
डब्लुएचओचा चालू आठवड्यातील एक रिपोर्ट जगभरातील तरुणाईच्या चिंतेत भर टाकणारा आहे. संघटनेच्या मते, सुरुवातीच्या चार महिन्याच्या तुलनेत या 60 दिवसात कोविडमुळे सर्वाधिक तरुण बाधित झाले आहेत. 24 फेब्रुवारी ते 12 जुलै दरम्यान 6 मिलियन संक्रमणाच्या विश्लेषण केले गेले. त्यात दिसून आले की 15-24 वर्षे वयोगटातील लोकांचा वाटा 4.5 वरून 15 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं दिसलं.
दुसरीकडे शास्त्रज्ञांनी जारी केलेल्या ताज्या निवेदनात संक्रमणामुळे तरुणांना फार काही नुकसान होईल अशी शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. उल्लेखनीय म्हणजे मागेही अशा पद्धतीचं मत शास्त्रज्ञाकडून व्यक्त झालेलं होतं. त्यानंतर अनेक तरुणांनी वैक्सिनच्या परिक्षणासाठी वॉलिटियर म्हणून आपली नावे नोंदवली होती. परंतु डब्लुएचओची ताजी आकडेवारी धोक्याचे संकेत घेऊन आली आहे.
या भितीला दूजोरा देणारा एक वृत्तलेख 30 जुलैला न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झाला. व्हॅन्डर्बिल्ट युनिव्हर्सिटीमधून निवृत्त झालेले बायोमेडिकल शास्त्रज्ञ लॅरी चर्चिल यांनी शोधनिबंध सादर केला आहे. त्यानुसार तरुणांना संक्रमणापासून वाचवणे हे प्रथम प्राधान्य असले पाहिजे असं मत व्यक्त त्यांनी केलं आहे.
त्यांच्या मते वृद्धाच्या तुलनेत तरुणांना लागण होणे अती हानिकारक आहे. आपल्या निबंधात त्यांनी काही संक्रमित वृद्धांची निवेदने नोंदवली आहेत. तरुणांना कोविडपासून वाचवणे अधिक हितकारक असल्याचं या संक्रमितांनी म्हटलं आहे. त्याआधारे चर्चिल मांडणी करतात की, वृद्धांनी आयुष्य जगलं आहे, आता तरुणांना वाचवणे प्राध्यान्यक्रम ठरविला पाहिजे. हे मत नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही असा न्यूयार्क टाइम्सचा सूर आहे. त्यासाठी काही विश्लेषणही मांडण्यात आलेलं आहे. मानवी हक्क संघटनांनीदेखील या संदर्भात आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
वाचा : कमल गुलची रायफल आणि वायरल असत्य
वाचा : दुबईच्या सारा अल् अमीरीचं 'होप मिशन'
चर्चिल यांचा हा निबंध प्रतिबंधात्मिक उपाययोजनेवर सखोल भाष्य करतो. त्यांनाही वाटते की तरुणांनी परिक्षण मोहीमेत अधिक सहभाग नोंदवावा. जागतिक आरोग्य संघटनेने वैक्सीन व परिक्षणासंदर्भात नवी माहिती प्रसारित केली आहे. संघटेनेच्या एक मुख्य वैज्ञानिक असलेल्या सौम्या स्वामीनाथन यांनी लस निर्मितीच्या प्रक्रियेविषयी बुलेटिन दिलं आहे. डब्लुएचओकडे सुरू असलेल्या लस विकसाच्या मोहिमेत 200 उमेदवारांनी सहभाग नोंदवल्याचं ते सांगतात. अल जझिरा म्हणते की यात बहुतेक तरुण वॉलिटियर आहेत.
कोविडवर लस शोधण्याच्या प्रक्रियेत जगभरात गती आलेली आहे. रिपोर्ट सांगतात की चालू महिन्यात काहींचे अंतिम निष्कर्ष येऊ शकतात. रशियानंतर अमेरिकानेदेखील वैक्सीन शोधल्याचा दावा केला आहे. या संदर्भात 15 जुलैला न्यूयॉर्क टाइम्समध्ये अधिकृत बातमी प्रकाशित झाली. त्याची दखल विविध मीडिया हाऊस व मेडिकल जर्नलने घेतल्यानं साहजिकच त्याचं महत्त्व आपोआप वाढलं.
बातमीच्या सुरुवातीलाच संशोधक डॉ. एंथोनी फाउची यांचा कोट आहे, “तुम्ही कितीही काट-छाट करा, परंतु ही एक चांगली बातमी आहे.” एसोसिएटेड प्रेसने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केलं आहे. हा रिपोर्ट सांगतो की, अमेरिकेत कोविड-19 विषाणूवर प्रभावकारी लस तयार झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणतात, ‘टेस्ट केलेल्या वॅक्सीनमुळे पेशंटमध्ये रोगप्रतिबंधक प्रणाली तशीच विकसित होत आहे, जसा दावा केला होता.’
