वुहान वायरस आणि चिनी तारुण्याचे रिकामे हात

सात महिने झाली कोरोना वायरस जन्मदाता चीनची पाठ सोडायला तयार नाहीये. वुहाननंतर आता राजधानी बिजिंग हॉटस्पॉट म्हणून पुढं आलं आहे. आंतरराष्ट्रीय वृतपत्र चाळलं तर त्याची भयावहता दिसून येते. परंतु या संदर्भात नेमकी व अधिकृत माहिती चीनच्या विश्वासहार्य सोर्सकडून कन्फम होत नाहीये त्यामुळे या संकटाचं रौद्र रूप सांगणं तुर्तास कठीण आहे.
वायरसची लागण सुरू झाली, त्यानंतर अमेरिकेने अधिकृतपणे तिसऱ्यांदा चीनला दोषी ठरवलं आहे. इतकंच नाही तर डब्लुएचओ चीनची पाठराखण करतोय असा आरोप अमेरिकेनं सतत केला आहे. रविवारी झालेल्या प्रचार रॅलीत ट्रम्प यांनी वुहान वायरसकुंग फ्लूअसे शब्द देत चीनवर माहिती लपविल्याचा आरोप केला. शिवाय यूरोपमधून चीननं कथितरित्या जौविक युद्ध छेडलं आहे, अशा बातम्यांचा ओघ अजूनही सुरू आहे.
वाचा : अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
हांगकांगमध्ये स्वायत्ततेच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोरदार आंदोलन सुरू झालं आहे. गेल्या दोन वर्षापासून हाँगकांगवाले मुक्ती आंदोलन करत आहेत. या देशाचे सर्व प्रशासकीय अधिकार बिजिंगकडे आहेत. कोरोना संकटात या आंदोलनाने प्रशासनाला अस्थिर केलं आहे. तर दूसरीकडे त्याच शहरात कोरोनाचा फैलाव जलदगतीनं सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या बिजिंग दूहेरी संकटाशी दोन हात करत आहे.
बिजिंग हे राजधानीचं शहर. पण सध्या अनेक प्रतिबंध तिथं लागू करण्यात आले आहेत. शहराला मेडिकल छावणीचं रूप आलेलं आहे. नव्या पेशंटला असिंप्टोमॅटिकम्हणजे कुठलीच लक्षणे नाहीत पण ते संक्रमित आहेत. असे अनेक पेशंट सध्या निगराणीखाली आहेत. नॅशनल हेल्थ कमिशनच्या मते असे पेशंट वाढत आहेत. शिवाय वुहानमध्येदेखील अशा प्रकारचे पेशंट वाढत असल्याचं वृत्त आहे. ही लक्षणे पाहून चीनी डॉक्टर्ससुद्धा अचंभित झाले आहेत. तज्ज्ञ याला कोरोनाची दूसरी लाट म्हणतात.
चीनी मीडियाच्या मते 11 जूननंतर बिजिंगमध्ये कोरोना वायरसचे नवे पेशंट वाढले. त्यात तरुणांची सख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या तरुणांनाच पुन्हा वायरसची लागण झाली आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेलं ग्लोबल टाइम्स संशोधकाचा आधार घेऊन म्हणते की बिजिंगमधील बाजारात क्लस्टर संक्रमणाचा फैलाव करणारा वायरस यूरोपमधून आला आहे.
एप्रिलमध्ये जगभरात वुहान वायरसनं संक्रमणाचा कळस गाठला होता, त्यावेळी चीनने स्वत:ला कोरोनामुक्त घोषित केलं. लॉकडाऊन उठवण्याची घोषणा केली. परंतु काहीच दिवसात वायरस लागणाचे थैमान सुरू झालं. अनिच्छेने चीनला पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागला. कोरोनामुक्त करण्याची घोषणा चीनच्या अंगलट आली.
