रशियाची घटनादुरुस्ती की तानाशाहीला मान्यता

म्हणतात, रशियात मतदानावेळी संगीत व वाद्ये वाजवण्याची परंपरा आहे. पण गेल्या आठवड्यात कुठल्याही गाजावाजा न करता एक मोठे मतदान पार पडले. अतिशय गुप्त व तेवढ्याच जाहिरपणे झालेल्या या मतदानात रशियन जनतेने घटनादुरुस्तीला मान्यता दिली. या बदलातून देशात बऱ्याच निर्णायक राजकीय घडोमोडी घडू शकतील, अशी चर्चा आहे.
नव्या जनमत चाचणीतून विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा कार्यकाळ शून्य होणार आहे. म्हणजे काय होणार? त्याचे थोडक्यात उत्तर असे की 67 वर्षीय व्लादिमीर पुतीन हे 2024 नंतर पुन्हा नव्याने फ्रेश उमेदवार म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उभे राहू शकतील. रिपोर्ट सांगतात की, त्याआधी त्यांनी सत्तेची उपभोगलेली 4 टर्म शून्य होतील वे ते पुन्हा 6+6 अशी दोन टर्मसाठी पात्र ठरतील.
1993 साली झालेल्या घटनादुरुस्तीत एक उमेदवार पंतप्रधान व राष्ट्रपती पद केवळ दोन वेळा उपभोगू शकत होता. तसेच पदाचा कार्यकाळ 4 वर्षांचा होता. 2008 नंतर झालेल्या घटनादुरुस्तीने तो 6 वर्षाचा झाला. कधी पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती राहिलेल्या व्लादिमीर पुतीन यांचा दोन दशकाच्या सत्तेचा कार्यकाल 2024ला संपणार आहे. पण या जनमत चाचणीनंतर पुतीन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किंवा नवे पद तयार करून सत्तेची सूत्रे आपल्या हातात ठेऊ शकतील, असी शक्यता वर्तवली जात आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात रशियनांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. लाखोंची बक्षीसे जिंकून देणाऱ्या एका योजनेसाठी तुम्हाला रजिस्टर करण्यात आले आहे, असे त्याचा आशय होता. पुढे जाण्यासाठी काही क्वीज दिले गेले. त्यानुसार लोक त्यात रमत गेली. मीडिया रिपोर्ट सांगतात की, ती कुठली योजना नव्हती तर सरकारने प्रायोजित केलेला एक जनमत संग्रहहोता. होयआणि नाहीअसे दोनच पर्याय त्यात देण्यात आले होते.
मास्को टाइम्स म्हणते की, लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. निवडणूक आयोगानुसार तब्बल 77 टक्के मते घटनादुरुस्तीच्या बाजूने टाकली गेली.
काय बदलेल?
  • राष्ट्रपतीचे अधिकार कमी होतील. तसेच पुतिन यांच्यासारखे अधिक कळ कोणीही सत्तेवर राहू शकणार नाही.
  • आता राष्ट्रपती ड्यूमा म्हणजे संसदेला बरखास्त करू शकणार नाही.
  • पूर्वी राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करीत. आता संसद पंतप्रधान निवडून देईन व तो आपली कैबिनेट बनवेल.
  • राष्ट्रपती या उमेदवाराला रिजेक्ट करू शकणार नाही. त्याला संसदेचे अधिकार मान्य करावे लागतील.
  • स्टेट कौन्सिलचे अधिकार वाढून त्याला सरकारी एजसीच्या रूपाने मान्यता मिळले. आतापर्यंत स्टेट कौन्सिल एक सल्लागार म्हणून काम करत असे. रिपोर्ट म्हणतात की, स्टेट कौन्सिल एक न्यायाधिश म्हणून काम करू शकेल.
  • जर कुठला वाद झाला तर स्टेट कौन्सिलचा निर्णय अखेरचा असेल.
