प्रिन्स हैरी आणि मेगन मर्केलची 'ब्रेगक्झिट'




जगभरातील लोक एकीकडे चंगळवाद आणि सुखासिन आयुष्यासाठी धडपत आहेत. परंतु ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्य आणि महारानी एलिजाबेथ यांचे नातू प्रिन्स हैरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्कल यांनी राजेशाही सुख आणि संपत्तीचा त्याग करण्याची घोषणा केली आहे. राज घराण्याच्या सोयी-सवलती आणि थाटबाट सोडून स्वत आत्मनिर्भर होण्याच्या निर्णयानं त्यांनी जगाला चकित करून टाकलं आहे.
रॉयल कपलनं ही घोषणा इंस्टाग्राम’ या सोशल साईटवरून केली आहे. पाच दिवसानंतर तब्बल 1,797,421 लोकांनी या निर्णयाला पसंती दर्शवली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रियामधून विविध मतप्रवाह आणि युक्तिवाद मांडले जात आहेत. काहींनी या निर्णयाची खिल्ली उडवली तर अनेकांनी धाडसी म्हटलं. बऱेच लेखकसमिक्षक आणि मान्यवर राजकीय मंडळीनी या चर्चेत सहभाग नोंदवला आहे. ट्विटरवर तर ब्रेगक्झिटच्या धरतीवर मेगक्झिट’ असं हैशटॅग वापरून शाही घराण्यावर चर्चा सुरू आहे. त्यातून रॉयल कपलच्या भविष्यातील अनेक घटितावर मतं मांडली जात आहेत. बीबीसीने तर हा तिढा (?) सोडविण्यासाठी जनतेतून सल्ले आणि प्रश्नावली मागवली आहे.
एखाद्या परिकथेला शोभावी अशी या रॉयल कपलची स्टोरी आहे. घराणेपरंपराप्रतिष्ठाविरोधटीका आणि टोमण्यांनी भरलेली ही एक चुरस व रंजक कथा आहे. अनेक खडतर प्रवासानंतर अखेर ही लव्ह स्टोरी लग्नापर्यंत पोहोचली. शाही परिवार या लग्नाला व दोघांच्या अतिव प्रेमाला अडथडा ठरत असल्यानं त्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला गेला. लग्नाच्या 20 महिन्यानंतर त्याला टिकवण्याचं आव्हान रॉयल कपलपुढे उभं राहिलं आहे. त्यासाठी प्रेमी जोडप्यानं शाही घराणं सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांत सर्वच युरोपीयन व आशियाई मीडियानं याविषयी बरेच चर्वण केलं आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहिणं-बोलणं बोरिंग वाटू शकतं. पण काही निवडक बाबींवर आपण प्रकाश टाकूया.
प्रिन्स हैरी आणि मेगन मर्कल यांची पहिली भेट जुलै 2016ला झाली. काही महिने सोबत घालवल्यानंतर नोव्हेंबरला प्रिन्स हैरींनी दोघांच्या संबंधाबाबत जाहीर कबुली दिली. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते या घोषणेनंतर एका ब्रिटिश टैबलाईड’ म्हणजे खमंग व खुसखुशीत बातम्या देणारे छोट्या साईजच्या वृत्तपत्राने भडक बातमी लावली. पहिल्या पानावर लागलेल्या यात बातमीत सनसनाटीपणा होता. इतकंच नाही तर त्यात मेगन मर्कलविषयी गलिच्छ शब्दात वर्णने होती. बहुतेक न्यूज पेपरनं अशाच प्रकारचं वृत्तांकन प्रसारित केलं होतं.
प्रिन्स हैरीसोबतच्या मैत्रीवर एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मेगन म्हणतात, “मला सुरुवातीला माहीतच नव्हतं की तो एक राजकुमार आहे. मी एखाद्या स्वच्छंद मुलीप्रमाणे नॉरमल वागत असे. तो ही माझ्याशी तसाच वागायचा. पण ज्यावेळी माझ्याबद्दल रंगवून बातम्या येऊ लागल्यात्यावेळी मला तो प्रिन्स ऑफ वेल्स असल्याचं ऐकून शॉक बसला.
