तरुणाईच्या अभिव्यक्तीचं संमेलन

नरेंद्र दाभोलकर प्रवेशद्वारातून आत शिरताच  एस. एम. जोशी सभागृहाच्या प्रीमाईसमधे यंगस्टर्सची ग्रुप्स ग्रुप्स दिसत आहेत. कोणी राजकुमार तांगडे गप्पा मारत आहेत तर कोणी रामदास फुटाणेकडून वात्रटिका समजून घेतोय, कोणी हरी नरकेकडून मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल जाणून घेताहेत. अशी अनेक तरुणांची ग्रुप्स इथं दिसत आहेत. 
खास तरुणांसाठी असलेल्या या युवक मेळाव्यात अंबाजोगाई, बीड, अहमदनगर, जामखेड, परभणी, मुंबई, नागपूर आणि नाशिकहून बरीच मंडळी इथं आली आहे. इथं जमलेली मंडळी पुस्तकं आणि कवितासंग्रहाच्या पलिकडे जाऊन मुक्तचिंतन करत आहेत. तरुणाईमधे नवा प्रोग्रेसिव्ह विचार आणि विचारप्रवाहातील समज-गैरसमज दूर व्हावेत तसेच तरुण लेखकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुण्यात टेकरेल अ‍ॅकेडमीतर्फे दोन दिवसीय अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 
युवा साहित्य संमेलन भरवण्याचा पहिला बहूमान पुण्याला मिळाला आहे. याच पुण्यात पहिले न्यायमूर्ती रानडेच्या मदतीने ग्रंथकार संमेलन भरवण्यात आले होते. आज त्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते.
वाचा : नॉनवर्बल’ कम्यूनिकेशन घडवताना.. 
वाचा : लोकसहभागातून माध्यमक्रांती
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच अन्य साहित्य संमेलनांमध्ये कॉलेज स्टुडंट आणि नवलेखकाला प्रतिनिधित्व मिळत नाही. वास्तविक, अनेक विद्यार्थ्यांना साहित्यलेखन तसेच वाचनाची प्रचंड आवड असते. अनेकवेळा यांची प्रतिभा कॉलेज किंवा यूनिव्हर्सिटीय नियतकालिकांपर्यंत त्यांची प्रतिभा मर्यादीत राहते. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन युवा साहित्य संमेलन भरवण्याचा विचार केला. यामाध्यमातून नवलेखकाला संधी आणि विविध विचारधारांना एकत्र आणून त्यांच्यातील असलेल्या मतभेदावर चर्चा घडवून आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून 17 व 18 मार्च रोजी दोन दिवसीय अखिल भरतीय युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित केले गेले. 
संमेलनाला तरुण गटाकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. सचिन परब अध्यक्ष असलेल्या या संमेलनात प्रामुख्याने तरुणांची प्रश्ने हाताळण्यावर भर देण्यात आला. परिसंवाद, काव्यसंमेलन, गझल, अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल संमेलनात होती. जमातवाद, समज-गैरसमज, माध्यम साक्षरता, संस्कृती इत्यादि विषयावर मुक्त चिंतन करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने जड विषयावर परिसंवाद न घडवता साध्या आणि दैंनादिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर भर देणारे चर्चासत्र आणि परिसंवाद घडवली गेली. तरुणाईत प्रोग्रेसिव्ह विचार मांडणारे हे साहित्य संमेलन ठरले.


