अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट

कोरोना संकटाच्या काळात जगभरात व्हेंटिलेटरची समस्या भेडसावत आहे. जागतिक बाजारात संख्येनं कमी असलेल्या या यंत्राची किंमत 30,000 डॉलर म्हणजे अंदाजे 23 लाख रुपये आहे. अवाढव्य किमतीत असलेले हे व्हेंटिलेटर गरीब देश क्षमतेपेक्षा जास्त खरेदी करू शकत नाही. अशावेळी त्यांच्यासमोर कोरोनाशी लढण्याचं संकट उभं राहिलं आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी अफगाणी तरुणींनी एक अनोखी शक्कल लढवली.
कारचे स्पेअर पार्ट जुळवून या अफगाण मुलींनी व्हेंटिलेटर तयार करण्याचा प्रयोग सुरू केला. दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहे.
पाच सदस्यीय मुलींच्या या टीमला रोबोटिक्स गर्ल्स गैंगम्हटलं जात आहे. हार्वर्ड यूनिवर्सिटी आणि स्थानिक हेल्थ एक्सपर्ट सोबत हे सदस्य या प्रोजेक्टवर काम करत आहे. एका प्रतिष्ठित टेक कंपनीनं टीमला साधन-सामृग्री पुरवत मदत केली आहे. हे बहुप्रतिक्षित प्रोडक्ट मैसेचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीनं दिलेल्या डिजाइनच्या आधारावर तयार केला गेला आहे.
व्हेंटिलेटर कल्पकता
मार्च महिन्यात अफगाणिस्तानमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. व्हायरसनं हेरात प्रांत सर्वाधिक संक्रमित केलेलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत 7,650हून अधिक बाधित तर 178 पेशंटचा मृत्यु झाला.
बीबीसीच्या मते 3.5 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात फक्त 400 व्हेंटिलेटर आहेत. कोरोनाचा धोका लक्षात येताच हेरातचे राज्यपाल अब्दुल कय्यूम रहीमी यांनी एक्सपर्टची एक बैठक बोलावली. त्यात डॉक्टर, पीएचडी स्कॉलर, ग्रॅज्युएट्स, स्थानिक उद्योजक आणि संशोधक सामील होते. त्यांच्यासह रोबोटिक्स गर्ल्सनादेखील निमंत्रित करण्यात आलं होतं. या टीमनं 2017मध्ये अमेरिकेत एका यांत्रिक शोध प्रकल्पात पुरस्कार पटकावला होता.
उपलब्ध असलेल्या बॅग-वाल्व-मास्क या कृत्रित श्वसनयंत्राच्या मर्यादेबद्दल या मिटिंगमध्ये चर्चा झाली. नाकाला लावलेली ही एक छोटीशी श्वसन पिशवी असते. त्यातून प्रेशरच्या साहाय्याने नाक व फुफुसापर्यंत श्वास पोहचवला जातो. हे डिवाइस बरेच स्वस्त आणि सामान्य आहे.
रुग्णांना श्वास घेण्यास मदतीसाठी अम्ब्युलंस आणि इमरजन्सी काळात ते वापरलं जातं. नव्या संकटात यातून फारसं काही हाती लागणार नव्हतं. चर्चेअंती असं ठरलं की देशात स्वनिर्मित व्हेंटिलेटर तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात यावा.
अर्थातच रोबोटिक्स गर्ल्स गैंगच्या चमूनं यासाठी पुढाकार घेतला. बाईक आणि कारच्या स्पेअर पार्टसमधून हे उकरण तयार करण्याची कल्पना मांडण्यात आली. टीमनं कामाला सुरुवात केली.
विशेष म्हणजे या रोबोटिक टीममध्ये असणाऱ्या मुली या 14 ते 17 वयोगटातील आहेत. टीमची 17 वर्षीय सदस्य डिझाईनर रोया महिबूब म्हणते, ‘राज्यपालांच्या मंजुरीनंतर ओपन सोर्सच्या माध्यमातून ऑनलाइन डिजाईन शोधण्याचं काम सुरू झालं. त्यातून काही डिजाईन हाती लागली.
टीमची कॅप्टन सुमैय्या फारूकी म्हणते, ‘आम्ही मुद्दाम असं डिझाईन निवडलं, जिथं कमी तंत्रज्ञान आणि त्याचे पार्ट्स सहजरीत्या कुठेही मिळू शकतील. जेणेकरून कमी वेळात ते तयार करता येईल. या डिवाइससाठी मायक्रो प्रोसेसर इन्स्टॉल करण्याची गरज होती. ती निकड किशोरवयीन मुलांसाठी तयार केलेल्या रोबोटिक्स किटमधून भागू शकली.
डिवाइसची निर्मिती
नेमकं कुठली कार्यपद्धती ही टीम वापरत आहे, याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नाही. पण टोयोटा ब्रँडची कोरोला कारची मोटर आणि आणि होंडा बाइकच्या चेन ड्राईव्हच्या वापरातून हे एक डिवाईस तयार केला आहे.
एक वेबसाईटच्या मते व्हेंटिलेटरसाठी दोन महत्त्वाची पार्ट्स लागतात. प्रेशर ट्रान्सड्यूसरया सेन्सरमुळे श्वासोच्छवासापासून एक प्रकारचा दवाब तयार करून तो विद्युतीय सिग्नलमध्ये रूपांतरित केला जातो. त्या सिग्नलवर मायक्रो प्रोसेसर हवेच्या पंपमध्ये प्रक्रिया करतो. या दोन डिवाइसची किंमत 50 हजार डॉलर आहे. पण अफगाणच्या रोबोटिक टीमनं त्यावर मात करून उपलब्ध असलेल्या साधनात हा डिवाइस तयार केला आहे.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत टीम प्रमुख सुमैय्या सांगते, या डिवाइसचा महत्त्वाचा पार्ट अंबू बॅग तयार करणे एक आव्हान होतं. पेशंटचं वय व त्याची श्वासाची गरज पाहता आरोग्य सेवक त्याचं प्रेशर निश्चित करत. पण यावर तोडगा म्हणून आम्ही ऑटोमैटिक व्हेंटिलेटर तयार केलं.
हार्वर्ड विद्यापीठातील सर्जन डग्लस चिन यांनी अफगाण रोबोटिक टीमल मदत करण्याचं आश्वासन दिलं. ते म्हणतात, ‘अस्तित्वात असलेल्या व्हेंटिलेटरची किंमत साधारणत: 50,000 डॉलर आहे. त्या तुलनेत हे व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी सुमारे 500 डॉलरचा खर्च येऊ शकतो.
रोबोटिक गर्ल्सच्या या प्रयोगावर काही तज्ज्ञानी शंका व्यक्त करत म्हटले की, या डिझाइनला एफडीएची मान्यता मिळणे कठीण आहे. पण या टीमकडे देशातील नागरिकांचे आयुष्य वाचवण्यासाठी याशिवाय दूसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. टीमची एक सदस्य नाहिदी रहीमी म्हणते, ‘यावेळी आमच्यासाठी एक-एक आयुष्य वाचवणं महत्त्वाचं आहे.
सर्वात कमी खर्च
उत्तम क्वालिटीचं व्हेंटिलेटर उपलब्ध न होऊ शकल्यास हे उपकरण श्वसनाचा त्रास कमी करून जगण्यासाठी धडपडत असलेल्या पेशंटला तात्काळ दिलासा मिळवून देऊ शकतं, असं कोरोना वॉरियर्सचं म्हणतात. गेल्या सहा आठवड्यांपासून टीम या डिवाइसवर अहोरात्र मेहनत घेत आहे.
या डिवाइसचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. एप्रिल महिन्यात त्याला डब्ल्युएचओकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात त्याची फायनल चाचणी घेण्यात आली. दूसऱ्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.
टीमची फाउंडर रोया महबूब स्वत: एक उद्योजक आहे. ती डिजिटल सिटीझन फंड या डिवाइस तयार करणाऱ्या सहयोगी फर्म प्रमुख आहे. टाइम मैग्जीनच्या 100 प्रेरणायी व्यक्तींच्या यादीत तिचं नाव समाविष्ट आहे. तिच्या मते एकदा हे डिवाइस पूर्ण झाले की अतिरिक्त उत्पादित करून हँडओव्हर केलं जाईल.
या उपरकरणासाठी केवळ 28 हजार 800 रुपये खर्च आलेला आहे. कोरोना संकटात हे कमी खर्चातलं व्हेंटिलेटर तयार करून डॉक्टर आणि नर्सना आधार देऊ शकलो, याचा अभिमान रोबोटिक टीम बाळगत आहे.
अफगाण ड्रीमर्स म्हणून ओळखल्या जात असलेल्या या रोबोटिक टीमचं लक्ष्य जगाला कमी किमतीत व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचं आहे. टीम म्हणते की, आमचा भविष्यात असा व्हेंटिलेटर तयार करण्याचा प्रयत्न आहे, जो गरीब देश केवळ 45 हजार रुपयात खरेदी करू शकेल.
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तान

वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
कोरोनासारख्या महाभयंकर रोगराईला रोखण्यासाठी 17 वर्षांच्या या मुली सरसावल्या आहेत. अफगाण सरकारने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांना राषट्रपती अशरफ गणी यांनी वैयक्तिकरित्या आदेश दिले आहेत.
अफगाणिस्तान गेल्या दोन दशकापासून युद्ध व दहशतीच्या छायेखाली जगत आहे. आकडेवारी सांगते की, तिथं महिला शिक्षमाचं प्रमाण केवळ 30 टक्के आहे. अशा प्रकारच्या प्रतिकूल आव्हानांवर मात करत रोबोटिक टीमनं केलेलं हे कार्य विधायकच नाही तर येणाऱ्या अफगाणी पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे.

कलीम अजीम, पुणे
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTd1TrARmVn4QSOvpjWZJCRxYCVrPxs9r1f1uGMMwwTjO7rEXnM_gtStFIhZHGY-4hztVb9slRBKqj1JdMAwS2aQvHD8hSiqK7S6S2RIC91N1oC9nu1wBTevRLv_V0K7rypiTbDqsYfkjV/s640/Girl+Robotics+Team+In+Afghanistan.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTd1TrARmVn4QSOvpjWZJCRxYCVrPxs9r1f1uGMMwwTjO7rEXnM_gtStFIhZHGY-4hztVb9slRBKqj1JdMAwS2aQvHD8hSiqK7S6S2RIC91N1oC9nu1wBTevRLv_V0K7rypiTbDqsYfkjV/s72-c/Girl+Robotics+Team+In+Afghanistan.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_26.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_26.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content