सलिमा मजारी अफगाणच्या बलाख जिल्ह्याच्या कलेक्टर. नियुक्तीच्या पहिल्या दिवशी सुरक्षेसाठी त्यांना दोन गार्ड आणि जुनं एके 47 देण्यात आलं. गन सुरू आहे का नाही याची चाचणी घ्यायचं त्यांनी ठरवलं. गार्डसह त्या डोंगराळ भागात गेल्या. स्वत ट्रिगर ओढलं.
बंदुकीतून निघणाऱ्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजानं
त्या भानावर आल्या. हाच तो आवाज का, जो विनाश करतो, अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त करतो, लहान मुलांना निराधार करतो. देशाला हिसेंच्या
दरीत लोटतो... हे चित्र बदलता येईल का? इत्यादी विचार त्यांच्या डोक्यात गोंगाट करू लागले. तिथून सुरू झाला
प्रवास एका निर्णायक बदलाचा.
पस्तिशीतल्या सलिमा ‘दि नेशनल न्यूज’ या अरब वृत्तपत्राला मुलाखत देताना वरील भावना
कथन करतात. संबंधित वृत्तलेखाचं शीर्षक आहे, ‘तालिबानींना शस्त्रे सोडण्यास मनाई करणारी महिला.’
लेखाचा सारांश, सलिमा मजारी यांनी तब्बल १२५ तालिबानींना कायमचं
शस्त्र आणि हिसेंचा मार्ग सोडण्यास भाग पाडलं.
वाचा : तालिबानींचा विरोध करणाऱ्या अफगाणच्या
बंडखोर महिला
वाचा : कमर गुलची रायफल आणि वायरल असत्य
काय आहे कथा?
सलिमा इराणमध्ये जन्मलेल्या अफगाण शरणार्थी.
इराणचं सेटल आयुष्य सोडून तीन वर्षापूर्वी त्या मायदेशी परतल्या. निर्वासितांचा
डाग माथी घेऊन मरायचं नाही, असा त्यांचा संकल्प. पती व मुलासह त्यांनी २०१८ला अफगाणिस्थान गाठलं.
मजार ए शरीफ शहरातील एका खासगी विद्यापीठात त्यांना प्रशासकीय पदावर नियुक्ती
मिळाली.
नोकरी करता करता त्यांनी सिविल सर्विसेजमधून
चारकिंट जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट गवर्नर पदासाठी अर्ज केला. अभ्यास व जोडीला
विविध अस्थापनेतील व्यवस्थापकीय अनुभवाच्या जोरावर त्या निवडल्या गेल्या. अशा
रितीने सलिमा उत्तर प्रांतातील बलाख शहराच्या पहिल्या महिला गवर्नर म्हणजे कलेक्टर
ठरल्या.
तालिबानी बंडखोरीमुळे स्थानिक जनतेला धोका
निर्माण झालेला हा प्रदेश. त्यांच्याशी सामना करण्याचं एक भलं-मोठं आव्हान सलिमा
यांच्यासमोर होतं. दि नॅशनल न्यूजच्या मुलाखतीत त्या म्हणतात, “यापूर्वी कधी मी बंदुकीच्या इतक्या जवळ गेले
नव्हते. जुने ४७ पाहून मला खात्री होत नव्हती की हे शस्त्र खरं आहे. शाहनिशा करून
घेण्यासाठी मी त्याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.”
सलिमा म्हणतात, “त्यादिवशी एका संकल्पासह बंदुकीची भिती नाहिशी
झाली. आता मी बंदूक उचलून पुरुषांसह युद्धात सामील होते, बहुतेक वेळा मी लोक आणि सरकारी सैन्यात समन्वय
साधण्यास मदत करते.”
काबुल नाऊच्या मते त्यांनी प्रदेशात अनियंत्रित
भ्रष्ट्राचाराविरोधात धडक मोहीम सुरू केली. या कार्रवाईमागेदेखील व्यक्तिगत अनुभवच
होता. त्या म्हणतात, “अफगाणिस्थानात
भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे. तुम्ही केवळ उच्च प्रतिभा घेऊन सरकारी यंत्रणेत
शिरू पहात असाल तर ते खूप कठीण आहे.”
सलिमा म्हणतात, “माझ्याकडे प्रतिभा व गुण असूनही आर्थिक व राजकीय
कमतरतेमुळे अर्ज फेटाळला गेला. मीच काय तर कुठलाही उमेदवार भक्कम आर्थिक पाठिंबा
असल्याशिवाय इथे निवडला जात नाही.”
आज चारकिंट प्रदेश समूळ भ्रष्टाचारमुक्तीच्या
मार्गावर आहे. त्याचवेळी दहशतमुक्त म्हणून हा प्रदेश ओळखला जातो.
वाचा : अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची
गोष्ट
वाचा : बालिकांच्या जीवावर उठणार हा सोमालियन कायदा!
तालिबांनी गडात प्रवेश
चारकिंट प्रदेश तालिबानी सैनिकांचा गड मानला
जातो. ते अनेकदा जिल्ह्यात हल्ले करतात आणि जाताना पोलीस चौक्या फोडतात. खेड्यांचा
ताबा घेऊन स्थानिकांना त्यांच्यासाठी टॅक्स भरण्यास भाग पाडतात. शस्त्रे व इतर
वस्तूंसाठी सैन्य आणि पोलीस चौकी लुटतात.
