कोरोनामुळे स्पेनच्या शवागारात साचले प्रेतांचे खच

गेल्या तीन महिन्यांपासून यूरोपीय राष्ट्रांना कोविड19 रोगराईचा भयंकर विळखा पडला आहे. त्यात इटली व स्पेन हे सर्वाधिक सेंसिटिव्ह देशघोषित झाली. हजारोंच्या संख्येनं झालेल्या मृतांनंतर आता या इथं परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.
जगभरात सुंदर देश म्हणून मान्यता पावलेला स्पेन सध्या बकाल व त्रस्त आहे. गेल्या तीन महिन्यापासून तिथं अलार्म ऑफ स्टेटम्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे. राजधानीसह तीन शहरं डेंजर झोन घोषित केलेली आहेत.
कोरोना संकटातून सावरण्याचा 90 दिवसात स्पेनचा बराचसा प्रयत्न यशस्वी झाला आहे. काही दिवसांपासून तिथं नियमात शिथिलता दिली जात आहे. आठवडाभरापूर्वी लहान मुलं व सिनियर सिटिजन स्पेनच्या रस्त्यावर दिसले.
अल जझिराच्या मते स्पेनमध्ये गेला रविवार म्हणजे 17 मे हा दिवस सर्वात कमी मृत्यूचा ठरला. त्या दिवशी एकूण 87 पेशंट दगावले. आदल्या दिवशी शनिवारी 104 मृ झाले होते. वर्ल्डमटर सांख्यिकी वेबसाईटचा रिपोर्ट सांगतो की रविवारी दिवसअखेर 277, 719 संक्रमित नोंदवण्यात आले. तर मृतांचा आकडा हा 27,650 पर्यंत येऊन थांबला. विशेष म्हणजे स्पेनचा आतापर्यंतचा रिकव्हरी रेट 195,945 आहे. जो जगात सर्वोत्कृष्ट मानला जात आहे.
काय होती स्थिती?
एप्रिलमधील स्पेनच्या कोरोना बाधीत मृतांच्या बातम्या ऐकून जगात चिंतेचं वातावरण तयार झालं. परंतु त्यातून धडा घेत कुठल्याही देशाने पुरेशा उपाययोजना आखल्या नाही. परिणामी आज अमेरिका, ब्रिटेन, ऱशिया आणि ब्राझीलमध्ये परिस्थिती फार बिकट झालेली आहे. अमेरिका 89,133 मृतांची संख्या नोंदवत क्रमांक एक; तर ब्रिटेन 34,466 मयतीसह दोन नंबरवर आहे.
कोरोना संकटाशी दोन हात करतानाचा स्पेनचा गेल्या तीन महिन्याचा प्रवास आणीबीणीचा होता. मृत्युदरात सर्वात वरचा क्रम असलेला हा देश आता सावरतोय. 12 मार्चला इथं कोरोना रोगराईनं घुसखोरी केली. याच महिन्यात रॉयल फॅमिलीत राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. त्या 86 वर्षांच्या होत्या. पुढे बघता-बघता स्पेनमध्ये मृतांचा खच पडत गेला.
14 मार्चपासून देशांत संपूर्णत: लॉकडाऊन म्हणजे इमरजन्सी लावण्यात आली होती. त्याच दिवशी राजधानी मॅड्रीड’, ‘कॅटोलोनियाव दक्षिणेतील ज़ाहरा डे ला सिएराही बडी ठिकाणं सील करण्यात आली. पुढे काही तासांतच देशात हाहाकार माजला.
ज़ाहरा डे ला सिएराया शहराने तात्काळ पावले उचलत देश व जगाशी आपला संपर्क पूर्णत: तोडून स्वत:ला वेगळं केलं. शहरात येणारे 5 प्रवेश द्वार बंद केलं. नागरिकांनाही घराबाहेर निघण्यास कडक प्रतिबंध लावला. त्यामुळे तिथं मृतांचा आकडा सरासरीपेश्रा कमी म्हणजे 2,811 राहिला. इथं वयस्क लोकांची संख्या तब्बल 60 टक्के आहे.
