इराणमधील लोकशाही हक्काचा लढा आपल्या तीव्र स्वरूपात जारी आहे. शेजारी
राष्ट्र इराक पाठोपाठ इराणमध्ये सुरू झालेला हा सत्तातंराचा लढा दोन आठवड्यापासून
धगधगत आहे. 15 नोव्हेंबरला सुरू झालेले सरकारविरोधी निदर्शने आणखी तीव्र होताना दिसत
आहेत.
इराण हा जगातील सर्वांत मोठा पेट्रोल उत्पादक देश मानला जातो. अन्य
देशाच्या तुलनेत इथे सर्वांत स्वस्त पेट्रोल मिळते. पण हाच देश पेट्रोलच्या
वाढत्या किमतीमुळे त्रस्त झाला आहे. परिणामी स्थानिक जनतेने सरकारविरोधात बंडाचं
हत्यार उपसलंय. इराणमध्ये पेट्रोलच्या दुप्पट झालेल्या किमतीमुळे जनक्षोभ उसळला
असून सरकारविरोधात अनेक लोकं रस्त्यावर उतरली आहेत.
वाचा : आणि
मैक्सिकोत महिला झाल्या अदृष्य
वाचा : इराकचा लोकशाही लढा
वादाला ठिणगीइराणच्या सुमारे 100 शहरात सरकारविरोधात जनाआंदोलने उभी झाली आहेत. शासनाने आंदोलकांना दंगलखोर आणि देशद्रोही घोषित करत त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर गोळीबारदेखील केला आहे. सरकारविरोधक व पोलीस यांच्यामधील झालेल्या चकमक आणि हिंसक प्रदर्शनात शेकडो लोकं मारली गेली आहेत. एमनेस्टी इंटरनेशनलच्या मते या विरोध प्रदर्शनात तब्बल 143 लोकांना जीव गमवावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते हा आकडा वाढू शकतो. याउलट बीबीसीने हा आकडा 200 पर्यंत नेला आहे. इराणने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
दोन आठवड्यापूर्वी म्हणजे शुक्रवारी 15 नोव्हेंबरला या वादाला ठिणगी
पडली. इराण सरकारने पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या. पेट्रोलवरची
सब्सिडी इराणी सरकारने पूर्णपणे बंद केली आहे. शिवाय पेट्रोलच्या अतिरिक्त वापरावर
निर्बंध घातले. पेट्रोलची वितरण व्यवस्था रेशनिंगद्वारे सुरू केली. वाढलेल्या
किमतीतून जो अतिरिक्त पैसा शासनाकडे येईल त्यातून गरीबांसाठी कल्याणकारी योजना
राबविण्याचं सरकारचं धोरण आहे.
सध्या इराणमध्ये पेट्रोलची किंमत 1500 रियाल म्हणजे भारतीय 32 रुपये
आहे. महिनाभरापूर्वी ही किंमत 21 रुपये प्रति लिटर होती. नव्या नियमामुळे आता
नागरिकांना महिन्याला केवळ 60 लिटर पेट्रोल खरेदी करता येणार आहे. यापेक्षा जास्त
हवं असेल तर त्यासाठी लिटरला दुप्पट रक्कम म्हणजे 30 हजार रियाल अर्थात 64 रुपये
द्यावे लागतील.
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल
वाचा : इस्रोच्या
दोन रॉकेट विमेन
चक्का जामया निर्णयाच्या विरोधात लोकांनी नाराजी दर्शवली. इराणी लोकांनी सरकारविरोधी निदर्शने सुरू केली. हळूहळू करत हा विरोधी सूर अन्य देशात पोहोचला आणि एकच भडका उडाला. सोशल मीडियातून या ठिणगीला हवा मिळत गेली व विद्रोही आंदोलनाला सुरुवात झाली. बघता-बघता हजारो लोक चौका-चौकात येऊन जमा झाले. वाहने एकाएकी थांबली. अचानक झालेल्या या कृतीमुळे सगळीकडे ट्रैफिक जॅम झाले.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलने अन्य शहरात पसरले. आंदोलनाची
दाहकता ओळखून सरकारने इंटरनेट बंद केले. देशभरात इंटरनेट शटडाउन केले गेले. या
संदर्भात इंटनेटवर नजर ठेवणाऱ्या ‘नेटब्लॉक’ य संस्थेने एक निवदेन जारी करत सांगितले
की हळूहळू अन्य शहरातील नेटवर्कमध्ये कपात केली जात आहे. शेवटची माहिती हाती आली
त्यावेळी इराणमध्ये इंटरनेट बंद होऊन 10 दिवस उलटले होते. इंटरनेट बंद केल्याने
सरकारविरोधातला उद्रेक आणखीनच वाढला.
