पनवेलला ३ ते ५ नोव्हेंबर रोजी ११वे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याची सांगता रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं.
राज्यातील व
पनवेलमधील अनेक साहित्यप्रेमींनी यात उत्स्फुर्त हजेरी लावली होती. परंपरेप्रमाणे
काही मागण्या व ठराव या संमेलनात मांडण्यात आले. सरकारने संमेलनाला निधी व मुस्लिम
मराठी सांस्कृतिक मंडळासाठी जागा द्यावी, तर दुसरी मागणी
राज्यातील विद्यापीठात मुस्लिम मराठी साहित्याचं अध्यासन केंद्र सुरू करावीत. या
दोन मागण्या प्रमुख होत्या. या व्यतिरिक्त अनेक ठराव संमेलनात मांडण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मराठी मुस्लिम
साहित्याचा आढावा घेतला. यासह समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधलं.
दहशतवाद, सामाजिक
सुरक्षा व आयसिस यावर सबनीस यांनी चिंता व्यक्त केली. तर संमेलनाध्यक्ष बीबी
फातेमा बालेखाँ मुजावर यांनी मुख्य प्रवाहात होत असलेली मुस्लिम मराठी
साहित्यिकांची फरफट आधोरेखित केली.
मराठी मुस्लिम
साहित्य साहित्य परिषदेनं मान्य करण्यास अनेक वर्षाचा कालावधी लावला याबद्दल यांनी
खंत व्यक्त केली. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा उद्घाटनाचं भाषण
प्रकाशित करुन वितरीत करण्यात आलं.
उद्घाटन कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते.
मराठी मुस्लिम लेखकांना एकत्र जोडण्याचा आमचा हेतू आहे. या संमेलनाच्या माध्यमातून राज्यभरातील मराठी लिहिणारे मराठी लेखक एका छताखाली येतात. याच उद्देशानं गेल्या २७ वर्षापासून मंडळ कार्यरत आहे. यंदाच्या संमेलनाने अनेक नवलेखक व तरुण मंडळी आमच्याशी जोडली गेली. कुटुंब वाढतंय येत्या काही दिवसात दर्जेदार व कसदार लिखाण मंडळाकडून येईल.
डॉ. इकबाल मिन्ने
अध्यक्ष, मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ
वाचा : प्रतिकांचे साहित्यकारण किती दिवस?
वाचा : तरुणाईच्या अभिव्यक्तीचं संमेलन
इतिहासाचं विकृतीकरण, संत-साहित्यात
मुस्लिम संताचे स्थान याची उजळणी परिसंवादात करण्यात आली. भारतात मुस्लिम प्रादेशिक
असून त्यांनी इथलं स्थानिक परंपरा व संस्कृतीचा स्वीकार केला. लाखो मुस्लिमांनी
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग घेतला होता. १८५७ सालच्या उठावात
एकट्या दिल्लीत २५ हजारपेक्षा जास्त मुस्लिमांना फासावर चढवण्यात आलं होतं, आज सत्ताधारी
पक्ष मुस्लिमांना परके ठरवतोय, यापेक्षा वेदनायी गोष्टी दुसरी कुठली
नाहीये,
अशी
खंत जावेद पाशा कुरेशी यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यांसाठी
प्राणाची आहुती दिलेल्या समुहाकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र मागणं लोकशाही
राष्ट्राचं दुख आहे असा सूर एकूण परिसंवादात उमटला.
‘मुस्लिम समाजाबाबत समज व गैरसमज’ हा दुसरा महत्त्वाचा परिसंवाद या संमेलनात झाला. यात माजी आय.जी. एसएफ मुश्रीफ, ‘दी वीक’चे प्रिन्सिपल कॉरसपाँडेंट निरंजन टकले, इतिहास संशोधक सरफराज अहमद, डॉ. सय्यद रफीक, धनराज वंजारी, मेहबूब काझी इत्यादींनी मुस्लिमांच्या दानवीकरणारच्या सादरीकणावर भाष्य केलं.
सरकारने मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी निधी द्यावा, निधीशिवाय साहित्य चळवळ अपूर्ण आहे. मंडळाला आर्थिक पाठबळ मिळाल्याने दर्जेदार लेखन समाजात येईल, मुस्लिम मराठी लेखकांकडे इस्लामचा होणारा अपप्रचार व कट्टरतावाद रोखण्याचे आव्हान आहे, मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी पुढाकार घेऊन लेखन लिहून प्रकाशित करावं.
