रात्रीच्या साडे नऊ वाजता सौदीच्या सरकारी टिव्हीवर अचानक महिला अँकर दिसली. कधी नव्हे ते प्रथमच प्राईम टाईमला महिला अँकर बातम्या वाचताना दिसत होती. त्यामुळे साहजिकच सौदीकर शॉक झाले. सौदीकरांसाठी हा ऐतिहासिक धक्का होता. कारण याआधी सौदीच्या कुठल्याही न्यूज चॅनलवर रात्रीच्या प्राईम टाईमला महिला न्यूज रिडर दिसली नव्हती. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाला अनेकांनी स्वतशी जोडून घेण्याचा प्रय़त्न केला आहे. ट्विटरला अनेकांनी महिला अँकरबद्दल कौतुकानं लिहिलं आहे. जसे प्रशंसा करणारे होते, तसे परंपरेनुसार टीकाकारही कमी नव्हते.
सोशल मीडियावर वीम अल-दखील नावाच्या या महिला पत्रकाराला किंग सलमानसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एण्डमेलगार्डियनशिप आणि विमेनराईज्अप ही दोन हॅशटॅग वापरून वीम अल-दखीलला चिअरअप केलं जात आहे. सर्व राष्ट्रांनी या प्रयोगाला ‘मुस्लिम महिला सशक्तीकरण’ म्हणून कोट केलं आहे. इतकेच काय तर मुस्लिम राष्ट्रानंही वीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा : सौदीत ‘वीमेन टू ड्राइव मूवमेंट’ला यश
वाचा : सौदीतली महिलांची मॅरॉथॉन
गेला आठवडाभर वीम सौदीची ‘सोशल सेलिब्रिटी’ ठरली. अनेकांनी वीमला शुभेच्छा देताना म्हटलंय की, ‘आम्ही काय बघतोय हे काही क्षण कळायला मार्ग नव्हता’ काही म्हणतात, ‘प्राईम टाईमला महिला अँकर आल्यानं कंझरवेटिव्ह आता मैदानात येतील’ अरब न्यूजनं म्हटलंय की, ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रमात हा प्रयोगाला मैलाचा दगड ठरू शकतो.
सौदी टिव्ही हा सरकारी मालकीचा न्यूज चॅनल आहे. प्राईम टाईम बुलेटीनला पुरुष अँकर बातम्या वाचत असे. महिला अँकरना फक्त हलके-फुलके शो, विमेन शो, किचन, हवामान, मॉर्निंग शो साठी अँकरींग शो दिले जात. पण आता महिला अँकरही महत्त्वाचे बुलेटीन होस्ट करू शकतील.
२५ सप्टेंबरला वीम अल-दखीलनं आपल्या पुरुष सहकारी उमर अल-नश्वनसोबत ड्यूल अँकर म्हणून जगभरातील बातम्या वाचल्या. याबद्दल तीनं सोशल मीडियावर आपला उत्साह शेअर केला आहे. आपला आधीचा अनुभव शेअर करत तिन म्हटलंय की, ‘पूर्वी ती वेगळ्या चॅनलसाठी बहरीनमध्ये २०१४ ते २०१७ काळात अँकरींग करीत असे, त्यापेक्षा हा अनुभव फारच चांगला होता’ वीमपूर्वी २०१६ साली जुमाना अलशमीने सकाळचे बुलेटीन वाचलं होतं. यानंतर कुठलीही महिला अँकर न्यूज प्रेझेटेशन करताना दिसली नाही.
वाचा : पाकिस्तानच्या दोन महिला वेटलिफ्टर
सौदी अरेबियात महिला सशक्तीकरणाची मोहीम गेल्या काही वर्षांत सुरू झाली आहे. या सदरात आपण विविध प्रयोगाबद्दल वाचलं आहेच. सौदी सरकारने आर्तिक सक्षमीकरण आणि महिला सबलीकरणासाठी व्हिजन २०३० कार्यक्रम घोषित कोला आहे. याअंतर्गत महिलांसाठी विविध क्षेत्र खुलं करण्यात आलं आहे.
नुकतंच महिलांसाठी वैमानिकांच्या जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. १३ सप्टेबरला प्रथमच ऑनलाईन नोंदमी सुरू झाली, पहिल्या २४ तासात विमान कंपनी ‘फ्लाइनस’कडे तब्बल महिला वैमानिकांचे अर्ज दाखल झाले.‘खलीज टाईम्स’च्या मते गेल्या दोन वर्षांत सौदीमध्ये तब्बल सहा लाख महिलांचे मनुष्यबळ तयार झाले आहे. ३२ वर्षीय प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांच्या प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरणाचे वारे सौदी अरेबियात सुरू झाले आहेत.
सौदीत महिलांना क्षुल्लक अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष फार मोठा आहे. तीन आठवड्यापूर्वी सौदीत एका महिलेनं पुरुष मित्रासमवेत हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानं तिला व तिच्या मित्राला शिविगाळ झाली. हे प्रकरण पाहता असं वाटतं की मुस्लिम राष्ट्रातील महिलांचा लढा अजून संपलेला नाहीये.
अशी अनेक राष्ट्रे आहेत जिथं एकटीनं महिला हॉटेलात जाऊ शकत नाही. हे अधिकार मिळवून देण्यासाठी जगव्यापी मोहीमची गरज आहे. स्वातंत्र्य व स्वैराचार असा मुद्दा पुढे करून महिलांना धर्मग्रंथ व तिथल्या राज्यघटनेनं दिलेला अधिकार हिरावून घेता येत नाही, हा विचारही तेवढाच प्रबळ आहे..
* महिलांसाठी खुली झालेली क्षेत्र
* सेनेत विविध पदावर महिलांची भरती
* बाईक, कार आणि ट्रक ड्रायव्हिगचे क्षेत्र खुले
* सिनेमाघर, स्पोर्टस ग्राऊंडमध्ये खेळ बघण्यास परवानगी
* महिला खेळास प्रोत्साहन मिळवून देण्यास विविध योजना सुरू
* प्रशासकीय क्षेत्रात फेरबदल करून महिलांना उच्च पदावर संधी
* पराराष्ट्र मंत्रालयामार्फत महिलांना उच्चायुक्त म्हणून नियुक्ती
* महिला इमाम
* खाजगी सेवा क्षेत्र महिलांसाठी खुले
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com