'राईट टू लव्ह' प्रेमाला नकार का?

वेळ मॉर्निंग इलेव्हन, पुण्यातील गुडलक चौकात दोन तरुण गुलाबी रंगाचा राईट टू लव्हनावाचा मजकूराचा बॅनर घेऊन उभे आहेत. प्रत्येक बाईकस्वार जरासा पॉज् घेऊन या तरुणांना न्याहाळत मजकूरावर नजर फिरवतोय, काहीजण स्मार्ट म्हणवणार्‍या फोन्समधून छबी टिपताहेत, तर काही हूँम्हणून निघून जाताहेत. सुमारे दहा मिनिटं हीच फ्रेम, अकराव्या मिनिटाला एकजण शेम...लिहलेला ब्लॅक बलून्स घेऊन दोघात सामील, बघ्याच्या नजरा आता जरा जास्तच खिळत आहेत. 
पुढच्या काही मिनिटात कॉलेज यंगस्टर्सचे जथ्थे चौकाच्या दिशेने येत चालू लागतात. काहींच्या हातात स्लोगनच्या पाट्या तर काहींच्या हाती गुलाबी-लाल रंगाचे लव्ह मॅसेजस् लिहलेले बलून्स. बघता-बघता जाम गर्दी जमलीय. पंधराव्या मिनिटाला चौक घोषणांनी दुमदुमलाय, जोरदार घोषणांनी चौकात चलबिचल सुरु झालीय..
आम्हाला हवाय राइट टू लव्ह..’ ‘प्रेम आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचं...’ ‘आम्ही चालत आहोत, जगत आहोत,  मरत आहोत फक्त प्रेमासाठी...’ ‘माझा देह.. माझा अधिकार’  सुमारे दिड-एकशे यंगस्टर्स शिस्तीत एका दोन-दोनच्या क्यूमध्ये उभे झालेत. सपोर्ट टू लव्ह, राईट टू लव्ह..’ ‘माझा देह, माझा हक्क..’ ‘वुई वॉन राईट टू लव्ह..’ ‘त्याने प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, तुमच्या बापाचं काय गेलं..अशा आशयाचे बॅनर्स घेऊन तरुणीच्या एक जथ्था चोकात येऊन सामील झाला. सुमारे पंधरा मिनिटात चौकातला ट्रॅफीकचा आवाज नाहीसा करण्यात तरुणाई यशस्वी ठरलीय. घणघणाती घोषणा देत जथ्थ्याचे राईट टू लव्हरॅलीत रुपांतर झाले, आता ही रॅली फर्ग्युसनच्या दिशेने चालू लागली.  
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
15 जानेवारीला राज्यातील प्रत्येक न्यूज चॅनलवर एका तरुणीला संस्कृतीरक्षणाच्या नावाने कावाकरणार्‍या तरुणांच्या घोळक्याने बेदम मारहाण केल्याचं वृत्त प्रसारित झालं. सबंध महाराष्ट्राने सदर घटना टिव्हीच्या छोट्या पडद्यावर पाहून मोठ्या मनाने हॉलमध्ये बसूनच चहा-बिस्कीटासोबत निषेध नोंदवला. 
लातूर जिल्ह्यातील अकोली गावात दिड महिन्यापूर्वी घडलेली ही घटना, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनीच व्हायरल केलेलं व्हिडीओ पाहून अनेक मते-मतांतरे बाहेर पडत आहेत. तर यात असाही एक गट आहे जो या घटनेनं व्यथीत झालाय. या घटनेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेणार्‍या काही तरुणांनी एकत्र येऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवला. मानवी हृदयाला पिळ घालणारी ही घटना होती. 
राईट टू लव्हचे संयोजक अभिजीत कांबळे याबद्दल म्हणतात नुसतं हळहळ व्यक्त करुन चालणार नाही, तर या अमानूष घटनेचा जाहीर विरोध झाला पाहिजे, असं आम्हाला वाटलं, म्हणून राईट टू लव्हया बॅनरखाली शहरातील तरुण एकत्र आलोत, यातून निषेध सभा घ्यायचे ठरले. ही निषेध रॅली गुडलक चौकातूनच झाली पाहिजे असे आम्ही ठरवलं.’ 
