काश्मिरची राजकीय कहाणी : ‘आतिश ए चिनार’

 शेरे काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेले काश्मीरचे ‘माजी पंतप्रधान’ व ‘मुख्यमंत्री’ शेख अब्दुल्ला यांचं आत्मकथन‌ ‘आतिश ए चिनार’ नावाने १९८१ साली प्रसिद्ध झालं. हे कार्यकथन मूळ उर्दू भाषेत आहे. इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे. इंग्रजीत वेगवेगळ्या शीर्षकांनी दोन-तीन अनुवाद आहेत. माझ्याकडे खुशवंत सिंग यांनी केलेला ‘Flames Of The Chinar’ असा भाषांतर आहे. तो पेग्विन वायकिंगने प्रकाशित केलेला आहे. सिंग यांनी अनुवादात उर्दू भाषेतील लेहजा, परंपरा व शैली इंग्रजीत ठेवण्याचा यशस्वी खटाटोप केलेला दिसतो.

सारांशरुपाने म्हणता येईल की, शेख अब्दुल्ला यांच्या आयुष्याची कर्म कहाणी सांगणारे हे कथन आहे. काश्मीरच्या प्राचीन इतिहासापासून त्याची कहाणी सुरू होते. सुरुवातीला थोडक्यात का असेना पण प्राचीन व मध्ययुगीन काश्मिरी संस्कृतीचं अधोरेखन अब्दुल्ला यांनी मार्मिक पद्धतीने केलेलं आहे. डोगरा शासकांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून काश्मीरची भूमी पैसे देऊन विकत घेतली व तिथून आपली राजवट स्थानिक नागरिकांवर लादली.. भूखंडाचा हक्क डोगरा कुटुंबियांना काश्मीरचा शासक बनवून गेला.

दांभिक डोगरा शासकांनी सर्वसामान्य प्रजेवर अतिरिक्त कर लादून आपली तिजोरी भरण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला. पहिल्या पिढीपासून तिसऱ्या पिढीपर्यंत डोगरा शासकांची शोषणाची व्यवस्था निरंतर चालू होती. श्रमिक, शेतकरी, कास्तकार, कारागीर व सर्वसामान्य नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा लादला.. शासकांनी नागरिकांवर त्यांच्या दैनंदिन मिळकती पेक्षा अवाढव्य कररचना लादली होती. शिवाय कराची सक्तीने वसुलीही केली जात. जो शेतसारा किंवा कर भरू शकत नसे, त्याची मिळकत, शेतजमीन, संसारोपयोगी साहित्य जप्त करून घेतली जात.

पढ़े : मुसलमानों के सामाजिकता और संस्कृति पर विशेष बहस

पढ़े : तरक्कीपसंद तहरीक का मुकम्मल खाका

हरि सिंगच्या राजवटीत सांप्रदायिक प्रवृत्तीने चांगलेच डोकं वर काढलं होतं. धार्मिक वाद नित्याचे झाले. लिहितात, काश्मिरी मुस्लिमांना जबरदस्तीने त्यांचा सुंदर प्रदेश सोडण्यास भाग पाडलं जाऊ लागलं. नंदनवन आणि निसर्गाचं वरदान असलेला भू-भाग सोडून धुळीनं माखलेल्या रखरखीत पंजाबमध्ये आश्रय घेण्यावाचून त्यांच्या पुढं पर्याय नव्हता. पंजाबमध्ये जाण्यासाठी त्यांना बनिहाल आणि मूरी हे दोन बर्फाच्छादित डोंगर पार करावे लागत होते. या खडतर प्रवासात वाटेतच काही जणांचा अंत होत असे. पंजाबपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या जवळचा पैसाअडका संपला की भीक मागितल्याशिवाय पोट भरणे काही जणांना शक्य नव्हते.

