हिटलरविरोधात लढणारी विरांगना : नूर इनायत खान

तिहासात अठराव्या शतकातील म्हैसूर शासकांच्या शौर्याचे अनेक किस्से नोंदवलेले आहेत. हैदरअली व नंतरच्या काळात टिपू सुलतानला शुरवीर म्हणून उपाधी लाभली. सदरहू लेखात म्हैसूर शासकाच्या शुरवीर कुटुंबाच्या एका पिढीची कहाणी रेखाटली आहे. म्हैसूर शासक घराण्यातील नूर इनायत खान नामक ही महिला जगाच्या इतिहासात अजरामर ठरली आहे. या ३० वर्षीय महिलेला भारतीय इतिहासातच नाही तर ब्रिटेनच्या इतिहासातदेखील मानांचे स्थान आहे. नूर इनायत या महिलेची वीरगाथा क्रूरकर्म हिटलरसोबत झालेल्या युद्धाशा जोडलेलेी आहे.
हिटरलचं नाव जरी घेतलं तर अंगावर काटा उभा राहतो. त्या क्रूरकर्मा व पिच्चाश हिटलरविरोधात ही महिला एकटीच झुंज देत होती. ब्रिटनच्या या प्रसिद्ध स्त्री गुप्तहेर मृत्यूच्या ७४ वर्षानंतर २०१८ साली अचानक चर्चेत आल्या आहेत. इग्लंडच्या चलनावर त्यांचा फोटो छापावा यासाठी जगभरात स्वाक्षरी मोहीम चालवली गेली. अनेक नामवंत सेलिब्रटींनी नूर इनायतचा फोटो चलनावर छापण्यासाठी समर्थन दिलं. भारतात तर मोठ्या प्रमाणात नूर इनायत यांच्यासाठी समर्थन मोहीम राबविली जात आहे. भारतासह ब्रिटन आणि फ्रांसमधून नूर इनायत यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं.
२०२०ला इग्लंड सरकार ५० पौंडच्या चलनी नोटांचे री-डिझाईन करत आहे. या नोटांवर फोटो छापण्यासाठी बँक ऑफ इग्लंडकडून काही नावे मागवण्यात आली आहे. यात मेरी सिकोल (क्रिमियन युद्धात सैन्याची सेवा करणारी नर्स), स्टिफन हॉकिंग (प्रसिद्ध शास्त्रज्ञ), क्लेमेंट ऐटली (चर्चील सत्ताकाळातील प्रभावशाली महिला मंत्री), मार्गारेट थॅचर (विसाव्या शतकातील सर्वात प्रभावी ब्रिटेनीयन पंतप्रधान) आणि नूर इनायत खान (हिटलरविरोधी गुप्तहेर) यांची नावे आलेली आहेत. पण यापैकी सर्वांत पुढे नूर इनायत खान आहेत.
सर्वप्रथम बीबीसीच्या पत्रकार झेहरा जैदी यांनी नूर इनायतसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली. कॅमडेन कौन्सिलतर्फे सादर झालेले हे लेटर पिटीशन ३ ऑक्टोबर २०१८ला चेंज ओआरजीवर आलं. पहिल्याच दिवशी तब्बल ७०० लोकांनी या मागणीला समर्थन देत आपली मते नोंदवली. 
शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी १६ हजार ६३९ मते नूर इनायतच्या पारड्यात पडली होती. जगभरातील मीडियानं या घटनेची नोंद घेतली. सर्वांनी एका सुरात नूर इनायतचा फोटो नोटावर टाकून हिटलर विरोधी गुप्तहेराचा सन्मान करण्याची मागणी केली आहे. सध्या इग्लंडच्या त्या चलनावर वाफेच्या इंजिनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जेम्स वॅट यांचा फोटो आहे. ही नोट २०११ साली जारी करण्यात आली होती.
कोण आहेत नूर इनायत?
धाडसी व शूरवीर महिला म्हणून नूर इनायत खान यांचा इतिहासाच उल्लेख आढळतो. १७व्या शतकातील शूरवीर योद्धा म्हैसूरचा शासक टिपू सुलतानच्या वंशजापैकी असलेल्या नूर यांचा जन्म १९१४ साली मॉस्कोमध्ये झाला. परंतु त्यांचे पालन-पोषण फ्रांसमध्ये तर निवास इंग्लडमध्ये होता. त्यांचे वडील इनायत खान टिपू सुलतानच्या वंशजातील होते. टिपू यांची नात ही इनायत खान यांची सासू होती. इनायत सुफी परंपरेतील मेसेंजर होते. संगीत साधनेसाठी त्यांनी भारतातून देशांतर केलं होतं.  