गेल्या पाच महिन्यापासून चीनमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. अनेक शहरं व प्रमुख बाजार बंद आहेत. काही शहरात अनलॉकची परिस्थिती आहे. मीडिया रिपोर्टसचा आधार घेतल्यास असं दिसून येतं की चीनने फार लवकर रोगावर नियंत्रण मिळवलं. रिपोर्ट्स म्हणतात की वायरसचा प्रादूर्भाव रोखण्यात चीनला वेळीच यश आलं. पण यूरोपीयन माध्यमं काहीतरी वेगळंच सांगतात. हा वाद येत्या 10 वर्षांपर्यंत तरी सुरूच राहील अशी चिन्हे आहेत.
लॉकडाऊन काळात जगभराचं लक्ष चीनच्या हालचालीकडे लागलं होतं. विषेश म्हणजे सोशल मीडियावर यासंबंधी चर्चा अजूनही संपलेली नाही. आता या चर्चा गलवान सीमावादावर केंद्रीत झाल्या आहे. जगभरातले सोशल कम्युनिकेटर या विषयावर बोलत आहेत. पण चायना कोरोना हा ट्रैंड अजूनही कायम आहे.
सोशल चर्चावर नजर टाकली तर असं दिसतं की चीनमध्येसुद्धा अन्य देशासारखं जॉब मार्केटवर संकट कोसळलं आहे. राज्यकर्त्यांपुढे नव्या पिढीसाठी काम शोधणं ही प्रमुख प्राथमिकता बनली आहे. रिपोर्ट सांगतात की, चीनमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्या लोकांना कामावर परत आणणे आहे.
कोरोना वायरसच्या उद्रेकाला चीनने झुंज दिली तेव्हा कोट्यवधी कामगार बेरोजगार झाले किंवा त्यांची फरफट झाली. ज्यांची नोकरी कायम आहे त्यापैकी बर्‍याच जणांचे पगार कपात आणि भविष्यातील चांगल्या शक्यता लेंदी झाल्या आहेत. वायरसचा फटका कारखानदारांना बसला आहे. ऑनलाइन डिलिव्हरी फर्म सारख्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी मोठी कॉस्ट कटिंग केली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनं गेल्या महिन्यात चीनच्या जॉब मार्केटवर विशेष स्टोरी केली होती. त्यात अनेकांनी नव्या नोकरीच्या शोधत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नाटक कंपनीत काम करणारी हुआंग म्हणते, “24 एप्रिलपासून मी अद्याप माझं काम सुरू करू शकले नाही, मला काळजी वाटते की यावर्षी मला अजिबात काम करता येणार नाही. सध्या माझ्याकडे वाट पाहण्याशिवाय कुठला पर्याय नाही.
न्यूयॉर्क टाइम्स म्हणते की, यावर्षी जवळजवळ 7.8 मिलियन तरुण ग्रॅज्युएट जॉबच्या हवेत प्रतीक्षा करतील. चीनी प्रशासनावर स्थिती पूर्पदावर आणणे सर्वात मोठे आव्हान आहे. सरकारच्या मोठ्या चिंतेत बेरोजगारी कमी करणे आणि अन्नधान्याच्या महागाईवर ताबा मिळवणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
वार्षिक संसदीय सत्राच्या उद्घाटन वेळी, पंतप्रधान ली केकियांग यांनी कोट्यवधी माणसं बेरोजगार झाल्याची कबुली दिली होती. कामाचे लवचिक तास आणि कमी पगारासह विचित्र नोकरी करत असल्याचं त्यांनी कबुल केलं होतं.
चीनची गतीशील अर्थव्यवस्था पाहता गुंतवणूक व सार्वजनिक कामावर अधिक निधी खर्च कला जातो. बॅंकांना छोट्या व्यवसायिकांना कर्ज देण्यास उद्युक्त केलं जातं. त्यामुळे व्यापारी व कंपन्यांवर कर्जाचा बोजा जास्त आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते अर्थव्यवस्था वाढीचं प्रेशर छोटी उद्यमे व दुकानदारांवर अती प्रमाणात आहे. शिवाय महाविद्यालयीन तरुण आणि कार्यालयीन नोकरादारही यात समाविष्ट आहेत. येणाऱ्या काळात ही अस्थिरता अजून वाढू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञ वर्तवत आहे.
