दोन आठवड्यापूर्वी ‘नासा’ने नवा इतिहास रचत प्रथमच दोन महिलांना एकट्याने स्पेसवॉकला पाठवलं. स्पेस स्टेशनच्या एका उपकरणाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नासाने ही सफर घडविली होती. क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेयर असं या दोन महिला वैज्ञानिकांचं नाव आहे. कोच या इलेक्ट्रीक इंजिनिअर असून मेयर या सागरी जीवशास्त्रात पीएचडी आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार १८ ऑक्टोबर
शुक्रवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी नासाच्या चमूने अवकाशात उड्डाण भरले. काही
तासातच म्हणजे ११ वाजून ३८ मिनिटांनी ते स्पेस स्टेशनवर दाखल झाले.
स्पेस स्टेशनमध्ये पावर कंट्रोलर आणि डिचार्ज यूनिट खराब झालेले होते. त्याची दुरुस्ती करण्याचे
काम क्रिस्टिना आणि जेसिका यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. दीर्घकाळ चाललेल्या या मोहिमेत
अनेक रोमांचक अनुभव आल्याचे त्या दोघींनी प्रसारमाध्यमांना सागितलं आहे.
वॉल स्ट्रिट जर्नलला जेसिका यांनी अत्यंत भावस्पर्शी
प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणतात, “महिला फक्त डेक्सवर बसून काम करण्यासाठी नाहीयेत.
आपण काय काम करतो, त्याचे महत्त्व त्याच्या स्वरूपामुळे ठरते. त्याच आधारावर तुमच्या
यशाच्या शक्यताही वाढू शकतात. त्यामुळे वेगळेपण साधण्याचा प्रयत्न नेहमी करायला
हवा. अशा यशस्वी कथांमधून प्रेरणा घेणारी आज बरीच लोक आहेत आणि मला वाटते की सर्वंनी
त्यांना ही महत्त्वाची कहाणी सांगावी.”
क्रिस्टिना यांनीदेखील या मोहिमेबद्दल भावूक
होत म्हटलंय, “मला ११ वर्षाची मुलगी आहे. मी मोठी होत असताना ज्या
संधी मला भेटल्या त्याच तिच्यासाठी मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे.” नासाच्या
मते त्यांच्यासाठी ही सामान्य बाब आहे. नासात ५० टक्के महिला एम्प्लॉई काम करतात,
त्यामुळे आमच्यासाठी रुटीन होतं, असं नासाने म्हटलंय.
परंतु जॉन्सन स्पेस सेंटरने ट्वीट करून या
मोहिमेबद्दल क्रिस्टिना आणि जेसिकांचे कौतुक केलंय. ‘आजचा
दिवस मोठा आहे. जिथे कुठे आपण या मोहिमेला बघत आहात तिथून आमच्यासाठी शुभेच्छा द्या
आमचा उत्साह वाढवा.' असं म्हटलं. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये सेंटरने
क्रिस्टिना आणि जेसिका यांचा पावर कंट्रोलर दुरुस्ती करतानाचा व्हिडिओ अपलोड करत
दोघींचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
अंतराळातील उपग्रह व अन्य यंत्रणेसाठी सौर
उर्जेचा वापर केला जातो. अंतराळ केंद्रात जिथे प्रकाशकिरणे पोहोचत नाहीत अशा ठिकाणी बॅटरीची गरज
भासते. स्पेस स्टेशनचे हे साधन सिस्टिमसाठी
सोलर उर्जा संकलित करून त्याचा पुरवठा करते. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते काही
महिन्यापूर्वी सिस्टिममध्ये नव्या बॅटऱ्या बसविल्या होत्या. गेल्या महिन्यात त्या
नादुरुस्त झाल्या. या उपकरणे बदलण्यासाठी नासाने हा स्पेसवॉक घडवून आणला होता.
महिला वैज्ञानिकांची ही अंतराळ सफर २९ मार्च
२०१९ला पार पडणार होती. क्रिस्टिना कोच यांच्यासोबत एनी मॅकक्लेन या सफरीवर जाणार होत्या. परंतु महिलांसाठी
योग्य असलेले स्पेससूट उपलब्ध नसल्याने ही मोहीम त्यावेळी स्थगित करण्यात आली.
