‘नॉलेज सोसायटी’ : समाजाच्या सर्वांगीण विकासाचे चिंतन

रोनानंतर औद्योगिक व व्यावयासिक परिवर्तनांसह समाजातील विविघ घटकात लक्षणीय बदल घडतील, अशी चर्चा सुरू झाली. वृत्तपत्रे, वेबसाईट व सोशल मीडियाभर टिपणे, लेख आणि मंथन प्रकाशित होऊ लागली. सामान्यजनांना चर्चेतून उसंतही मिळाली नव्हती, त्यापेक्षा कमी वेळात भांडवली उद्योगसमूह, गट आणि घटकांनी कोट्यवधींचा व्यवसाय सुरुवातीच्या एक-दोन महिन्यात केला. आज ऑनलाईन बाजाराची उलाढाल एकट्या भारतात हजारो कोटींच्या घरात आहे.

दीडएक वर्षानंतर आम्हा भारतीयांची मानसिक स्थिती पूर्वपदावर आली, आता शिक्षण नको पण ऑनलाईन आवर अशी अवस्था निर्माण झाली आहे. यातला उपहासाचा भाग सोडला तर कोट्यवधीच्या ऑनलाईन बाजाराचा लाभ कोणाला झाला, याची चर्चा केली तर त्यात ठरावीक भांडवली वर्ग घटकांची मक्तेदारी दिसून येते.

या ऑनलाईन बाजाराने तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक ज्ञानशाखेत आपला विस्तार वाढवला. फक्त काहीच दिवसात कोट्यवधींची माया जमवली. परंतु आमची शिक्षण व्यवस्था व प्रणाली किंवा धोरणे आजही पारंपरिक पठडीतल्या शिक्षणाचा प्रसार-प्रसार करण्यात मश्गुल आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने गल्लाभरू कोर्सेच्या जाहिराती करीत होत्या. मल्टिटाक्स परिप्रेक्ष्यात पाहिले तर व्यावहारिकदृष्ट्या संबंधित शिक्षण प्रणाली बाद या कॅटेगरीत मोडते. तरीही आमची शौक्षणिक धोरणे नवे काही शोधण्याचा उद्देशाने प्रयत्नशील होताना दिसत नाही.

नॉलेज सोसायटी मात्र अशा आधुनिक शिक्षण, ज्ञानपरंपरा आणि त्यातून घडणाऱ्या शाश्वत विकास प्रकियेची महती अधोरेखित करते. त्यातही मागास वर्ग, समुदाय व जातींनी या शिक्षणाकडे कसे वळावे, याचे मार्गदर्शन करणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणता येईल.

जनाब हुमायून मुरसल यांच्या दूरदृष्टीतून प्रत्यक्षात उतरलेले हे पुस्तक २१व्या शतकातील नव-तंत्रज्ञानात मागास समुदायाची सहभागिता किती महत्त्वाची आहे, याचे निरिक्षण नोंदवते. केवळ तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शिक्षणच नाही तर जगभरात फोफावत जाणाऱ्या फॅसिस्ट प्रवृत्तीच्या रेट्यात कौशल्याने आपले स्थान कसे अधिक बळकट करता येईल, याची मीमांसा करते.

वाचा: ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?

वाचा : कुदरत आत्मकथन संकलित करताना...

प्रस्तृत पुस्तक शिक्षण, ज्ञानपरंपरा, विज्ञान, पर्यावरण, संस्कृती, सामाज, नागरी प्रश्न, संस्कृती, राजकारण, इतिहास अशा विविध क्षेत्रात एक स्वतंत्र व्हीजन देते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुकर होणारी जीवनशैली आत्मसात करण्याची प्रेरणा देते. लेखकाने संबंधित पुस्तक जरी मुस्लिम समाजाला उद्देशून लिहिले असले तरी त्यात प्रत्येक मागास, बेदखल व निम्न समूहातील घटकांच्या उद्धाराच्या दृष्टीने शिक्षण, ज्ञान व्यवहार, जीवनशैलीविषयी एक व्यावहारिक समाधान देणारा विचार सामील आहे.