य प्रवासात त्यांना ब्रिटिशर ओरा बेकर भेटल्या. त्या इनायतना संगीत सभेसाठी मदत करत असत. पुढे दोघांनी लग्न केलं.  जानेवारी १९१४ला ओरा व इनायत दाम्पत्याने पहिली मुलगी झाली. तिचे नाव नूर ठेवण्यात आलं. कांलातराने इनायत कुटुंब पॅरीसमध्ये स्थलांतर झालं. एका दुसऱ्या महायुद्धावेळी खान कुटुंब पॅरिसमध्ये राहात होतं. युद्धानंतर पॅरीस जर्मनीच्या ताब्यात गेल्यानं खान कुंटुब लंडनमध्ये स्थायिक झालं.
नूर इनायत शांत स्वभावाच्या पण थोडाशा लाजऱ्या आणि अभ्यासू होत्या. लिखाणाचा छंद असलेल्या नूर यांच्या वयाच्या २५ साली त्यांच्या अनेक जातक कथा प्रकाशित झालेल्या होत्या. नूर इनायत यांचे चरित्र 'द स्पाई प्रिसेंज: द लाइफ़ ऑफ़ नूर इनायत ख़ान' लिहिणाऱ्या श्राबणी बसु यांनी बीबीसीला १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणतात, 
नूर इनायतला संगीताशी फार जवळीक होती. ती एक लेखिकादेखील होती, तिने अनेक गीते रचली आहेत. ती वीणादेखील वाजवित असत, तिनं लहान मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या होत्या. नंतरच्या काळात नूर फॅसीझमविरोध लढ्यासाठी सैन्यात दाखल झाली.
श्राबणी बसु यांनी नूर इनायत खान यांचे खूप सुंदर चरित्र लिहिलं आहे. त्यातून नूर यांच्या कुटुंबाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व इनायत खान यांचा संगीत प्रवास उलगडतो. इनायत खान यांचा भारत भेटीदरम्यान मृत्यू झाला. त्यांची मजार दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन परिसरात आहे.
सुडाची भावना
नूर इनायत यांनी पॅरीस उद्ध्वस्त होताना पाहिलं. युद्ध, रक्ताचे सडे, हिटलरचा नंगा नाच त्यांच्यावर परिणाम करून गेला. देशांतरच्या जखमा घेऊन त्या लंडनमध्ये स्थायीक झाल्या. हिटलरनं लादलेल्या सम्राज्यवादी युद्धामुळे त्यांना बेघर व्हावं लागलं. हा दंश त्यांच्या मनावर कोरला गेला. हिटलरच्या क्रूर शासनाविरोधात त्यांच्या मनात सुडाची भावना होती. हिटलरविरोधात काहीतरी करायचं आहे या सुडाने त्या पेटून उठल्या होत्या. 
१९४० साली त्यांनी इग्लंडचं विमेन औक्सिलरी एअर फोर्स जॉईन केलं. तिथे त्या वायरलेस ऑपरेटर बनल्या. महत्त्वाची माहिती मोर्स कोडमध्ये बाहेर पाठवण्याचे काम त्यांच्याकडे होतं हे मॅसेज कुणालाही वाचता येत नसत. नूर फर्राटेदार फ्रेंच बोलत असत, ही बाब स्पेशल ऑपरेशन एग्जिक्यूटिव्ह सदस्याच्या ध्यानात आली. ही गुपत संघटना विस्टन चर्चिल यांनी सुरु केली होती. तीन वर्षातच नूर या संघटनेच्या सिक्रेट एजंट बनल्य़ा.
श्राबणी बसु यांनी रेखाटलेल्या चरित्रात नूर इनायत खान यांचे हे धाडसी व्यक्तिमत्व एका थ्रीलर सिनेमासारखे उलगडत जाते. नूर यांच्या घरात सुफी परंपरेचा वारसा असल्यानं त्या हिंसेपासून लांब होत्या. हिंसेंतून प्रश्न सुटू शकतात यावर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणूनच त्यांनी गुप्त मोहिमेचा आधार घेतला. तिथे खोटे बोलण्याशिवाय व आपली ओळख लपविण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांची जडणघडण याला संमती देत नव्हती पण देशप्रेमाखातर त्यांनी हे दिव्य पेललं. 