आज प्रत्येक जाति आणि गटांचे वेगळे साहित्य संमेलन भरवले जाते. त्यात तरुणाईच्या प्रश्नांना सोयिस्कररित्या बगल दिली जाते. नेमाडे म्हंटल्याप्रमाणे रिकाम टेकडी ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन ज्येष्ठांसाठीच आणि निवृत साहित्यिकांसाठी संमलने भरवतात. त्यात जड आदर्शवादी, तत्वज्ञानी विषयावर पारंपारिक पद्धतीने परिसंवाद घेतली जातात. टेक्नॉलाजी, पश्चिमी संस्कृती, गॅझेट्स, बदलती जीवनशैली, कॉलेज, करिअर, जीवघेणी स्पर्धा, पौगंड अवस्था, वायलन्स, सांस्कृतिक वर्चस्ववाद, तरुण मुला-मुलींच्या समस्या आदि विषयांना या बड्या साहित्य संमेलनात काहीच स्थान नसते. 
त्यामुळे तरुणांसाठी तरुणांची भाषा बोलणारे संमेलन असावे असा विचार आला. पुण्यातील टेकरेल या स्पर्धापरिक्षांचे मार्गदर्शन करणार्‍या संस्थेतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाची रुपरेषा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात केली गेली. प्रामुख्याने वक्ते तरुण असावं असे प्रमाण पाळण्यात आले. तरुण साहित्यिक आणि कवींना या संमेलनात सहभागी करुन घेण्यात आलं. ज्यात सचिन परब पासून अवधुत डोंगरे, रवी कोरडे,  राहुल कोसम्बी, राजकुमार तांगडे, आशिष खेतान, इम्तियाज जलील पासून ते  फेसबुकवर गाजणारे वैभव छाया, कुणाल गायकवाड, अक्षय इंडिकर, आश्विनी सातव-डोके, बालाजी गाढे, हनुमंत पवार यांना सहभागी करुन घेण्याचा विचार आला.


आजच्या टेक्नोसॅव्ही युगात प्रत्येकाकडे स्मार्ट फोन्स आले आहेत. त्यामुळे तरुणांना एक स्वतंत्र भाषा सापडली आहे. अशावेळी म्हटलं गेली की वाचन संस्कृती लोप पावणार परंतु असे नाही. सोशल मीडिया आणि  इंटरनेटनं  वाचनाच्या कक्षा वाढवल्या आहेत. व्हॉटस अप आणि फेसबुकच्या माध्यमातून आज प्रत्येकजण किमान शंभर शब्द का होईना तो वाचतोय. इतरांनादेखील वाचनासाठी मजकूर उपलब्ध करुन (त्याची गुणवत्ता आणि विश्वासहार्यता नंतर तपासू) व्हॉटस अप वर आलेल्या बुलेटची तथ्यता तपासण्यासाठी, नेटकर्स त्या संबधी केवळ दुय्यम संदर्भावर न विश्वास ठेवता मुळ संदर्भ  शोधताना दिसत आहे. 
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
वाचा : उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे
धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, सामाजिक मुल्ये, महिलांचा सन्मान अशा इत्यादी विषयाची चर्चा सोशल मीडियावर नित्यनियमाने चालू असते. कुठेतरी वाचलेला कोट, त्याचे फोटो कॉपी पाठवून आपले संदर्भकसे दणकट आहेत याची उजळणी केली जाते. केवळ चर्चेत मागे पडू नये यासाठी तरुणाई वाचत आहे. मार्क्स, आंबेडकर, असगर अली, सावरकर, गोळवलकर, महात्मा गांधी, नेहरु, आझाद, रावसाहेब आदी इत्यादी विचारवंताची कोट वापरण्याची स्पर्धा सोशल मीडियावर सुरु असते. हे वाचन संस्कृती वाढल्याचे उदाहरण आहे. 
नेहमी तरुणांवर टिका होते की, आजची पिढी वाचत नाही. परंतु या संमेलनात येणारा प्रत्येक तरुण गट नवीन साहित्यासंदर्भावर चर्चा करत होता. शिवाजी, मार्क्स, फुले, स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट, लॉग आऊट खरेदी करत होता. त्यावर चर्चा करत होता. शिवाजी कोण होता? हे पानसरेंच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर अत्यंत गाजलेले पुस्तक ठरले. या पुस्तकाची पीडीएफ कॉपी लाखो जणांनी वाचून फॉरवर्ड केली. या संमेलनात देखील सर्वाधिक विक्री करणारे हे पुस्तक ठरले.  


