
पाकिस्तानच्या 38 वर्षीय कृष्णाकुमारी आशिया खंडात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांची पाकिस्तानच्या सिनेटवर खासदार म्हणून निवड झाली आहे. कृष्णाकुमारीबद्दल बरंच काही लिहून आलं आहे. भारतीय मीडियाने त्यांना (हात राखून) मोठी प्रसिद्धी दिली, त्यामुळे मी आता नवीन काय सांगणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
माझ्याकडेही त्यांच्याबद्दल नवीन असं काही नाही, पण ‘द डॉन’ने लिहलेल्या विषेश लेखामुळे मला या सदरात कृष्णाकुमारींची नोंद घ्यावीशी वाटली. त्यांचा लढा हा खरंच प्रेरणादायी आहे. कदाचित भारतीय प्रसार माध्यमांना त्यांची ‘योग्य’ दखल घ्यावीशी वाटली नसावी, त्यामुळेच इंडियन मीडियानं ‘हिंदू’ घोषित करत वरवरची बातमी दाखवून हात झटकले. पण एका बंधक मजूरापासून सिनेटरपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
कृष्णाकुमारी यांचा जन्म 1979 साली एका शेतमजूर कुटुंबात झाला. सिंध प्रांतातील ‘थर’मधील नगरपारकर जिल्ह्यातील ‘धना गम’ गावात कुडाच्या घरात आजही त्यांचे नातेवाईक राहतात. ‘द डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पंजोबा रोपलो कोहलींनी याच गावातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ब्रिटीशाविरुद्ध विद्रोह केला होता.
या बदल्यात इंग्रजांनी त्यांना 1858 साली फासावर लटकवलं. त्यांचे आजोबा शेतमजूर होते. ‘दी असोशिएट प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, अतिशय मागास समजल्या थर परिसरात आमची ही तिसरी पिढी आहे. आठव्या वर्षी वडिलांसोबत त्यांना बालकामगार म्हणून बंधक करण्यात आलं होतं. याच काळात त्यांचे शिक्षणही काही काळासाठी बंद होतं.
एका व्यक्तीने त्यांच्या कुटुंबीयाला मजुरीसाठी तब्बल तीन वर्षे कैद केले होते. ‘द डॉन’ च्या म्हणण्यानुसार कृष्णाकुमारींचा बंदीवास केवळ हीच घटना त्यांना न्यायहक्कासाठी पेटून उठण्यासाठी परिणामकारक ठरली. देशातील मागास समाजातील महिलांसाठी कृष्णाकुमारींचं सिनेटपद मैलाचं दगड मानलं जात आहे.
दहावीत असताना त्यांचा बालविवाह झाला. लग्नानंतर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 2005 पासून पूर्णवेळ त्यांनी देशातील अल्पसंख्य समुदायासाठी शिक्षण व मानवी हक्काची लढाई सुरु केली. 2000च्या दशकात पाकिस्तानमध्ये इशनिंदेच्या आरोपाखाली अल्पसंख्य समुदायाला लक्ष्य करण्यात येत होतं. शिया-सुन्नी-अहमदिया-इस्माईली पंथाचा वाद केंद्रस्थळी होता.
न्यायाधिश, गव्हर्नर, मानवी अधिकार कार्यकर्ते, बंड करुन उठणाऱ्यांना ठार मारले जात होते. अशा काळात कृष्णाकुमारी अल्पसंख्य हिंदू समुदायाच्या मानवी हक्कासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी 2013 साली बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’त प्रवेश केला. समान नेतृत्व व समान संधी या धोरणातून पीपीपीने कृष्णाकुमारी यांना उमेदवारी दिली.
कृष्णाकुमारी या पीपल्स पार्टीच्या तिसऱ्या हिंदू खासदार आहेत. 2006 साली रत्ना भगवानदास चावला या देशातील पहिल्या हिंदू सिनेटर ठरल्या होत्या. 2013 साली रीता इश्वर लाल कौमी असेंब्लीत निवडून गेल्या होत्या. पाकिस्तानच्या कौमी असेंब्ली (लोकसभा) आणि सिनेट (राज्यसभा) वर निवडून जाण्यासाठी भारतासारखाच पैशाचा घोडेबाजार सुरु असतो. अशा काळात कृष्णाकुमारींची निवड होणे फारच मोठी गोष्ट म्हणावी लागेल.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही देशात अनेक समाजघटक मागास म्हणून जगत आहेत. ‘दी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ अर्थात इस्लामच्या नावाने एका वेगळ्या देशाची निर्मिती करण्यात आली. इस्लाम न्याय, समान संधी व बंधुता मानतो, शोषण व अत्याचाराच्या विरोधात असलेल्या धर्माच्या अनुयांयानी मागास घटकांवर गुलामी प्रथा व अत्याचार लादणे इस्लामच्या तत्वाला धरुन नाही.
पण आजही सरंजाम वर्ग जमीनदारी व नवाबी मानसिकेच्या बाहेर पडलेला नाही. या पिढीने वर्चस्ववादातून गुलामीची प्रथा जोपासली. यात कृष्णाकुमारीसारखे कितीतरी गरीब भरडले जात आहेत. पाकिस्तानच काय तर जगातील अनेक भागात मागास घटकांना हीन वागणूक दिली जाते.
वाचा : सबीन महमूदची हत्या म्हणजे अस्थिर पाकिस्तानऑक्सफॉमच्या अहवालानुसार जगातील 1 टक्के लोकांकडे 50 टक्के संपत्ती आहे. म्हणजे मुठभर लोकांकडे संपत्तीचे बंदिस्तीकरण झाले आहे. ही अब्जाधीश माणसे दिवसेंदिवस अधिकच श्रीमंत होत आहेत. अशा धनाढ़्यामध्ये शोषण व वर्चस्ववादी वृत्ती वाढणारच आहे.
यातून शोषक जमातीच्या तावडीतून सुटून एखादीच कृष्णकुमारी सिनेटर होते. त्यामुळे जगातील इतर समुदायांनीही आपल्या न्यायहक्कासाठी ‘येणाऱ्या’ मसिहाची वाट न पाहिलेली बरी.
(सदरील लेख 20 मार्च 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com