सौदी अरेबियात गेल्या काही महिन्यांपासून बदलाचे वारे वाहत आहेत. सौदी सरकारने लागू केलेलं आर्थिक व सामाजिक सुधारणा धोरण महिलांसाठी क्रांतिकारक ठरलं आहे. सरकारने महिलांना ड्रायव्हिंगचे निर्बंध उठवले, तसेच नोकरी करण्याची मुभाही दिली आहे. आता महिलांना स्पोर्ट्सकडे वळविण्यासाठी सरकारने विषेश कार्यक्रम आखले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सौदीत नुकतीच ‘वूमन हाफ मॅरेथॉन’ पार पडली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची ‘महिला मॅरेथॉन’ झाली, त्यामुळे साहजिकच सौदी अरेबिया जगभरात देश चर्चेत राहिला. पारंपारिक पेहरावात बहूसंख्य महिलांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. अनेक महिलांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सोशल साईट्सवर फोटो अपलोड करुन व्यक्त केला.
शनिवारी 3 मार्चला सौदीच्या रियाध शहरात भल्या सकाळीच बुरखा, हिजाब आणि अबाया या पारंपारिक वेषात महिला रनिंगसाठी सज्ज होत्या. सौदी स्पोर्ट्स अथॉरिटीने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये वय वर्षे पंधरा ते साठपर्यंत तब्बल 1500 महिला सहभागी झाल्या होत्या.
3 किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा होती. सौदीच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी अशा प्रकारच्या खेळाचं जाहीर आयोजन करण्यात आलं होतं. महिलांच्या खेळांना प्रोत्साहन मिळावं हा हेतू आयोजनामागे होता. दुसरीकडे सौदीतील मुस्लिम महिलांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या दृष्टीनेदेखील ही स्पर्धा महत्त्वाची मानली गेली. त्यामुळे जगभरातील बऱ्याच प्रसारमाध्यमांनी या ‘वूमन मॅरेथॉन’ स्पर्धेचं कव्हरेज केलं. रॉयटर्स, एएफपी, गल्फ न्यूज, अल जझिरा तर भारतात टाईम्स ऑफ इंडिया आणि स्क्रॉल या मीडिया हाऊसनं मॅरेथॉनची दखल घेतली.
‘मिझना अल नासेर’ही 28 वर्षीय महिला ब्रिटिश महिलेला हरवून स्पर्धेची विनर ठरली. केवळ 15 मिनिटात तिनं 3 किलोमीटरचं अंतर कापून प्रथम क्रमांक पटकावला. सौदी सरकारने मिझनाच्या यशाचा यथोचित करत सन्मान तिला आगामी ‘टोकयो ऑलंम्पिक’ला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यवसायाने इंजिनिअर असलेली मिझना ऑलंम्पिक खेळात सौदीचं प्रतिनिधित्व करणारी दुसरी महिला ठरली आहे. ‘अल अरेबिया’ या न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मिझनाने सौदी किंग सलमान बिन अब्दुल्ला यांचे आभार मानले आहेत. तिचं यश सौदीतील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी प्रतिक्रीया तिनं मुलाखतीत दिली.
मिझनाने याआधी अझरबैजान आणि शारजाहमधील गेम्समध्ये भाग घेतला आहे. याआधी 2012च्या लंडन ऑलंम्पिकमध्ये सराह अत्तार नावाच्या 23 वर्षीय मुलीनं बुर्किनीमध्ये सौदीचे प्रतिनिधीत्व केलं होतं. सराह यावेळी ‘कल्चरल क्लॅशेश’ला बळी पडली होती, बुर्किनी घालून रनिंग केल्यानं तिला पाश्चिमात्य खेळाडूंच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
भारतातील स्क्रॉल या वेबसाईटनं मिझनाची तुलना सराहसोबत केली आहे. वेबसाईटने या मॅरेथॉनला सोशल रिफॉर्मच्या प्रयत्नातील एक मैलाचा दगड म्हटलं आहे. ‘मीडल इस्ट मॉनिटर’ या एका अन्य वेबसाईटने वूमन मॅरेथॉनचं कौतुक करत किंग सलमान बिन अब्दुल्ला यांच्या व्हिजनरी धोरणाला या बदलाचं श्रेय दिलं आहे. ‘व्हिजन 2030’ धोरणामुळे महिलांसाठी 140 सेक्टरमध्ये अगणित जॉब निर्माण झाल्याची आकडेवारी वेबसाईटने दिली आहे.
एअर ट्रॅफीक कंट्रोल, एअरपोर्ट, पासपोर्ट अशा शासकीय सेक्टरव्यतिरीक्त खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रणाणात जॉब खुले झाले आहेत. महिनाभरात तब्बल मध्ये 1 लाख 7 हजार महिलांनी नोकरीसाठी अर्ज केल्याचं वेबसाईटसने म्हटलं आहे. ‘व्हिजन 2030’ कार्यक्रमाअंतर्गत सरकारने महिलांसाठी महिला कल्याणाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
सौदीचे राजे किंग सलमान बीन अब्दुल अजीज यांनी ऑक्टोबर-2017मध्ये ‘व्हिजन 2030’ कार्यक्रम घोषित केला. या अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. महिलांसाठी आखलेल्या या धोरणांमुळे इस्लामिक इतर राष्ट्र सौदी सरकारवर टीका करत आहेत. पण याला न जुमानता किंग सलमान आधुनिकीकरणाचे धोरणं राबवित आहेत.
दुसरीकडे सरकारच्या बदलत्या महिला धोरणासंदर्भात #SuadiWoman या हॅशटॅग अंतर्गत कन्झरव्हेटिव्ह विचारसरणीवर सौदी तरुणांच्या चर्चा झडत आहेत. अनेकांना हा बदल स्वीकारला, तर काहींनी स्वातंत्र्य आणि स्वैराचाराची तुलना करत इस्लामी तत्वज्ञान अधोरेखित केलं आहे. या चर्चा खरंच वाचण्यासारख्या आहेत. थोडक्यात काय तर अरब राष्ट्रेही आता परिवर्तनवादी विचार जोपासण्याची तयारीत मश्गुल आहेत.
(सदरील लेख 17 मार्च 2018च्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com