नाव-सारा इफ्तेखार
वय- २० वर्षे
शिक्षण- कायदा
व्यवसाय- मेकअप आर्टिस्ट
छंद- ब्यूटी स्पर्धक
उपलब्धी- मीस इग्लंड फायनलची स्पर्धक
निवासी-एनआरपी (नॉन रेसिडेन्शियल पाकिस्तान)
गेल्या दोन आठवड्यापासून हा बायोडाटा जगभरात फिरतोय. कारण काय असावं, असा प्रश्न मराठी वाचकांना साहजिकच पडला असेल. साराच्या नव्या प्रयोगामुळे ‘ब्रिटिश सौंदर्यवती’ स्पर्धेच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला गेला. ४ सप्टेंबरला ब्रिटनमध्ये ‘मीस इंग्लंड’ची फायनल स्पर्धा पार पडली. स्पर्धेची विनर होती, अलीशा कोवी; पण चर्चेचा केंद्रबिंदू ठरली सारा इफ्तेखार. यावर सारा म्हणतेय की ‘जिंकायच्या उद्देशानं मी आले नव्हते, तर मला लोकांचा मुस्लिमाबद्दल असलेला टॅबू तोडायचा होता.’
नॉटिंघमशायरच्या नेवार्क स्थित केल्हम हॉलमध्ये सारानं या अंतिम स्पर्धेत हिजाब घालून रॅम्पवॉक केला. जगभरातील सौंदर्यवती स्पर्धेतली ही अनोखी घटना सर्वच प्रसारमाध्यमांनी टिपली. विनरची बातमी दुय्यम व साराचा हिजाब अव्वल न्यूज ठरली. युरोप खंडातील फोफावणाऱ्या इस्लाम फोबियाला उत्तर म्हणून साराच्या या प्रयोगाकडे पाहिलं जात आहे.
वाचा : सुहाई अजीज : पाकची सुपरकॉप लेडी
अंतिम फेरीसाठी निवड होताच तिनं इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करत हिजाब घालून रॅम्प वॉक करणार असल्याचं जाहीर केलं. फोटोसोबत दोन मॅसेज जोडले, या प्रयोगानं सौंदर्यवती स्पर्धेला प्रोत्साहन मिळेल हा पहिला संदेश, तर दुसरा होता, २२ हजार तरुणींमधून ज्या ५० सौंदर्यवती स्पर्धक सिलेक्ट झाल्या त्यात मी हिजाब घालणारी प्रथम मुस्लीम महिला आहे.
साराच्या या अनोख्या प्रयोगाला जगभरातील प्रसारमाध्यमांनी ‘इस्लाम फोबिया’ला उत्तर म्हणून पाहिलं आहे. आशियातील मीडियानंदेखील याला इस्लाम फोबियाविरोधात सकारात्मक पाऊल म्हणून या प्रयोगाची नोंद केली आहे. हफ्गिंटन पोस्टनं या घटनेला अदभूत म्हणत २०१६च्या सोमालियन मॉडेल हलीमाशी तुलना केलीय. तर बीबीसीनं गेल्या ६८ वर्षांतला हा ऐतिहासिक प्रयोग म्हटलं आहे.
बीबीसीनं मीस इग्लंड आयोजकांनी याआधीही केलेल्या विविध ऐतिहासिक प्रयोगाबद्दल आपल्या वेबपेजला माहीती अपलोड केलीय. सारा वॉश्गिटन विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेत आहे. एक मेकअप आर्टीस्ट असलेली सारा याआधी मिस ‘हडर्सफील्ड’ आणि ‘यॉर्कशायर्स मिस पोप्यूलेरिटी’ राउंड विजेती ठरली आहे.
अलीकडे हिजाब महिलांसाठी ‘मॉडर्न फॅशन’ सिंबल ठरलं आहे, त्यामुळे या प्रयोगाकडे नॉरमल म्हणून पाहिलं जात आहे. पण अनेक मुस्लीम देशामध्ये हिजाब घालणे त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इस्लामिक देशांमध्ये महिला धार्मिक प्रथा म्हणून हिजाबचा वापर करतात. आपलं वेगळेपण सिद्ध करण्यासाठीदेखील हिजाबचा वापर केला जातो. पण अलीकडे युरोपीयन देशात हिजाब घालणाऱ्या महिला हेटक्राईमच्या बळी ठरत आहेत. याला इस्लाम फोबिया हे मोठं कारण मानलं जात आहे.
वाचा : पाकिस्तानच्या दोन महिला वेटलिफ्टर
वाचा : सोमालियाची पॅशनेट ब्रॉडकास्टर नैलाह
९/११च्या अमेरिकन हल्ल्यानंतर युरोप व अमेरिकेत मुस्लिम हेटनेसच्या प्रकार वाढले. या वातावरणाला कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले. आरोपांना उत्तरे देणारी अनेक नॉव्हेल लिहिली गेली, सिनेमे तयार करण्यात आले. ऑस्ट्रेलियात वेस्टपॅकसारख्या सार्वजनिक बँकेने महिला कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड म्हणून हिजाबला मान्यता दिली. अजूनही विविध माध्यमातून याला उत्तरे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ताज्या आकडेवारीनुसार युरोपीयन राष्ट्रात इस्लाम फोबियात कमालीची घट झाली आहे. पण मुसलिमांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा-पुन्हा इस्लामफोबिया डोके वर काढत असतो.
अलीकडे कोरा डॉट कॉम या प्रश्न-उत्तरे करणाऱ्या वेबसाईटवर महिलांनी हिजाबसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बहुतेक महिला या युरोपीयन आहेत. हिजाब किंवा डोक्यावर विशिष्ट प्रकारचा कपडा बांधल्यानं त्यांना सार्वजनिक स्थळी हेटनेसला बळी पडावं लागल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे. मुस्लीम महिलांसोबत अनेक गैरमुस्लीम महिलांनाही अशा प्रसंगाना सामोरं जावं लागलं आहे.
अनेकांचं मत आहे की, वादग्रस्त राजकीय विधानामुळे आमच्यावर ही पाळी आली आहे. दुसरीकडे हिजाबमुळे मुस्लीम महिलांना आपल्याच देशांत सावत्र वागणूक मिळत असल्याचे प्रकारही पाहायला मिळत आहेत.
मुस्लीम महिलांसाठी हिजाब घालणे डोकेदुखी ठरत आहे. सौदी अरेबिया, इजिप्तसारख्या देशात हिजाब घातल्याने महिलांना रेस्टारंटबंदी केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अगदी अलीकडे सौदीत एका तरुणाला बुरखाधारी महिलेसोबत हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानं सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.
वाचा : नागपूरच्या अमेरिकन सिनेटर गझाला हाशमी
महिलांबाबत असलेल्या प्रतिगामी विचारांमुळे मायभूमीत महिला भेदभावाला बळी पडत आहेत. त्याच्या विहार स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सारा इफ्तेखारसारख्या तरुणी आपलं विश्व शोधू पाहत आहेत. त्यांना उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखाना बळ देण्याची गरज आहे.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 25 सप्टेंबर 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com