चर्चा अशीही आहे की पुतिन नवे स्टेट कौन्सिल प्रमुख होऊ शकतात. म्हणजे सर्व कंट्रोल पुन्हा पुतीनच्या हाती येतील. पुतीनने याआधी पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. आता त्यांनी त्यावर जनमताची मोहोर लावली आहे. थोडक्यात काय तर पुतिन हे रशियाचे जोसेफ स्टालिनपेक्षा अधिक काळ सत्तेत राहणारे राष्ट्रप्रमुख ठरू शकतील. म्हणजे पुतिन हुकूमशाह म्हणून पुढची 12 वर्षे तरी सत्तेची अधिकार सूत्रे आपल्याकडे ठेवतील.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रशियात जोरदार राजकीय हालचाली पहायला मिळाल्या. ज्यात पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. चर्चा आहे की, पुतिन आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतील. ज्याचा उद्देश आगामी काळात सत्तासंकट उभे राहू नये असे, असावे.
जगभरातील प्रसारमाध्यमे जनमताला पुतिनशाहीम्हणत आहेत, म्हणजे त्यांना शक्तिशाली व प्रभावशाली राजकीय नेता म्हणून प्रचारित करत आहेत. या निमित्ताने पुतिनचे व्यक्तिमत्व व हिरोगिरीच्या चर्चा माध्यमात पुन्हा रंगल्या आहेत.
सोव्हियत रशियात गुप्तेहर म्हणून काम करणाऱ्या पुतीनची कथा एका मसाला बॉलीवूड सिनेमापेक्षा कमी नाही. 1999 मध्ये पंतप्रधान म्हणून सुत्रे स्वीकारताना कोणाला कल्पनाही आली नसेल की काहीच काळात हा माणूस जगभरात चर्चेचा विषय ठरेल.
बेरोजगारी व आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर 1993 साली सोव्हियत रशियाचे तुकडे होऊन जगातील सर्वात मोठी साम्यवादी सत्ता विखुरली. त्यातून लहान-सहान असे 25 देश जन्माला आले. पुढची चार-पाच वर्षे कम्युनिस्ट कुठे चुकले, या चर्चेतच गेली. अशात 1999 साली पुतीन पंतप्रधान झाले. संधी पाहून त्यांनी प्रक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न चालवला. एखादी गुप्त डील केल्यासारखी त्यांनी सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांनी मागच्या सरकारला दोष न देता हातोहात बदल स्वीकारले. त्यांनी देशात बऱ्याच आर्थिक सुधारणा घडवून आणल्या.
थोड्याच कालावधीत ते अतीश्रीमंत व मध्यमवर्गाचे लोकप्रिय नेता म्हणून पुढे येऊ लागले. हळुहळू त्यांनी आपले कौशल्य दाखवत इतर पाश्चात्य देशांवरही प्रभाव पाडायला सुरुवात केली. वेगवेगळ्या बदलांवर स्वार होऊन त्यांनी आपल्या निरंकुश सत्तेची प्रस्थापना केली. सत्तेत हस्तक्षेप करण्यापासून देशातील गर्भश्रीमंत वर्गाला त्यांनी रोखले.  ज्याचा एकहाती सत्ता चालवण्यासाठी त्यांना बराचसा फायदा झाला. आज पाश्चिमात्य मीडिया पुतिनला मोस्ट पावरफुलम्हणून प्रचारित करते.
पुतिनने सत्तेत स्थिरस्थार होताच त्यांचे केंद्रिकरण केले. काही काळातच विरोधक, मीडिया आणि इंटरनेटनर अंकुश लावण्याचे काम सुरू केले. प्रसारमाध्यमात सोयीचे वृत्त प्रसारित करण्याची मुभा देण्यात आली. 2017 मध्ये 100 शहरात सरकारविरोधात 10 हजार लोकांनी आंदोलन केले. पण हे वृत्त प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली. इंटरनेशनल मीडियासा देशात इंट्री बैन केली गेली. मानवी हक्क समूह एगोराचा रिपोर्ट सांगतो की, 2018 मध्ये सरकारने तब्बल6 लाख 50 हजार वेबसाइट्स बंद केल्या. 