लेखक संबंधित पुस्तकातून ज्ञान परंपरेचा असा विचार मांडतात, जो केवळ मानवाच्या भौतिक गरजाच नव्हे तर जीवसृष्टीच्या सरंक्षणाच्या सर्वांगिण व शाश्वत प्रक्रियेचा विचारही देतात. पहिल्या प्रकरणात निसर्गाच्या ऐतिहासिक विकासप्रक्रियेची माहिती दिलेली आहे. शिवाय मानवाच्या क्षमतांच्या पलीकडे असलेल्या ज्ञानाच्या विकास प्रक्रियेचा विस्ताराने आढावा लेखक देतात. विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना, नवीन शोध- संशोधनचे मानवी समाजाला झालेल्या लाभांची चर्चा करतात. शिवाय मानवाच्या स्वार्थीपणामुळे झालेल्या नुकसानाची चर्चादेखील करतात.

उपरोक्त विकास प्रकियेत मुस्लिम कुठे आहे? त्याचे स्थान काय आहे? तो का अशा ज्ञानाकडे लक्ष पुरवत नाही?  तंत्रज्ञानावर आधारित विकास प्रक्रियेत मुस्लिम उपभोक्ता आहे, पण लाभधारक गट का नाही, असाही प्रश्न लेखक उपस्थित करतात.

आधुनिक ज्ञानसाधना, त्याविषयीची समज, त्याची व्यावसायिक व व्यावहारिक गरज, तंत्रज्ञानाच्या भांडवली बाजारात तग धरून राहण्यासाठी सेंटर फॉर रेनेसाँया संस्थेने केलेल्या प्रयत्नांची उजळणी करत लेखकाने नॉलेज सोसायटीचा कल्पना मांडली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शिक्षणासाठी मुस्लिम यूनिव्हर्सिटी स्थापन करण्याची कल्पना लेखक मांडतात. ज्यात फॉर्मल आणि नॉन फॉर्मल रिसर्च डेव्हलपमेंट प्रोग्रम राबवले जातील.

स्वतंत्र मुस्लिम विद्यापीठाच्या माध्यमातून लोकशाही समाज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये योगदान देण्याची कल्पना लेखक मांडतात. स्त्री आणि पुरुष समानतेचा विचार, बहुसांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी आणि सामाजिक सौहार्द अशा नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण धोरणाची कल्पना लेखक मांडतात.

एकविसाव्या शतकाच्या गरजेनुसार शिक्षण व मनुष्यबळ निर्माण करणे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक क्षेत्रात सहभागिता नोंदवणे, गरीबी-मागासलेपण संपवणे आणि समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणे अशा विविध घटकांची चर्चा लेखक पुस्तकात करतात. शिवा​​सेंटर फॉर रेनसाँ आणि मुस्लिम यूनिव्हर्सिटी अशा दोन मिशनची स्थापना करण्याची देखील पुस्तकात चर्चा केलेली आहे. इतकेच नव्हे तर त्याची त्यासाठीची प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि संरचना देखील मांडली आहे. संस्थेचा उद्देश 80 टक्के मागास समुदायाचे जीवन सफल आणि उज्ज्वल करण्याची कल्पना लेखक मांडतात.

सरकार कुठल्याही पक्षाचं असो सार्वजनिक बँका, उद्योग, मालमत्ता एकेक करून सर्व काही संपवून टाकली जात आहे. घटनात्मक अस्थापनांचे महत्त्व कमी केलं जात आहे. दलित, आदिवासी, शेती आणि श्रमिकांशी संबंधित कायदे बदलणे, बाबरीचा निर्णय, राम मंदिराची उभारणी, देशद्रोहाचे खटले, खोटे आरोप ठेवून तुरुंगात टाकणे, गुन्हे दाखल करणे, नाहक त्रास देणे, ऑनलाईन छळणे, ट्रोल करणे इत्यादी प्रकार वाढत आहेत. राजकारणातील विरोधी पक्ष संपवणे, विरोधी विचारकांना त्रस्त करण्याचा हा प्रकार आहे. एका अर्थाने, विशिष्ट धार्मिक गटावरच नव्हे तर संपूर्ण जनमाणसावर आलेले हे संकट असून त्यातून मार्ग काढणे सद्यस्थितीतील मोठे आव्हान आहे, असे लेखक म्हणतात.

त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब आणि जनमाणसांची सजगता शिवाय तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शिक्षण, उद्योग, विकासधोरणे हेच पर्याय ठरू शकतात, असेही लेखकाला वाटते. नॉलेज सोसायटीच्या माध्यमातून मूल्यशिक्षण, समान न्याय आणि घटनात्मक अधिकाराचे बिजारोपण होईल. आधुनिक शिक्षण अमलात आणल्या शिवाय 80 टक्के मागास समुदायाचे जीवन चांगले करणे कठीण आहे, असेही लेखक म्हणतात. या कार्याला पूर्णत्वास नेण्यासाठी सामाजिक विश्लेषण व त्याला प्रयोगशील करण्यासाठी संबंधित ज्ञानकेंद्रे उभे करावित असे लेखकाला वाटते.