सॅटिस्ताया अनालिटिकल वेबसाईटच्या मते आतापर्यंत एकट्या मॅड्रीडमध्ये 8,720 तर पाठोपाठ कॅटोलोनियात 5,621 मृत्यू नोंदवण्यात आले. 25 मार्चला स्पेनमध्ये 7,457 कोरोना संक्रमित तर 656 पेशंट मृत झाले. त्यानंतर दिवसाकाठी मृतांचा आकडा 800 ते 900 होत गेला. 1 एप्रिलला 8,195 संक्रमित आढळून आले. त्याचदिवशी तब्बल 923 लोक मरण पावली. या महिन्यात सरासरी 500-600 संक्रमितांचा मृत्यू होत. 1 मे नंतर हा आकडा कमी होत 275 वर आला. स्पेन हेल्थ मिनिस्ट्रीच्या मते 17 मे रोजी रविवारी फक्त 87 कोरोना पेशंट दगावले.
सामान्य पेशंटचं काय?
सरकारचं पूर्ण लक्ष कोरोनावर असल्यानं अन्य किरकोळ आजाराचे पेशंट दुर्लक्षित झाले. याचा भयंकर परिणाम दिसून आला. इकोनॉमिक टाइम्सच्या मते लॉकडाउनमुळे ही अवस्था अती वाईट श्रेणीत गेली. रिपोर्ट्स सांगतात की हार्ट पेशंट आपला मानसिक तोल सांभाळू शकले नाही. एप्रिलमध्ये कोरोनाव्यतिरिक्त मरणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. इटीचा रिपोर्ट सांगतो की, घरात मृतदेह पडून राहिल्याने मिलिट्रीला पाचारण करावं लागलं.
लष्कराच्या मते मृतदेह हटविताना वेदनादायी प्रसंग दिसले. वृद्ध उपचाराविना तडफडत होती. ब्लडप्रेशर व हार्ट पेशंट बेवारस अवस्थेत पडली होती. काही वयस्क मानसिक आघातानं मृत झाल्याचेही रिपोर्ट्स आहेत. दूसरीकडे कोरोनामुळे हॉस्पिटलच्या शवागारात प्रेतांचे खच साचले होते. सामूहिक कबरीत हजारो मृतदेह कुठल्याही अंत्य संस्काराशिवाय मातीच्या ढिगाऱ्यात निर्दयपणे लोटले जात होते. बीबीसीनं या संदर्भात जारी केलेला एक वीडियो डोळ्यानं न पाहण्यासारखा होता. फेक न्यूजनं ही स्थिती आणखीन विदारक केली.
गार्डियनच्या मते स्पेनमध्ये कोराना संकाटने वृद्ध व लहान मुलांना साइलेंट ट्रामासारख्या मानसिक आजाराने घेरलं आहे. गार्डियनच्या बार्सिलोनाच्या या स्पेशल स्टोरीत लॉकडाऊनमुळे लहान मुलांवर कठोर अटी लादण्यात आलेल्या असून ते पालकांच्या भयात जगत असल्याचा निरिक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. घरात असणाऱ्या वृद्धांचीही अवस्था बिकट असल्याचे हा रिपोर्ट सांगतो.
परिस्थिती नियंत्रणात
मार्च-एप्रिल 2020 स्पेनच्या इतिहासातला हे सर्वाधिक दुर्दैवी महीने ठरले. या 50 दिवसात 22 हजार पेक्षा जास्त कोराना संक्रमितांचा मृत्यू झाला. या काळात दररोज सरासरी 8000 नवीन संक्रमित आढळत. आता ही संख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली असून केवळ 3000 हजारावर थांबली आहे.
एप्रिल अखेर स्पेनची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अंतिम उपाययोजनेतून मेच्या सुरुवातीला स्थितीवर बऱ्यापैकी ताबा मिळवता आला. आजमितीला स्पेनमध्ये 74 हजार एक्टिव पेशंट आहेत. तर तब्बल 195,945 लोकं बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. स्पेनमध्ये 12 मार्च ते 9 मे पर्यत लॉकडाऊन होता. पंतप्रधान पेंद्रो सांचेज यांनी तो आता एका महिन्यापर्यंत वाढवला आहे.