भ्रष्ट सरकार व प्रशासनात जातीय द्वेष प्रचंड होता.. मुस्लिम बहुसंख्या असूनही त्यांना प्रशासनात नोकऱ्या मिळत नव्हत्या. सरकारी आस्थापनात महाराजांची खुषमस्करी करणारे व हांजी-हांजी करणाऱ्या हिंदूंनी जागा बळकावून ठेवली होती. लिपिक किंवा त्यावरच्या अधिकारांवर प्रामुख्याने काश्मिरी पंडित विराजमान होते. वरिष्ठ अधिकारी मुस्लिमेतर होते. आपल्या मनाची व्यथा पुढील शब्दात व्यक्त करतात, राज्यात बहुसंख्य मुस्लीम होते. त्यामुळे साहजिकच मुस्लिमांकडून राज्याच्या तिजोरीत घसघशीत महसूल जमा होत होता. तरीही मुस्लिमांवर जुलूम-जबरदस्ती होत होती. ही किती काळ आम्ही सहन करायची? का सहन करायची? केवळ सरकारी अधिकारी मुस्लिमेतर आहेत म्हणून हा अन्याय सहन करायचा?”

संस्थानातील उच्चशिक्षित मुस्लिम तरुण एकतर बेरोजगार होता किंवा रोजंदारीच्या कामात गुंतलेला होता. शेख अब्दुल्ला यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती.. ते हरी सिंगचे खुश मस्करे नव्हते, त्यामुळे त्यांना मेडिकलची अॅडमिशन मिळू शकली नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांशी उर्मट बोलल्याने त्यांना संस्थानात प्रवेश मिळणे मुश्कील झाले. परिणामी लाहौरच्या इस्लामिया कॉलेजात दाखल झाले. त्यांना नाईलाजाने बीएस्सी करावी लागली. पुढे अलीगड विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी पूर्ण केली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बेरोजगारी वाट्याला आली. महाराजा हरिसिंगच्या भ्रष्ट प्रशासनात त्यांना नोकरी मिळू शकली नाही. मग ते जन आंदोलनाकडे वळले गेले.. बेरोजगारी, कामगार हक्क, कारखानदारीच्या शोषणाविरोधात त्यांनी लढा सुरू केला. याविषयी लेखक म्हणतात, इथली जुलूमशाही नष्ट करण्यासाठी काश्मिरी युवकांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले. माझा त्यात सक्रिय सहभाग होता.

पुढे लिहितात, जिकडे जाई तिकडे मला होणारा अन्याय आणि अन्यायग्रस्त काश्मिरी दिसत. त्यांची कैफियत ऐकून त्यांचे प्रश्न सोडवणं, हेच माझं दैनंदिन काम झालं. जसं जसं मी लोकांचे प्रश्न ऐकायला लागलो तसं तसं जुलूमशाहीच्या विरोधात अधिक त्वेषानं लढा देण्याची आणि त्यासाठी सर्वतोपरी त्याग करण्याची माझी मनाची तयारी व्हायला लागली.

वाचा : कुदरत आत्मकथन संकलित करताना...

वाचा : ‘नॉलेज सोसायटी’ : समाजाच्या सर्वांगीण विकासाचे चिंतन

शेरे कश्मीर शेख अब्दुल्ला यांनी १९३१ साली सरंजामी व दांभिक महाराजा हरिसिंग विरोधात लोकशाही प्रस्थापनेचा लढा सुरू उभा केला. अल्पावधीत त्यांच्या लढ्याला राष्ट्रीय चळवळीतून मोठं पाठबळ मिळू लागलं. डॉ. मुहंमद इकबाल यांनी काश्मीर मुक्तीच्या चळवळीला पाठिंबा दर्शवला. त्याचप्रमाणे जनचळवळीसाठी राजकीय विचार देखील दिला. डॉ. इकबाल यांच्या सूचनेमुळे त्याच्या निधनाच्या वर्षभरानंतर १९३८साली मुस्लिम कॉन्फरन्सचं या संघटनेचं नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स केलं असा खुलासाही लेखक करतात. १९२४ पासून त्यांची डॉ. इकबालसोबत मैत्री होती.