डॉ. श्रीपाल सबनीस
उद्धघाटक
‘मुहंमद अली
जिना यांनी द्वि-राष्ट्राचा सिद्धान्त सावरकरांकडून घेतला होता, त्यामुळे
फाळणीचे ते पहिले गुन्हेगार आहेत’ अशी भूमिका निरंजन टकले यांनी मांडली, गौमांस
बंदीवरील त्यांच्या एका स्पेशल स्टोरीचा उल्लेख ते म्हणाले की “बीफ बॅनच्या
आड बजरंग दल खंडणीचा व्यवसाय करत आहे, यांचे व्हिडिओ पुरावे
माझ्याकडे आहेत.”
वाचा : 'राईट टू लव्ह' प्रेमाला नकार का?
वाचा : विद्यार्थी निवडणूका : नव्या नेतृत्वाची गरज
एका कार्यकर्त्याचा
उल्लेख करत ते म्हणाले की “माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये एक
गोरक्षक म्हणतोय की ‘डर फैलाने में इतना समय लगा, अब बिझनेस का
टाईम हैं.”
मुस्लिम
विरोधात सुरू असलेल्या षडयंत्राबाबत टकलेंनी अनेक खुलासे केले.
इतिहासाचे अभ्यासक
सरफराज अहमद यांनी टिपू सुलतानच्या सुरू असलेल्या कथित राक्षसीकरणावर भाष्य केलं.
तब्बल सात वर्ष त्यांनी टिपूवर केलेल्या संशोधनाचा उहापोह आपल्या व्याख्यानात
केला. टिपू सुलतानच्या नैतिकतेचे पुरावे देत ते कसे ब्राह्मण्यावाद्यांच्या
डोळ्यांना खुपत आहे, याबद्दल त्यांनी विचार मांडले.
माजी पोलीस अधिकारी
वंजारी यांनी भारतात आयबी म्हणजे गुप्तचर यंत्रणा सत्ता चालवत असल्याचा धक्कादायक
खुलासा केला. तर सय्यद रफीक यांनी दहशहवादाच्या आरोपाच्या षडयंत्रावर भाष्य केलं.
भारतीय मुस्लिम हा शांतीप्रिय असून तो दहशतवादी कारवाया करू शकत नाही हे निर्दोष
सुटत असलेल्या तरुणांवरुन सिद्ध होतं, असं मत मांडलं.
सर्व बॉम्बब्लास्ट
प्रकरणाचा तपास नव्यानं करावा व खऱ्या आरोपींना शोधावं अशी मागणी डॉ. रफीक सय्यद
यांनी केली. तर अध्यक्षीय समारोप करताना एसएम मुश्रीफ म्हणाले की दलित व बहुजन
शिक्षित होण्याने ब्राह्मण्यवाद्यांचे धाबे दणाणले होते, त्यामुळे
त्यांना मुस्लिमांच्या पाठीमागे लावले. ज्यावेळपासून
स्फोटाच्या तपासात ब्राह्मण्यवादी संघटनांचा हस्तक्षेप आढळला त्यावेळपासून
ब्लास्टच्या घटना कमी झाल्या” असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
दुसऱ्या दिवशी शनिवारी
मुस्लिम महिलांनी आपल्या भावविश्व व साहित्यातील अवकाशावर भाष्य केलं. मस्जिदमध्ये
नमाजला न जाता येणं ही आम्हाला सूट असल्याचं मत नागपूरच्या जुल्फी शेख यांनी
मांडलं. घरातली मुलं बाळं, स्वंयपाक-पानी सोडून दर तासा-दोन
तासाला मस्जिदमध्ये नमाजला जाणे महिलांना प्रॅक्टिकली शक्य नाही, पण पुरुषांना
व्यावसायाच्या ठिकाणी ते शक्य असतं असंही मत जुल्फी शेख यांनी मांडलं.
वाचा : लव्ह जिहाद : हिंदुत्ववाद्यांची नसती उठाठेव !