तुर्तास औद्योगिक वसाहती, मैन्युफैक्चरिंग आणि कंस्ट्रक्शन सेक्टर सुरू करण्यात आली आहेत. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास सूट आहे. त्यासाठी सरकारने नवी नियमावली जारी केली. फिजिकल डिस्टेंसिंगच्या अटी कसोशीनं पालनाचे आदेश काढण्यात आले. कामगारासाठी कोट्यवधी फेस मास्क वितरित केले जात आहेत. सरकारतर्फे दररोज मास्क दिले जात आहेत.
आज घडीला स्पेनमध्ये इतर यूरोपीयन देशातून येणाऱ्या सीमा पूर्णत: सील आहेत. सीमेपलीकडील रस्ते वाहतूकीवर निर्बंध लादण्यात आलेले आहे. फ्रान्स आणि पुर्तगाल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मॅड्रीड व कॅटोलोनिया शहरे पूर्णत: बंद आहेत. स्थानिक सरकारची मागणी फेटाळून लावत इथं केंद्रीय सरकारने अनेक प्रतिबंध जारी केले आहेत.
वाचा : आणि मैक्सिकोत महिला झाल्या अदृष्य
वाचा: मोरक्कोत गर्भपातबंदी शिथिलतेची मागणी
लॉकडाऊनचा विरोध
इटली, जर्मनी, ब्रिटेन बगळता अन्य यूपोरीय देशात जिथं हे संकट नाही त्या ठिकाणी नियमात कठोरता आणली गेली आहे. लॉकडाऊन कायम असून दूकानदार व सार्वजनिक परिवहनमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आलेले आहे. अन्य यूरोपीय देशात लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी 16 मे रोजी विविध ठिकाणी निदर्शन झाली. ज्यात ब्रिटेन, पोलंड, जर्मनीतील नागरिक सामील होते.
कोरोनारामुळे मृत्युची पहिली घटना 1 जानेवारीला वुहानमध्ये घडली होती. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते जगभरात कोरोनामुळे झालेले सर्वाधिक मृत्यू यूरोपीयन राष्ट्रातील आहेत. मृतांची संख्या एक लाख पोचण्यास 91 दिवस लागले तर पुढील 16 दिवसात हा आकडा वाढून दोन लाख झाला. हा आकडा 3 लाखांपर्यत वाढण्यास पुढचे 19 दिवस लागले. धक्कादायक म्हणजे यातल्या 50 टक्के घटना एकट्या अमेरिका, ब्रिटेनस स्पेन आणि इटलीत घडलेल्या आहेत.
सोमवारपर्यंत जगभरात 47 लाख कोरोना संक्रमित पेशंटची नोंद झाली. तर मृतांची संख्या सवा तीन लाख 15 हजारांवर गेली आहे. साख्यिकी वेबसाईट वर्ल्डमीटच्या मते जगात अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना पेशंट ब्राझील, ब्रिटेन, रशिया आणि फ्रान्समध्ये आहेत. मृत्युदरात स्पेन पाच क्रमांकावर तर रशिया 18 नंबरवर आहे. विशेष म्हणजे या दोन्ही देशाचा रिकव्हरी रेट चांगला आहे.  

Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: कोरोनामुळे स्पेनच्या शवागारात साचले प्रेतांचे खच
कोरोनामुळे स्पेनच्या शवागारात साचले प्रेतांचे खच
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuTqej7XX2QYJNMIFGqBua2Nf6WlekliHuSJZ_WbMuesg0EQkc5BGqa6A2MWoxDrvNAKvs-yGcrw4DDOUm4SzSVyHP8cv_mhWZurAKHj1tqkZ3TX4pNozWE0cXpE2y2uTBwMJo1HeejLw6/s640/Spain+Corona.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuTqej7XX2QYJNMIFGqBua2Nf6WlekliHuSJZ_WbMuesg0EQkc5BGqa6A2MWoxDrvNAKvs-yGcrw4DDOUm4SzSVyHP8cv_mhWZurAKHj1tqkZ3TX4pNozWE0cXpE2y2uTBwMJo1HeejLw6/s72-c/Spain+Corona.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_19.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/05/blog-post_19.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content