दूसरीकडे अशा संकटसमयी तग धरून राहणाऱ्या तरुणांची संख्यादेखील चीनमध्ये कमी नाहीये. अर्थव्यवस्थेचा फुगवटा त्यांना आत्मविश्वास देतो, असं त्याचं मत आहे. लंडनस्थित आय-डी वाइस या लाईफस्टाइल वेब पोर्टलनं लॉकडाऊनमध्ये स्टे होमराहून काम क्रियाशील काम करणाऱ्या आणि पॉजीटीव एनर्जी असलेल्या अनेक युवक-युवतींच्या स्टोरी केल्या आहे. बहुतेक तरुण हे कॉलेज स्टुडंट, लाइफस्टाइल, इंटरटेन्मेंट, हॉस्पिटिलिटी, डिजिटल कंटेट, यूट्यूबर्स व एंत्राप्रनर आहेत.
प्रश्नांवर आधारित या कथा लॉकडाऊन कसा जातोय इथून सुरू होतात. तर वेळ कसा घालवता, फिट ठेवण्यासाठी काय करता, आजार व मानसिकता कशी जपता, खाण्याच्या सवयी, नातेसंबंध, नैराश्य असा होत पुढे काय अशी ही प्रश्नावली आहे. बहुतेक उत्तरे पॉजीटीव एनर्जी देणारे आहेत. त्यात सिनेमे बघणे, व्यायाम करणे, स्वयंपाक शिकणे, मेजवान्या देणे, कल्पना रंगवणे, भविष्याचं प्लानिंग करणे, विरुद्ध लिंगी मित्रांसमवेत आभासी कल्पनारंजन करणे, चित्रे काढणे इत्यादी उत्तरे आहेत. कदाचित ही उत्तरे सिलेक्टिही असू शकतात. पण ती वाचनीय व प्रेरणादायी वाटतात.
बहुतेक तरुणांनी आपला वेळ, वाचन, नवे शिकणे, अभ्यास, रिसर्च, मैदानी खेळ, ऑनलाइन गेम्सला दिलाय. तर अनेकजण एकटेपणा व संकटावर मात कशी केली याच्या सुरस कथा सांगतात. अशाच काही चांगल्या कथा स्थानिक वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सलाही वाचायला मिळतात. इथल्या बहुतेक बातम्या फुगवून तर अनेक तटस्थ व नीरस स्वरूपात आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सनंही असा एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. बहुतेक तरुण नोकरी व कामासाठी शहरात एकटे राहतात. अशावेळी एकटेपणा व जगाचं आपल्यावर लागलेलं लक्ष यामुळे ती विचलित झाली आहेत. काहीजणांना आपल्या देशावर होत असलेल्या टीका असह्य वाटतात. तर बहुतेक तरुण देशाशी एकनिष्ठ आहेत.
कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
Twiter@kalimajeem
FB/Kalim Ajeem
मेल-kalimazim2@gmail.com

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,25,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,302,व्यक्ती,23,संकलन,65,समाज,265,साहित्य,80,सिनेमा,22,हिंदी,54,
ltr
item
नजरिया: वुहान वायरस आणि चिनी तारुण्याचे रिकामे हात
वुहान वायरस आणि चिनी तारुण्याचे रिकामे हात
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEim1DgaoVffEt2j0_0tLkYVfPrrnp6hwFdI3evc-fBl_kxWl3qv_2wde57YINYzbolBxeZLp3WnMQYf9KafRSV6-Vi1NU-1n8JGZILE9kxEGhIMLyFOy3E_-qoJBDVL3wr1YOENdnmPFkr6/s640/merlin_172836252_21097480-a65d-494f-8005-4a36b2564d26-jumbo.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEim1DgaoVffEt2j0_0tLkYVfPrrnp6hwFdI3evc-fBl_kxWl3qv_2wde57YINYzbolBxeZLp3WnMQYf9KafRSV6-Vi1NU-1n8JGZILE9kxEGhIMLyFOy3E_-qoJBDVL3wr1YOENdnmPFkr6/s72-c/merlin_172836252_21097480-a65d-494f-8005-4a36b2564d26-jumbo.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/06/blog-post_52.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/06/blog-post_52.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content