दोघांच्या नात्याबद्दल दररोज मीडियात बातम्या प्रसारित होत असत. ते लंडनमध्ये क्रिसमस ट्री खरेदी करीत आहेत. नॉर्वेमधील नॉर्दर्न लाइट्स पहायला गेले. जमैकामध्ये मित्राच्या लग्नात हात घालून फिरू लागले. कपडेकेशरचनाशूजचे रंगपर्सजॅकेट इत्यादी बाबत सतत मीडिया बातम्या पुरवायचा. अखेर मर्कल यांनी सप्टेंबर 2017ला स्पष्ट केलं की दोघेही सहजीवनाच्या दीर्घ पल्ल्याचा विचार करत आहेत. प्रिन्स हैरी यांनीही दोन महिन्यानंतर एक प्रेस स्टेटमेंट जारी करून एंगेजमेंटची घोषणा केली.
प्रिन्स हैरी यांनी आपण मेगन मर्कलसोबत लग्न करणार असं जाहीर केलं. त्यावेळी बकिंघम पॅलेस या राजवाड्यात भूकंप झाला. कारण टैबलाईट न्यूज पेपरनं मेगनच्या वर्णवंशजात आणि तिच्या पंथाबद्दल पब्लिक डोमेनमध्ये खूप काही बरे-वाईट मांडून ठेवलं होतं. डेली मेल या वृत्तपत्रानं मर्कल यांचं कुंटुंब 150 वर्षापूर्वी ब्रिटनच्या गृहयुद्धात कापूस वाहणारं गुलाम होतं. त्यांनी आज एका मुलीला दासी म्हणून विंडसर राजवाड्यात समाविष्ट केलं आहे.” अशी हेडिंगच लावली होती. सतत पाच ते सहा महिने अशाच प्रकारच्या बातम्या प्रसारित होत होत्या. न्यूजमधून मेगन मर्कल विरोधात सतत वर्णद्वेशी हल्ले केले जात. मर्कलच्या रंगापासून जातधर्मकूळ आणि व्यवसायाबद्दल शेरेबाजी सुरू होती.
प्रत्येकजण मेगनच्या रंगावरून खिल्ली उडवत. बीबीसीच्या एका कमंटेटरनं तर मेगन आणि हैरी यांचा एक फोटो चिंपाजीसोबत ट्वीट करत हे दोघांचं मूल आहे, लिहिलं होतं. मीडियातून सतत असा आभास निर्माण केला जात होता की 150 वर्षांत गरीब कृष्णवर्णीय समुहातून येणाऱ्या एका कुटुंबाने शाही घराण्यापर्यंत मजल मारली. दि गार्डियनच्या मते वर्णेद्वेषी हल्ले सुरू असताना राजघराणे मेगनच्या पाठिशी उभं नव्हतं. या सर्वांचा प्रिन्स हैरी यांना भरपूर त्रास झाला.
मेगन मर्कल एक सामान्य अमेरिकन कुटुंबातली मुलगी. सध्या मर्कल कुटुब टोरंटोमध्ये राहते. मेगन यांचे वडील थॉमस मर्कल सिनेमेटोग्राफर आहेत. लॉस एंजिल्समध्ये मेगन यांचं बालपण गेलं. त्यांनी नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात मास कॉम केलं आहे. मेगन मॉडेलनिवेदकटीव्ही स्टार म्हणून सर्वपरिचित आहेत. अक्टिंग क्षेत्रात येण्यापूर्वी त्या लग्नाच्या निमंत्रण कार्ड लिहिण्याचं काम करत. 2011 साली त्यांनी ट्रेवर एंगलसन नावाच्या अभिनेता आणि प्रोड्युसर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं. परंतु दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.