अमेरिकेच्या ‘नेशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ’ आणि ‘मोडेरना इंक लॅब’मध्ये डॉ. फाउची आणि त्यांच्या सहकाऱ्याने ही वॅक्सीन विकसित केली आहे. बीबीसीच्या मते पहिल्या टप्प्यात 45 रुग्णावर हे ट्रायल करण्यात आलं. या परिक्षणार्थी वॉलंटियर्सच्या शरीरात न्यूट्रालाइजिंग एंटी बॉडी विकसित झाली होती. ही टेस्ट एंटी बॉडी इंफेक्शन रोखण्यास समर्थ ठरली. आत्तापर्यंतच्या चाचणीत कुठलेही गंभीर साइड इफेक्ट आढळून आले नाहीत.
तरुण मुलांवर ही परिक्षण मोहीम रोबवण्यात आली. टेस्टसाठी स्वत:हून अनेक नवयुवक वॉलंटियर्स पुढे आल्याचे मीडिया रिपोर्ट सांगतात. चालू महिन्यात वॅक्सीनची महत्त्वाची परिक्षणे केली होतील. तब्बल 30 हज़ार जणांवर ही टेस्ट केली जाईल. यात बहुतेक वृद्धांचा समावेश प्रथमच केला जात आहे. परिक्षणात वॅक्सीनचे दोन डोस दिले जाणार आहेत. ज्यात एका महिन्याचं अंतर असेल.
शास्त्रज्ञांनी आवाहन केलं आहे की, जास्तीत जास्त तरुण वॉलंटियर्सनी या परिक्षण मोहीमेत आपला सहभाग नोंदवावा. न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट सांगतो की, अंतिम रिझल्ट येण्यास किती वेळ लागेल सांगता येणार नाही. पण सरकारला आशा आहे की, वर्षाअखेरीपर्यंत ट्रायल पूर्ण केलं जाईल. बीबीसी म्हणते की, वॅक्सीन विकसित करण्याच्या तुलनेत पाहिलं तर हे रिकॉर्ड स्पीड आहे.
वाचा : रशियाची घटना दुरुस्ती की तानाशाही ला मान्यता!
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल
रशियातही प्रयत्न
रशियाने प्रतिबंधात्मक लसीचा उत्पादन सुरू केले आहे. चालू आठवड्यात वॅक्सीनच्या पेटेंटसाठी रशिया अर्ज करणार आहे. रशियन न्यूज एजन्सी ‘स्पुतनिक’ने या संदर्भात अधिकृत रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्याच्या मते, ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रांसलेशनल मेडिसिन एंड बायोटेक्नोलॉजी’च्या प्रयत्नामुळे हे मेडिसिन तयार झालं. संस्थेचे डायरेक्टर वादिम तरासोव प्रतिक्रियेत म्हणतात, “जगातील पहिली कोरोना वॅक्सीनचे क्लीनिकल ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.”
यूनिवर्सिटीने 18 जूनपासून या वॅक्सीनचे क्लीनिकल ट्रायल घेणं सुरू केलं होतं. मॉस्को टाइम्सचा रिपोर्ट सांगतो की, ‘मॉस्को स्थित सरकारी मेडिकल यूनिवर्सिटी सेचेनोफ़ने हे ट्रायल केलं असून त्यात मानवी शरीरावर संबंधित वॅक्सिन सुरक्षित आहे. ज्या रुग्णांवर टेस्ट घेण्यात आली त्यांच्यावर कुठलेही साइट इफेक्ट झालेले नाहीत.’
सेचेनोफ़ विद्यापीठाचे एक ज्येष्ठ संशोधक अलेक्ज़ांडर लुकाशेव बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात, “या ट्रायलचा उद्देश ही लस मानवी शरीरावर सुरक्षित आहे की, नाही याची तपासणी करणं होतं. आम्हाला आढळून आलं की हे वॅक्सीन पूर्णत: सुरक्षित आहे.” ऑक्टोबरपासून ही लस सर्वसामान्याला देण्यात येणार आहे. या संदर्भात प्रतिबंधात्मक संकेत पाळण्याचे आवाहन डब्ल्युएचओने रशियाला केले आहे
जगभरात प्रयत्न
महाराष्ट्रातील मालेगावपासून ते नार्वेपर्यंत सगळीकडे कोविड-19ला रोखण्याच्या उपाययोजनेवर काम सुरू आहे. दररोजच लस शोधल्याचं वृत्त सतत देश-विदेशातून न्यूज फिडमध्ये येत आहे. कोविड-19 संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विविध देशात शर्थीचे संशोधन सुरू आहे. जगातील विविध देशांनी या संशोधनात गुंतवणूक केलेली आहे. भारत, चीन, ब्रिटेनसह जगभरातील विविध देशात सुमारे दोन डझन एंटी कोरोना वॅक्सीन अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.
जगात विविध ठिकाणी उपलब्ध औषधे साधने, पारंपरिक उपचार व रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोविडचा मुकाबला केला जात आहे. या संकटातून बचाव करण्यासाठी पारंपरिक वैद्यापासून उच्चशिक्षित डॉक्टर्स व संशोधक काम करत आहेत.
