नवं वर्ष सौदी अरेबियातील महिलांसाठी क्रांतीकारी वर्ष ठरणार आहेत. डिसेबरच्या शेवटच्या आठवड्यात सौदी सरकारने महिलासंदर्भात अजून एक महत्वाचा निर्णय लागू केला आहे. सौदीचे राजे किंग सलमान यांनी महिला व मुलींना बाईक चालवण्याची परवानगी दिली आहे. सौदी सरकारने आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी ‘व्हिजन 2030’ कार्यक्रम घोषीत केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिला कल्याणाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
तूर्तास बाईक, ट्रक आणि कार चालविण्यावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. यासह महिलांना स्पोर्ट्स स्टेडियममध्ये इंट्रीची परवानगी देण्यात आली आहे. यासह अजून एक महत्वाची निर्णय सौदी सरकारने घेतला आहे, तो म्हणजे देशातील सिनेमा हॉल पुन्हा सुरु करण्याची परवानगी सौदी सरकारने दिली आहे. भारतच काय तर इतर देशातील नागरिकांसाठी ही गोष्ट फुटकळ वाटू शकते, पण सौदी महिलांसाठी हे निर्णय एक पर्वणी आहे.
वाचा : सौदीतली महिलांची मॅरॉथॉन
ऑक्टोबर महिन्यात सौदीत महिलांच्या ड्रायव्हिंगवरचे निर्बंध उठवण्यात आले. तर डिसेंबर महिन्यात म्हणजे आठ दिवसांपूर्वी सौदीच्या शाही सरकारने दोन महत्वाचे निर्बंध उठवले. पहिली म्हणजे महिलांना बाईक व ट्रक चालविण्याची परवानगी दिली. तर दुसरं म्हणजे देशात तब्बल साडे तीन दशकानंतर सिनेमागृह पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सौदी सरकारने घेतला. या निर्णयाने सौदीत अनेकांनी जल्लोष केला.
नवे आदेश लागू व्हायला तीन व सहा महिन्याचा कालावधी आहे, पण सोशल मीडियावरुन किंग सलमानचे सौदीच्या अनेक मुली व महिलांनी किंग आभार मानले. तब्बल 3 लाख लोकांनी किंग सलमानच्या ट्वीटला ‘अलहम्दुलिल्लाह’ असा एक शब्द रीट्वीट करुन ऐतिहासिक बदल केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
या संदर्भात ‘फायन्शियल टाईम्स’ या जागतिक किर्तीच्या न्यूजपेपरने किंग सलमानच्या निर्णयाला एक क्रांतीकारी पाऊल म्हटलं आहे. या निर्णयामुळे सौदी महिलांच्या आयुष्यात नवा उत्साह येईल असा आशावाद नोंदवला आहे.
‘गल्फ न्यूज’नेही या शाही राजेंचा निर्णय छापत सामान्य लोकांच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेक महिलांनी निर्बंध उठविल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. ‘गल्फ न्यूज’ने एका महिलेची प्रतिक्रीया छापली, त्यात ती महिला म्हणते ‘मी आत्ता अठ्ठावीस वर्षाची आहे पण या निर्णयाने मी माझं आयुष्य दहा वर्षाने कमी झालं असून मी आता स्वत:ला एकवीस वर्षाची फील करते, मी बाईक ड्रायव्हिंग करुन आता मी हवेशी स्पर्धा करु शकते.’
या महिलेची प्रतिक्रीया खूप महत्वाची आहे. कारण महिलांच्या अखंड लढ्याला तब्बल सत्तावीस वर्षानंतर यश आलं आहे. या निर्णयामुळे सौदीतील स्थानिक महिलांपेक्षा व नोकरीसाठी त्या देशात असलेल्या परदेशी महिलांना मोठा फायदा मिळू शकेल. पण या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला आणखी थोडासा वेळ लागेल. मार्च महिन्यापासून सिनेमागृह सुरु होती. तर प्रत्यक्ष ड्रायव्हिंगसाठी जूनपर्यत थांबावं लागणार आहे.
1990 साली कायद्यात सुधारणा करत सौदी सरकारने महिलांच्या ड्रायव्हिंगला निर्बंध लादले. त्या काळात शाही परिवाराविरोधात उघड बंड करणे अशक्य होते. त्या काळात बंडखोरांना थेट जेलमध्ये टाकण्यात येई, तरीही परिणामांची पर्वा न करता तब्बल 47 महिलांनी शाही परिवाराच्या निर्णयाचा बहिष्कार करत रियाधच्या रस्त्यावर गाड्या चालवल्या. या महिलांना अटक करण्यात आली.
सौदीतील विद्वान धर्मगुरुंनी या महिलाविरोधात कायदेशीर आदेश काढत महिलांना ड्रायव्हिंगला बंदी केली. या धर्मगुरुंनी महिलाच्या कार चालवण्याला अशुभ ठरवत नकारात्मक परीणाम दर्शवणारे म्हटलं. महिलांच्या ड्रायव्हिंग बंदीला थोतांड कारण पुढे करण्यात आलं. ‘महिलांनी गाडी चालवली तर त्याची जवळीकता पुरुषांशी वाढेल आणि त्यातून अनैतिक कामं होतील’ अशा हास्यास्पद आदेशाला सौदीच्या शाही परिवाराने मान्यता दिली.
विरोध करणाऱ्या महिलांचे पासपोर्ट जब्त करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात येऊ लागले. पण महिलांचा विरोध कायम होती. कार ड्रायव्हिंगवरील निर्बंध उठवण्याची मागणी सातत्याने सुरु झाली. पण सर्व सरकारने याकडे दुर्लक्ष करत जेलभरो सुरु ठेवलं.