डॉ. इकबाल यांच्याविषयी असलेलं मैत्रीप्रेम पुस्तकात ठिकठिकाणी विखुरलेलं आढळते. अर्थात डॉ. इकबाल यांची शायरी विषयानुरुप टाकलेली आहे. लेखकाचं कथन व इकबाल यांची शायरी समर्पक अर्थाने येत राहते.

बॅ. मुहंमद अली जिना यांच्याविषयी देखील परखड विवेचन शेख अब्दुल्ला यांनी केलेलं आहे. १९३५ साली बॅ. जिनांनी काश्मीर दौरा केला होता. तेव्हापासून त्यांचं काश्मीरवर विशेष लक्ष होतं. जिनांनी केलेल्या उपदेशावा लेखकाने कथनात जागा दिली आहे. त्यांना जिना म्हणाले होते, मी तुमच्या वडिलांसारखा आहे. राजकारणात माझे केस पांढरे झाले आहेत. माझा अनुभव हा आहे की हिंदुंवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. ते आपले मित्र कधीच होऊ शकत नाहीत. मी आयुष्यभर हिंदूंना जवळ करण्याचे प्रयत्न केले, मात्र मला त्यांचा विश्वास संपादन करणे शक्य झालं नाही. एक वेळ अशी येईल की माझं म्हणणं तुम्हाला आठवेल आणि तेव्हा तुम्हाला पश्चाताप होत असेल. जो धर्म तुमच्या हातून पाणी पिणं पाप मानतो त्यांच्याबरोबर तुम्ही कसे एकत्रित राहू शकता? हिंदुमध्ये शेख अब्दुल्लांना काहीच स्थान नाही. ते तुम्हाला कनिष्ठ आणि खालच्या धर्माचे मानतात.

यावर मी म्हटलं हिंदुंमध्ये स्पृश्य-अस्पृश्यता आहे. याबाबत कोणीच नकार देणार नाही मात्र शिकलेल्या हिंदुंचा एक मोठा वर्ग या स्पृश्य-अस्पृश्यतेला मानत नाही. त्याचा जातिभेद मिटविण्यासाठी यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न महात्मा गांधी हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि मोठ्या धैर्याने आणि धाडसाने स्पृश्य-अस्पृश्यते विरुद्ध लढाई करीत आहेत. माणूस कितीही गंभीर आजाराने आजारी असला तरी डॉक्टर त्याला कधी विष देत नाही किंवा पेशंटचा गळाही आवळत नाही किंवा त्याच्याशी संबंधही तोडत नाही. उलटत प्रेमाने आणि आपुलकीने त्याच्यावर उपाय करीत असतो.

सेक्युलर असलेला एक पुढारी धर्मांध होतो व धर्माच्या नावाने राजकारण खेळू लागतो, सबंध मुसलमानांना वेठीस धरतो.. मुसलमानांची दिशाभूल करतो व बोटावर मोजणारे धनिक लोक घेऊन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करतो.. स्वत: हिंदू राष्ट्राचा द्वेश करणारी व्यक्ती मात्र मुस्लिम राष्ट्राची स्थापना करते, हे परस्परविरोधी आहे, असं लेखक म्हणतो. लेखकाने बॅ. जिना व त्यांच्या सांप्रदायिक राजकारणावर वेळोवेळी बोट ठेवलेलं आहे.. जिनांच्या भेटीतील वृत्तांत देखील लेखकाने विस्ताराने दिलेलं आहेत. म्हणतात, ज्या व्यक्तीला नमाज पढण्याचाही त्रास होतो त्यानेच स्वतंत्र पाकिस्तानची-स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची-मागणी करावी याबद्दल काय म्हणावं.”

वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

वाचा: ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?

