‘मुहंमद रफी : माय अब्बा अ मेमॉयर’ मुहंमद रफी यांच्या खासगी आयुष्यावर रेखाटलेलं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. यास्मीन खालिद रफी यांनी २०१२ साली हा ठेवा भारतीय संगीतप्रेमी व रफी साहेबांच्या चाहत्यांना लोकार्पित केला आहे. यास्मीन ह्या रफी साहेबांच्या मंझली बहू आहेत.
सूनेनं आपलं सासर आणि पिता समान रफींच्या कौटुंबिक आयुष्यावर पुस्तकात सुंदर भाष्य केलं आहे. पती, सासरे, बाबा, नाना आणि आजोबा म्हणून घरातले आणि बाहेरील म्हणजे सिने इंडस्ट्रीतले व्यावसायिक रफी या पुस्तकातून उलगडतात.
लेखिका लिहितात, जितेंद्र एक सिनेमा प्रोड्यूस करीत होते. त्यांच्या संगीतकाराला रफींकडून काही गाणी गाऊन घ्यायची होती. परंतु सिनेमा काही अडचणींमुळे सुरू होऊ शकला नाही व तीन-चार वर्षे रखडला.
जेव्हा सुरू झाला त्यावेळी रफींनी सिनेमात गाणी गायली. मानधन म्हणून जितेंद्रनी रफींच्या सेक्रेटरीला बंद पाकिट पाठवलं. ज्यावेळी पाकिट उघडलं त्यात ठरल्यापैकी मोठी रक्कम होती. रफी साहेबांनी ती रक्कम पटकन परत पाठवली.
जितेंद्र म्हणाले, ही रक्कम तुमचीच आहे, ज्यावेळी तुम्हाला साइन केलं, त्यावेळी ती रक्कम कमी होती आज, किशोर कुमार यांना जी रक्कम दिली तीच तुम्हाला देतोय.
रफी साहेब म्हणाले, किशोर कुमारनी रक्कम वाढवली असेल मी नाही, त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणेच मी मानधन घेईन.
दुसरा किस्सा, किशोर कुमार अभिनयात व्यस्त झाले त्यावेळी रफींनी त्यांच्यांसाठी पडद्यावर गाणी गायली. किशोर यांच्या होम प्रोडक्शनच्या शाबाश डैडी साठी रफी साहेबांनी काही गाणी गायली, त्यावेळी रफी साहेबांनी मानधन नाकारले. किशोर यांच्या बऱ्याच आग्रहानंतर रफी साहेबांनी शगुन म्हणून एक रुपया घेतला.
वाचा : मन तडपत 'रफी' गीत बिन
दुसरा एक किस्सा अजून भन्नाट आहे, यास्मीन यांनी तो खूपच सुरेख लिहिलाय, शशी कपूरनी वडिलांच्या स्मृतीमध्ये पृथ्वी थियटर पुन्हा सुरू केलं. पहिला कार्यक्रम सिलिगुडी येथे घेतला. त्यास रफी साहेबांना गाण्यासाठी आमंत्रण पाठवलं. रफी साहेबांनी गाणं गायलं. शो संपल्यानंतर शशी कपूरनी रफींना मानधन देण्यासाठी पाकिट पुढे केलं. परंतु रफी साहेबांनी तो घेण्यास नकार दिला, म्हणाले, “पृथ्वीराज केवळ तुमचे बाबा नव्हते; ते माझेही बाबा होते.” अशा असंख्य किस्से-कहाणी आणि प्रसंगानी हे पुस्तक भरलं आहे.
रफी कलावंत महणून उत्तम होते, पण माणूस म्हणूनही ते खूपच संवदेनशील व सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते. यास्मीन लिहितात, दररोज सकाळी घरातून बाहेर पडताना रफी पैशाचा मोठा डबा घेऊन गाडीत बसत. सिग्नल असो वा रस्त्यावर मागणाऱ्यांना घरी परत येईपर्यंत रफी सगळी रक्कम वितरित करून टाकत.
महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या तारखेला त्यांच्या घरी गरजवंत येत व आपापले पाकिटे घेऊन जात. सिने इंडस्ट्रीत त्यांनी मदत केलेली अनेक उदाहरणे आपल्याला इतरत्र वाचायला मिळतील पण यास्मीन यांनी जी उदाहरणे दिली ती खूपच संवेदनशील आहेत.
वाचा : इस्लामशिवाय जग कसे असते ?
रॉयल्टीच्या मुद्द्यावर त्यांचं मत स्पष्ट होतं. एकदा निर्मात्यांनी मानधन दिलं तर आपली जबाबदारी संपली. त्यांच्या गाण्यावर पुन्हा-पुन्हा हक्क मागता कामा नये. त्याचमुळे त्यांचं लता मंगेशकर सोबत चांगलंच खटकलं होतं. परंतु रफी साहेबांनी दिलेला शब्द पाळला. निर्मात्याकडून एक छदामही अतिरिक्त घेतला नाही.
यासमीन लिहितात, या निर्णयामुळे रफी साहेब गेल्यानंतर कुटुंबियांना खूप आर्थिक त्रास सोसावा लागला.
यास्मीन यांच्या मते रफीसाहेब चित्रपट उद्योगातील राजकारणापासून खूप अलिप्त होते. एखाद्या कृती किंवा वक्तव्यावरून कोणाचेही मन दुखवू नये यासाठी ते खूप सतर्क असायचे. अनवधानाने किंवा कळत नकळत अशी कुठलीही कृती आपल्याकडून होता कामा नये, यासाठी ते दक्ष राहायचे. त्यांच्या मते इथं क्षुल्लक घटनेचाही बाऊ करुन थयथयाट केला जातो.
रफी साहेब आपल्या कुटुंबियांना रेकॉर्डिंग स्टुडिओच नाही तर शहरातील कुठल्याही सांगीतिक कार्यक्रमाला देखील येऊ देत नसत.
यास्मीन यांनी रफी साहेबांनी कुटुंबियांना सिने इंडस्ट्रीबाहेर का ठेवलं, याचा विस्ताराने आढावा घेतला आहे. रफी साहेबांच्या मते, येणारी पिढी सिने इंड्रस्टीत नैतिकतेच्या परिमाणांची पर्वा करणारी नसेल, आपण जी नैतिकता टिकवून ठेवली आहे, कदाचित येणारी पिढी त्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. शिवाय त्यांना हेदेखील माहिती होतं की, आपल्यानंतर ही इंडस्ट्री आपल्या मुलांना योग्य वागणूक देणार नाही. कारण त्यांना माहीत होतं की, त्यांची सर्व मुलं हळवी, प्रामाणिक, संवेदनशील आहेत. त्याचमुळे त्यांनी सर्वांना मुंबईबाहेर लंडनला ठेवलं.
यास्मीन यांनी लिहिलेलं हे पुस्तक रफी साहेबांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्तवाची चर्चा करते. त्यांचे राहणीमान, स्वभाव, संवेदशनीलता, आवड, सिने उद्योगातील नाते-संबंध, सहकारी कलावंत, गायक, संगीतकार, नट-नटींशी रफी साहेबांचं असेलेलं प्रेमळ नातं अधिक हळुवारपणे खुलवणारे हे पुस्तक आहे.
###
पुस्तकाचे नाव : ‘Mohammed Rafi : My Abba A memoir’
भाषा : इंग्रजी
पेज : २०४
किंमत : ५००
प्रकाशक : वेस्टलैंड-२०१२
…….
कलीम अजीम, पुणे
मेल : kalimazim2@gmail.com
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“ फा तिमा शेख जोतीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम कर चुकी हैं। जब जोतीराव-सावित्रीमाई को उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा और उन...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
बी ते 9 जनवरी को गूगल ने फ़ातिमा शेख पर डूडल बनाकर उन्हें 191 वें जन्मदिन की बधाइयां पेश की। जिसके बाद देशभर में बधाइयों का सिलसिला चला। ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com