“पॅलेस्टिन आणि इस्रायल संघर्षावर मात करण्यासाठी विकसित आणि विकासशील, सर्व देशांनी दोन मोर्चांवर काम करण्याची गरज आहे. पहिले, मंदीच्या तात्कालिक परिणामांशी दोन हात करणे आणि दुसरे अंतरराष्ट्रीय वित्तीय स्थापत्य संपुष्टात आणणे. त्यासाठी गरज आहे कि जगातील सर्वच क्षेत्रातील देशांना आंतरराष्ट्रीय पातळीवर य़ोग्य प्रतिनिधीत्व दिले पाहिजे.”
इजिप्तचे
राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक 2008 सालच्या नोव्हेंबर महिन्यात
भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते
त्यांना प्रतिष्ठित जवाहरलाल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर झालेल्या
संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी इस्रायल-पॅलेस्टिन वादावर ही प्रतिक्रिया दिली
होती.
25 फेब्रुवारीला पॅलेस्टाईन व इस्रायलचा हा कथित मैत्री दूत काळाच्या
पडद्याआड गेला. 91 वर्षे जगून हा एक तानाशाही सत्ताधिश इतिहासजमा झाला. 2011 साली
सत्ता संपुष्टात आल्यापासून सत्तापदच्यूत राष्ट्राध्यक्ष म्हणून ते 9 वर्षे जगले.
एक सैनिक ते राष्ट्रप्रमुख हा त्यांचा प्रवास रंजक व रोचक आहे.
14 ऑक्टोबर 1981
साली एका नाटकीय घटनेत राष्ट्राध्यक्ष पदाची माळ होस्नी मुबारक यांच्या गळ्यात
पडली. त्यावेळी ते देशाचे दोन नंबरचे नागरिक होते. एका यशाच्या मोबदल्यात त्यांना
हे गिफ्ट मिळाले होते. होस्नी मुबारक वायू सेनेत असताना 1973 साली बहुचर्चित
ऑक्टोबर युद्ध अर्थात ‘योम किपुर युद्ध’ झाले. इस्रायलकडून आपली भूमी
परत मिळवण्यासाठी अरब देश आणि इस्रायलमध्ये हे युद्ध झाले होते. यात इजिप्तने 1967
साली गमावलेले सिनाई क्षेत्र होस्नी मुबारकमुळे परत मिळाले.
मुबारक यांनी इजिप्तने
गमावलेली जमिन परत मिळवली होती. या बदल्यात त्यांना उपराष्ट्रपति पद द्यावे अशी
मागणी राष्ट्रपती अनवर सादात यांच्याकडे करण्यात आली. अशा रीतीने मुबारक
उपराष्ट्रपति झाले. कालांतराने राष्ट्राध्यक्ष सादात यांनी इस्रायलशी मैत्र करार
केला. ही बाब देशातील परंपरावाद्यांना खटकली. शत्रुशी हातमिळवणी केल्याच्या
आरोपावरून मुस्लिम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेने सादात यांची 6 ऑक्टोबर 1981 या
दिवशी एका परेडदरम्यान हत्या केली.
हत्येच्या आठ दिवसानंतर 14 ऑक्टोबरला होस्नी
मुबारक राष्ट्राध्यक्ष झाले. एका सामान्य कुटुंबातील मुबारक देशाचे प्रथम नागरिक
झाले होते. 30 वर्ष एकहाती सत्ता गाजवणारा हा इसम खरोखरच नशीबवान होता. मुहंमद होस्नी सईद इब्राहिम
मुबारक असे पूर्ण नाव असलेला हा
व्यक्ति क़ाहिराजवळील अल् मेसेलहाया
या छोट्याशा गावी 4 मे 1928ला जन्मला.
एका सामान्य
कुटुबात जन्मल्याने उच्च शिक्षण मिळेलच असा कुठलाही शास्वती नसताना केवळ
गुणवत्तेच्या जोरावर ते 1949 साली मिलिट्री अकेडमीत पोहोचले. इथे त्यांनी एअर
सायन्समध्ये डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. आणि लगोलग वयाच्या 21व्या वर्षी एअर
फोर्स जॉईन केलं. वायू सेनेत त्यांनी 25-30 वर्ष नोकरी केली. वायुसेनेचे कमांडर
आणि संरक्षण खात्याचे उप-मंत्री या नात्याने ते इस्रायल युद्धाला सामोरं गेले.
तिथे त्यांनी आपली जमीन परत मिळवली.
या युद्धापूर्वी ते कधी चर्चेत नव्हते. एक
साधारण मनुष्य म्हणून त्यांची प्रतीमा होती. परंतु राषट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी
या संधीचा फायदा घेतला. इस्रायलशी मैत्री करार करून त्यांनी कुटनिती राबवली.
