व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको


विम्बलडन ट्रॉफी जिंकणे माझं एकमेव लक्ष्य आहे. मी पूर्वीही हेच सांगितलंय. मला महान खेळाडू व्हायचंय. मी जेव्हा आठ वर्षांची होती, त्यावेळी माझ्या वडिलांनी म्हटलं होतं, मला ते यश मिळू शकतं. मी स्वत:ला सतत सांगत होते की, शांत राहा. एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत मी कधीच खेळले नव्हते; पण कोर्ट तर नेहमीसारखंच आहे, लाइन्स त्याच आहेत, खेळायचं नेहमीसारखंच आहे. असा विचार केल्यानं मी शांत राहिले. खेळले. आता स्वप्नात असल्यासारखं वाटतं आहे ते वेगळं. ती माझी प्रेरणा आहे, आजही हे तिला समक्ष सांगणं मला कठीण जाईल, मात्र तिच्यासारखं होण्याचं स्वप्न पाहत मी मोठी झाले हे तर खरंय!’

पंधरा वर्षीय कोरी गौफने ही प्रतिक्रिया टेनिसमध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या व्हिनस विल्यम्सला पराभवाची धूळ चारल्यानंतर दिली. होय, हे खरंय! गेल्या दोन दशकापासून टेनीसवर अधिराज्य गाजविणाऱ्या व्हिनसचा पराभव एका नवख्या मुलीने केलाय. ४६ वेळा सिंगलचा किताब पटकावणारी, सहावेळा विम्बलडन आणि १६ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या ३९ वर्षीय व्हिनसवर १५ वर्षीय कोरीने ६-४, ६-४ अशी खणखणीत आघाडी घेत झुंझार विजय मिळवलाय. इतकेच नाही तर पहिल्याच राऊंडमध्ये पराभव झाल्याने ती विम्बलडनमधून बाहेर फेकली गेलीय.

व्हिनस यापूर्वी २०१२ला विम्बलडनमधून बाहेर पडली होती. पण यंदा तिच्याच देशातील नवख्या मुलीमुळे तिचे विम्बलडन जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आणलंय. गेल्या काही महिन्यांपासून व्हिनस ही ट्रॉफी पटकावण्यासाठी घाम गाळत होती. परंतु आपलीच जबराट फॅन असलेल्या कोरीमुळे तिचे हे स्वप्न कायमचे भंग झाले.

२ जुलैचा तो दिवस. कोरी गौफचे पूर्ण कुटुंब टेनिस कोर्टच्या प्रेक्षा गॅलरीत प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या मुलीला चिअरअप करत होतं. पहिल्यापासूनच कोरीने व्हिनसवर आघाडी मिळवली. सामन्यातील आव्हान कायम राखत तिने आपला कॉन्फिडन्स वाढवला. या महत्त्वाच्या झुंजीत ती आत्मविश्वासाने खेळली. १ तास १९ मिनिटे चाललेल्या या मॅटमध्य़े कोरीने ग्राउंडस्ट्रोक्स मारत अखेर विजयी आघाडी मिळवलीच.

वाचा : इस्रोच्या दोन रॉकेट विमेन

प्रथम तर कोरीला व्हिनसचा पराभव झालाय यावर विश्वासच बसला नाही. पण प्रेक्षागृहात बसलेल्या पालकांचा उत्साह पाहून ती भानावर आली. आपल्याच आदर्श असलेल्या व्हिनसचा पराभव केलाय, याची जाण होताच तिला रडू कोसळले. बराच वेळ ती स्तब्ध व निश्चल उभी होती. टेनीस कोर्टमध्ये आनंदाअश्रू वाहणारे तिचे अनेक फोटो वर्ल्ड मीडियात गेल्या आठवडाभरापासून फिरत आहेत. सोशल मीडियावर कोरी गौफला शुभेच्छा देणाऱ्यांची अजूनही रीघ लागलेली आहे.

इसपीएनवर दिलेल्या प्रतिक्रियेत तिच्या पालकांनी कोरीबद्दल असलेला आत्मविश्वास बोलून दाखवला. आपली मुलगी व्हिनसला हरवेन याबद्दल त्यांना आत्मविश्वास होता, असं दोघेही बोलले. कोरीच्या वडिलांनी तर जिंकण्यासाठी आम्ही तिला तयार केल्याची प्रतिक्रिया दिलीय. याउलट, कोरीने म्हटलंय की, तिला कधी विश्वासच नव्हता की ती व्हिनसला हरवेन आणि मला वाईल्डकार्ड मिळू शकेल.

