पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भाषिक आणि वांशिक भेदभावातून लष्करी कारवाया, दहशतवादी हल्ले नित्याचेच झाले आहे. शिया-सुन्नी वाद, प्रांतिक राजकारण, विकासात डावललेपण, हजारो कोटींचा अनुशेष बलुची नागरिकांच्या माथी मारला जात आहे. माणूस म्हणून नागरी हक्क हिरावले जाताना बलुची सक्षमीकरणाकडे कूच करत आहेत. वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याने त्रस्त झालेल्या बलुची मुलींनी सक्षमीकरणाकडे पावले टाकली आहेत.
मार्शल आर्ट शिकून सेल्फ सिक्युरिटी साधण्याच्या प्रयत्नातून या
मुलींनी देशासाठी मेडल मिळवून देण्याचा मानस केला आहे. कुलसूम हाजरा, शाहिदा अब्बासी या दोन मुली 2020 साली होणाऱ्या ‘टोकिया ऑलंम्पिक’मध्ये गोल्ड मेडलसाठी घाम गाळत आहेत.
कराटे या खेळाला प्रथमच ऑलंम्पिकमध्ये स्थान देण्यात आलं आहे. याचा पुरेपूर फायदा करून
घेण्याच्या तयारीत या दोघीजणी आहेत.
वाचा : पाकिस्तानच्या दोन महिला वेटलिफ्टर
वाचा : पाकिस्तानची कृष्णकुमारी : बंधक मजूर ते सिनेटर
कुलसूम हाजरा ही पाकिस्तानची पहिली महिला कराटे चॅम्पियन, 2012 साली ‘आशियायी चॅम्पियनशिप’मध्ये मेडल जिंकून तिने देशाचं लक्ष मुलींच्या कराटेकडे वळवलं. आशिया चॅम्पियनशिपमध्ये तिने लागोपाठ तीन गोल्ड मेडल मिळवून हॅटट्रिक साधली आहे. तिच्यानंतर शाहिदा अब्बासीने 2016 साली ‘साऊथ आशियायी चॅम्पियनशिप’मध्ये देशासाठी ब्राँझ पदक पटकावलं आहे.
रावलपिंडी शहरातील इरम शहजादने देश व राज्य पातळीवर ज्यूडो कराटेत तब्बल 50 मेडल जिंकली आहेत. कराटे खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवणाऱ्या या मुलींना सरकारची कुठलीच मदत मिळत नाहीये. आगामी ऑलंम्पिकमध्ये सरकारच्या मदतीशिवाय मेडल उत्तम कामगिरी शक्य नसल्याचं या खेळाडूंना वाटतंय.
कुलसूम आणि शाहिदाच्या कामगिरीमुळे बलुचिस्तानमध्ये कराटे खेळाचं फॅड ‘हाजरा’ समुदायातील इतर मुलींमध्ये वाढलं आहे. याच कारणामुळे क्वेट्टा शहरातील मार्शल आर्ट अकॅडमीत प्रशिक्षणासाठी मुलींची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. बलुच परिसरातील दहशतवादाच्या विरोधात उभं ठाकण्यासाठी या मुलींना शारिरिक सक्षमीकरण महत्वाचं वाटतं.
बलुचिस्तानमध्ये हाजरा समुदाय गेल्या कित्येक वर्षांपासून
दहशतवादी हल्ल्याच्या जखमा झेलत जगण्यासाठी संघर्ष करत आहे. मागील काही वर्षांत 1 हजारपेक्षा
जास्त हाजरा समुदायातील नागरिकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या भयापासून
कायमस्वरुपी मुक्तीचा मार्ग कराटे खेळातून या मुली मिळवू पाहात आहेत.
वाचा : निगार जौहर : पाकिस्तानची पहिली लेफ्टिनेंट जनरल
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तानक्वेट्टा शहरातील हाजरा समुदायातील अनेक मुलींनी मार्शल आर्ट अकॅडमीत कराटे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. वर्षभरापूर्वी मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या काही अकॅडमीवर ‘डॉन’ आणि ‘बीबीसी’ समूहाने स्पेशल स्टोरी केली होती. 5 ते 25 या वयोगटातील अनेक मुली कराटे खेळाचं प्रशिक्षण घेत आहेत.
एकेका अकॅडमीत 40-40 मुली खेळात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अशा अनेक मुली आहेत, ज्यांचे वडील, भाऊ दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. सुरैय्या बतुल ही 10 वर्षांची मुलगी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अकॅडमीत दाखल झाली आहे. डोळ्यादेखत तिच्या वडिलांचे दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. गुलाम अली हा कराटे ट्रेनर बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतोय, ‘बहूतेक मुलींना पदकाची लालसा नाहीये, त्या केवळ आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी कराटे शिकत आहेत’
डॉन समूहाने केलेल्या एका अन्य स्टोरीत कराटे अकॅडमीच्या बहूतेक मुली देशासाठी पदक मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. वांशिक व पंथीय भेदभावाला या मुलींनी खेळातून उत्तर देण्याचे ठरवलं आहे. कराटे खेळामुळे आमच्याविरोधात सुरु असलेल्या प्रांतिक भेदभाव नष्ट होईल असा आशावाद या मुली बाळगून आहेत. क्वेट्टा शहरातील अशा अकॅडमीतून अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. आगामी टोकिया ऑलंम्पिकसाठी अनेक मुली घाम गाळत आहेत.
वाचा : सुहाई अजीज : पाकची सुपरकॉप लेडी
कराटेशिवाय ‘पारकोर’ या खेळातही प्राविण्य
मिळवण्याची तयारी हाजरा समुदायातील मुली करत आहेत. पारकोर खेळाची तयारी करणारा हा पाकिस्तानचा
एकमेव ग्रूप आहे. चिनी ड्रॅगनची मक्तेदारी असलेला ‘पारकोर’ गेम्स बलुचिस्तानमध्ये
मोठ्या प्रमाणात खेळला जातोय. ‘पारकोर पाकिस्तान’च्या
नावाने या खेळाचे अनेक व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड केलेले आहेत. खेळात प्राविण्य मिळवून
प्रांतिक व वांशिक भेदभाव नष्ट करू पहाणाऱ्या या मुलींचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
(सदरील लेख 22 मे 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता वाचा :

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com