
पहिल्या प्रयत्नातच मुलींनी मोठी बाजी मारत देशाचे नाव रोशन केलं आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पाकिस्तानच्या 9 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यापैकी फक्त मुलींनी पदकं मिळवली आहेत. या यशाबद्दल देशभरातून मुलींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असताना पाकिस्तानच्या स्पोर्ट्स अथॉरिटीकडून कुठलिही प्रतिक्रीया आली नाही. त्यामुळे या विनर मुलीनी सरकारबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवली, ‘कौतुक सोहळा नको पण मुलींच्या खेळाला प्रोत्साहन मिळावं यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात’ अशी मागणी या विनर मुलींनी मीडियासमोर केली.
मुली व महिलांच्या बाबतीत मुलतत्ववादी विचारसरणी लादल्याचा आरोप पाकिस्तानवर वारंवार केला जातो. पण अलिकडे देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करत आहेत. विज्ञान संशोधन, मीडिया, कॉर्पोरेट हाऊस, राजकारण, सामाजिक कार्य, शिक्षण, स्पोर्ट्मध्ये महिलांनी मानाचं स्थान मिळवलं आहे. आयेशा जलाल, मुख्तारन माई, बेनझिर भुट्टो, मलाला युसूफजाई असा कितीतकरी आदर्श महिलांचे नावे पाकिस्तानात आहेत.
वाचा : कुलसूम हाजरा : बलुची कराटे गर्ल
अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मुलत्तववाद जास्तच बोकाळला, महिलावर अनेक बंधने लादण्यात आली. पण आता परिस्थिती हऴुहळु पूर्वपदावर येत आहे. परिणामत: गेल्या काही वर्षापासून पाकिस्तानमध्ये महिला व मुलींची कामगिरी लक्षणीयरीत्या उंचावली आहे.
क्रिकेट व अथलिटमध्ये पाकिस्तानी मुली उत्तम कामगिरी बजावत आहेत. गेल्या काही ऑलंम्पिकमध्ये पदकं हाती आली नसली तरी देशाची कामगिरी अथलिट्समध्ये उंचावली आहे. कराची, लाहौर, रावलपिंडी शहरात स्पोर्ट्स जीम व क्लब मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.
मार्च 2017ला ऑस्ट्रीयामध्ये झालेल्या ‘वर्ल्ड विंटर गेम्स’मध्ये पाकिस्तानने तब्बल 16 मेडल पटकावले. 3 गोल्ड, 7 सिल्वर, 6 ब्राँझ मेडल पाकिस्तानच्या खात्यात आली. यंदाच्या ‘आंतरराष्ट्रीय ओशिनिया पॅसिफिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप’मध्ये पहिल्याच इंट्रीत मुलींनी गोल्ड मेडल जिंकलं. सानिहा गफूर, राबिया रज्जाक, ट्विंकल व सायबर सोहेल अशा या विनर्स मुलींचे नावं आहेत.
या चारपैकी ट्विंकल व सायबर अल्पसंख्यांक ख्रिश्चन समुदायातील आहेत. लाहौरच्या ट्विंकल सोहेल व सायबर सोहेल या दोन बहिनांनी देशासाठी पाच पदकं मिळवली आहेत. ट्विंकलने 57 किलोगटात तर सायबरने 47 किलोगटात 4 सुवर्ण पदकं मिळवली आहेत. तर सायबरने एकसिल्वर जिंकलं.
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
वाचा : हिजाबधारी मिस इंग्लड सारा इफ्तेखार
काही वर्षापूर्वी सोहेल कुटुंबाची धार्मिक अल्पसंख्यांक असल्याने हेटाळणी झाली होती. अशा वातावरणातही लाहौरच्या स्लम भागात राहून ट्विंकलचे वडिल सोहेल जावेद खोखर यांनी आपल्या आपल्या चारही मुलींना देशसेवेसाठी तयार केलं. सोहेल जावेद यांच्या चारही मुली वेटलिफ्टर आहेत.
सानिहा गफूर हिदेखील लाहौरच्या गरीब वस्तीत राहते. 72 किलोग्रॅम गटात तिने 270 किलो वजन उचलून गोल्ड मेडल जिंकले आहे. सानिहाचे वडिल अब्दुल गफूर 1970च्या कॉमनवेल्थ गेम्सचे सिल्वर मेडलिस्ट आहेत. 25 वर्षापासून ते वेटलिफ्टिंगमध्ये मुलांना घडवण्याचे काम करतात. सानिहाला त्यांनी आपल्या छोटाशा घरात वेलिफ्टिंगसाठी तयार केलं आहे.