दूसरीकडे परंपरावाद्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर निर्बंध लादले. त्यांनी देशात
मिलिटरी रूल लागू केला. आणीबीणीसदृष्य कायदे केले. विरोधक व प्रसारमाध्यमांवर वचक
बसवली ती 2011 पर्यत.
इजिप्त देशात सर्वात जास्त एकहाती सत्ता गाजवणारे होस्नी
मुबारक एकमेव व्यक्ति होते.2009 साली ट्यूनिशिया या इजिप्तच्या शेजारी राष्ट्रात
सत्तेविरोधात बंड उभे राहिले. वाढती महागाई, सत्तेचा
गैरवापर, वाढता भ्रष्ट्राचार आणि
निरंकुश सत्तेविरोधात तरुणांनी एकत्र येत जस्मिन क्रांति घडवली. पंधरा दिवसात
तिछल्या राष्ट्राध्यक्षाला पद सोडावे लागले. तरुणाईचा हा मोठे यश होते. सोशल मीडियाचा
प्रभावी वापर करून तरुणांनी सत्तेविरोधात विद्रोह केला होता. ही ठिणगी काहीच
दिवसात इजिप्तला पोहोचली.
इजिप्शियन तरुणांनी होस्नी मुबारक यांच्या निरंकुश
सत्तेविरोधात बंड केले. 2010च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राजदानीतल्या
तहरीर चौकात प्रचंड मोठे आंदोलेन उभे राहिले. आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने
निदर्शकावर लाठीमार केला. यात एका 17 वर्षीय उमर नावाच्या मुलाचा पाय तुटला.
दूसऱ्या दिवशी हा उमर लंगडत लंगडत तहरीर चौकात पोहोचला. उमर हा फोटो जागतिक
मीडियात झळकला आणि एकच ठिणगी उडाली.
तहरीर चौकात 10 लाख तरुण, वृद्ध आणि महिला जमा झाल्या.
गांधीजीनी सांगितलेला सत्याग्रहाचा त्यांनी साधन म्हणून वापर केला. शांततेत
चाललेल्या या मोर्चामुळे मुबारक यांच्यावर दबाव वाढला. अमेरीकेने उघड भूमिका घेत
मुबारक यांना खूर्ची सोडण्याचा आदेश दिला.
इस्लामफोबियाने ग्रस्त झालेल्या
मर्डौकप्रणीत मीडियाने व्यापारी संधी म्हणून या आंदोलनाकडे पाहिले. भांडवलवादी
देशांनी इस्रायल-अमेरिका-रशिया-फ्रान्स-ब्रिटेन समर्थित होस्नी मुबारक यांनी
सत्तेतून घालवण्याची विषेश मोहीम सुरू केली. डोईजड झालेले मुबारक आता अमेरिका व
इस्रायलला नको होते. पुढच्या नाटकीय घडामोडीनंतर शीस्तशीरपणे आंदोलनाच्या 15 दिवसात
होस्नी मुबारक यांनी राजिनामा दिला.
दरम्यानच्या काळात त्यांनी उपराष्ट्रपतीची निवड
करून राजकीय सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीपासून दूर राहिल, अशी ग्वाही दिली. परंतु
संतप्त झालेल्या तरुणांनी माघार घेतली नाही. यातच नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींनी
आगीत तेल ओतणारे भाषण केले. त्यांनी आंदोलक तरुणांचा बंदोबस्त करू अशी थेटच धमकी
दिली होती. या विधानावरून संतप्त झालेल्या तरुणांनी मंत्रिमंडळ कार्यालये आणि संसद
भवनाचा ताबा घेतला.
संसद भवनाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नामकरण 'पीपल्स असेंबली स्ट्रीट' ऐवजी पीपल्स स्ट्रीट केलं
गेलं. हा निर्णायक बदल मुबारक यांना राजीनामा देऊन कुटुंबासह काहिरा सोडण्यास
कारणीभूत ठरला. होस्नी मुबारक यांची 30 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. या आंदोलनात
239 आंदोलकांच्या मृत्यु झाला. सत्तातरांचे पडसाद येमेन, सिरिया आणि लिबियापर्य़ंत
पोहोचले. कालांतराने काही देशात सत्तांतर झाले.
इजिप्तमध्ये निवडणुका होऊन मुस्लिम
ब्रदरहूड पक्षाचे मुहंमद मोर्सी राष्ट्राध्यक्ष झाले. पदच्यूत झाले असले तरी
मुबारक यांची प्रशासनावर पकड होती. तरीही ते खटल्यांना सामोरे गेले. कुटुबातील
सदस्यांवर खटला भरला गेला. आंदोलकांच्या मृत्युचा आरोपाखाली मुबारक यांना
जन्मठेपेची शिक्षा झाली.