वाचा : काफ़िराना : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर

वाचा : तरक्कीपसंद तहरीक का मुकम्मल खाका

या कार्याला पूर्णत्वास नेण्यासाठी सामाजिक विश्लेषण व त्याला प्रयोगशील करण्यासाठी संबंधित ज्ञानकेंद्रे उभे करावित असे लेखकाला वाटते.

बहुसंख्यांकवादी राजकारणाच्या हिंदुत्ववादी रेट्यात अगतिक न होता ज्ञानसाधनेच्या जोरावर तग धरून ठेवता येईल असा आशावाद लेखक मांडतो. जात, वंश, धर्म आणि अस्मितावादी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्ञानकेंद्री समाज घडविण्याची मांडणी लेखकाने पुस्तकातून केली आहे.

मुस्लिम समाज अंतर्गत पंथीय भेदाभेद, वाद-विवाद व सामाजिक असुरक्षिततेच्या भावनेत जखडला आहे, यातून बाहेर पडण्यासाठी राजकीय संघर्ष करावा लागेल, असे लेखक म्हणतात. राजकारणापासून अलिप्त राहून प्रथम शिक्षण व ज्ञान मिळवावे असे लेखक सूचवतात. सात-आठ वर्षांपूर्वी राज्यसभेचे खासदार मुहंमद अदीब यांनीदेखील मुस्लिमांनी राजकारणापासून १० वर्ष अलिप्त राहावे असे सूचवले होते. या काळात समाजाने फक्त आधुनिक उच्च शिक्षण मिळवावे, ज्ञानार्जन करावे, प्रशासनात शिरावे असे त्यांचे म्हणणे होते. या विधानावरून बराच गजहब झाला.

गुलाम नबी आज़ाद यांनी अदीब यांच्यावर टीका करत संबंधित विचार चुकीचा असल्याची शेरेबाजी केली. कुठल्याही स्थितीत मुस्लिमांना राजकारणापासून अलिप्त राहता येत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.

उपरोक्त दोन्ही विधाने आपापल्या जागेवर योग्य असली तरी बहुसंख्यांकवादी धर्मीय-वर्ण-वर्चस्ववादी रेट्यातून मार्ग काढण्यासाठी मुस्लिमांना कुठलातरी एक निर्णय घ्यावा लागणार आहे. दोन्ही निर्णय योग्य की अयोग्य ही चर्चा स्वतंत्र जरी ठेवली तरी ज्ञान साधनेच्या बाबतीत मुस्लिमांनी मागास राहता कामा नये.

इथे लेखक एक महत्त्वाचा मुद्दा लेखक मांडतात, ज्ञानार्जन करून फक्त नोकरीच्या मागे न धावता मुस्लिमांनी उद्योजक व्हायला पाहिजे. त्यासाठी लघुउद्योजकासाठी असलेल्या कर्ज सुविधांचा लाभ घ्यावा, त्याचा पाठपुरावा करावा. शिवाय विविध शासकीय योजनांमध्ये आपली सहभागिता नोंदवावी असेही लेखक सूचवतात. यासाठी त्यांनी लघु व मध्यम उद्योजकांसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजनांबद्दल माहितीदेखील दिलेली आहे. दुसरीकडे कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांच्या लाभधारक घटकात मुस्लिमांचे स्थान अत्यल्प आहे, याबद्दलही ते आकडेवारी देतात.

समाजातील उच्च विद्याविभूषित व धनिक वर्गाने एकत्र येऊन एका स्वयंसहाय्यता गटाची निर्मिती केली पाहिजे. त्यातून शिक्षण व रोजगार विषयी मार्गदर्शन, सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया घडवावी असेही लेखक म्हणतात. प्रत्येक जबाबदारी सरकारवर सोडणे योग्य नाही, असेही लेखकाला सुचवायचे आहे.

हयात असलेल्या शिक्षणपद्धतीवर बोट ठेवत त्यांनी तंत्रज्ञानावर आधुनिक शिक्षण आत्मसात करावे, शिवाय वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये मुस्लिमांनी आपली सहभागिता नोंदवावी असाही विचार लेखक मांडतात. शैक्षणिक घटक म्हणून विज्ञान क्षेत्रात मुस्लिम खूप मागास आहे, अशी खंत लेखकाला वाटते.