इराणी लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे.
त्यांना सोशल मीडिया हाताळण्यास बंदी करण्यात आली आहे. इंटरनेट बंद केल्याने
त्याचा मोठा फटका अन्य उद्योगावर पडला आहे. मुद्रीत प्रसारमाध्यमांच्या निवडक
आवृत्त्या निघत आहेत. शिवाय इलेक्र्टॉनिक मीडिया मोठ्या शटडाऊनला सामोरे जातोय.
वाचा
: सुदानी राज्यक्रांतीची नायिका
वाचा : सुदानची पॅशनेट नलायाह तीन हजार जणांचा बळी
लोकांची नाराजी इतकी वाढली की, त्यांनी हातात शस्त्र घेतलं. जाळपोळ व नासधूस सुरू केली. हजारो आंदोलकांनी रस्त्यावर येऊन सरकारी बँका, खासगी दुकाने, पेट्रोल पंप आणि शासकीय कार्यालयांना आग लावली. फार्स या न्यूज एजेंसीच्या मते आंदोलकांनी कमीत कमी 713 बँकांना आणि 140 सरकारी कार्यालयांना आगी लावण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलकांनी सुरक्षारक्षकांवरदेखील हल्ले केले आहेत. बीबीसीच्या मते इराणी लोक हसन रुहानी सरकारच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
या संदर्भात अल जझिराने दिलेल्या वृत्तानुसार अशी माहिती मिळते की, आंदोलनात मारल्या
गेलेल्या लोकांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास अधिकारी नकार देत आहे.
त्यामुळे सरकारविरोध आणखीन तीव्र स्वरूपाचा होतोय. अल जझिराच्या मते पोलिसी उत्तरी
कारवाईत तब्बल 3 हजारपेक्षा जास्त लोकं गंभीर जखमी झाले आहेत.
राष्ट्रपती हसन रुहानी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “लोकांना विरोध निदर्शने करण्याचा अधिकार आहे. परंतु दंगली आणि
निदर्शनात फरक असतो. आम्ही सामाजात असुरक्षा माजविण्याला परवानगी देऊ शकत नाही.”
गेल्या वर्षी मे महिन्यापासून अमेरिकेने इराणवर अनेक आर्थिक निर्बंध
लादले आहेत. परिणामी देशातील अर्थव्य़वस्थेवर त्याचा विपरित परिणाम झालेला आहे.
अनेक मूलभूत वस्तुचे दर गगनाला भिडले आहेत. निर्बंधामुळे दैनंदिन वस्तुच्या किमती
आवाक्याबाहेर गेल्या आहेत. आयात बंद झाल्याने देशात गरजेच्या वस्तू बाजारातून
हळूहळू गायब होत आहेत. परिणामी मूलभूत वस्तुंसाठी जनतेला दुप्प्ट-तिप्पट किंमत
मोजावी लागत आहे.
अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने विविध कर आकारले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून पेट्रोलची सब्सिडी हटवली आहे. सरकारने पेट्रोलच्या किमती
आवाक्याबाहेर वाढविल्याने सरकारविरोधात जनक्षोभ उसळला असून देशभरात हिंसक
प्रदर्शने होत आहेत. येणाऱ्या काळात सरकारविरोधी आंदोलने अधिक तीव्र होतील असं
भाकित अनेक वृत्तसंस्थांनी वर्तवलं आहे.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com