शाही घराण्यात एका सामान्य कृष्णवर्षीय कुटुंबातली घटस्फोटित मुलगी सून म्हणून येणं राज घराण्याच्या प्रतिष्ठेला शोभणारं नव्हतं. वर्ण’ आणि घराणं’ अस्सलता आणि प्रतिष्ठेचे लक्षण मानल्या जाणाऱ्या बकिंघम पॅलेसमध्ये वाद होणं सहाजिकच होतं. खानदान कि इज्जतनाक कापलं जाणारलोकांना काय तोंड दाखवणार.. अशा सर्व भाकड कल्पना वादाच्या केंद्रस्थानी होत्याच. त्याला राज महालातूनही पोषक वातावरण मिळत होतं. अर्थातच हे प्रसारमाध्यातून बाहेर येतच होतं. या सर्व विरोधाला न जुमानता राजकुमार हैरी ठाम राहिले.
सर्व अडचणी पार करत अखेर 19 मे 2018ला दोघांचे विंडसर पॅलेसमधील सेंट जॉर्ज चर्चमध्ये हे शाही लग्न पार पडलं. तत्पूर्वी मेगनचा रितसर बाप्तिस्मा करून इसाई धर्मात प्रवेश करून घेतला गेला. मेगन मर्कल (36) आणि प्रिन्स हैरी (33) यांच्या शाही लग्नाला निवडक 200 पाहुणे हजर होते. त्यात मेगन यांची मैत्रीण प्रियांका चोपडा एक होती. विंडसर पॅलेसच्या बाहेर हजारो समर्थकांनी नवविवाहित जोडप्याची एक झलक दिसावी म्हणून दोन दिवस आधीपासून रांगा लावल्या होत्या. लग्नात मर्कल यांची आई डोरिया रागलँड एकट्य़ाच उपस्थित होत्या. वडील थॉमस प्रकृती अस्वस्थामुळे गैरहजर राहिले. डेली मेलच्या मते त्यांना जाणूनबुजून वगळण्यात आलं होतं.
लग्नानंतर नवविवाहित जोडप्याला महाराणी एलिजाबेथ (द्वितीय) यांनी ड्यूक आणि डचेस ससेक्स’ हा किताब बहाल केला. महाराणींनी नववधू मेगन यांच्या डोक्यावर शाही मुकुट बसवला. तसेच लेडी डायना यांनी राखून ठेवलेली दागिणे मेगनला देण्यात आली.
लग्नानंतर शाही राजवाड्यात प्रिन्स हैरी आणि मेगन मर्कलसाठी सर्वकाही सुखासिन होतेच असं नाही. राजघराण्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे कीमीडियानं दोघांच्या सुखी आयुष्यात विष कालवलं. मेगनविरोधात बातम्या देणं लग्नानंतरही थांबलं नव्हतं. प्रिन्स हैरी यांचे मोठे बंधू प्रिन्स विलियम यांची पत्नी केट मिडलटन यांचं आणि मेगनशी सतत खटके उडतात. रंग आणि वंशावरून मेगनला त्रास दिला जातो. शाही घराण्यात मेगनला किंमत नाहीअशा विविध बातम्या सतत प्रसारमाध्यमात झळकत होत्या. मेगनच्या प्रेगनंसीपासून तर मीडियानं त्यांच्यावर पाळतच ठेवली होती. तिच्या शरीरातील बदलदिसणंफिरणं इत्यादी घटना मीडिया टिपू लागला. बाळाच्या जन्मानंतरही बाळाचे बोटंत्वचारंगकेस इत्यादी मीडियाचे रकाने भरू लागले.