लेखक जनाब हुमायून मुरसल यांनी संबंधित पुस्तकात एक महत्त्वाचा विचार मांडला आहे, तो म्हणजे, मुसलमानांनी आपले सांस्कृतिक पुनर्जागरण करावे. सांस्कृतिक क्षेत्रात मुस्लिमांचे प्रयत्न अत्यल्प असल्याबद्दल खंत व्यक्त करत लेखक म्हणतात, कला, कौशल्य, भाषा, साहित्य, खान-पान, सर्जनशिलतेच्या माध्यमातून इतर समुदायाला जोडून घ्यावे, असा महत्त्वाचा विचार लेखक मांडतात.

शिक्षणासोबत खेळामध्ये देखील प्राविण्य मिळवावे, असे लेखकाला वाटते. आधुनिक शिक्षणात फक्त इंजीनियरिंग, मेडिकल किंवा तत्सम घटक नसून कला, साहित्य, संस्कृती, खेळ इत्यादीवर आधारित शिक्षण पद्धती व रोजगार स्वीकारायला पाहिजेत आणि त्यात रोजगार मिळवाला पाहिजे असेही लेखकाला वाटते. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन शिक्षण घेतले नाही तर समाजाला त्याचे तोटे सहन करावे लागतील असेही लेखक सुचवतात.

भविष्यात शिक्षण पद्धती व रोजगाराची साधने अकल्पनीयदृष्ट्या विकसित होणार आहेत, त्यासाठी समाजाने तयार रहावे, असेही लेखकाला वाटते. शिक्षणासोबत रोजगार मिळवण्याच्या मानसिकतेतदेखील बदल घडविला पाहिजे, असे लेखक सुचवतो.

वाचा : रफींच्या कौटुंबिक स्मृती : माय अब्बा अ मेमॉयर

वाचा : इस्लाम : ज्ञात आणि अज्ञातांंचा शोध

आधुनिक शिक्षणाने मिळवून देणारी एक प्रणाली स्वायत्त गटातून उभी केली पाहिजे, असे लेखक म्हणतात. त्यासाठी मुस्लिम विद्यापीठाची कल्पना लेखक मांडतात. स्वयंसहायता गटातून असे प्रयत्न झाले पाहिजे असे लेखक मानतात. त्यासाठी अलीगड विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, आलिया विद्यापीठ स्वयंसहाय्यता गटाच्या मार्फत उभे राहिले आहेत. त्याच धर्तीवर मुस्लिम विद्यापाठाची कल्पना साकार होऊ शकते, असा आशावाद लेखक मांडतात.

इतिहासातून वाद उत्पन्न करता त्यातून बोध घ्यावा, असे लेखक सूचवतात. ऐतिहासिक वाद-विवाद व त्याचा आधार घेऊन मुस्लिमांचे शत्रूकरण होणारच. जो घटक इतिहासातील पात्रांना जिवंत करून त्यावर वाद उभा करतो, तो आपले राजकीय हित साधण्यासाठी हे कृत्य करतो. त्यामुळे राजकीय हिताच्या दृष्टीने केलेल्या कृत्याला बळकटीकरण न देता त्यातून बाजूला झाले पाहिजे, वादग्रस्त मुद्द्याला बेदखल केले पाहिजे. वादात न पडता शिक्षण, रोजगार, आधुनिकता, प्रयोगशिलता अशा बाबींकडे लक्ष पुरवावे, असे लेखक सुचवतात.

हिंदू आणि मुसलमान दोन्ही एक देश आहेत. त्यांचे जगणे आणि भविष्य एकसारखे आहे, धर्म, संस्कृती भाषा वेगळ्या झाल्या असल्या तरी हे बहुसंस्सकृती भारताचे सौंदर्यस्थान आहे. ही बहुसंस्कृती शत्रुता, वाद, तंटे, बखडे आणि रक्तपाताचे कारण ठरता कामा नये, सहजीवनात लोकांना जोडून ठेवणे, आपलेपण, करुणा आणि समर्पित प्रेमाचे प्रयत्न दोन्ही समूह गटातून झाले पाहिजे, असे लेखक सुचवतो.

