१९९१ मध्ये सोमालियात भयंकर गृहयुद्ध सुरू होतं. युद्धात राजधानी असलेलं मोगादीशू शहर सर्वात जास्त ध्वस्त झालं. इथं एका बॉम्ब हल्ल्यात रमालाच्या १२ वर्षीय भावाचा मृत्यू झाला. या हल्ल्यानं रमालाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. हीच परिस्थिती मोगादीशूतील अन्य घरातली होती. अशावेळी रमालाच्या कुटुंबानं जीव वाचवण्यासाठी स्थलांतर स्वीकारलं. हेच स्थलांतर सोमालियन देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून देण्यास कारणीभूत ठरलं. भयग्रस्त झालेल्या रमालाच्य़ा कुटुंबाने नऊ दिवस एका छोट्याशा बोटीतून प्रवास करत केनिया गाठलं. संयुक्त राष्ट्राच्या मदतीनं अखेर रमाला कुटुंबाने इग्लंडमध्ये शरण घेतली. रमाला त्यावेळी दीडएक वर्षांची होती. ब्रिटनला गेल्यानंतर अली कुटुंबाचे आयुष्य पूर्णत: बदलून गेलं.
वाचा : व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
वाचा : सोमालियाची पॅशनेट ब्रॉडकास्टर नलायाह
अवघ्या लहान वयात रमालानं बॉक्सिंगचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात फक्त वजन कमी करणे हाच हेतू बॉक्सिंगमागे होता. कारण रमाला लहानपणी लठ्ठ दिसत असे. शाळकरी मित्रांच्या डिवचण्यानं ती त्रस्त झाली. आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी ती शाळेत बॉक्सिंग करू लागली. पण हळूहळू करत तिला बॉक्सिंगच्या खेळात रस येऊ लागला. कालांतराने बॉक्सिंग पॅशन म्हणून रमालाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला.
२०१६मध्ये ब्रिटिश राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणारी रमाला पहिली मुस्लिम बॉक्सर महिला होती. सोमालिया व्हाया केनिया इग्लंड रमालाचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. पारंपरिक मुस्लिम कुटुंबात वाढलेल्या रमालाला रितीरिवाज व मुलगी असल्याची सर्व बंधने जन्मजात चिकटली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिनं बॉक्सिंगचे धडे गिरवले. रामलानं ब्रिटनच्या प्रतिष्ठित विद्यापीठातून पदवी मिळवली. काही काळ तिने कायद्याच्या फर्ममध्ये कामही केलंं. पण उशीरापर्यंत काम करावं लागत असल्यानं तिनं तोो जॉब लवकरच सोडला. दरम्यानच्या काळात बॉक्सिंगकडे दुर्लक्ष झालं होतं, तिनं पुन्हा सुरुवात केली. जोरदार कमबैक करत रमालानं आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरीदेखील बजावली.
रमालाच्या आई-वडिलांना तिचे बॉक्सिंग खेळणे आवडत नव्हते. त्यांच्या मते या खेळात कमी कपडे घालून खेळावं लागतं. आई-वडिलांच्या सक्तीच्या बंधनामुळे रमालाला वाईट वाटे. पण तिनं खेळासंदर्भात असलेली आपली जिद्द कायम ठेवली. बॉक्सिंगच्या वेडापायी तिनं घरात आपल्या खेळाविषयी काहीच कळू दिलं नाही. ती नॅशनल फायनलमध्ये पोहोचली तरी घरी काहीच माहीत नव्हतं. रमालानं ब्रिटिश नॅशनल चॅम्पि
वाचा : सराह यास्मीनचा आयफोन कॉन्ट्रैक्ट व्हायरल
याबद्दल हफिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, ‘बॉक्सिंगमुळे माझ्यात प्रचंड आत्मविश्वास बळावला आणि याच जोरावर मी आज कोणासमोरही भिती न बाळगता उभी राहू शकते. खेळामुळे मला नव्या देशात मित्र भेटले, परंतु कुटुंबाची साथ न मिळणे माझ्यासाठी वेदनादायी होतं. जेव्हा मी फायनलमध्ये खेळत होते, त्यावेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या घरातली सर्व मंडळी तिथं हजर होती, पण माझ्या घरातून कोणीच आलं नव्हतं, मला त्यावेळी खूप वाईट वाटलं, मला मित्रांचे समर्थन होतं पण घरातील एकही व्यक्ती माझ्यासोबत नव्हती, त्य़ांच्या विरोधामुळे मला ही गोष्ट त्यांच्यापासून लपवावी लागली.’
तिच्या यशानं घरात बॉक्सिंग खेळाला सन्मान व आदर मिळवून दिला. आई व वडिल रमालाच्या यशानं प्रचंड आनंदी झाले. परंतु रमालाच्या अनेक नातेवाईकांना आजही वाटते की आपल्या नात्यातल्या मुलींनी असं वागणं बरोबर नाही. यावर रमाला त्रागा करत म्हणते, 'माझ्या आईला सुरुवातीला माझा खेळणे मंजूर नव्हतं. पण मी त्यांचे मत परीवर्तित करू शकले. विरोध करणाऱ्यांनी एकदा माझा खेळ अवश्य बघावा त्यांचे नक्कीच मत परिवर्तन होईल.'
रमालानं आता ब्रिटनची बॉक्सिंग टीम सोडली आहे. गेल्या वर्षांपासून ती सोमालियासाठी खेळत आहे. तिनं आपला पती आणि कोच रिचर्ड मूरेच्या मदतीनं सोमालियामध्ये बॉक्सिंग फेडरेशनची स्थापना केली आहे. मूरे आता सोमालियाच्या नॅशनल बॉक्सिंग टीमचे कोच आहेत.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com