अंडर कव्हर एजंट
१९४२ला त्यांनी स्पेशल ऑपरेशन्स एग्जीक्यूटिव्ह (एसओई) नूर यांनी जॉइन केलं. या नियुक्तीपूर्वी त्यांचं कडक  ट्रेनिंग पार पडलं. प्रशिक्षणानंतर या दलाच्या त्या अंडर कव्हर एजंट बनल्या. त्यांचे काम युरोप राष्ट्रात लहान-सहान आंदोलनं व मोर्चाना उत्तेजन देणं होतं. याचा हेतू हिटलरचा जर्मनीवरील कंट्रोल थंड करणे होतं. १९४३ला एसओई म्हणून पॅरिसला जाणाऱ्या नूर इनायत पहिल्या महिला होत्या.
नूर इनायत पॅरीसमधील हिटलरच्या गुप्त कारवाया संदर्भात माहिती ब्रिटेनला पुरवत असत. अनेक दिवस त्यांनी अतिशय चपळतेने कुमाच्याही लक्षात ने येता आपलं काम पार पाडलं. पुढे त्यांचे अनेक सहाकरी एक एक करून पडकले गेले. पण नूर मात्र शेटवपर्यंत गेस्टापोला (हिटलरचे सीक्रेट पोलीस) गुंगारा देत राहिल्या.
अनेक वेळा गेस्टापोने त्यांच्या ठिकाण्यावर छापा टाकला. पण  प्रत्येक वेळी त्या निसटल्या. तीन-चार महिने त्या सतत वेशांतर करून गेस्टापोला हुलकावणी देत होत्या. अशा काळातही त्यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. गुप्त माहिती त्या लंडनला पाठवित राहिल्या. 
कलीगच्या बहिणीने दिला दगा
हिटलरच्य़ा स्ट्राँग नेटवर्कमुळे गुप्तहेर महीनाभरापेक्षा जास्त काळ लपून राहात नसत. अशा काळातही नूर इनायत ३ महिने लपून आपलं काम करीत होत्या. पण एका डबल एजेंटच्या कटामुळे त्या हिटलरच्या हाती लागल्या. श्राबणी बसु यांच्या मते ‘त्यांंच्या एका सहकाऱ्याच्या बहिणीने जर्मनांसमोर गुपीत जाहीर केलं. ती मुलगी द्वेष आणि ईर्ष्येची बळी ठरली होती. कारण नूर दिसायला सुंदर होत्या आणि अनेकजण त्यांना पसंत करत होते.
ज्यावेळी त्यांना पकडण्यात आलं त्यावेळी त्या सहज सरेंडर झाल्या नाहीत, त्यांनी पळून जाण्याची पुरेपूर प्रयत्न केला. इतिहासात अशी नोंद आढळते की, नूर इनायत सहा-सहा तगड्या पुरुषांनाही मानवत नसे. अशा अवस्थेतही नूर इनायत पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असे. 
अटकेत असताना त्यांनी बाथरूमच्या खिडकीमधून ड्रेनेज पाइपच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिथं उपस्थित गार्ड्सने त्यांना पकडले. यानंतर पुन्हा नूर इनायत यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना साखळदंडात बांधून एकटेच कैदेत ठेवण्यात आलं. त्यांना सतत टॉर्चर करून प्रश्न विचारले जात असत. छर्ड डिग्री वापरून त्यांचा आतोनात छळ करणात आला. महिला असूनही त्या छळाला कणखरतेनं सामोरं गेल्या. हिटलरनं त्यांचा छळ छावनीत टाकून छळलं. परंतु त्यांनी आपलं तोंड उघडलं नाही.
अमानवी छळ
एक वर्षे कैदेत ठेवल्यानंतर त्यांना दचाऊ कंसंट्रेशन कॅम्पला पाठवण्यात आलं. त्यांच्यासोबत आणलेल्या व्यक्तींना लगेच मारून टाकण्यात आलं. अमानवी छळानंतर १३ सप्टेंबर १९४४ला त्यांना गोळी घालण्यात आली. वयाच्या ३०व्या वर्षी एक धाडसी व शुरवीर गुप्तहेर मरण पावली. बसु लिहिता, "मृत्युसमयी त्यांच्या ओठावर आलेला शेवटचा शब्द लिबरेटहोता.. याचा अर्थ त्यांना छळातून आज़ादी मिळाली होती."