मेगन मर्कल यांनी एका मुलाखतीत हे स्पष्ट केलं होतं की, “बाळाच्या जन्मानंतर पाळत ठेवणाऱ्या मीडियामुळे आम्हाला भयंकर त्रासाला जामोरं जावं लागत आहे.”  मेगन यांनी ब्रिटनच्या द मेल’ या टैबलाईडवर राजमहालातील खासगी बाबींचा बोभाटा केला म्हणून खटलादेखील भरला. फोन हैक करणेखासगी पत्र प्रकाशित करणे असे विविध खटले ब्रिटिश टॅबलाईडच्या मालकांवर भरले गेले आहेत. तरीही प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित करणं थांबवलं नाही.
प्रिन्स हैरी आणि मेगन मर्कल यांच्यावर 'Harry & Meghan: An African Journey' ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. यात त्या दोघांनी मीडियामुळे आम्हाला त्रास होतोअसं म्हटलं आहे. प्रिन्स हैरी यांनी तर मीडियाने आपल्या आईचे (लेडी डाय़ना) वस्तुकरण केलं ती एक जिवंत मनुष्य आहे हे लोक विसरूनच गेले होतेअशी स्पष्टोक्ती दिली होती.
शाही थाटबाट हा आमच्या सुखासिन जगण्यातला अडथडा ठरत आहे. सामान्य आयुष्य आम्ही जगू शकत नाहीअसं म्हणत राजघराण्याचा त्याग करण्याचे संकेत प्रिन्स हैरींनी दिले होते. दूसरं म्हणजेगेल्या काही वर्षांपासून भाऊ प्रिन्स विलियम्स यांच्यासोबतच्या नातेसंबंधात वितुष्ट आल्याच्या वृत्तांना प्रिन्स हैरी यांनी सार्वजनिकरीत्या मान्य केलं होतं. यावरून बकिंघम पॅलेसच्या राज घराण्यात सर्वकाही आलबेल नाहीअसं दिसून आलं.
हफिंग्टन पोस्टच्या मते कौटुंबिक वाद या मुळाशी आहे. दुसरीकडे असंही म्हटलं जात होतं की प्रिन्स हैरींना मीडिया आणि शाही सोयी-सवलतीचा कंटाळा आला होता. आईसारखा त्यांचाही अंत होईल अशी भिती त्यांना होती. या शक्यतेला बीबीसीचे बकिंघम पॅलेस बीट सांभाळणारे ज्येष्ठ पत्रकार जॉनी डायमंड दुजोरा देतात.
आव्हाने
13 जानेवारीला संकटातून मार्ग काढण्यासाठी शाही घराण्यात बकिंघम पॅलेसमध्ये शैनड्रिंघम समिट’ झाली. यात महाराणी एलिजाबेथ यांच्यासोबत ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हैरीत्यांचे भाऊ ड्यूक ऑफ कैंब्रिज युवराज विलियम्स आणि त्यांचे वडील प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स सहभागी झाले होते. बैठकीनंतर प्रिन्स हैरी यांच्या घोषणेला मान्यता देण्यात आली. परंतु अंतिम निर्णयाला अजून वेळ लागेल असंही सांगण्यात आलं.
प्रिन्स हैरी आणि मेगन मर्केल कपलवर येणारे अनेक दिवस चर्चा झडत राहतील. त्यासंबंधीचे नवेनवे युक्तिवाद पुढं येतील. परंतु एक बाब स्पष्ट आहे कीशाही थाटबाट सोडण्याच्या अनेक कारणांपैकी मीडियाचा वाढता प्रताप हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. शाही टायटलचा त्याग करूनही रॉयल कपलच्या आयुष्यात मीडियाचा अतिरेक कमी होणार नाही. उलट तो अधिक वाढेल. कारण प्रिन्स हैरी यांचं सामान्य आयुष्य कसं सुरू आहे. हे जगभरातील मीडियासाठी बातमीमूल्याचा व कुतुहलाचा विषय असेल. त्यामुळे रॉयल कपलवर मीडियाची पाळत आणखीन वाढणार आहे.