शेख अब्दुल्ला यांचे हे आत्मकथन व्यक्तिगत किंवा कौटुंबिक आठवणींचा संग्रह नाही. तर त्यांच्या एकूण राजकीय कारकीर्दीची मीमांसा करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. सुरुवातीच्या काळातील खटले आणि लवाद याच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. वारंवार जेलमध्ये जाणे व सुटून आल्यावर नागरी हक्काच्या चळवळीत सामील होणे.. मग पुन्हा तुरुंगात जाणे.. तीन-चार वर्षात बाहेर पडल्यानंतर पुन्हा लोकआंदोलनाला गती देणे असा त्यांचा नित्यक्रम होता. पुस्तकात नोंदवल्याप्रमाणे दर दोन वर्षाला त्यांची तुरुंगवारी ठरलेली असे.. विलणीकरण पूर्वकाळात त्यांचा बहुतांश वेळ तुरुंगातच गेला.. तसंच नंतरही नेहरू, शास्त्री व इंदिरा गांधी सरकारने त्यांना वेळोवेळी तुरुंगात दडपले.

फाळणीपूर्व भारत, राष्ट्रीय चळवळ, त्याचे नेते, ब्रिटिशांचे फुडपाडे राजकारण इत्यादींची चर्चा पुस्तकाच्या पहिल्या भागात येते. त्याचप्रमाणे विलीनीकरण पूर्व काळातील राजकीय घडामोडींची विस्तृत माहिती आत्मकथनात येते. फाळणीनंतर भारत की पाकिस्तान असा पर्याय निवडण्याची वेळ आली त्यावेळी सरंजामी व दांभिक हरी सिंहने स्वतंत्र राहाण्याची भूमिका घेतली. चालढकल करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाकिस्तानशी लगट केली. दरम्यानच्या काळात पाकिस्तानी टोळ्यांचा काश्मिरवर हल्ला झाला. अशा संकटकाळी हरी सिंह काश्मिरी जनतेला वाऱ्यावर सोडून जम्मूला निघून गेला. अशावेळी शेख अब्दुल्ला यांनी सडेतोड भूमिका घेऊन भारतासोबत राहण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात त्यांनी महात्मा गांधी, नेहरू, अब्दुल कलाम आज़ाद यांच्याशी सतत संपर्क ठेवला.

या निर्णयानंतर शेख अब्दुला यांना जवाहरलाल नेहरूंनी पत्र लिहून भूमिकेचं स्वागत केलं. त्यात नेहरू म्हणतात, एक अत्यंत अवघड कामगिरी आपण पार पाडली आहे. आता यापुढेही यश नक्कीच मिळेल, अशी मला खात्री आहे. आपण काल जो निर्णय घेतला तो ऐकून मला अगदी मोकळे-हलके वाटायला लागले आणि आज आमच्या फौजा श्रीनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. ही बातमी ऐकून तर आता कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही असे वाटले, भविष्यात जे उद्दिष्ट गाठायचे आहे त्याची चाचणी आता घेतली जात आहे असे म्हणता येईल.

विलीनीकरणानंतर हरी सिंहची सत्ता संपुष्टात येईल व सत्तेची सारे सूत्र शेख अब्दुल्लाकडे जातील असं भाकीत ठरवून सरदार पटेल यांनी शेरे काश्मीरला त्या काळात सतत विरोध दर्शवला, कुरघोड्या केल्या, हेटाळणी केली असं लेखकाने स्पष्टपणे नोंदवलं आहे.. लेखकाच्या मते सरदार पटेल हिंदू राष्ट्रवादी होते.. ते सांप्रदायिक प्रवृत्तीचे नेते होते. त्यांच्यामुळे काश्मीर प्रश्न अधिक बिकट झाला.. त्यांनीच नेहरूंच्या मनात आपल्याविषयी संशयाची बीजे पेरली व त्याला खतपाणी दिलं असा दावा लेखकाने आरोप केला आहे.. आपल्या मागे गुप्तचर यंत्रणेचा ससेमीरा लावून सतत कुरघोड्या करण्यात पटेल अग्रेसर होते, असंही अब्दुल्ला नोंदवतात.