कोको नावाने प्रसिद्ध असलेल्या या १५ वर्षीय खेळाडूचा जन्म १५ मार्च २००४ साली अ‍ॅटलांटा इथं झाला. या मुलीचं तिच्या आईवडिलांनी दोन धाकटय़ा भावांसह होम स्कूलिंगच केलं. ती अगदी लहान होती, तेव्हा तिच्या पालकांनी टेनिससाठी फ्लोरिडात जायचं ठरवलं. आणि तेव्हापासूनच या मुलीच्या हातात रॅकेट आलं. तिची आई उत्तम अ‍ॅथलिट, तर वडील बास्केटबॉल प्लेअर. मात्र वयाच्या सहाव्या वर्षापासून तेच मुलीचे कोच झाले. पुढं तिचं टेनिस अ‍ॅकडमीत शिक्षण झालं; पण केवळ ११ वर्षाची असताना सेरेना विल्यम्सचे कोच पॅट्रिक्स मॉटरुगोल यांच्या चॅम्प सीड फाउण्डेशनसाठी तिची निवड झाली. आणि त्यांच्याकडे फ्रान्समध्ये ती टेनिस शिकली. खरं तर कुठलीही ग्रॅण्ड स्लॅम क्वॉलिफाय करणारी ती सगळ्यात लहान खेळाडू ठरली आहे. तिथवर पोहोचणं हीच इतक्या कमी वयात मोठी गोष्ट होती. मात्र त्याही पुढचं एक पाऊल कोकोनं टाकलं.

कोरी गौफला सर्वांत कमी वयाची खेळाडू म्हणून विम्बलडनचे मानांकन मिळालंय. सध्या कोरी वर्ल्ड रॅकींगमध्ये ३१३ क्रमांकावर आहे. कोरी गौफने गेल्या वर्षी ज्युनियर फ्रेंच ओपन चँपियनशीप जिंकली होती. कोको दोन दशकातली विंबलडनच्या पहिल्याच मॅचमध्ये जिंकणारी कमी वयाची पहिली खेळाडू आहे. याआधी २००९ला ब्रिटेनच्या लौरा रॉबसनला हा मान मिळाला होता. यापूर्वी १९९१ला अमेरिकेच्या १५ वर्षीय जेनिफर कैप्रियातीने नऊदा चँपियन राहिलेल्या मार्टिना नवरतिलोवाचा पराभव करून ही उपलब्धी मिळवली होती.

 

२००६ला भारताची टेनिस सनसनी सानिया मिर्झा आणि अमेरिकी टेनिस स्टार व्हिनस विल्यम्स यांच्यात सिंगल मॅच होता. त्यावेळी भारतात अनेकांनी देव पाण्यात टाकून सानियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या होत्या. काहींनी भजने तर अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण केलं गेलं. पण भारतीयांना निराशा हाती आली. सानियाचा विदारक पराभव झाला. सानियाने विल्यम्सला कडवी झुंज दिली. याबद्दल विल्यम्सने दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी होती. ती म्हणाली की, ‘सानिय़ाशी खेळताना मला चिवट झुंज द्यावी लागली. प्रत्येक शॉटवेळी सानियाची धास्ती वाटत होती.अगदी हीच प्रतिक्रिया विल्यम्सने कोरी गौफच्या विजयानंतर दिलीय.

वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल 
वाचा :  प्रिन्स हैरी आणि मेगन मर्केलची 'ब्रेगक्झिट'
गेल्या काही वर्षांत व्हिनस विल्यम्स वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत आहे. डोपिंग प्रकरणातही ती अडकली होती. सानिया मिर्झानेदेखील तिच्यावर डोपिंगसंदर्भात अनेक गंभीर आरोप केले होते. वर्णभेदाचे शिंतोळेदेखील तिच्यावर उडाले आहेत.

विम्बलडनच्या पराभवावर अनेक मोठ्या मीडिया हाऊसने व्हिनसवर टीका करणारे लेख लिहिले आहेत. तर अनेक दैनिके व वेबसाईडने कोरी गौफबद्दल कौतुकाचे विशेष लेख प्रकाशित केले आहेत. वॉश्गिटन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्सने व्हिनसच्या घसरत्या परफॉर्मन्सवर प्रश्न उपस्थित केलं आहे. तर कोरी गौफच्या एन्ट्रीचे जोरदार स्वागत केलंय.

(सदरील लेख दि. ११ जुलैच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
 
कलीम अजीम, पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZSJloFNKt3PXx2zGFU5b-lTyJozJ-pnBFSQOmGSaqjDFVV7rZq17VdpG-y_CFENODOKUppOTiLOanU7MMUaNpUEUeiNi4zAoIFAxoMi4BXW8smomBWOBR7IC42EWFjLXP3t0plF47FO-n/s640/skynews-cori-gauff-wimbledon_4711080.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZSJloFNKt3PXx2zGFU5b-lTyJozJ-pnBFSQOmGSaqjDFVV7rZq17VdpG-y_CFENODOKUppOTiLOanU7MMUaNpUEUeiNi4zAoIFAxoMi4BXW8smomBWOBR7IC42EWFjLXP3t0plF47FO-n/s72-c/skynews-cori-gauff-wimbledon_4711080.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post_15.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/07/blog-post_15.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content