वाचा : इजिप्शियन दुसऱ्या क्रांतीकडे
वाचा : लोकशाहीहक्कासाठी इराणचा भडका 
एकेकाळी जगभरातील कम्युनिस्ट रशियाला श्रद्धास्थान मानत आज सगळ्या भांडवली सत्ता रशियाला रोल मॉडेल मानतात. काही देश लालसेतून रशियाला आपला विरोधक मानतात. पुतिन एकमेव अघोषित हुकूमशहा नाहीत तर चीनचे जिनपिंग व तुर्कीचे एर्दोगानसुद्धा एका प्रकारचे त्याच कैटेगरीत मोडणारे नेते आहेत. जिनपिंग यानी तर 2018 साली घटनादुरुस्ती करून आजीवन राष्ट्रप्रमुख राहू अशी तरतूद करून घेतलेली आहे.
रशियातील अशिक्षित व मध्यमवर्गाचा मोठा पाठिंबा पुतिन यांना आहे. मोठे, लघु व मध्यम व्यापारी पुतिनच्या धोरणावर खुश आहेत. त्यामुळे या बदलांमुळे त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण उच्चशिक्षित वर्गाने या धोरणांचा विरोध केला आहे.
यूनिवर्सिटी ऑफ़ हेल्सिंकीमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या प्रा. व्लादिमीर जेलमेन बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात, “मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग सारख्या शहरातील तरुणांकडे चांगले शिक्षण आहे. ते पुतिन यांच्या सतत सत्तेत टिकून राहण्याच्या धोरणांचा विरोध करतात. पण दूसरीकडे त्यांना जुन्या पिढीचे कमी शकलेल्या आणि गरीब लोकांचे समर्थन आहे.
इंटरफैक्सचा रिपोर्ट सांगतो की, मतदान सुरू असतानाचाच बहुमताची घोषणा करण्यात आली व मतदात्याचे सरकारच्या बाजुने मन वळविण्यात आले. पुतिनचे राजकीय विरोधक देश व विविध बुद्धिवादी गटाने हे सार्वमत दगा असल्याचे म्हटले आहे. जारी केलेली मतदानाची आकडेवारी खोटी असल्याचे त्यांचे मत आहे.
इजिप्तच्या अब्देल फतह अल सीसी यांनीही अशाच प्रकारे गरजेच्या वस्तु व खाद्य पॅकेटचे अमिश दाखवून आपल्या समर्थनार्थ व घटनादुरुस्तीसाठी मतदान घेतले होते. 2030 पर्यंत आपणच प्रमुख राहू अशी तरतुद त्यांनी केलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्याविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे राहिले होते. सीसी यांनी संभ्रमित करून मते घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.
जनमताविरोधात उच्चशिक्षित रशियन नागरिकांत बैचेनीचे वातावरण आहे. सध्या मध्यमवर्ग आनंदात असला तरी त्याची झळ त्याला बसेल, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. या जनमत चाचणीवरून दोन गट पडले आहेत. त्याचे परिणामही दिसून आले. अनेक तरुणांनी राजधानी मास्कोमध्ये सरकारविरोधात शेकडो लोकांनी एकत्र येत निदर्शने केली. कोरोना संकटावर मात मिळवण्याऐवजी सरकारने राजकीय स्वार्थ साधला आहे, अशा प्रतिक्रिया आंदोलक व्यक्त करत होते.