पुण्यातील गुडलक चौक म्हणजे चळवळी आणि आदोलनाचं तहरीर स्क्वेअर’. याच चौकातून खैरलांजीच्या घटनेला पहिला विरोध झाला होता. आता इथूनचराईट टू लव्हच्या रॅलीची सुरवात. या निषेध रॅलीचे वृत्तांकन राज्यातील जवळपास सर्व न्यूज चॅनलने 22-23 जानेवारीला चालवले. तदनंतर या घटनेचं निषेध नोंदवणारे पुढे येऊ लागले. 
25 जानेवारीला नागपूरात या घटनेचा विरोध दर्शवणारे आंदोलन झाले. (हे आंदोलन होताच पुण्यातील राईट टू लव्हच्या संयोजकाला निनावी धमकीचे फोन्स सुरु झाले) नागपूरच्या आंदोलनापाठोपाठ महाराष्ट्रात सभा, चर्चासत्रे, निवेदनाला सुरवात झाली. मागील शुक्रवारी (30 जाने) पुण्यात याच विषयावर ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी तरुणांची चर्चा घडवून आणली. 
लातूरच्या घटनेच्या निमीत्ताने समाजात प्रेमाच्या अधिकाराची जाणीव व जनजागृती व्हावी, असे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही. पेशावर, हेब्दो, ओबामा भेटीवर चर्चा करणारा फेसबुक समुदाय त्यावेळी मात्र गप्प होता. आपल्या प्रदेशातील घटना विसरुन फेसबूकी गँग हेब्दोच्या फ्रिडम ऑफ स्पीचबद्दल भरभरुन बोलत होती. ओबामाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारा सोशल कट्टात्यावेळी भकास वाटत होता. या विषयाची मुक्त चर्चा अपेक्षित होती. पण ती झाली नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आजच्या तरुणांचा स्वत:चेच प्रश्न कळत नाही. किती दयनीय अवस्था आहे ही नव्या पिढीची. 
सदर विकृत मानसिकतेचा राज्यभरात चर्चा व्हावी याच उद्देशाने पुण्यातील रॅली होती. मराठवाड्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रभर अशा घटना नेहमीच घडत असतात, आजही औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात अशा जोडप्यांवर पाळत ठेवली जाते. शहरातील सुप्रसिद्ध बिबी का मकबरापरिसरात मैत्रिणीसोबत येणार्‍या तरुणांना त्रास दिला जातो. म्हैसमाळ, अजिंठा परिसरात येणार्‍या जोडप्यांना गुंडाचा त्रास सहन करावा लागतो.  
लुटालूट, मारहाण, दमदाटी करणे असे प्रकार सर्रास सुरु असतात. काहीबाबतीत ही विकृतता टोकाला जाते. अशा प्रकारच्या अनेक  बातम्या वृत्तपत्राचे रकाने सजवून गेलीत. परंतु यावर कसल्याच प्रकारची साधी चर्चासुद्धा झाली नाही. पोलिस गुंडाना रोखत नसून अशाच प्रकारचा त्रास देतात, अशा अनेक तक्रारी पर्यटन स्थळी पर्यटकाच्या आहेत. 
भारतातील अदीम मानवी संस्कृतीत प्रेमाची अनेक उदाहरणे मिळतात. तरीही भारतीय समाजात प्रेमाला विरोध व्हावे हे नवल आहे. प्रेमासंदर्भात वेस्टर्न कंट्रीज्मध्ये भारतातील खजुराहो, वात्सायानाची अनेक संदर्भ दिली जातात. परंतु त्याच भारतात मोठ्या प्रमाणात प्रेमाला विरोध होत असल्याचा इतिहास आहे. तसं हा विरोध फक्त इतरांच्या प्रेमाला असतो. आपलं म्हणजे प्रेम आणि इतरांचं म्हणजे वासनाच? याच दृष्टीकोनातून पाहण्याची सवय झाली जणू आपल्या मानसिकतेला. का न्यूनगंडातून आलेली प्रतिक्रिया म्हणावं याला. 