मृत्युनंतर नूर इनायत यांचा इग्लंडने यथोचित सन्मान केला. मृत्यु पश्चात त्यांना वॉर क्रॉसदेऊन गौरव करण्यात आला. वीरतेसाठी त्यांना ब्रिटनचा दोन नंबरचा सन्मान जॉर्ज क्रॉस देऊन गौरवण्यात आलं. २०१२ साली नूर इनायत खान यांची भव्य प्रतिमा लंडनच्या गॉर्डन स्क्वेयर गार्डन्स म्हणजे त्या बालपणी राहात असलेल्या जागी बसवण्यात आली. नूर इनायतवर पोस्टाचे तिकिटदेखील आहे. ब्रिटेनमध्ये आशियायी महिलेचा हे पहिलेच स्मारक आहे. योगायोग म्हणजे येत्या ८ नोव्हेंबरला नूर इनायत खान यांचा अजून एक पूर्णाकृती भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न
नूर इनायत यांच्या धाडसी कर्तृत्वावर अनेक पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत. जगभरातील विविध देशात त्यांच्यावर सिनेमेदेखील तयार झाले आहेत. भारतात नुकतीच अशा प्रकारच्या एका सिनेमाची घोषणा झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार राधिका आपटे त्यात लीड रोल करणार असल्याचे कळते.
दरवर्षी लंडनस्थित नूर मेमोरियल ट्रस्टतर्फे त्यांच्या स्मृतीमध्ये अनेक कार्यक्रम केले जातात. ब्रिटेनच्या चलनी नोटांवर नूर इनायत यांचा फोटो छापला गेला नाही तरी त्यांचे कर्तृत्व काही कमी होणार नाही. पण त्यांच्या राष्ट्रभक्तीचा सन्मान जरूर होईल. 
टिपू सुलतानला ब्रिटिशविरोधात लढताना वीरमरण आलं, पण त्याच टिपूच्या वंशजाचे ब्रिटन यतोचित सन्मान करतोय ही मोलाची गोष्ट आहे. टिपू सुलतान भारतात राहून ब्रिटिशांच्या वसाहतवादाला विरोध करत राहिला. दूसरीकडे त्याची नात ब्रिटेनची मदत करून त्याबदल्यात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. बसु यांनी याबद्दल खूप सविस्तर लिहिलं आहे. ब्रिटेनला तिची भारताबदंदलची भूमिका  माहिती असतानाही तिछल्या राज्यकर्त्यांनी नूर यांच्या प्रामाणिकपणाचा मोल टेवत त्यांच्या भारताच्या स्वातंत्र्यसंग्राबाबतची भूमिका मान्य केली. 
अशा भारतवंशीय व्यक्तीचा परदेशात सन्मान होतोय, पण भारतातही त्यांच्या स्मृतीत अजून कुठलाही कार्यक्रम झालेला नाही. आता या निमित्तानं तरी का होईना नूर इनायत यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. त्यांच्या नावे एखादी योजना किंवा प्रोत्साहनपर कार्यक्रम हाजीर होण्याइतपत नूर इनायत यांचे कर्तृत्व नक्कीच आहे.

कलीम अजीम, पुणे

(सदरील लेख 6 नोव्हेंबर 2018ला लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे, त्यात अपडेट व विस्तार करून तो इथे टाकला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: हिटलरविरोधात लढणारी विरांगना : नूर इनायत खान
हिटलरविरोधात लढणारी विरांगना : नूर इनायत खान
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKo2rLv-Q-CmA1-XwszXq-ADjXbElZ11WPCgWu1HMm6nftrGxOXCSb0wBnPmdO_ikD7t2r68uI1U_pBgQ0Sqyk4pgcWF8Vq1Ba_o4uXy4FclrtyPuaLuh-SK7WlTYFdXoA6Ehy3gj7uk7v/s640/15551496._SX540_.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKo2rLv-Q-CmA1-XwszXq-ADjXbElZ11WPCgWu1HMm6nftrGxOXCSb0wBnPmdO_ikD7t2r68uI1U_pBgQ0Sqyk4pgcWF8Vq1Ba_o4uXy4FclrtyPuaLuh-SK7WlTYFdXoA6Ehy3gj7uk7v/s72-c/15551496._SX540_.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_8.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2018/11/blog-post_8.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content