तरुणांच्या हातात सोशल मीडिया सारखं पॅरलल माध्यम आल्याने सिटीजन जर्नालिस्टची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्या परिसरातील व भागातील माहिती देणार्‍यांची संख्या वाढत आहे. आपले नाव व विचार लाखो लोकापर्यंत सहज पोहचवली जात आहेत. सोशल मीडियामुळे तरुणांना आपली भाषा सापडली आहे. त्यामुळेच ती पिढी बोलत आहे व्यक्त होत आहे. 
अभिव्यक्तीची माध्यमे वाढत आहेत त्याच प्रमाणे विचार करण्याच्या कक्षा देखील विस्तारत आहेत. त्यामुलेच आज तरुण कसदार लेखकांची फळी तयार होत आहे. आपली शक्ती आणि शक्यतांचा उपयोग करुन नवं सृजन निर्माण करणारी पिढी वाढत आहे. फेसबुक पोस्ट्वरील आशयाची पुस्तकात निर्मीती होत आहे. नुकतेच एनडीटीव्हीचे रवीश कुमार यांचे इश्क मे शहर होना नावाचे पुस्तक आले आहे. वैभव छाया यांचे डिलीट केलेलं सारं आकाश फेसबुक श्रृंखलाचेच उदाहरण आहे.


जगाचा अर्थ लावणे तरुणांचे काम नाही तर जग बदलणे हे आमचे काम आहे. त्यासाठी विविध विचारधारांनी एकत्रित बसून चचा करणे महत्वाचे आहे. भूतकाळाच्या चुका निदर्शनास आणून किती वेळ आम्ही भांडत बसणार आहोत. त्या-त्या गोष्टींचे संदर्भ देत आम्ही वर्तमानातही चुका करत आहोत. वर्तमानातील चुका दुरुस्त करण्यासाठी इतिहासातील चुका बदलाव्या लागतील. त्यासाठी नवा इतिहास आपणास मांडावा लागेल तसेच इतिहासातील चुका मान्य करुन माफी मागायला शिकावं लागेल. 
याच समजातून हे संमेलन भरवण्यात आले होते. जसा प्रादेशिक विकासाचा असमतोल असतो तसाच सांस्कृतिक विकासाचा असमतोल असतो. तो सांस्कृतिक अनुषेश भरुन काढणे आणि साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात नवीन नेते तयार झाले पाहिजे व त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक पिढीच्या तरुणाईवर एक साहित्यिक जबाबदारी असते ती जबाबदारी आपण वेळीच समजून घ्यायला हवी. त्यानं जगण्याचा दर्जा उंचावेल ही जाणीवच या युवकसाहित्य संमेलनाची मुळ प्रेरणा होती. हा उद्देश या संमेलनाच्या माध्यमातून साध्य  झाला. असे म्हणायला काही हरकत नाही.

कलीम अजीम, पुणे


वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: तरुणाईच्या अभिव्यक्तीचं संमेलन
तरुणाईच्या अभिव्यक्तीचं संमेलन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjORPtr5_gwHmCt-wVh-3DSHg8V9knkn-2xozJ9fI8Y_bsPltljIYgpe0NHAHEPB5Lc2HYMlVzaSxmxOstsHKTj45-Da7kViW3YZnvcjhXKZDfEpk7hAALR-b2cOhLPTyYNuFhrrDBgqxF9/s1600/Akhil+Bhartiy+marathi+yuva+smmelan1.JPG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjORPtr5_gwHmCt-wVh-3DSHg8V9knkn-2xozJ9fI8Y_bsPltljIYgpe0NHAHEPB5Lc2HYMlVzaSxmxOstsHKTj45-Da7kViW3YZnvcjhXKZDfEpk7hAALR-b2cOhLPTyYNuFhrrDBgqxF9/s72-c/Akhil+Bhartiy+marathi+yuva+smmelan1.JPG
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_22.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_22.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content