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
तलाक, मस्जिद व
दर्गा प्रवेश यापेक्षाही मुस्लिम महिलांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत, याकडे
सामाजिक संघटना कधी लक्ष देणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला, विद्युत
भागवत यांनी महिला सुरक्षेवर सरकारला घेरलं. तर ऐनुल अतार यांनी मुस्लिम
महिलांच्या बदलल्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. हसिना मुल्ला यांनी ग्रामीण भागातील
महिलांची फरफट मांडली. मुस्लिम महिलांचं संघर्ष करणारे चित्रण साहित्यात येत
नसल्याची खंत त्यांनी मांडली. एकूण परिसंवादात हिंदू-मुस्लिम प्रश्नात स्त्रियांची
होणारी होरपळ साहित्य क्षेत्राने दुर्लक्षित केल्याची खंत मांडण्यात आली.
शनिवारचा दुसरा
परिसंवादात मुस्लिमेत्तर लेखकांच्या नजरेतून मुस्लिम साहित्य वा विषयावर चर्चा
झाली. यात हिंदू आणि मुस्लिमातली गंगा-जमनी संस्कृती साहित्यात प्रकर्षाने मांडावी
असा ठराव मान्यवरांनी मांडला.
पांडुरंग कंद व फारुख
तांबोळी यांनी मुस्लिम विषयातील साहित्यिक संशोधनात येत असलेल्या अडचणींवर भाष्य
केलं. संशोधनासाठी मराठी मुस्लिम साहित्याचे संग्रहण करावी अशी मागणी या दोघांनी
केली. अनिलकुमार साळवे यांनी सिनेमातील सिम्बॉलिक मुस्लिम चित्रणावर भाष्य केलं. मुस्लिम
साहित्य संशोधक मेळावा व २५ वर्षातील मराठी मुस्लिम साहित्याचा लेखा-जोखा हे दोन
प्रमुख परिसंवाद शनिवार चा मुख्य आकर्षण ठरली.
डॉ. बशारत अहमद यांनी
२५ वर्षातील मुस्लिम मराठी साहित्याची होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त
केलं. १९९० पासून मराठी मुस्लिम संघटनेच्या स्थापनेपासून आज मुस्लिम मराठी साहित्याची
काय स्थिती आहे यावर संमेलनाच्या सर्व अध्यक्षांनी विवेचन केलं.
वाचा : पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा
फ.म. शाहजिंदे यांनी मूळ
‘मुस्लिम मराठी
साहित्य परिषदेच्या’ कार्यपद्धतीवर भाष्य करत चळवळींमुळे
मुख्यप्रवाही साहित्यात काय बदले झाले, यावर सविस्तर विवेचन केलं. शिवाय आधीच्या
संघटकांनी हाड-वैर विसरून साहित्य चळवळीसाठी पुन्हा संघटित व्हावं, अशा सूचना
केल्या.
त्यांनी साहित्यिकांच्या लेखन प्रसारासाठी त्रैमासिक पत्रिकेची गरज व्यक्त केली, तर जावेद पाशा कुरेशी यांनी मुस्लिम प्रश्नांवर दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर द्यावा असा प्रस्ताव मांडला. डॉ. इकबाल मिन्ने यांनी मुस्लिम मराठी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचं आव्हान केलं.
संमेलनाध्यक्ष पदाचा मान मला दिल्याने माझी जबाबदारी आता वाढली आहे. येत्या काळात मुस्लिम मराठी लेखकांना बळ देण्यासाठी विभागवार शाखा सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून सोशल मीडिया वापरणाऱ्या लेखकांना आम्ही जोडणार आहोत. भविष्यात नवलेखकाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला मंडळ आर्थिक सहकार्य करेल.
बीबी फातेमा बालेखाँ मुजावर
संमेलनाध्यक्ष
शनिवार एकांकिका व
नवेदित कवि संमेलनामुळेही चांगलाच गाजला. मुख्य परिसंवादानंतर दोन कवी संमेलनं
झाली. पहिल्या कवि संमेलनात महिला कविंनी दर्जेदार कविता सादर केल्या. महिला
प्रश्न,
कुटुंब, नातेसंबध, सामाजिक
मान्यता,
आदर
अशा विविध आशयांना घेऊन कविता सादर झाल्या. यात फरजाना डांगे, जुल्फी शेख, मोहसिना शेख, शमा बरडे, समीना शेख सायराबानू
चौगुले इत्यादी कवियत्रींनी आपल्या रचना सादर केल्या. यानंतर इकबाल मिन्ने लिखित व
आरेफ अन्सारी दिग्दर्शित एकरात्र वादळी या एकांकीकेचं अभिजित भातलवंडे व विदुला
बाविस्कर यांनी सादरीकण केलं.
