भारतात सर्वात मोठ्या विद्यार्थी
अंदोलनाचे यश उस्मानिया विद्यापीठात साजरं होत आहे. हे विद्यार्थी चळवळीचं सर्वात
मोठं यश म्हणता येईल. २० व्या शतकात भारतात मोठी
अंदोलनं झाली. त्यात जे. पी.चं अंदोलन सर्वात मोठे ठरले. नंतरच्या काळात
बांग्लाभाषिक अंदोलन, पँथर चळवळ, नामांतर चळवळ, मंडल आयोगाचं अंदोलन, नुकतीच दिल्ली येथे झालेली बलात्कारविरोधी अंदोलनं आणि समस्त जगाचं लक्ष
वेधून घेणारी इजिप्त क्रांती. या सर्व चळवळीचे केंद्रबिंदू विद्यार्थीवर्गच होता.
सार्या क्रांत्या विद्यार्थी चळवळीशिवाय पूर्णच होऊ शकल्या नसत्या.या
चळवळीतून मोठे नेतृत्वगुण उदयास आले.
महाराष्ट्रात
गेली सुमारे २० वर्षे बंद असलेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा घेण्याचा राज्य
सरकारचा विचार आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी विधिमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनात नुकतीच ही माहिती दिली. निवडणुका हिंसाचारा विना आणि सुरळीत पार
पडाव्यात यासाठी धोरण निश्चित करताना सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेण्यात येईल, असे आश्वासनही मंत्र्यांनी
दिले आहे. हा निर्णय खुप स्वागताहार्य आहे.
कॉलेज
निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी देशभर निरनिराळ्या न्यायालयांमध्ये याचिका
दाखल केल्या गेल्या. त्यावर सरकारने मुख्य निवडणूक
आयुक्त जे.एम. लिंगडोह यांच्या अध्यक्षतेखाली २००५ मध्ये सहा सदस्यांची समिती
नेमली. या समितीने २००६ साली अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर
अभ्यासासाठी सरकारने समितीच्या अहवालानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर
यांची समिती नेमून या विषयावर पुन्हा अहवाल तयार करविला.
सध्या देशात राजकीय पटलावर असलेले गणमान्य व्यक्ती
विद्यार्थी चळवळीचेच फ़लीत आहे.महाविद्यालय पातळीवर नेतृत्वगुण सिध्द करण्यास विद्यार्थी निवडणुका
फ़ार प्रभावी ठरतात. सध्या भारतीय राजकारणात घराणेशाहीचे वारे जोरात वाहत आहेत. राजकारणातील
प्रस्थ मंडळी आपली धुरा पुत्र व आप्त स्वकीयाकडे सोपवत असताना जनतेला
भावनीक आव्हानदेखील करण्यास विसरत नाही. इच्छा नसतानाही अशा उमेदवारास निवडून
द्यावे लागत आहे. अशावेळी नव्या नेतृत्वाची मोठी गरज निर्माण झाली आहे. शैक्षाणिक
क्षेत्रात निर्णय,धोरणं, जाचक अटी, फ़ीवाढ, स्कालरशीप यात विद्यार्थी चळवळीचे योगदान महत्वाचे ठरते. विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडवणे, सभा संमेलने, आयोजीत करणे यात नेतृत्वगुणाची गरज असते.
राजकारणात नवे नेतृत्व उदयास येण्यास कुठेतरी खंड पडला
होता. सुमारे
२० वर्षांपूर्वी १९९३ मध्ये मुंबईतील जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ
महाविद्यालयातील निवडणुक रिंगणातील एका विद्यार्थ्याचे दुसर्या महाविद्यालयातील प्रतिस्पर्धी
विद्यार्थ्याने गुंडांच्या मदतीने अपहरण करुन त्याची हत्या केली, याशिवाय अनेक ठिकाणी हिंसाचार, परस्परांना धमकावणे, अपहरण अशा अनेक घटनांची
पार्श्वभूमी पाहता राज्य सरकारने या निवडणुकाच बंद केल्याहोत्या.आता या निर्णयानंतर मोठ्या
प्रमाणात नेतृत्व निर्माण होण्यास मदत होईल.
सध्या
विवीध राजकीय भाषिक पक्षांच्या नेतृत्वामुळॆ आज बराच गोंधळ झालेला दिसतो. त्यामुळॆ विद्यार्थी अंदोलन आणि विद्यार्थी राजकारण याबद्दल जवळपास
सर्वांचाच नकारात्मक दृष्टिकोन दिसतो. पण त्यावर कारणमिमांसा कोणीच करत नाही.
विद्यार्थी अंदोलनातून तयार होणारं नेतृत्व समाजाचेच
प्रतिबिंब असते. त्यामुळं जात आर्थिक प्रबलता इथंही वरचढ ठरतात. परिणामी
विद्यार्थी राजकारणापासून लांब जात आहेत. राजकारणाशी
आम्हाला काही देणं-घेणं नाही, असा
आजचा विद्यार्थी सर्रास म्हणतो. पालिटीक्स फ़ार घाण आहे, यात पडायचे नाही, अशी भाषा वापरली जाते. आपल्याकडे राजकारणाच्या समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरले आहे. जनताकेंद्रित
मुलभूत विकासापेक्षा नेते आणि राजकिय पक्षकेद्रित राजकारण ऎवढच राजकारणाबद्दल
आपल्याकडे माहित आहे. त्यामुळे अधिक गोधंळ आहे. इतिहासाच्या या वळणावर तरुणांनी
राजकिय शक्तीचे महत्व ऒळखले नाही तर भविष्य गंभीर असेल.जर तरुण राजकारणात येणार नाही तर देश चालावायचं कोणी? का बाहेरुन लोकं आयात करायची?
यासाठी
विद्यार्थी निवडणुका फ़ार महत्वाच्या आहेत. यातून देशास चांगले नेतृत्व मिळेन.
उच्चशिक्षीत वर्ग राजकारणाचा भाग बनल्यास काही प्रमाणात बोकाळलेला भ्रष्ट्राचार
कमी होण्यास मदत होईल. असं काहीच नाही ज्यात राजकारण नाही. अन्न, पाणी, वस्त्र, शिक्षण, आरोग्य आपल्या दैंनादीन जीवनातील प्रत्येक गोष्ट राजकारणावरच अवलंबून आहे.
मग राजकारणाशी कशाला पळ काढायचं.
जागतिकीकरणाच्या
वीस वर्षात जवळपास सर्वच शिक्षणाचं खाजगीकरण झालं आहे. त्यामुळे वैद्यकीय
क्षेत्रासारख्या उच्चभ्रू मानल्या जाणार्याशिक्षण शाखेतील विद्यार्थी रस्त्यावर उतरुन अंदोलन
करत आहेत. (बी.ए.एम.एस., एम.बी.बी.एस.च्या शुल्कवाढीमुळे मुंबईच्या आझाद मैदानावर मेडिकलचे विद्यार्थी “आयसा”च्या विद्यार्थ्यासोबत अंदोलन करत आहेत)
जागतिकीकरणाच्या या झंझावातामुळॆ निराशेचा काळोख पसरला आहे. आणि त्यास विद्यार्थी
अंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि संपूर्ण जगात घडणार्या राजकीय घडामोडीमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यामुळे झालेला विजयाने विद्यार्थी राजकारणाचे
शिक्कामोर्तब केले आहे.
कलिम अजीम, पुणे
मेल-kalimazim2@gmail.com
(1 ऑक्टोबर 2013 रोजी दै. सकाळच्या सप्तरंगमध्ये प्रकाशित झालेे टिपण)
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com