. या घटनेवरून
जगभरातील वृत्तपत्रांनी ट्रम्प यांच्या लहरी धोरणावर टीका केली. मानवी हक्क संघटनांनी
ट्रम्प यांना वर्णद्वेशी म्हटलं आहे.
वाचा : लॉकडाऊन डायरी : फेक नरेशन आणि मुस्लिम
जगभरात
बेराजगारी भत्ता
कोरोना वायरसमुळे जगभरात अस्वस्थतेचं
वातावरण आहे. या संकटाचा सामाना करण्यासाठी विविध देशांनी विशेष पॅकेजची घोषणा केली
आहे. जगात आर्थिक संकट आ वासून उभं आहे. नोकऱ्या जाण्याचं संकट अनेक देशात येऊ घातलं
आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह ब्रिटेन, ग्रीस, जापान, नॉर्वे, स्पेन, फ्रान्स आणि कॅनडानं बेरोजगारी भत्ता जारी केला
आहे.
बाकी देशाच्या तुलनेत अमेरिकेत
सर्वाधिक नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुले सरकारनं नोकरदारांना बेरोजगारी भत्ता
देऊ केला आहे. जो
सैलरीपेक्षा दीड पटीने
अधिक आहे. संस्था आणि वीमा कंपन्यातर्फे
हा मोबदला दिला जात आहे. अमेरिकीन श्रम विभागाच्या मते सरकार बेरोजगारांना 45 हजार रुपए भत्ता देत आहे. मात्र त्यांचा पगार सरासरी 30 हजारच्या जवळपास आहे. अशावेळी काम न करता भत्ता घेणाऱ्यांची
संख्या वाढली आहे. परिणामी सरकारची डोकेदुखी वाढली असून सरकारने नोकरीवर
बोलविल्यासही न येणाऱ्या लोकांची यादी मागितली आहे.
कोविड आणि जॉबलेस या दुहेरी
संकटात अमरिकन तरुण अडकला आहे. स्थलातरित आपापल्या देशात गेल्यानं कोविंडनंतर परिस्थिती
बदलेल असं बहुतेक तरुणांना वाटते. दुसरीकडे अमेरिकेतून बाहेर पडलेला मॅन पावर आता आपला
देश बरा, अशी भावान व्यक्त करत आहे. म्हणजे कोविडनंतर अमेरिकेत जॉब मार्केटमध्ये तेजी
येईल अशी बाळगण्यास हरकत नाहीये.
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये 'आय काण्ट ब्रीद' शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे)
कलीम अजीम, पुणे
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem
मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com