संबंधित पुस्तकात लेखक समकालीन राजकीय वादावर देखील प्रकाश टाकतात. हिंदुत्व विचारसरणींवर भाष्य करत ते म्हणतात, यातून काही हाती लागणार नाही. धार्मिक गटांचे मोबिलायझेशन होणार, हा गट अधिकाधिक धर्मांध, कट्टर होत जाणार परिणामत: मागास घटकाला मग तो श्रमिक असो, धार्मिक अल्पसंख्यांक असो किंवा गरिब- निराश्रित सर्वांना त्याचे तोटे सहन करावे लागणार आहेत, असेही लेखक म्हणतो. हिंदुत्व ही विचारसरणी वर्ण-वंशश्रेष्ठत्वाच्या वर्चस्ववादी विचारावर उभी आहे, त्यातून परिघाबाहेर ढकलल्या गलेल्या मागास घटकांना काहीच लाभ होणार नाही, असेही लेखक सुचवतात.

मुस्लिम आरक्षणाबद्दल लेखकाने घटनात्मक तरतुदीचा उल्लेख करत ते कसे योग्य आहे, याचे महत्त्व पटवून दिले आहे. शिवाय लेखकाच्या वतीने महेमूद उर रहमान अभ्यास गटाला देण्यात आलेल्या प्रस्तावाची चर्चादेखील केलेली आहे. या प्रस्तावात त्यांनी मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण आणि समान संधी आयोग स्थापन करावा द्यावा असे सुचवले होते, याचीही आठवण ते काढून देतात.

शेवटचे तीन प्रकरणे मुस्लिम समुदायाबद्दल राजकीय विचार, सामाजिक सद्भाव व सहजीवन इत्यादींबद्दल महत्त्वाची मांडणी करतात. ही तीन प्रकरणे पुस्तकाचा मध्यबिंदू आहे, असेही म्हणता येईल. संबंधित प्रकरणात खूप विस्ताराने अनेक बाबींची उकल करण्यात आलेली आहे. शिवाय अगतिक अवस्था व राजकीय समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग देखील सांगण्यात आलेले आहेत.

आधुनिक शिक्षण आत्मसात करताना मुस्लिमांनी उर्दू भाषेचे संगोपन व संवर्धन करायला पाहिजे असे सांगून लेखक पुस्तक संपवतात. उर्दू ही मुसलमानांची सांस्कृतिक अधिष्ठान आहे, त्यामुळे तिचे जतन व संगोपन महत्वाचे ठरते, असेही लेखक म्हणतात. भाषा-साहित्य टिकवण्यासाठी मुस्लिमांनी उर्दू शिकली पाहिजे असाही आग्रह ते धरतात.

वास्तविक पाहता हे पुस्तक सामाजिक संघटनेत कार्य करणाऱ्या व करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना व सामान्य मुस्लिम समुदायाला उद्देशून लिहिण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवतात. 100 पानांच्या या पुस्तकात मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चिंतन करण्यात आलेले आहे. सबंध पुस्तक आधुनिक शिक्षण व ज्ञानप्रणाली आत्मसात करण्यावर बळ देते.  

 ###

पुस्तकाचे नाव : नॉलेज सोसायटी

भाषा : हिन्दोस्ताँनी (देवनागरी हिंदी)

लेखक : हुमायून मुरसल

पाने : 100

देणगी मूल्य : 100 रुपये

प्रकाशक : सोसायटी फॉर मुस्लिम्स सोशल चेंज, कोल्हापूर

(१५-३१ जानेवारी २०२३च्या परिवर्तनाच्या वाटसरूमध्ये प्रकाशित)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘नॉलेज सोसायटी’ : समाजाच्या सर्वांगीण विकासाचे चिंतन
‘नॉलेज सोसायटी’ : समाजाच्या सर्वांगीण विकासाचे चिंतन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio7Aqi2fiEAPHcpZsMT1RsnHG3vJzDlPZOXINoCA0STDr_0ZgvGY5F9yRx30ZqbRNVJmFyRmP2uRe8iNVSRuQcIWenudiG6NbaDuMSpZ-dBWntPWJwQdINA8_b80YRmsThmfjEqLaHF-rLN8shNwSnZnWqhCK6u_lS1xdDSo0S2cYLA9Rcsvs7o2og9fKe/w640-h396/Humayun%20book-1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEio7Aqi2fiEAPHcpZsMT1RsnHG3vJzDlPZOXINoCA0STDr_0ZgvGY5F9yRx30ZqbRNVJmFyRmP2uRe8iNVSRuQcIWenudiG6NbaDuMSpZ-dBWntPWJwQdINA8_b80YRmsThmfjEqLaHF-rLN8shNwSnZnWqhCK6u_lS1xdDSo0S2cYLA9Rcsvs7o2og9fKe/s72-w640-c-h396/Humayun%20book-1.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2023/02/blog-post_1.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2023/02/blog-post_1.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content