2011 साली इजिप्त, ट्यूनिशिया, लिबीया आणि यमन या अरब राष्ट्रात सत्ता उलथवण्यासाठी आंदोलने सुरु झाली. सोशल मीडियाच्या आधारे ही आंदोलने अन्य इस्लामिक राष्ट्रात पोहचली. सत्तातरांच्या आंदोलनाने अनेकांच्या राजकीय जाणीवा प्रबळ झाल्या. परिणामी सौदीमध्येही महिलांनी ड्रायव्हिंग बंदीविरोधात आंदोलने सुरु केली. ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ अशा नावे अभियान राबविण्यात आले.
अनेक महिला या अभियानात सहभागी झाल्या. सोशल मीडियावरुन अनेक महिलांनी संतप्त प्रतिक्रीया नोंदवल्या. सरकारचा विरोध कायम होता. महिलांचा विरोध बघता सरकारने विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या कमिटीने महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी दिली तर त्यांची वर्जिनिटी नष्ट होईल असा युक्तीवाद केला. त्यामुळे शाही दरबारात ड्रायव्हिंग बंदी आणखी तीव्र झाली.
ऑक्टोबर 2013 ला पुन्हा महिलांनी आंदोलने तीव्र केली, यावेळी तब्बल 11 हजार महिलांनी पाठींबा दिला होता. हळुहळू पुरुषांनीदेखील ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ला समर्थन दिले. ड्रायव्हिंग बंदीला सरकारला कायदेशीर कारण द्यावे अशी मागणी महिलांनी केली. 2014 साली दुबईच्या सामाजिक कार्यकर्त्या ‘लुजैन अल हथलौल’ यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सीमेवरुन कार चालवत सौदीत प्रवेश केला.
त्यांना सौदी पोलिसांनी अटक केली, त्याच्यांवर दहशतवादाचे आरोप ठेवून जेलमध्ये डांबण्यात आले. या अटकेचा अनेक देशातून निषेध झाला, एमनेस्टी इंटरनेशनलसह अनेक मानवी अधिकार संघटनांनी सौदीच्या शाही परिवारावर टीका केली. पण ड्रायव्हिंग बंदी विरोधात ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ सुरुच होती. अखेर सरकारने नमतं घेत ऑक्टोबर 2017 ला महिला कार ड्रायव्हिंगचे निर्बंध उठवले. तब्बल 27 वर्षानंतर सौदीचे राजे किंग सलमान बीन अब्दुल अजीज यांनी क्रांतीकारक निर्णय घेतला.
एकवीसाव्या शतकात जग तंत्रज्ञानाच्या मदतीने आंतराळाला कवेत घेऊ इच्छित आहे, अशा परिस्थितीत सौदी महिला केवळ ड्रायव्हिंगसाठी भांडत होत्या. याच काळात काही अरब राष्ट्रात वर्षानूवर्षापासून चालत आलेली सत्ता उलथवून टाकत ‘अरब क्रांती’ झाली. पण सौदीच्या महिलांनी कार चालवण्याची परवानगी मिळवण्यातच धन्यता मानली. इतर देश महिला सक्षमीकरणासाठी अनेक नवनवे प्रयोग राबवित असताना सौदी महिलांना बेसिक मुद्द्यासांठी संघर्ष करावा लागत होता. ही बाब खरंच लाजीरवाणी आहे.
आजही अनेक इस्लामिक राष्ट्रांवर मुलतत्व विचारांचा मोठा पगडा आहे. अनेक ठिकाणी महिलांना विविध गोष्टीची बंदी करण्यात आली आहे, त्याविरोधात त्यांचे बंड सुरुच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही महिला बाहेर पडू पाहात आहेत. 2016 साली रिओ ऑलंम्पिकमध्ये बुर्किनी घालून इजिप्तची महिला व्हॉलीबॉल खेळाडू मैदानावर होती. दुर्दैवाने ‘कल्चरल क्लैश’ नावानेच याची जगभरात चर्चा झाली.
मुस्लिम महिलांच्या या बदलत्या भावविश्वावर सखोल चर्चा अपेक्षित होती. मात्र, असं काही झालं नाही. जागतिक स्तरांवर धार्मिक, कौटुंबीक आणि राजकीय पातळीवर मुस्लिम महिलांची घुसमट सुरु आहेच. असं असतानाही मुस्लिम महिला अनेक पातळीवर आपलं नाव कोरत आहेत. हे नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.
सौदींच्या महिलांचा लढा नक्कीच कौतुकास्पद आहे पण अशा मुलभूत गोष्टी मिळवण्याकरिता महत्वाचा काळ व एनर्जी खर्च व्हावी यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं दुसरं असू शकत नाही. तब्बल साडेतीन दशकानंतर सौदीत सिनेमा थियटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदीत सिनेमागृह पुन्हा सुरु होणार आहेत याच पार्श्वभूमीवर भारतात काश्मीरमध्ये सिनेमागृह सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे.
येत्या काळात महिलासंदर्भात अजून काही महत्वाचे निर्णय सौदी सरकार घेण्याची शक्यता आहे. ‘विजन 2013’ अंतर्गत आर्थिक व सामाजिक सक्षमतेसाठी नवी धोरणे सरकार आखणार आहे, यातून येत्या कळात महिलांना नक्कीच मोठा फायदा होईल, असा आशावाद बाळगूया.
(सदरील लेख 1 जानेवारी 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com