स्टॅटर्जी व नियोजन करून त्यांनी तालिबानी
बंडखोरांचा मुकाबला केला. फ्रंट लाईनवर राहून त्यांनी बंडखोरांना आव्हान दिलं.
त्यांना माहीत होतं की सशस्त्र महिलेवर तालिबानी हल्ला करू शकणार नाही.
कलेक्टरच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी स्वत:ला
सशस्त्र केले आणि अनेक तालिबानी हल्ले रोखले. अनेक रहिवाशांनी या युद्धात सामील
होण्यासाठी व शस्त्रासाठी पैसे जमविण्याकरिता त्यांचं पशुधन विकलं.
दि नॅशनल म्हणते, सलिमा यांनी व्यक्ती कुठल्या परिस्थितीत बंदूक उचलतो
याचा अभ्यास केला. त्यात अनियंत्रित सरकारी पोलीस व यंत्रणेत रुजलेला भ्रष्टाचार
ही कारणे प्रामुख्याने समस्या म्हणून निदर्शनास आल्या. सलिमा त्यांनी त्यावरच थेट प्रहार
करत तो नायनाट करण्याचा संकल्प केला. परिणामत: गेल्या तीन वर्षात बहुतेक प्रश्न संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.
सशस्त्र हिंसेऐवजी त्यांनी शांततेच्या मार्गाने
वाटाघाटी सुरू केल्या. महिनाभरापूर्वी प्रदेशातील एका खेड्यावर तालिबान्यांनी
हल्ला केला. त्यात महिला आणि लहान मुलांचा बळी गेला. परिणामी ग्रामस्थांनी कर भरणे
थांबवले. जीवंत राहिलेल्यांना बदला घ्यायचा होता, परंतु सलिमा यांनी चर्चा घडवून आणून पुढचा अनर्थ
टाळला.
गावातील बुजुर्ग आणि धार्मिक नेत्यांमार्फत त्यांनी
तालिबांनी बंडखोरांना संदेश पाठविला आणि सामूहिक शांततेचं आवाहन केलं.
वाचा : हिजाबधारी मिस इंग्लड सारा इफ्तेखार
वाचा : हिजाबधारी
एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
तुमचा माझा इस्लाम वेगळा का?
दि नॅशनल म्हणते, संबंध तीन वर्षे बंडखोरांना वेगवेगळ्या मार्गाने ग्रामस्थांच्या
मदतीने प्रबोधनाचे धडे देत होत्या. हिंसा व उत्पात घडविणाऱ्या तालिबानी बंडखोराला
शांतता बैठकीत इस्लामचे धडे दिले.
“तुम्ही हिजाबबद्दल बोलत असाल तर आम्हीदेखील हिजाब
घालतो. तुम्ही नमाजचा आग्रह धरता, आम्ही पाचवेळा ती करतो. तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलता,
मीदेखील त्याविरूद्ध लढत आहे. तुमचा आणि
माझा इस्लाम एकच आहे, मग तो तुम्हाला हिंसा
आणि मला शांतता कसा शिकवतो. जर इस्लामच्या नावाने लहान मुलांना निराधार करणे,
हत्या घडविणे, हिंसाचार करणे योग्य आहे का?”
या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, तब्बल 125 तालिबान सैनिकांनी गेल्या महिन्यात
आत्मसमर्पण केले. त्यात बहुतेक बंडखोर हे तरुण आहेत. त्यांचे ब्रेन वॉश करण्यात
आलं होतं, पण योग्य ब्रेन वॉश
तर सलिमा मजारी यांनी केलं अशी कबुली या तरुणांनी दिली आहे.
दि नॅशनल न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सलिमा यांनी
विश्वास व्यक्त केला आहे, अधिकाधिक बंडखोर तरुणांना प्रजासत्ताकात सामील करून घेण्यासाठी व
त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. त्या म्हणतात, “जेव्हा तुम्ही प्रशासक म्हणून लोकांशी प्रामाणिक असता
त्यावेळी ते नेहमीच तुमच्याशी दयाळूपणाने वागतात.”
युरोपीयन मीडियात ग्रे शेडमध्ये दिसून येणारा
अफगाण मात्र मध्य-आशियायी प्रसारमाध्यमात सकारात्मक बदलांना टिपणारा दिसतो. इतक्या
मोठ्या आश्वासक घटनेचं वृत्त आघाडीच्या आंतरराष्ट्रीय मीडियात नव्हते.
सलिमां यांनी प्रत्यक्षात आणलेला हा आश्वासक बदल परंपरावादी म्हणवल्या जाणाऱ्या अफगाणला परिवर्तानाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. सलिमा मजारी यांनी एक प्रशासक म्हणून हा बदल घडवून आणला आहे. महिलांसाठी निर्णायक बदल सध्या अफगाणमध्ये घडत आहेत, त्यात एक महिला म्हणून सलिमा मजारी यांनी दिलेलं योगदान प्रेरणादायी आहे.
कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख २६ नोव्हेंबर २०२०च्यालोकमत-ऑक्सिजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)
जाता जाता :
* इजिप्तच्यामुली मौन तोडतात तेव्हा!

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com