‘अया सोफिया’ सांस्कृतिक वर्चस्ववादाचा बळी


‘हागिया सोफिया’ तुर्की उच्चार ‘अया सोफिया’ हे तुर्कस्थानच्या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक महत्त्वाचं ठिकाण. यूनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये जागा मिळवलेल्या या म्यूजियमला भेट देण्यासाठी लाखों पर्यटक देश-विदेशातून इस्तांबूलला येतात. शुक्रवारी तुर्कीच्या सर्वोच्च कोर्टाने या जागेचे मस्जिदीत रुपांतर करण्याचा बहुचर्चित निकाल दिला. या निर्णयावरून जगभरात मंथन सुरू आहे. तुर्की व अन्य देशातही या निकालाची समिक्षा होत आहे.

एका निकालामुळे विचार करणाऱ्या तरुणाईत दोन गट पडले आहेत. जगभरात यावरून वाद-प्रतिवादाचे फड रंगले आहे. अनेकांनी या निर्णयाला सुडबुद्धी म्हटलंय तर बहुसंख्य त्याला धर्मवादी राजकारणासाठीची एक विखारी कृती ठरवत आहेत.



काय आहे इतिहास?

1600 वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले ‘अया सोफिया’ एक विख्यात चर्च होतं. 900 वर्षांनंतर त्याचे मस्जिदीत रुपांतर झाले. या सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या घटनाक्रमाची कहाणी एकीकडे फारच रोचक व दूसरीकडे धक्कादायक आहे. ईसवी सन 325मध्ये रोमन सम्राट कॉन्सटियस (पहिला) याने एक नवे शहर वसवून त्याला रोम साम्राज्याची राजधानी केलं. त्याचे नाव आपल्या नावावरून ‘कॉन्सटेनटिनोपोल’ असं ठेवलं. नंतर त्याचे नाव इस्तांबूल झालं.

त्यानंतर आलेल्या थिसिसियस (दूसरा) याने इसवी 360मध्ये या शहरात जगभरातील आश्चर्यात गणले जावे, असं एक चर्च निर्माण करण्याची योजना आखली. पण ते पूर्णत्वास येण्यास 200 वर्षे उलटावी लागली. दरम्यानच्या काळात फॉऊंडेशनचे बरेचसं काम झालेलं होतं. ईसवी 532मध्ये जस्टिनियन (द्वितीय) याने जगभरातील आश्चर्य म्हणून कल्पिलेल्या या इमारतीचं काम सुरू केलं. पाच वर्षांनंतर ही देखणी इमारत प्रत्यक्षात आली.

या भव्य इमारतीसाठी जगभरातून इंजिनियर बोलावण्यात आले होते. त्यासाठी 10 हजार मजूर राबत होते. इतिहास सांगतो की, तब्बल 150 टन सोनं या वास्तुसाठी वापरण्यात आलं. त्या इमारतीचं नाव ‘हागिया सोफिया’ म्हणजे ‘पवित्र ज्ञान’ असं ठेवण्यात आलं व ऑर्थोडॉक्स चर्च म्हणून ते लोकार्पित झालं.

कभी रोमन साम्राज्य के शानौशौकत का प्रतीक रहे हागिया सोफ़िया चर्च को सुलतान ने मस्जिद में तब्दिल करने का आदेश दिया।...

विशाल घूमट असलेलं हे प्रसिद्ध चर्च शहरातील बॉस्फोरस नदीच्या पश्चिमी किनाऱ्यावर स्थित आहे. दोन प्रदेशाला विभक्त करणाऱ्या या नदीच्या पूर्वेकडे आशिया तर पश्चिमेकडे यूरोप आहे. चर्चमधील नक्काशी व कलाकुसर अप्रतिम आहेत. येशू ख्रिस्ताचे भव्य चित्र इथे कोरलेले आहे. थोड्याच कालावधीत हे चर्च रोमन साम्राज्याचे गौरवाचे प्रतीक बनले.

बायझेंटाईन साम्राज्याच्या अर्ध्याहून अधिक सम्राटाचे राज्यभिषेक याच चर्चमध्ये झाले. शिवाय राज्यकाराभारासंदर्भातले सर्वच राजकीय निर्णय इथून घेतले जात. जगभरातील ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्माला मानणाऱ्यांचे हे श्रद्धास्थान बनले. असे म्हणतात की, या चर्चेचे उत्पन्न कोट्यवधीच्या घरात होते.