शेख अब्दुल्ला आणि नेहरू यांची मैत्री अफाट होती. त्याचे विविध दाखले लेखकाने दिलेले आहेत. एक वेळ अशा आली की, नेहरुंची शेख अब्दुल्लांवर उघडउघड अविश्वास दर्शवला. परंतु ते निराश झाले नाहीत. सरदार पटेल व त्याच्या गुप्तहेराचे कारस्थान आहे, हे त्यांना कळून चुकलं होतं. आपल्या विरोधात कागाळ्या करूनही तसंच अविश्वास व्यक्त करून लेखक नेहरूविषयी चीड किंवा अभिनवेश बाळगत नाहीत. पुस्तकाच्या अनेक पानापानात त्यांनी नेहरूविषयी आत्मीयता व मित्र प्रेम व्यक्त केलेलं आहे. भारतीय संघराज्यात काश्मीर विषयी आस्था असणारे नेहरू एकमेव नेते होते, असं लेखकांचं म्हणणं आहे. नेहरूंनी हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला खटाटोप पुस्तकाच्या पानापानात विखुरलेला आहे..

वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

वाचा : रफींच्या कौटुंबिक स्मृती : माय अब्बा अ मेमॉयर

नेहरूंची शेवटची भेट हे प्रकरण वेदनादायी आहे. शेख अब्दुल्ला यांना आपण जेलमध्ये टाकून, त्यांच्यावर देशद्रोहाचा संशय ठेवून खूप मोठी चूक केली, अशी खंत नेहरूंनी लेखकाला बोलून दाखवली. गैरसमज व पुरवल्या गेलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मी हा निर्णय घेतला, पण राष्ट्रप्रमुख म्हणून त्याची जबाबदारी मला टाळता येत नाही, असं नेहरूंनी अब्दुल्ला यांना म्हटलं होतं. देशद्रोहाचा नाहक आरोप करून नालस्ती केली याबद्दल त्यांनी क्षमा देखील मागितली.. (परंतु काश्मीरचं राजकारण व अनुच्छेद ३७० विषयी लिहिणाऱ्या बहुतांश लेखकांनी शेख अब्दुल्ला यांना देशद्रोही म्हटलेलं आहे. प्रसिद्ध लेखक कुलदीप नय्यर यांनी बियाण्ड द लाईन्स या आपल्या आत्मकथनात याविषयी नेहरूंनी व्यक्त केलेली खंत व शेख अब्दुल्ला विषयी अपसमज बाळगून केलेल्या कार्यवाहीविषयी चूक केल्याचं नेहरूंचं मत विस्ताराने नोंदवलं आहे.)

पुस्तकाच्या पुढील भागात शेख अब्दुल्लांना सत्ताच्युत करणं, विरोधकांचं पाठबळ वाढविणे, धार्मिक नेतृत्त्वाचं सशक्तीकरण करणे, केंद्रातील कुरघोड्या, काश्मीरचे स्वनियंत्रण, स्वायत्त राजकारणाला विरोध, केंद्राचा वदरहस्त वाढविणे, सदर ए रियासत (राज्यपाल) डॉ. करण सिंहच्या (हरी सिंहचे वंशज) यांच्या काश्मीरविरोधी कुरघोड्या इत्यादींची चर्चा विस्ताराने केलेली आहे.

शेवटचं प्रकरण काश्मिरी पंडितांवर आहे. पंडितांचे सत्ता लालसेपोटी शत्रू गटात सामावणे व वेळोवेळी विश्वासघात करणे इतरांवर शेख अब्दुल्ला यांनी तटस्थपणे कटाक्ष टाकलेला आहे.. इंग्रजी अमलातही काश्मिरी पंडित निर्णायक भूमिकेत होते असं त्यांचं म्हणणं आहे. दिल्ली व उर्वरित भारतात महत्वाची पदे लाटणे, त्यावर ताबा मिळवणे, कुरघोड़्या करण्यात असलेली अग्रेसरची नोंदवली आहे. एके ठिकाणी शेख अब्दुल्ला म्हणतात, काश्मिरी पंडितांनी एक हात जनसंघाच्या (आरएसएस) हातात तर दुसरा हात मौलवी फारूक (धार्मिक नेते) यांच्या हातात घालून वाटचाल केली.