वाचा : अस्वस्थ इजिप्त सोडून होस्नी मुबारक झाले भूतकाळ
वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका
मीडिया रिपोर्ट सांगतात की, पुतिनच्या भीतीमुळे कुठलीहबी प्रसारमाध्यमे त्यांच्याविरोधात बातम्या देत नाहीयेत. नेहमीप्रमाणे सरकारी मीडिया पुतिन यांची छबी मोठी करून लोकासमोर पेश करत आहे. सोशल मीडियावर मात्र, पुतिन यांच्या या धोरणाविरोधात पडसाद उमटले आहेत.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, येत्या महिन्यात राष्ट्रपती पुतीन यांच्या प्रस्तावित घटनात्मक बदलांविरोधात मोठा निषेध आंदोलन करण्याची योजना आखली जात आहे. शिवाय सत्तेवरील एकहाती पकडीला विरोध करणारे म्हणजे पुतिन यांचे विरोधकही संख्येने वाढत आहेत.
विरोधी पक्षनेते इलिया यशिन यांनी जाहीर केले की पुतीन यांच्या विरोधात मोर्चासाठी मॉस्को येथे विविध योजना आखल्या गेल्या आहेत. ते म्हणतात, “हा एक राजकीय मोर्चा असेल, ज्याचे प्रमुख उद्दीष्ट सत्ता उलथवून लावणे आणि सत्ता हडपण्याच्या विरोधात आंदोलन करणे आहे.त्यांनी बहुसंख्य रशियन मोर्चाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.
दोन हजार सालानंतर पाश्चिमात्य देशांनी मध्य आशियात लोकशाही प्रस्थापनेच्या नावाखाली हाहाकार माजवला. नाटो सैन्याने इराक-अफगाणिस्तानात रक्तपात घडवला. पुढे पाच-सहा वर्षात जैस्मीन क्रांतीतून काही देशांनी निरंकुश सत्तेतून मोकळा श्वास घेतला. पश्चिमी देशांनी न्याय देण्याच्या नावाने इथल्या राष्ट्रप्रमुखांना फासावर चढवले. पण तिथे ते आजही शांतता प्रस्थापित करू शकले नाहीत.
सिरियात हिसेंची अमानवी क्रूरता आजही सुरुच आहे. तसेच इस्रायलचा अमानुष रक्तपात जारी आहे. इथे लोकशाही प्रस्थापनेसाठी कुठलाही देश पुढे येऊ शकला नाही. तर दुसरीकडे पुतिन व जिनपिग सारखे प्रमुख अघोषितपणे हुकमूशहा बनले आहेत. अमेरिकेच्या आर्थिक दहशतवादाला उत्तर म्हणून रशिया व चीनने नवा जगभरात अघोषित हुकमशाहीचा नवा पायंडा पाडला आहे. त्याला तुर्त सगळे चिडीचूप असले तरी भविष्य मात्र फार भयानक असू शकते. बदलत्या काळात राज्यव्यवस्थेत राजकीय सुधारणा कराव्या लागतात. त्याचा फारसा परिणाम सामान्य लोकांच्या जीवनावर होत नाही. पण रशियात घडलेलेल्या अशा सुधारणांचा परिणाम सामान्य नागरिकांच्या जगण्यावर नक्कीच परिणाम करतील.

कलीम अजीम, पुणे
(सदरील लेख लोकमतच्या 9 जुलै 2020च्या ऑक्सिजन अंकात प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,37,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,292,व्यक्ती,17,संकलन,61,समाज,246,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: रशियाची घटनादुरुस्ती की तानाशाहीला मान्यता
रशियाची घटनादुरुस्ती की तानाशाहीला मान्यता
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIe2x8YSjfW6fN41eOAanYWAFrm5xQJ0OVUpHLGsr4QbV4-JfWx7sKzuIRdz2rcFU3yqGVXMwCOarD_sG0tjhErAAwapjBVduzy20p_4SJT9JsoLehrNHJbB-Ie_IXpl4jDyPgXUQiCvCc/s640/putin.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIe2x8YSjfW6fN41eOAanYWAFrm5xQJ0OVUpHLGsr4QbV4-JfWx7sKzuIRdz2rcFU3yqGVXMwCOarD_sG0tjhErAAwapjBVduzy20p_4SJT9JsoLehrNHJbB-Ie_IXpl4jDyPgXUQiCvCc/s72-c/putin.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_9.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2020/07/blog-post_9.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content