क्रूर शासनाचे गौरवशाली प्रतीक

सहाव्या शतकात पैगंबर मुहंमद (स) यांनी प्रेषित अब्राहम व इसा यांच्या एकेश्वरी धर्माची पुन:प्रस्थापना केली. मूर्तिपूजेला नाकारत मानवता, समान हक्क व न्याय या तत्त्वावर आधारित सत्यधर्माची स्थापना जगभरात चर्चेचा विषय बनला. थोड्याच कालावधीत समान न्यायावर आधारित राज्यव्यवस्थेचं धोरण स्वीकारून मुस्लिमांनी इस्लामचा विस्तार केला. लोक मोठ्या संख्य़ेने मूर्तिपूजा सोडून देत एकेश्वराची दिक्षा घेत होते. अशा रितीने नव्या शासनप्रणालीची रुजवणूक सुरू झाली. प्रेषित इसाला मानणाऱ्या ख्रिस्ती सम्राटांनी प्रस्थापित सत्तेला हादरे म्हणून या घटनेकडे पाहिलं.

त्याकाळी बायझेंटाईन साम्राज्य अर्ध्या जगावर राज्य करत होतं. सत्तेला मिळालेलं इस्लामचे आव्हान मोडून काढण्यासाठी ख्रिस्ती सम्राटांनी वेटिकन (पोप)च्या मदतीने धर्मयुद्धाची (क्रूसेड) घोषणा केली. इस्लामी साम्राज्यवादाला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू झाले. दरम्यानच्या काळात अनेक युद्धे झाली. शुद्धिकरण, धर्मस्थापना व सत्ता विस्ताराच्या हेकेखोर धारणामुळे कोट्यवधी माणसं मारली गेली. सत्तेसाठी वाट्टेल ते धोरण बायझेंटाईन सम्राटांनी स्वीकारलं.

इतिहास सांगतो की रोमन सम्राटांनी क्रूरतेची परिसीमा गाठली होती. धर्माच्या नावाने हजारोंच्या संख्येने हत्या, युद्धे, रक्तपात, हिंसा मारकाट नित्याचेच झाले होते. प्रेषितांनी आपल्या हयातीत या अन्यायी व क्रूर रोमन साम्राज्याच्या पतनाचे भाकित केलं होतं. आठशे-नऊशे वर्षानंतर तुर्की सम्राटाने प्रेषितांच्या या भविष्यवाणीला आव्हान म्हणून स्वीकारलं.


चर्चेचं मस्जिदीत रुपांतर

1453मध्ये इस्लाम धर्माला मानणाऱ्या तुर्की सुलतान मेहमद (दूसरा) याने कॉन्सटेनटिनोपोल शहर जिंकून बायझेंटाईन साम्राज्य व नष्ट केले. शहराचा ताबा घेऊन त्याने रोमन सम्राटाच्या गौरवाचे प्रतीक असलेल्या सुप्रसिद्ध ‘अया सोफिया’ चर्चेचं मस्जिदीत रुपांतर करण्य़ाची घोषणा केली. ही कृती त्याकाळातील एक सामान्य बाब होती. याच शतकात स्पेनमधून इस्लामी सत्तेचा नायनाट करून स्पॅनिशांनी हजारो मस्जिदीचे चर्चमध्ये रुपांतर केलं होतं. त्यामुळे या घटनेकडे इतर देशांनी सामान्य बाब म्हणून पाहिली.

तुर्की सुलतानने या वास्तुला इस्लामी स्वरूप देत त्यात बदल केले. ख्रिस्ती प्रतीक नष्ट करून किंवा ती लपवून त्यावर कुरआनच्या आयती कोरल्या. कालांतराने बाजहेरील बाजूस सहा मिनार उभे झाली. अशा रितीने 900 वर्षानंतर अया सोफिया चर्चमधून मस्जिदीत रुपांतरित झाले. पाचशे वर्षानंतर 1918मध्ये पहिले महायुद्ध झाले. यात मित्रराष्ट्रांनी तुर्की सुलतानला पराभूत केले. बड्या तुर्की साम्राज्याचे विघटन होऊन त्यातून नवे देश जन्मास आले.