सानिहाच्या पदकाने त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. देशात बहुसंख्येनं अथलिट मुली तयार व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. ओशिनिया पॅसिफिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या विजयाने त्यांच्या आसा उंचावल्या आहेत. या चारही मुलींना सरकारच्या स्पोर्ट्स अथॉरिटीकडून कुठलीच मदत मिळाली नाही. त्यांनी व्यक्तिगत प्रॅक्टीस करुन ही उल्लेखणीय कामगिरी केली आहे. सरकारच्या या उदासिन धोरणावर सानिहा गफूरचे वडिल अथलिट विनर अब्दुल गफूर सरकारबद्दल नाराजी व्यक्त करतात.
मरियम नसीम या अजून एक महिला वेटलिफ्टिर खेळाडूचं नाव पाकिस्तानमध्ये आदराने घेतलं जातं. मरियम शिक्षणासाठी ऑस्टेलियात गेली होती. वजन कमी करण्यासाठी तिने मेलबर्नमध्ये एक जीम जॉईन केलं. एक्सरसाईज करताना तिला वेटलिफ्टिंगचे वेड लागलं. अपघाताने ती मेलबर्नच्या एका चॅम्पियनशीपमध्ये पोहचली. ऑक्टोबर 2017मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने 57 किलोग्रम कॅटेगरित पहिल्याच प्रयत्नात सिल्वर मेडल पटकावलं. कुठलंही ट्रेनिंग नसताना मरियमने ही केवळ अठराव्या वर्षात ही कामगिरी करुन दाखवली.
मरियम मागास समजल्या जाणाऱ्या पेशावरची राहणारी. ती आत्ता मेलबर्नमध्ये स्वत:ची ‘वेटलिफ्टिंग ट्रेनिंग अकॅडमी’ चालवते. मेसबर्नमध्ये ती पाकिस्तानच्या मुलींना ती वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देते. परदेशात राहून मरियम देशाचं प्रतिनिधीत्व करते. ‘डॉन न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीत सरकारच्या अथलिट खेळासंदर्भातील उदासिन धोरणावर ती टीका करते. अनेकवेळा तिला ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यासंदर्भात सांगण्यात आलं, पण तिने नकार देत देशासाठी काम करण्याचा मानस ऑस्ट्रेलियाला बोलून दाखवला.
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्यावाचा : सुहाई अजीज : पाकची सुपरकॉप लेडी
ती म्हणते देशातील मुलींमध्ये स्पोर्ट्सबद्दल बहूमुखी प्रतिभा आहेत, त्याला थोडसं प्रोत्साहन दिलं तर या मुली चांगली कामगिरी करू शकतात. पाकिस्तान सरकारने मुलींसाठी खेळाचं अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र व जीम सुरू करावं असं मरियम म्हणते. मरियमला पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया सेलिब्रिटी समजलं जातं. फिटनेस ट्रेनर म्हणून मरियम महिला व मुलींमध्ये लोकप्रीय आहे.
देशातील स्पोट्स अथॉरिटीने मुलींच्या खेळ भावनेला पाठींबा दिल्यास ऑस्ट्रेलियासारखी कामगिरी बजावू शकतात असं मरियमला वाटते. ऑस्टरेलियात खेळासाठी अथलिट्सना वयाची अट नाही. त्यामुळे प्रत्येक खेळात अग्रेसर आहेत, असं ती म्हणते डॉन न्यूजच्या चर्चेत प्राईम टाईम चर्चेत तिनं एक महत्वाची क्लोझिंग नोट्स दिली ती म्हणजे, मुलींनी आपल्या पॅशनला पॅरेन्ट्सच्या मोरल वॅल्यूशी जोडून घेऊन पालकांचे मनपर्वर्तन करावे जेणेकरुन अनेक मुली खेळात विषेश प्राविण्य मिळवण्यासाठी सज्ज होतील. पाकिस्तानच्या या मुलींची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. भविष्यात याच मुली पाकिस्तानवरील चिटकलेल्या दहशतवादाच्या डागाला पुसू शकतील.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 8 जानेवारी 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com