पुरुषांसारखी दाढी, मिशी असलेल्या पाच इराणी मुलींचा फोटो अलीकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर या फोटोंना लाखो लाईक आणि तेवढ्याच संख्येने चीअरअप करणाऱ्या प्रतिक्रीया मिळत आहे. फुटबॉल स्टेडिअममध्ये आपल्या फेव्हरेट टीमला चिअरअप करणाऱ्या या दाढीवाल्या मुलींमुळे इराणच्या सरकारमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.
प्रशासकीय यंत्रणेसोबत इराणचे क्रीडा मंत्रीदेखील या मुलींचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रपती हसन रुहानी अप्रत्यक्षरीत्या या मुलींचं कौतुक करत 40 वर्षांपूर्वी लादलेली बंदी उठवण्याच्या तयारीत आहेत. या एका घटनेनं इराणमध्ये प्रोग्रेसिव्ह विरुद्ध कन्झेरवेटीव्ह असा संघर्ष रंगलाय.
राजधानी तेहरान शहरातील आझाद स्टेडिअमध्ये 27 एप्रिलला ‘पर्शियन गल्फ प्रो लीग’ फुटबॉल मॅच सुरु होतं. आपल्या फेव्हरेट टीमचा खेळ पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये तुफान गर्दी झाली होती. शहरातील काही मुलींना हा मॅच स्टेडिअममध्ये जाऊन बघायचा होता पण स्पोर्ट्स स्टेडिअममध्ये महिलांना जाण्यास बंदी असल्याने ते शक्य नव्हतं.
परंतु या मुलींनी पुरुषासारखा वेशांतर करून स्टेडिअममध्ये इन्ट्री मिळवली. तिथं जाऊन त्यांनी आपले मॅच बघतानाचे व चिअरअप करतानाचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ अपलोड करुन बंदीच्या नियमाला हरताळ फासला. काहीच वेळात ट्वीट-रीट्वीटमधून हे फोटो व्हायरल झाले.
वाचा : इराणी महिलांचा स्टेडिअम प्रवेशाचा लढा
1979 साली धर्मगुरू आयतुल्लाह खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडली. ईरानचे शाह मोहम्मद रजा पहलवी यांना पदच्युत करून खोमेनी यांनी ‘धार्मिक प्रजसत्ताक’ इराणची स्थापना केली. या घटननेनंतर इराणमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले. महिलांना बुरखा सक्तीसह अनेक बंधने थोपवण्यात आली. या बंदीअंतर्गतच महिलांना स्पोर्ट्स स्टेडिअममध्ये जाऊन खेळ बघण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. ही बंदी झुगारण्यासाठी 40 वर्षांनंतर पाच मुली पुढे आल्या आहेत.
इराणमध्ये या पाच मुली कौतुकाचा विषय झाल्या आहेत. देशांतील महिलांची बाजू घेऊन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. महिलांसोब पुरुषही या बंदीचा निषेध नोंदवत आहेत. या घटनेनंतर इराणमध्ये प्रशासकीय पातळीवर ही बंदी उठवण्याची चर्चा सुरु आहे.
बीबीसीने याबद्दल दिलेल्या आपल्या बातमीत म्हटलंय की, इराणचे राष्ट्रपती हा नियम शिथील करण्याच्या तयारीत होते, पण कट्टरवाद्याकडून होत असलेल्या विरोधापुढे त्यांना झुकावं लागलं आहे. इराण हा पुराणमतवादी देश म्हणून ओळखला जातो.
वाचा : इजिप्शियन दुसऱ्या क्रांतीकडे
वाचा : अबी अहमद इथियोपियाचे मंडेला
अशा अवस्थेत तिथल्या सांस्कृतिक आंदोलनातून सुधारणावादी स्थानिक सरकारच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त करताना दिसतात. इराणचा सिनेमा तर जगभरात विद्रोही परंपरेसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत तिथल्या महिला मूलभूत हक्कासाठी उभा उभारु राहात आहेत. कदाचित येत्या काळात ही ठिणगी मोठ्या आंदोलनात रुपांतरीत होऊ शकेल.. सौदीसारख्या परंपरावादी व कट्टरवादी देशाने महिलांवरील असलेले निर्बंध उठवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे इराणच्या महिलांचा हा लढादेखील नक्कीच यशस्वी होईल अशी अपेक्षा करुया..
(सदरील लेख 15 मे 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com