सुलतानला पदच्युत करत विघटित तुर्कीची सर्व सूत्रे कमाल अतातुर्क या सुलतानच्या पूर्वाश्रमीच्या सैनिक कमांडरकडे आली. त्याने धर्मनिरपेक्ष राष्ट्रावादाचा पुरस्कार करत प्रथमच तुर्कीत लोकशाही राज्यव्यवस्थेची स्थापना केली. केमाल पाशा नावाने ओळखला गेलेला हा सम्राट उदारमतवादी होता.



मस्जिदचे झाले म्यूजियम

टीआरटी वर्ल्ड या तुर्की माध्यम समूहाच्या मते 1931मध्ये अमेरिकेच्या बायझेंटाईन इन्स्टिट्यूटचे संचालक थॉमस विटमोर यांनी राष्ट्रपती केमाल पाशाची भेट घेऊन अया सोफियाला पुन्हा चर्चमध्ये रुपांतर करण्याची विनंती केली. राष्ट्रपतींनी मधला मार्ग स्वीकारत अया सोफियाचे एका म्यूजियममध्ये रुपांतर करत जगभरातील पर्यटकासाठी खुले केलं. पुढे त्यांनी 1943 साली एक स्वतंत्र विधेयक आणत अया सोफियामध्ये नमाजला पायबंद घातला.

गेल्या 80 वर्षापासून अया सोफिया एक संग्रहालय आहे. तिथे जगभरातून लाकों पर्यटक भेट देतात. परंतु तुर्कस्थानमध्ये ‘अया सोफिया’चे पुन्हा मस्जिदीमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी जोर धरू लागली. त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेदेखील झाली. विद्यमान राष्ट्रपती रेचेप तय्यप अर्दोआन यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात अया सोफियाचा मुद्दा लावून धरला. त्याला मस्जिदीत रुपांतर करण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी घोषणा त्यांनी वारंवार केली.

अर्दोआन इस्लामी राष्ट्रात प्रभावशाली नेते मानले जातात. वाढता इस्लामफोबिया व यूरोपीयन राष्ट्रवादाचे ते विरोधक मानले जातात. इतर देश त्यांना धार्मिक भावना भडकावून राजकारण करणारे नेते मानतात. परंतु तुर्कस्थानच्या मध्यमवर्गीयांचे ते लोकप्रिय नेते आहेत. आपल्या मतदारांचा अहंगड सुखावण्यासाठी अर्दोआन प्रसिद्ध आहेत.



कोर्टाचा निकाल

आठ दशकापासून प्रलंबित असलेला मुद्दा त्यांच्या काळात कारकीर्दीत स्टेट कौन्सिल म्हणजे सर्वोच्च कोर्टात आला. कोर्टाने शुक्रवारी 10 जुलैला एक ऐतिहासिक निकाल देत अया सोफियाचे मस्जिदीत रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला. मतदारांना खूश ठेवण्यासाठी तुर्की सरकारने अया सोफियाचे राजकारण केले, अशी चर्चा आहे.

 

या निर्णयाने तुर्कस्थानचा मध्यमवर्ग जल्लोष करत असला तरी बुद्धिवादी गटात नाराजीचा सूर आहे. जगभरातील ख्रिस्ती धर्मावलंबी व नागरिकात या निर्णयामुळे अस्वस्थतेचे वातावरण आहे. अमेरिका, ग्रीससहित अनेक देशांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दूसरीकडे यूनेस्कोनेदेखील या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहे.

इस्लामी देशात संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अनेकांना हा निर्णय चुकीचा वाटतो. मुस्लिम तरुणांची सोशल मीडियावरील चर्चा लक्षणीय आहेत. अनेकांनी हैशटैग मोहिम सुरू करत चर्चा रंगवली आहे. बहुतेक जण मानतात की, अया सोफियाला म्यूजियम ठेवायला हवे. तर मस्जिदीचा ठेका लावून धरणारेही कमी नाहीयेत. स्पेन व इतर देशांनी मस्जिदीचे रुपांतर चर्चेमध्ये केले आता ते त्याची मस्जिद करतील का? असा प्रश्न विचारणारेही बहुसंख्येने होते.



