दोन हजार सतरा साली मुंबईमधील न्यूज चॅनेलचा कॉर्पोरेट जॉबचा राजीनामा देऊन पुण्यात परतलो आणि ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाचं संपादन कार्य करू लागलो. मासिकाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सरांशी नव्याने संपर्क आला.
तत्पूर्वी २०१० साली त्यांच्या लिखाणातून आणि एक-दोन व्यक्तिगत भेटीतून त्यांचा आणि माझा परिचय होऊन तो वृद्धिंगत झालेला होता. त्याच दरम्यान सोलापूर निवासी सरफराज अहमद यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी बेन्नूर सरांशी माझी नव्याने ओळख करून दिली. माझं घर कोंढवा (खु) मध्ये होतं. अर्थात सरांच्या पारगे नगरमधील घरापासून अवघ्या पाच-सातशे मिटर अंतरावर मी राहत होतो. त्यामुळे आमच्या भेटी-गाठी नियमित होऊ लागल्या. तत्पूर्वी त्यांचं लेखनकार्य एकत्रित करून ते पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याची कल्पना मी सरफराज भाईंकडे मांडली होती. त्यांनी ती सरांपर्यंत पोहोचवली होती. त्यांनी ती हातोहात घेतली व त्यांचं सर्व लेखन मला उपलब्ध करून दिलं.
महिना-दिड महिन्यात होईल तेवढे लेखन संकलित करून चार विषयाच्या फाईल शब्द पब्लिकेशनचे संचालक श्रीयुत येशू पाटील यांना त्यांच्या डिसेंबरच्या पुणे भेटीत दिलं. त्यांनी सरांचं एकुण सर्व साहित्य प्रकाशित करण्याचं कबूल केलं. कारण श्री. पाटील सरांच्या लिखाणाशी परिचित होते. हा निरोप जेव्हा मी सरांना दिला, त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला आणि समाधानही लाभलं.
उत्साहाने त्यांनी बरंच अप्रकाशित-प्रकाशित लेखन उपलब्ध करून दिलं. त्याचवेळी सरांनी आत्मकथनाची हस्तलिखित पाने दिली. दरम्यान त्यांचं ‘हिंदवी स्वराज्य : एक अन्वयार्थ’ आणि ‘मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद’ पुन:प्रकाशित करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न सुरू झाले होते. सरांनी आपल्या आत्मकथनाची संपूर्ण हस्तलिखित प्रथम सरफराज भाई व नंतर माझ्याकडे सुपुर्द केली. मी त्वरीत त्याच्या प्रकाशनपूर्व प्रक्रियेला सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने प्रा. बेन्नूर यांचा किडनीचा आजार बळावला व पुढच्या सहा महिन्यात १७ ऑगस्ट २०१८ला त्याचं दुर्दैवी निधन झालं. मृत्युशय्येवर असताना ‘हिंदवी स्वराज्य’ची नवी आवृत्ती त्यांच्या हातात पडली. तसंच ‘...राष्ट्रवाद’ पुस्तकही आलं, परंतु ते त्यांच्यापर्यंत वेळेत पोहचू शकलं नाही.
इकडे शब्द पब्लिकेशन आत्मकथन आणि इतर चार पुस्तकावर काम करत होतं. परंतु सरांच्या एकाएकी आकस्मिक निधनामुळे काम रेंगाळलं. पुढे कोरोना रोगराईच्या विश्व संकटामुळे अनेक क्षेत्रांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यात मीडिया व पब्लिकेशन व्यवसायाला सर्वांत जास्त फटका बसला. परिणामी पुस्तक प्रकाशनाचं काम रखडलं.
पुढे विविध कारणांनी काम पुढे-पुढे ढकलत राहिलं. इतर पुस्तके विलंबाने प्रकाशित केली तरी चालतील; पण त्यापूर्वी आत्मकथन णावं असा विचार मांडला गेला. वेगवेगळ्या संकटातून मार्ग काढून स्वकथन प्रकाशनापर्यंत पोहोचेपर्यंत २०२३ साल उजाडलं. प्रा. बेन्नूर यांच्या निधनानंतर तब्बल चार वर्षांनी त्यांचं हे लेखन प्रकाशित होत आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया वाचकांच्या लक्षात आणून देणे गरजेचं होतं.