कुठल्याही शाही ग्रँटची फंडिंग घेणार नाहीअसं प्रिन्स हैरींनी जाहीर केलं आहे. शाही ग्रँट म्हणजे तो पैसा जो ब्रिटन सरकार शाही घराण्याला देते. हा पैसा शाही कुटुंबाने आपली संपत्ती जनतेला सोपवली त्या मोबदल्यात दिला जातो. प्रिन्स हैरी आणि मेगन मर्कल शाही घराण्याचे सदस्य राहतील. त्यांना आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्राप्त दर्जा मिळेल. ब्रिटनमध्ये त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मेट्रोपोलिटन पोलिसाची असेल. तर बाहेर ग्लोबल चॅरिटेबल फाऊंडेशन ही जबाबदारी सांभाळेल.
उदरनिर्वाहासाठी हे रॉयल जोडपं नेमकं काय करेलअसा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज घराण्याचे माजी प्रेस अधिकारी डिकी ऑर्बिटर यांच्या मते, "हैरी गरीब व्यक्ती नाही. मात्रदोन वेगवेगळ्या देशांमध्ये स्वतःचा जम बसवणंकुटुंबाचा सांभाळ करणं आणि आपलं काम करणं अवघड आहे.
बीबीसीच्या मते प्रिन्स हैरी आणि मेगन यांनी बराच पैसा साठवून ठेवला आहे. प्रिन्स हैरी यांना त्यांची आई प्रिन्सेस डायना यांच्याकडून गडगंज संपत्ती मिळालेली आहे. शिवाय मेगन एक अभिनेत्री आहे. त्यांच्याकडेही बराच पैसा साठवलेला आहे. त्यामुळे त्यांना फारसे कष्ट सोसावे लागणार नाहीत. शाही घराणे सोडण्याच्या घोषणेवेळी प्रिन्स हैरी यांनी जाहीर केलं होतं कीकौटुंबिक जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आम्ही एक नवी सेवाभावी संस्था सुरू करत आहोत. त्यामुळे सामान्य जीवन जगणं तसं काही अवघड नाही. परंतु ते तितकेही सोप नाही.
प्रिन्स हैरी यांनी घेतलेला निर्णय धाडसी आहे. त्यांनी अनेक दिवस विचार करून निस्पृह मनाने घेतलेला हा निर्णय आहे. कृत्रीमरीत्या जगण्यापेक्षा आनंदी आणि मुक्त जगणं त्यांनी स्वीकारलं आहे. जगण्यात शाही थाटबाट अडथडा ठरत होते. त्याचा त्यांनी कायमचा त्याग केला आहे. प्रेम आणि प्रतिष्ठा या दोघांमध्ये त्यांनी प्रेमाला निवडले आहे. ही निवड तशी धाडसीच म्हणावी लागेल.

Twitter@Kalimajeem
(सदरील लेख लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: प्रिन्स हैरी आणि मेगन मर्केलची 'ब्रेगक्झिट'
प्रिन्स हैरी आणि मेगन मर्केलची 'ब्रेगक्झिट'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_TLQYFC9gzCjYBqVFwSl73SPkS8TqRRsOKhe7NxJ2e0SGZnhAq5GYSq_fpgpw7RcG7_KysEzRFJfiLPdaJe8yiQDvx_B7EeJ8efL6qKP_UsyRZaDJHuNU8XS2XWIrV0Rx1J9i_VpGYC-n/s640/meghan-markle-prince-harry-greenery-t.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_TLQYFC9gzCjYBqVFwSl73SPkS8TqRRsOKhe7NxJ2e0SGZnhAq5GYSq_fpgpw7RcG7_KysEzRFJfiLPdaJe8yiQDvx_B7EeJ8efL6qKP_UsyRZaDJHuNU8XS2XWIrV0Rx1J9i_VpGYC-n/s72-c/meghan-markle-prince-harry-greenery-t.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/02/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/02/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content