धर्मीय राजकारणाचे शस्त्र

शनिवारी या विषयावर राष्ट्रपतींनी देशाला संबोधित केलं. त्यांनी या निर्णयावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. ‘निकालावर प्रश्न उपस्थित म्हणजे तुर्कीच्या सार्वभौमिकतेचं उल्लंघन आहे’ असे ते म्हणाले. प्रार्थनेसाठी खुली असलेली अन्य 435 चर्च आमच्या देशातील विविध धर्मसमुदायाची ठेव आहे म्हणत अया सोफिया पूर्वीप्रमाणे सर्वांसाठी खुले राहील, अशी घोषणा त्यांनी केली.

अर्थात अप्रत्यक्षरित्या त्यांनी टीकाकारांना धमकी दिली आहे, असं म्हणता येईल. राजकीय विश्लेषक या घटनेला इस्रायलविरोधात संघर्षाची सुरुवात म्हणत आहेत. कारण इस्रायलमध्ये मुसलमानांची पवित्र समजली जाणारी ‘मस्जिद ए अल अक्सा’ तिथल्या ज्यू धर्मियांच्या ताब्यात आहे.

अर्दोआन यांनी वर्षभरापूर्वी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला होता. शिवाय पॅलेस्टाईनच्या कमी होत जाणाऱ्या भूमीवरदेखील त्यांनी जगाचे लक्ष वळवले होते. शिवाय ते इस्रायलविरोधात उघडपणे भूमिका घेतात. थोडक्यात, असं म्हणता येईल तुर्की सरकारने धर्मीय भावना भडकावून विषाक्त राजकारण चालू केलं असून त्याचे एक शस्त्र म्हणून वापर करत आहे. त्याचा भविष्यकाळ कसा असेल, हे तुर्त सांगता येणार नाही. स्मरण असावे की अर्दोआन हे हुकूमशाही वृत्तीचे शासक असून गेल्या वर्षी त्यांनी घटनात्मक सुधारणा करून आपल्या राष्ट्रप्रमख पदाचा कारकीर्दीत वाढ करून घेतली आहे.

वास्तविक, अया सोफिया संदर्भात अर्दोआन यांनी कमाल पाशा यांचा निर्णय यथास्थितीत ठेवायला हवा होता. किंवा त्यापलीकडे जाऊन जूने वैभव परत मिळवून देत त्याला संरक्षित करायला हवं होतं. अया सोफिया हे श्रद्धेय प्रार्थनास्थळ आहे. ते हिंसक व क्रूर समजल्या जाणाऱ्या बायझेंटाईन साम्राज्यवादाचे प्रतीक आहे. ही वास्तु देशाचा पुरातन ठेवा आहे. तशीच ती अघोरी साम्राज्यवादी वृत्तीसाठी एक धडा आहे. त्याचं मूळ स्वरूपात जतन व संवर्धन होणं, तितकंच गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीसाठी स्मरण म्हणून त्याला संरक्षित करता आलं असतं. परंतु या पवित्र वास्तुला धर्मवादी राजकारणासाठी वापर केला जात आहे, अशा कृतीला मान्यता कदापि नाही.

कलीम अजीम, पुणे

Twitter@Kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘अया सोफिया’ सांस्कृतिक वर्चस्ववादाचा बळी
‘अया सोफिया’ सांस्कृतिक वर्चस्ववादाचा बळी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6_CAtvTx7vLZuNVgyg79M0czEvs6npGyaU9ewfs006ywAcQCpm5UkZWA1wFXr1W9HEsOta0qfIDBYAvkJL34iY12D26Rin0L2Ugvn8QH5RXAu0dkpVvmJYdCBIjZKNsfAAi1bpRFVylf-/s640/Hagia+Sophia.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6_CAtvTx7vLZuNVgyg79M0czEvs6npGyaU9ewfs006ywAcQCpm5UkZWA1wFXr1W9HEsOta0qfIDBYAvkJL34iY12D26Rin0L2Ugvn8QH5RXAu0dkpVvmJYdCBIjZKNsfAAi1bpRFVylf-/s72-c/Hagia+Sophia.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_77.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_77.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content