काही संस्कृतीरक्षक आपला राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी वॅलेंटाईनला विरोध करतात. जोडप्यांना त्रास देतात. पद्धतीला विरोध असेल पण प्रेमविचाराला विरोध हे कितपत योग्य आहे. प्रेम ही नॅचरल फिलींगआहे. परंतु समाजात आजही विरोधी विचाराची संकुचित विचारप्रणाली रुजत आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या गप्पा सुरु असताना आपण बुरसटलेल्या कल्पना घेऊन वावरत आहोत. यालाच म्हणायची का ऐज्युकेटेड सोसायटीहा प्रश्न सहज पडतो. 
लव्ह मॅरेजकेलेली कपल्सदेखील प्रेमाला विरोध करण्यात अग्रेसर आहेत. खाप व जात पंचायती घातकी निर्णये तरुणांवर थोपवतात. या पुढारलेल्या समाजात प्रेमाला विरोध व्हावा या गोष्टीचे आश्चर्य वाटते. दोन तरुण मने एकत्र फिरत वा बसले असल्यास त्यांना हे कोणत्या अधिकारातून विरोध करताय. उघड्यावर समागम तर करत नाही ना, भलं-बुरं कळतंय अजून या पिढीला. प्रेमाला घरचे स्विकारत नाहीत आणि समाज करु देत नाही. दोहोकडून गोची होतेय तरुणाईची. एकीकडे पालक आणि दुसरीकडे समाजाच्या वाईट नजरा, कोणा-कोणास स्पष्टीकरण देत फिरायचे. 
जातीव्यवस्थेची दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय लग्न व्हावीत असे बाबासाहेबांचं म्हणणं होतं, त्याचाच एक भाग म्हणून या इंटरकास्ट मॅरेजकडे पाहावे लागेल. अशी आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न व्हावे यासाठी शासनाकडून पुरस्कार व विविध योजना राबविल्या जातात. परंतु अशा तथाकथित संस्कृतीरक्षकांनी जो हाहाकार माजवला आहे. तरूणांवर बंधने लावणारे हे कोण
आमच्या प्रेमाला नकार देणारे हे कोण? प्रेमी युगलांना त्रास देण्याचा अधिकार यांना कोणी दिला? अशा प्रकारची दमदाटी करणे चूकीचं व बेकायदा आहे. या सर्वांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. संस्कृती आम्हाला मारहाणीची शिकवण देत नाही. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. त्यात चुकीचे काही नाही. 
वाचा : उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे
वाचा : पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा
पुण्यातल्या या राईट टू लव्हरॅलीत विकृत मनोवृत्तीला तरुणांनी खडे बोल सुनावले. दोन प्रेम करणार्‍याला त्रास देणे हीच का आपली भारतीय संस्कृती. संस्कृतीच्या नावाने कावा करणार्‍या त्याभक्षकांनी आमच्या किती आया बहिणीचे विटंबना केली असेल. तरुणांना प्रेमाबाबत व्यक्त व्ह्यायचं असल्यास कुठे व्यक्त व्हावं, पुणे-मुंबईसारख्या शहरात ठीक आहे, परंतु निमशहरी व ग्रामीण भागातील तरुणांनी काय करावं. अशा कपल्सना अडवून मुलीची छेड काढणे, विनयभंग, लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडत असतात हा प्रकार निंदनिय आहे. हीच का आमची संस्कृतीलातूरची घटना निंदनीय असून हा तरुणाईमध्ये दहशतशाहीचा प्रताप आहे. 
तथाकथित संस्कृतीरक्षकांना वचक बसावा आम्ही बाहेर पडताना भाऊ किंवा मित्र देखील आमच्या सोबत असू शकतो. आम्ही का प्रत्येकांनी आय कार्ड सोबत घेऊन फिरायचे! आणि हे कोण आम्हाला जाब विचारणारे, संस्कृतीच्या नावाखाली प्रेमी युगुलांना त्रास देणाऱ्या लोकांवर प्रशासनाने सक्त कारवाई करण्याची गरज आहे असा सूर रॅलीतून मोठ्या प्रमाणात येत होता. 
समाजाच्या सर्वच घटकांमध्ये प्रेमाच्या अधिकाराविषयी जनजागृती व्हावी. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली निंदनीय प्रकार होऊ नयेत, अशा प्रकाराकडे पोलिस व गृहमंत्रालयाचे लक्ष वळविण्यासाठी ही प्रतिकात्मक विरोध रॅलीकाढण्यात आली होती. ही बाब मेनस्ट्रीम मीडियाने उचलून धरल्यामुळे याची चर्चा झाली. या आंदोलनानंतर महाराष्ट्राभर आंदोलने होत आहेत. 