संबधित टिपण लिहिण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रा. बेन्नूर यांनी आत्मकथनाची हस्तलिखित दिली त्यावेळी त्याला शीर्षक दिलं नव्हतं. शीर्षकासंबंधी त्यांच्याशी नियमित चर्चा सुरू होती. परंतु त्यांना समर्पक शब्द सुचत नव्हता. त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आमच्यासमोर बिकट प्रश्न उभा राहिला की शीर्षकाचं काय करावं? सरांच्या एकूण कार्य व त्यांच्या वैचारिक भूमिकेशी सुसंगत शीर्षक असावं, अशा रीतीने आम्ही विचार करत होतो. सरांचे बंधुवर डॉ. यूसुफ बेन्नूर, अजीज बेन्नूर, मित्र हयातमहंमद पठाण, सरफराज अहमद व मी शीर्षकावर चिंतन करत होतो.
अनेक शब्द सुचले परंतु त्यातून कोणाचंही समाधान होत नव्हतं. त्यातच आमच्यापैकी कोणीतरी सूचवलं की सरांच्या बंगल्याचं नाव ‘कुदरत’ होतं. त्यांना हे घर प्रिय होतं. घराविषयी त्यांच्या भावना उत्कट होत्या. ‘कुदरत’वर विचार करू या का? क्षणात वाटलं की हेच नाव समर्पक राहील. एका मोठ्या संकटातून सुटल्याच्या भावनेतून शीर्षकाला सर्वांची संमती लाभली. परंतु नंतर वाटलं की, हेच नाव सयुक्तिक आहे. कारण सरांचं अध्यापन कार्य, वैचारिक लेखन, संघटना बांधणी व सामाजिक सद्भावनेच्या विविध प्रयत्नांशी अनुरुप ठरणार होतं.
‘कुदरत’चा अर्थ जसा निसर्ग होतं, तसाच समृद्धता असाही त्याचा अर्थ होतो. या शब्दामुळे सरांच्या एकुण कार्यप्रवणतेत अधिक महत्त्व लाभणार होते. त्यांचे वैचारिक जनजागरण, प्रबोधन परंपरा व संघटना बांधणीच्या विविध प्रयोगाचा निसर्ग, समाज, देश, संस्कृती, सहजीवन, धर्म, बहुसांस्कृतिक घटक इत्यादीशी आंतरसंबंध होता. त्यामुळे हा शब्द अधिक सर्वंकष ठरणार होता.
प्रा. बेन्नूर यांच्या एकुण लेखन असो वा कृतिशिलतेत ‘सामाजिक एकात्म’ हे मध्यवर्ती सूत्र होतं. त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कार्याचा अर्थबोध ‘कुदरत’ या शब्दातून प्रतीत होणार होता. त्यामुळे या शीर्षकावर सर्वांनी मोहोर उमटवली. असा ठरला कुदरत शीर्षकाचा प्रवास!
प्रा. बेन्नूर यांच्या निधनानंतर चार वर्षांनी हे लेखन प्रकाशित होत आहे. त्यामुळे वाचकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे टिपण लिहित आहे.
चार वर्ष तसा दीर्घ कालावधी आहे. या संदर्भात प्रकाशकीय भूमिका लिहिण्याची विनंती केली. परंतु यथास्थिती पाहता शब्द पब्लिकेशनचे संचालक येशू पाटील यांनी संकलक म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे सोपवली. त्यानुसार हे टिपण लिहित आहे.
गुरुवर्य प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांचं हे स्वकथन वाचकांना सुपुर्द करताना होणारा आनंद शब्दातीत आहे. २०१८ ते २०२३ हा चार वर्षांचा कालावधी का लागला, याची मीमांसा केलेली आहे. विलंबाचं हेच कारण त्यांच्या इतर पुस्तकांना लागू असेल. यथावकाश ती पुस्तकेही प्रकाशित होतील. प्रकाशक म्हणून श्री. पाटील यांनी जो विश्वास दर्शवला त्याविषयी बेन्नूर कुटुंबीय, मित्रमंडळी व फाउंडेशनच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो.
‘डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन’ने प्रा. बेन्नूर यांचं बरेचसं लेखन संकलित केलेलं आहे, यथावकाश ती पुस्तक रुपाने प्रकाशित होतीलच. प्रा. बेन्नूर यांच्या लिखाणाचे चाहते आणि वाचक आत्मकथनाचं स्वागत करतील, अशी आशा आम्ही सर्वजण बाळगतो.
कलीम अजीम, पुणे
सचिव, डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन
(कुदरत संकलनाविषयी लिहिलेली भूमिका)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com