तुलसी
गबार्ड, कमला हॅरिस, प्रमिला जयपाल, निमरत
रंधावा उर्फ निकी हेली यांच्यानंतर अजून एक भारतवंशीय
महिलेला अमेरिकन संसदेच्या खासदारपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे. गझाला
हाशमी असं या महिलेचं नाव आहे. वर्जीनिया राज्याच्या १०व्या सिनेट जिल्ह्याच्या
खासदार म्हणून त्यांची निवड झाली आहे. सध्याच्या रिपब्लिकन सीनेटर ग्लेन
स्ट्रेटवेंट यांचा त्यांनी पराभव केला आहे. अशा रीतीने सध्याच्या संसदेत एकूण नऊ
भारतीय वंशाचे खासदार आहेत.
नवनियुक्त सिनेटर गझाला हाशमी यांचा जन्म हैदराबाद येथे १९६४ साली
झाला. पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील जिया हाशमींनी भारत सोडून अमेरिकेत
बस्तान बसवलं. जिया हाशमी व्यवसायाने डॉक्टर होते. गझाला
यांनी जॉर्जिया साऊथर्न युनिव्हर्सिटीतून बी. ए. केलं असून इमोजी युनिव्हर्सिटीतून
साहित्यशास्त्रात पीएडी केली आहे. त्यांचे पती अझहर रफिक शिक्षणतज्ज्ञ आहेत. अझहर
दाम्पत्याला दोन मुली आहेत.
गझाला वर्जीनिया राज्यातील रिचमंड शहरात असलेल्या प्रतिष्ठीत
सारजेंट रेनॉल्डस कम्युनिटी कॉलेजमध्ये कार्यरत
होत्या. कॉलेजच्या सेंटर फॉर एक्सीलेंस इन टीचिंग अँड लर्निगच्या त्या डायरेक्टर
आहेत. २५ वर्षांपासून गझाला या कॉलेजमध्ये अध्यापन करत आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी
राजीनामा दिलेला आहे.
गल्फ न्यूजच्या मते ५ नोव्हेंबर रोजी वर्जीनिया राज्यात झालेल्या
निवडणुकीत त्यांनी अमेरिकेच्या बंदूक संस्कृतीविरोधात ठोस भूमिका घेतली होती.
अमेरिकेत फोफावणारे बंदूक कल्चर सर्वांधिक धोका मानला जात आहे. बंदुकधारण करणाऱ्या
सामान्य माणसाच्या अतिरेकी वागण्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. वाढत जाणाणारे
बंदूक कल्चर नियंत्रित करून सुरक्षीत व निडर आयुष्य वर्जीनियावासींयाना देण्याची
ग्वाही गझाला हाशमी यांनी दिली होती. शिवाय चांगले शिक्षण, उत्तम आरोग्य व मुक्त पर्यावरण हेदेखील त्यांच्या कॅम्पेनचे प्रमुख मुद्दे
होते.
सीबीएस न्यूजने या विजयाला अनोखा व ऐतिहासिक इतिहास म्हटलं आहे.
इथे दिलेल्या इंटरव्यूमध्ये गझाला म्हणतात, “मुस्लिमावर
विविध प्रकारची बंदी टाकणाऱ्या ट्रम्प प्रशासनासाठी माझा विजय धक्कादायक असावा.
ट्रम्पच्या त्या निर्णयामुळे गेल्या ५० वर्षांपासून अमेरिकेत राहणाऱ्या अनेक
महिलांना झळ बसली आहे. माझा विजय त्यांच्यासाठी आश्वासक आहे. भविष्यात हजारो
स्थलांतरित लोकांसाठी माझा लढा असेल.”
गल्फ न्यूजच्या मते गझाला हाशमी ट्रम्पच्या निर्वासित धोरण
कायद्याचे बळी पडल्या होत्या. त्यांना अमेरिकेतून निघून जाण्यास सांगण्यात आलं
होतं. त्यावेळी गझाला हवालदिल झालेल्या होत्या, असंही गल्फ न्यूज
म्हणतेय. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत स्थायिक
होणाऱ्या भारतीयांना ‘कचरा’ म्हणून संबोधित केलं होतं. ट्रम्पच्या या बेजबाबदार धोरणामुळे अनेकांना
त्रास सहन करावा लागत आहे. मेक्सिकोतून स्थलांतरित होऊन अमेरिकेत येणाऱ्या
अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रम्प सरकारचे निर्वासित धोरण हा देखील
गझाला हाशमी यांच्या निवडणूक प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
हिलरी क्लिंटन यांनी ट्विट करून गझाला यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यात हिलरी म्हणतात, “गझाला हाशमी वर्जीनिया स्टेट सिनेटर म्हणून निवडून गेलेली पहिली
मुस्लिम महिला आहे. ज्यांना असं वाटत होतं की, त्यांचा आवाज नाही,
अशा लोकांचा ती आवाज झालेली आहे. तिनं म्हटल्याप्रमाणे तिचा विजय
आपण सर्वांचाच विजय आहे. असा विश्वास आहे की वर्जीनियात अनेक सुधारणावादी बदल
घडण्याची वेळ आलेली आहे.”
गझाला या जनतेतून निवडून जाणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला सिनेटर
आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इल्हन उमर आणि रशिदा तालिब या वरच्या सभाग्रहात
(काँग्रेस) निवडून गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी इल्हन उमर यांनी काश्मीरच्या
३७० कलमावरून भारतात होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर भाष्य केलेलं होतं.
ज्यामुळे भारतातील व अमेरिकेतील उजव्या शक्तीक़डून त्यांना ट्रोल करण्यात आलं.
त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. या दोन्ही महिला खासदार निर्वासितांच्या
प्रश्नांवर ट्रम्प सरकारशी लढा देत आहेत. आता त्यात गझाला हाशमी यांचीही भर पडली
आहे.
गझाला हाशमी यांच्यासह या निवडणुकीत अजून तीन भारतवंशीय व्यक्तीचा
या निवडणुकीत विजय झालेला आहे. सुहास सुब्रमण्यम ८७व्या सिनेट जिल्ह्यातून खासदार
म्हणून निवडून आले आहेत. मूळ बंगळुरूचे असलेले सुहास ओबामा सरकारमध्ये व्हाईट
हाऊसच्या तंत्रज्ञान धोरणाचे सल्लागार होते. गझाला हाशमी आणि सुहास सुब्रमण्यम या
सदस्यांसह अमेरिकेतील भारतवंशीय खासदारांची संख्या आता आठवर गेली आहे. राजा
कृष्णनामूर्ती, रो खन्ना, अमी बेरी हेदेखील
अमेरिकन जनतेचं प्रतिनिधीत्व करत आहेत. दुसरीकडे मानो राजू हे सॅन
फ्रांसिस्कोत पब्लिक डिफेंडर या पदावर आणि डिम्पल
अजमेरा यांना शार्लोट सिटी
कौन्सिलच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे.
अमेरिकेत सर्वांत जास्त भारतीय वंशाचे राजकीय नेते झालेले आहेत.
त्यांची संख्या ३९ आहे. तर दोन नंबरवर फिजी देश असून तिथे ३४ खासदार होऊन
गेलेले आहेत. कॅनडा ३४, मलेशिया २३, सिंगापूर १७ आणि
दक्षिण आफ्रिकेत २३ भारतीय वंशाचे खासदार होऊन गेलेले आहेत. लिओ वराडकर हा मराठी
माणूस आर्यलँडचा पंतप्रधान आहे.
कलीम अजीम
मेल-kalimazim2@gmail.com
(सदरील लेख आजच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेले आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com