कोविड आजारात श्वास घेण्यास असमर्थता हे मोठे लक्षण आढळून आलं आहे. विविध मीडिया रिपोर्ट सांगतात की, अखेरच्या क्षणी बहुतेक पेशंट श्वासाशी झुंज देत होते. वॅक्सीनच्या माध्यमातून कोविड रुग्णाचा श्वास नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर व संशोधक प्रयत्नशील आहेत.
जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाच्या एका संशोधकाचा दावा आहे की, मोठ्या प्रमाणात वापरात असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणारे ‘फेनोफाइब्रेट’ औषध कोरोना वायरस संक्रमणाचा धोका कमी करण्यास उपयोगी आहे. न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई मेडिकल सेंटरचे बेंजामिन टेनोएवर देखील हा उपाय महत्त्वाचा मानतात.
भारतात पुण्यातील सीरम इंन्टिट्यूटने वॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. रिपोर्ट म्हणतात, ‘कोविशिल्ड’ नावाने कंपनीने लस तयार केली आहे. ही वॅक्सीन ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी विकसित केली असून डिसेंबरपर्यंत बाजारात येईल, अशी शक्यता आहे. भारतात कोविडवर मात मिळवण्यासाठी घरगुती उपायापासून आयुर्वेदिक चिकित्सा अमलात आणली जात आहे. मीडिया रिपोर्ट सांगतात की, सरकार अमेरिकेसोबत संयुक्तपणे आयुर्वेदिक फॉर्मूला घेऊन क्लिनिकल ट्रायल करण्याच्या विचार करत आहे. असेही रिपोर्ट आहेत की, हे वॅक्सीन भारतात टीबी, इंफ्लूएंजा, चिकगुनिया सारख्या नियमित होणाऱ्या आजारावर प्रभावकारी ठरू शकेल.
याशिवाय इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटर दोन वॅक्सीनवर काम करत आहे. सेंटरचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांच्या मते या वॅक्सीनची ससा आणि उंदरावर यशस्वी चाचणी करण्यात आली. यानतंर ह्यूमन ट्रायलला मंजूरी देण्यात आली आहे. रिपोर्ट सांगतात की, पुणे आणि मुंबईतही कोरोनाला पायबंद घालण्यासाठी वॅक्सीन तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धोका कायम
जगातील काही देश गेल्या पाच-सात महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहेत. बहुतेक संक्रमित देशात दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मानवी संपर्कामुळे संक्रमणाची लाट येईल, अशी भिती वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशनने व्यक्त केली आहे. संघटनेच्या मते प्रतिबंधात्मक वॅक्सीनचा शोध जर वेळेत झाला नाही तर कोविड धोक्याची अतिउच्च पातळी गाठू शकतो.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका या रोगराईच्या भयंकर विळख्यात पुरता अडकला आहे. मीडिया रिपोर्टचा संदर्भ घेतल्यास लक्षात येते की, अमेरिकेत आरोग्य तज्ज्ञ आणि राष्ट्रपती यांच्यात होत असलेल्या खडाजंगीमुळे संक्रमणात जलद गतीने वाढ झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या मते येणाऱ्या काळात कोरोनाचा सर्वाधिक धोका अमेरिकेला असेल.
गेल्या सहा महिन्यापासून डब्लुएचओ वेळोवेळी बुलेटिन जारी करत आहे. कोविड संदर्भातली संघटनेचे बहुतेक आडाखे पूर्णत्वाकडे जात आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये भारतात संक्रमणाची लाट येईल हे भाकित वास्तविक स्वरूप धारण करत आहे. सद्यस्थितीत भारतात तरुणाच्या संक्रमणाचे प्रमाण तुलनेनं कमी आहे. येत्या काळात ते वाढू शकते, असे रिपोर्ट प्रकाशित झाले आहेत.
डब्ल्युएचओनं व्यक्तिगत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. फिजिकल डिस्टेंसिंग, वारंवार हात धुणे आणि मास्क वापरणे या रोगराईपासून बचाव करण्याचे प्रभावकारी उपाय आहेत, सर्वांनी याला गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचं मत संघटनेनं व्यक्त केलं आहे. काही महिन्यात तयार होणाऱ्या वॅक्सीनवर विश्वास ठेवून संक्रमणात वाढ करणे, शहाणपणाचं लक्षण नाही. वायरससोबत जगायला शिकलं पाहिजे, असं स्पष्टीकरण संघटनेनं दिलं आहे.
जगभरात आत्तापर्यंत 70 लाख कोविड रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमणाची वाढती गती पाहता, जगातील सर्वच वैज्ञानिक आणि हेल्थकेयरशी संबंधित संस्था वॅक्सीनचे संशोधन व त्याचे उत्पादन लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहेत.
रिपोर्ट सांगतात की, हे संशोधन पूर्ण होण्यास अजून सहा महिन्याचा काळ लागू शकतो. त्यामुळे सध्या तरी संक्रमणापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना राबवविण्यातच सर्वांचे हित आहे. मानवी समुदायावर आलेले हे संकट दूर करण्यास सर्वांचेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यापूर्वी ‘स्टे होम’ आणि ‘बी सेफ’ हे धोरण औषधाशिवाय जास्त फायदेशीर आहे.
कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख 13 ऑगस्ट 2020च्या दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com