महाराजा हरी सिंग विषयी लेखकाने केलेलं कथन तटस्थ व वस्तुदर्शी आहे. हरी सिंगने स्वातंत्र्य चळवळ व तिच्या राष्ट्रीय नेत्यांचा सातत्याने विरोधी केला. लेकक नोंदवतात की, वेळोवेळी त्यांनी ब्रिटिशांची बाजू घेतली. स्वातंत्र्य चळवळ व त्यांच्या नेत्यांची नालस्ती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ समर्थक होते. त्यांनी कधीही काश्मिरींच्या हिताचा विचार केला नाही. गांधी हत्येवेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेची पाठराखण केली. ‌त्याचप्रमाणे गांधी हत्येच्या दिवशी सारा देश शोक सागरात बुडालेला होता, तेव्हा जम्मूमध्ये मिठाई वाटण्यात आली. शेख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा बोलावली, परंतु ही सभा हरी सिंहच्या माणसांनी उधळून लावली. अशी माहिती लेखक देतात.

नेहरू, मौलाना आज़ाद आणि महात्मा गांधी हे काश्मीर विषयी आस्था असणारे नेते व त्यांनी काश्मीर संदर्भात केलेले वेळोवेळी प्रयत्नांची मीमांसादेखील शेख अब्दुल्ला यांनी केलेली आहे. नेहरूंच्या निधनानंतर काश्मिर प्रश्नांची वाताहात झाली. काश्मिरविषयी प्रामाणिक आस्था असणारा एकही नेता केंद्रात उरला नही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सारांश स्वरूपात असं म्हणता येईल की संबंधित आत्मकथन हे शेख अब्दुल्ला यांची राजकीय कर्म कहाणी आहे. त्यांच्या आयुष्यातील खाजगी बाबींना त्यात क्वचितच जागा मिळते. मूळ उर्दू आत्मकथा आतिश एक चिनारतब्बल १००० पानांमध्ये विभागली आहे. परंतु त्याचा इंग्रजी अनुवाद १८० पानात संपुष्टात येतो, त्याचं कारण कळू शकत नाही.

१९८१ साली शेख अब्दुल्ला वार्धक्याला पोहोचले त्यावेळी हे आत्मकथन सर्वप्रथम प्रकाशित झालं. सदरील इंग्रजी अनुवाद १२ वर्षानंतर म्हणजे १९९३ साली प्रकाशित झालेला आहे. विलनीकरणानंतरचा काश्मीरचा राजकीय इतिहास समजून घेण्यासाठी शेख अब्दुल्ला यांचं हे आत्मकथन उपयुक्त आहे.

##

नाव : फ्लेमस ऑफ दि चिनार

लेखक : शेख अब्दुल्ला

इंग्रजी अनुवाद : खुशवंत सिंग

पाने : १८०

किंमत : १९५

प्रकाशन काळ : १९९३

.............. 

कलीम अज़ीम, पुणे

मेल : kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: काश्मिरची राजकीय कहाणी : ‘आतिश ए चिनार’
काश्मिरची राजकीय कहाणी : ‘आतिश ए चिनार’
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEG3ccp1IPpCETzWgmYJaYEE7OUzQXXOF5Cm1zg3jbWL76jqz9G_V5UWl6muUAEmzy898QNTPvjJgMni2LYNPDZi27Wumm93q-xDJN4qVbdC1_n70iOvRDvQD4WJeXW2YViycIT5r03b3O8HspCcdUo-KlBh4Xjf3McJmrJkl-jpNAwUAgUl_1-YOb38Dh/w640-h394/Flames%20Of%20The%20Chinar.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEG3ccp1IPpCETzWgmYJaYEE7OUzQXXOF5Cm1zg3jbWL76jqz9G_V5UWl6muUAEmzy898QNTPvjJgMni2LYNPDZi27Wumm93q-xDJN4qVbdC1_n70iOvRDvQD4WJeXW2YViycIT5r03b3O8HspCcdUo-KlBh4Xjf3McJmrJkl-jpNAwUAgUl_1-YOb38Dh/s72-w640-c-h394/Flames%20Of%20The%20Chinar.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2024/01/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2024/01/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content