अब्दल अल सीसी या मुबारक मंत्रिमंडळातील नेत्याने 2013
साली मुहंमद मोर्सी यांची सत्ता ताब्यात घेतली. त्यांच्यावर पाश्चिमात्य देशासाठी
हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. गंभीर गुन्हे लावून त्यांना जेलमध्ये
टाकण्यात आलं. अब्दल सीसी होस्नी मुबारकचे दूसरे अवतार बनले. त्यांनी देशावर
पुन्हा एकदा सैन्य शासन लादले. दूसरीकडे नाटकीयरीत्या होस्नी मुबारक 6 वर्ष
तुरुंगात राहून निर्दोष सुटले.
अब्दल सीसी यांची निरंकुश सत्ता इजिप्तमध्ये सुरु
झाली. महागाई आणि भ्रष्टाचार बोकाळला. इजिप्शियन जनतेने लोकशाही शासनाची मागणी
करून आंदोलने सुरू केली. सीसी यांनी विरोधकांचा बंदोबस्त केला. मीडिया रिपोर्टवरून
लक्षात येते कि विरोधकांसमवेत त्यांनी सामान्य लोकांनादेखील गायब केले. त्यांचा
शोध लावावा अशी मागणी अधूनमधून होत असते.
2019च्या ऑक्टोबर महिन्यात इजिप्शियन
नागरिकांनी तहरीर चौकात अब्दल सीसीविरोधात प्रचंड मोठे आंदोलन केले. राषट्राध्यक्ष
सीसी यांनी हे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून मोडून काढले. दोन महिने चाललेल्या या
आंदोलनात हजारो तरुणांना सरकारने अटक केले. त्यांचा अमानूष छळ केला. चार-पाच
महिन्यानंतर अजूनही या तरुणांची सुटता झालेली नाही.
मुबारक यांची तानाशाही सत्ता
सपुष्टात येऊनही इजिपिशिय़न नागरिकांना समाधान लाभलेले नाही. मुबारक यांच्या
सत्तापालटाला 9 वर्ष होत आहेत. पण अजूनही इजिप्तमध्ये सामान्य लोकांना स्थैर्य
लाभलेले नाही. सुदान, लेबनान, अल्जेरिया या देशातही पुन्हा
एकदा अस्थिरतेने डोके वरे काढले आहे. लोकशाही सत्तास्थापनेचा त्यांचा लढा आजही सुरूच आहे. मुबारक
अमेरिका-इस्रायल धार्जिणे होते. त्यापूर्वीचे सादात यांची वागणूकही त्याच पद्धतीने
होती.
इजिप्तचे दूसरे राष्ट्राध्यक्ष जमाल नासर मध्य आशियाचे हिरो होते. त्यांनी
धार्मिक राष्ट्रवादाचा बाजूला सारून अरब राष्ट्रवादाचा पाया घातला. अनेक सुधारणा
घडविल्या. सुएज कालव्याचे लोकशाहीकरण केले. मध्य आशियात शांति प्रश्तापित केली. या
नासरवादातून अनेक राष्ट्रात राजकीय सुधारणा झाल्या.
नासर यांची सत्ता इजिप्तसाठी
सुवर्णकाळ होती. आज इजिप्शियन नागरिकांची शांतता भंग झालेली आहे. मुबारक यांच्या
तानाशाहीचा 10 वर्षापूर्वी अंत झाला. पण सीसीच्या रुपाने अजून एक डिक्टेटर
इजिप्शियन नागरिकांच्या माथी मारला गेला आहे. मुबारक गेले पण त्यांचा वारसदार आज
इजिप्शियन लोकांना छळतो आहे.तज्ज्ञाच्या मते पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्ष सादात व
मुबारक यांच्यामुळे चिघळला आहे.
2001 साली पाश्चिमात्य देशांनी मानवतेच्या हाक देत
अफगाणिस्तामध्ये नाटो सैन्य घुसवले. परंतु ती मानवता पॅलेस्टिनीसाठी त्यांनी लागू
केली नाही. दूसरीकडे 18 वर्षानंतर आज पुन्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्ता
स्थापन करणार आहेत. तालिबानींनी अथक संघर्ष करून अमेरिकेकडून सत्ता मिळवली.
तालिबानी सत्ता ही स्त्रिविरोधी आहे. तसेच ती मध्य-आशियात अशांतता माजविण्यासाठी
कारणीभूत ठरणारी आहे. अमेरिकेने त्यांच्या सत्तेला मंजूरी दिली. भारताने त्यांचे
स्वागत केले. तालिबानी सत्तेचे हे अरिष्ट मानवतेर कोसळू नये अशी प्रार्थना
करुया...
Twitter@Kalimajeem
(सदरील लेख लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
(सदरील लेख लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना , घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे. उदाहरणार्थ , ...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com