वाचा : नवं वर्षे, जुनी आव्हानं
सदर व्हिडीओ पाहिल्यास बर्‍याच गोष्टी संवेदनशील मनात प्रश्न उपस्थित करुन जातात. जसे त्या व्हिडीओत स्पष्ट स्वरुपात फक्त मार खाणार्‍या तरुणीचा चेहरा दिसतोय. मारहाण करणारे पुसटशा स्वरुपात एकदाच दिसतात. मारेकरी शोधायचे होते तर संपूर्ण व्हिडीओ का प्रसारित केला, असा प्रश्न सहज पडून जातो. सदर इसमाचे स्नैप शॉटने आरोपी शोधण्याचे काम झाले असते. तसंही मारेकर्‍याचा चेहरा फक्त एकदाच दिसतो. म्हणजे हा त्या तरुणीला बदनाम करण्याचा कट देखील म्हणता येऊ शकतो. 
त्या मुलीला वारंवार तू अमक्या जातीचीच ना, असं विचारण्यात येत होतं. मुलाला कोणी काहीच बोलत नव्हते किंवा मारत नव्हते. याचा अर्थ काय असावा. कदाचित मुलगी अमक्या जातीची असली असती तर.. तर काय? अजून एक नितीन आगे घडला असता? प्रथमदर्शनी वाटते तितकी सोपं नाहीय हे प्रकरण, यात बरेच शेड्स आहेत. तसंच व्हिडीओत मोबाईल हातात घेतलेला इसम म्हणतो, ‘थांब व्हॉट्स अपवरच टाकतो!म्हणजे किती व्हिडीओ तयार केले होती? किंवा त्यात असं काय शूट केलं होतं? सदर मारेकरी (पुढारी कपड्यात वावरणारे) स्थानिक पोलिसांनी बारकाईने पाहिले असते तर, हा शोध त्यांचाच परिसरातच संपला असता. 
दिड महिन्यानंतर बदनामी करण्यासाठी का व्हायरल केला तो व्हिडीओ. असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. चित्रफित वार्‍यासारखी महाराष्ट्रभर फॉरवर्ड होत होती. पाहणारा प्रत्येकजण पुढे पाठवत होता. त्या मुलीची आपण नाहक बदनामी असं का वाटलं नाही कोणाला. अशाच प्रकारची अनेक व्हिडीओ शेअरींग त्या स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून चालू असतात. 
हा टेक्नॉलॉजीचा गैरवापर नव्हे का? हे प्रकरण मीडियात गेले म्हणून अटक झाली. तुम्हाला अटक व्हावी म्हणून तक्रार करण्याची वाट पाहता आहात का तुम्ही? असे किती व्हिडीओ जीव घेण्यास कारणीभूत ठरलेत याचा अंदाज आहे का, या टेक्नोसॅव्ही पिढीला. टेक्नॉलॉजीच्या वापराच्या सोयी जेवढ्या आहेत तेवढेच त्याचे धोके देखील आहेत हे आपणास कधी कळणार. का इतक्या बोथट झाल्या आपल्या संवेदना. 

कलीम अजीम, पुणे 
लिंक-http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=1417

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: 'राईट टू लव्ह' प्रेमाला नकार का?
'राईट टू लव्ह' प्रेमाला नकार का?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrPtzXpih4tFhDqtOlfMVKVPPplQ9CmjXeV3ajwmyYOMOfwkksjChIwYsNhkr3OYrtdCTHcEASOExiPONFty8UU_m8DwEc-_e84AphWxaSzYOU_qB4rkqDcHk2Fn1Dmg2wy2oVONSCtIiR/s640/10887325_863531927023211_6000511975531318875_o.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrPtzXpih4tFhDqtOlfMVKVPPplQ9CmjXeV3ajwmyYOMOfwkksjChIwYsNhkr3OYrtdCTHcEASOExiPONFty8UU_m8DwEc-_e84AphWxaSzYOU_qB4rkqDcHk2Fn1Dmg2wy2oVONSCtIiR/s72-c/10887325_863531927023211_6000511975531318875_o.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/02/blog-post_6.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/02/blog-post_6.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content