मिलाजुला मुशायऱ्यात
मोठ्या संख्येनं कविंचा सहभाग होता. प्रेम, त्याग पासून
सामाजिक वेदना व सुरक्षेसंदर्भात अनेक कविंनी आपल्या रचना सादर केल्या. कलीम खान, एके शेख, मुबारक शेख, मसूद पटेल, खलील मोमीन, बशारत अहमद, बदीउज्मा
बिराजदार,
सय्यद
आसीफ,
आबीद
शेख,
राज
पठाण,
कैलास
गायकवाड,
आबिद
मुन्शी,
छाया
गोवारी यांच्यासह सुमारे ३० कवींनी संमेलनात रचना सादर केल्या.
रविवारी पहिल्या
सत्रात नवेदीत कवींचा मुशायरा झाला. यात शफी बोल्डेकर, सुनिती साठे, मोहसिन सय्यद, समाधान
दहिवाल,
परवेज
शेख,
जावेद
अली यांच्यासह सुमारे २० पेक्षा जास्त कविंनी सहभाग घेतला. यानंतर सोशल मीडिया व
आजचा तरुण यात जमात ए इस्लामीचे प्रवक्ते नौशाद उस्मान, डॉ. शाहिद
शेख,
इनाडूचे
खालिद मुल्ला,
शशी
सोनवणे व साजिद पठाण यांनी सोशल मीडियातील लेखन शैली, ट्रोलिंग व
बिझनेस मॉडलवर चर्चामंथन केलं.
मध्येच बेगुनाह कैदी
पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतील २००६ पश्चिम रेल्वे ब्लास्टमधील
निर्दोष आरोपींच्या शिक्षेत सूट मिळावी यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन चालवण्याचं
आवाहन केलं.
मुस्लिम मराठी
साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंडळाची आगामी भूमिका ठरवण्यात आली.
यात त्रैमासिक पत्रिका व वेबसाईट सुरु करणे, मंडळाच्या
विभागीय शाखा सुरू करणे, निधी व जागेसाठी प्रयत्न करणे आदी
विषयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. संमेलनाच्या समारोप
कार्यक्रमाआधी कोंकणी मुस्लिमांच्या साहित्य व सांस्कृतिक योगदानावर मंथन झाले.
शिवाय आधीची मुस्लिम मराठी साहित्य परिषद व आताच्या संघटनेचा मिलाफ कसा घडवायचा यावरही मंथन झाले. चर्चेदरम्यान दोन गट पडले. एकाचे म्हणणे होते, की आधीच्या संघटकांनमा सामिल का करून घेतले जात नाही. मुबारक शेख यांनी आयोजकावर हल्लाबोल करत त्याला चांगलेच खडसावले. पहिले संमेलनाध्यक्ष फ. म. शहाजिंदे यांनी वेळ मारून नेचत पॅचअप करण्याचा प्रयत्न केला. यावर आम्ही साहित्य परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्याकडून बाजू ऐकली.
संमेलन आहे असं विलासकडून (सोनवणे) कळलं पण त्याचं निमंत्रण मात्र मिळालं नाही. आमच्या साहित्य परिषदेचा आणि या संमलेनाचा काहीएक संबंध नाही. ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी आमच्या साहित्य संमलेनाचा व चळवळीचा आधार घेत आपली संघटना मोठी केली. मूळ संघटना बरखास्त आहे, अशावेळी मागील संमेलनाचे श्रेय का घ्यावे. साहित्यविषयक घडामोडी घडत असते तर हे घेणं बरोबर होतं. पण त्याचा व्यवसाय होत असेल तर त्याला आमचा आक्षेप असेल.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, पुणे
संस्थापक, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद
प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित समारापोचा भव्य सोहळा पार पडला. समारोपात एकूण १६ ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषेचं विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरला व्हावे, मुस्लिम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळासाठी विभागीय साहित्य मंडळाप्रमाणे अनुदान मिळावे, जेलमधील दलित आदिवासी व मुस्लिम विचाराधीन कैदींची सुटका करावी इत्यादी विषय मांडण्यात आले. या संमेलनाला राज्यभरातून अनेक मराठी मुस्लिम व मुस्लीमेत्तर लेखकांनी सहभाग नोंदवला होता.
वार्तांकन - कलीम अजीम
Twitter@kalimajeem
(सदरील वृत्तांकन अक्षरनामावर प्रसिद्ध झालेले आहे.)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com