वाचा : नागपूरच्या अमेरिकन सिनेटर गझाला हाशमी
स्पेस स्टेशनच्या बाहेर काम करण्यासाठी स्पेससूट
लागतो. त्याला ‘एक्स्ट्रा वेहिकुलर
मोबिलिटी यूनिट’ म्हटले जातं. नासाच्या
प्रवक्त्या स्टेफनी शियरहोलज यांच्या मते एक स्पेससूट तयार करण्यासाठी किमान १२
तासांचा अवधी लागतो. तर त्याला परिधान करण्यासाठी सुमारे तासभर लागतो. स्पेससूट अंतराळात यात्रेकरूंना ऑक्सिजनचा पुरवठा
करतो. तसेच अत्याधिक तापमान, किरणोत्सर्ग आणि अंतराळातील
धुलीकणापासून त्यांचे संरक्षण करतो.
वैज्ञानिक
मॅकक्लेन यांनीच त्यावेळी ट्वीट करून अंतराळ यात्रा स्थगित झाल्याने दुख व्यक्त
केलं होतं. यावेळी नासावर जगभरातून टीकेची झोडदेखील उठवण्यात आली होती. स्पेससूट तयार करताना महिलांसाठी वेगळा सूट
तयार का केला जात नाही, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला. नंतरच्या काळात
यावरून बरेच राजकारण शिजलं होतं. हिलरी क्लिटन यांनी नासा व अमेरिकन सरकारवर ठपका
ठेवत लैंगिक भेदभावाचा आरोप केला होता. त्यानी ट्विट करून ‘नवीन सूट तयार करा’ असे म्हटले होते.
सध्या वापरात असलेला स्पेससूट
१९७४मध्ये विकसित केले गेले आहेत. त्यावेळेसपासून हाच सूट वापरात आणला जातो.
गेल्या ४ दशकात त्याला अनेकदा अपग्रेड करण्यात आलं. परंतु ते अजूनही कंम्फर्टेबल
नाही, असा सूर अधून-मधून निघत असतो.
नासाने गेल्या ५० वर्षात उपकरणाच्या
दुरुस्तीसाठी ४२० स्पेसवॉक केले आहेत. यंदाचा ४२१वा होता. चालू वर्षी याच कामासाठी
आठवेळा अंतराळ सफरी झाल्या आहेत. सर्व अभियानात पुरुष वैज्ञानिकासोबत अनेक महिला
वैज्ञानिकांनीदेखील भाग घेतलेला आहे. आतापर्यंत १५ महिलांनी ४२
वेळा स्पेसवॉक केला
आहे. १९६३ साली सोवियत रशियाच्या व्हॅलेंतिना
तेरेश्कोवा या पहिल्या अवकाशयात्री ठरल्या होत्या. तर १९८२मध्ये स्वेतलाना
सावित्स्काया यांना पहिल्या अमेरिकी महिला स्पेसवॉकर म्हणून मान मिळाला होता.
स्पेस स्टेशनवर अंतराळात एकट्य़ाने स्पेसवॉक
करणाऱ्या क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेयर या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांनी
एकट्य़ांनीच स्पेस स्टेशनवर उतरून आपली मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. त्यांच्यासोबत
या सफरीवर चार पुरुष वैज्ञानिकही होते. मात्र ते अंतराळ यानाबाहेर उतरले नाहीत. सुमारे
६ तास अवकाशात व्यतित केल्यानंतर क्रिस्टिना आणि जेसिका पृथ्वीतलावर परतल्या.
जाणकारांच्या मते महिलांच्या बाबतीत नासाने
उचललेलं गेल्या ५० वर्षातले हे पहिलेच धाडसी पाऊल होतं. नासा २०२४पर्यंत चंद्र आणि
मंगळ ग्रहावर महिलांना पाठवणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून या स्पेवॉककडे पाहिलं
जात आहे.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com