पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा

आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचे भविष्य असतोतो येणार्‍या भारताचे प्रतिनिधीत्व करत असतोपण हा तरुण  विद्यार्थीदशेत असताना किती प्रतिकूल परिस्थीतीत जगत असतो हे फ़क्त त्यालाच माहीत असते,  संघर्ष हा विद्यार्थ्याचा जीवनाचा एक अविभाज्य भाग असतोअपवादात्मक काहींना अनुकूल परिस्थीती असतेतर बरेचजण प्रतिकूल परिस्थितीतून भारताचे भविष्य घडवण्यासाठी धडपडत असतात. या विद्यार्थी दशेचा आढावा घेणार्‍या पुण्यातील काही घटना...
मेसचा डबा
पुण्यात मेसचा डबा खाणे म्हणजे अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखं असतं. कॅटीन असो वा मेस दोन्हीचा दर्जा सुमारचचार कागदी चपात्या, 100 ग्रॅम उकडलेला भात, 250 ml पिवळ्या रंगाचं पाणीयास आम्ही वरण म्हणतोआणि प्रत्येक मेसवाल्याचं एकच ठरलेला मेनू बटाटे/पत्ताफुलकोबी/सोयाबीनवटाणे/काबुली हरभरे यांची आलटून-पालटून 200ml ची भाजीहाच मेनू डेलीचापोटाची आग शमविण्यासाठी काहीतरी आत ढकलावं म्हणून ज्ञानेद्रिये बंद करुन गिळावं लागतंशरीरशास्त्रानुसार हवे असलेल्या कॅलरीज यातून मिळते का हा भलामोठा प्रश्न???
35-40 रुपये घेऊन असे डबेथाळी दिल्या जातातआजच्या स्पर्धेच्या युगात अभ्यास करताना दररोज डिप्रेशन खाली विद्यार्थी वावरत असतातत्यात त्यांना मिळणारे अन्नही सुमार दर्जाचेपरिणामी स्मरणशक्ती व एकाग्रतेला धोका उद्भवतोयामुळे अभ्यासात मागे पडण्याचे प्रमाण वाढत आहेविद्यापीठ व महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांना दोन वेळचं चांगलं व पौष्टिक अन्न देऊ शकत नाही का??? फक्त भरमसाठ फी आकारणे यांच्या अखत्यारीत येते का?? सामाजीक जबाबदारी नावाचा शब्द यांच्या शब्दकोशात आहे का?? एवढ्या हालअपेष्टा सहन करूनही आज या गळाकापू स्पर्धेत विद्यार्थीवर्ग टिकून आहेहाच वर्ग भविष्यकाळात अहंकारी व भ्रष्टाचारी अधिकारी बनतोयाला जबाबदार कोण??? व्यवस्थाच ना?????
चिल्लरवाले खंडणीखोर
पुण्यात PMT चा प्रवास असो की AUTO चा यात एक गोष्ट कॉमन आहेती म्हणजे सुट्या पैशाचीPMT त सदर भाडे अनुक्रमे 7,8,9, असले तरी रु. 10 मधील बाकीचे पैसे परत येणार नाहीत हे ठरलेलंकिंवा 11, 12, 13, 18, असेल तर खिशातून सरळ 20, 50, 100 ची नोट निघणे साहजिकच आहेमोठी नोट बघताच कंडक्टर रागावतोवैतागतोउरलेल्या बाकी पैशाची मागणी केल्यास सरऴ चिल्लर नाहीचा सुरआता चिल्लर बाऴगण्याचे काम कोणाचे??? अशा प्रकारे बसच्या एका अप-डाऊन फेरीत किमान 100 रुसहज बनतातदहा फेरीचे हजार रुपयेमग कशाला हे लोकं ठेवणार!
चिल्लरसाठी प्रवाशांना ही नेहमीची कटकट व भुर्दडहाच प्रकार AUTO वाल्यांचाऐनवेऴी चिल्लर नसल्याचे सांगून वेठीस धरतातचिल्लरसाठी पळवायला लावतातआम्ही बचत करायची आणि यांचे खिसे भरायचीएकीकडे शिक्षणव्यवस्था आणि दुसरीकडे हे बस-अटोवाले दोघांचे रक्त पिणे सुरुच. 
दयनिय पीएमपीएल
पुण्यात वाहतुक सेवा उपलब्ध करुन देणारी P.M.P.L. ही सर्वात मोठी सेवा आहेआजही पुण्यात सुमारे चाळीस टक्के प्रवास हा P.M.P.L. नेच केला जातोफ़ेर्‍या वाढविल्या की अजून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढण्याची शक्यता आहे.  पण P.M.P.L. प्रशासनाला बहुदा वाढलेले प्रवासी नको आहेत.  त्यामुळॆ पुण्यातील विद्यार्थीनोकरदारबापे प्रवासी   P.M.P.L. ची वाट पाहत AUTO चा  सेकंडरी पर्याय शोधावा लागतो
कसाबसा AUTO  वाला तयार झाला कीदुप्पट भाडे आकारुन रात्रीअपरात्री प्रवाशांना वेठीस धरणार हे नक्की. मन मारुन इच्छा नसतानाही निमूटपणे मागीतले तेवढे भाडे द्यावेच लागतेतर काही वेळेस जवळचे भाडे चक्क  नाकारण्याचा पवित्रा हे AUTO वाले घेतातअशावेळी वृध्दवयस्कमहिला-मुलींना खुप त्रास सहन करावा लागतोअशावेळी काय करावे कळत नाही मन व्यवस्थेला हजार शिव्या घालू लागतो,  तरी प्रश्न सुटत नाहीएका क्षणात येते भाडे नाकारण्यार्‍या त्या AUTO  वाल्यास गच्चीला धरुन जबर मारावे तेवढ्यात आपल्यातला सदग्रहस्थ जागा करुन निमूट दुसर्‍या AUTO वाल्याची विणवणी करण्यास भाग पाडतो.
कधीकधी जास्तीच्या रकमेसाठी देखील भाडे नाकारले जाते अडला हरीगाढवाचे पाय धरी’ अशी गत काही वेळा होते.  पण पर्याय नसतो सगळ्यांनी बहुदा आमची पिळवणूक करण्याची शपथ घेतली असावीमागे सहा महिण्यापूर्वी अशा भाडे नाकारणार्‍या AUTO वाल्या विरुध्द पोलिसांनी कारवाई केली असली तरी यांचे त्यांचे काहीच बिघडले नाही.
तक्रार करुनही उपयोग नाहीदखलच घेतली जात नाहीपण दुचाकीस्वारांना अडवून लायसन्स ची मागणी करुन पैसे उकळून कारवाई मात्र वेळेवर केली जाते. 
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
वाचा : उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे
रहिवास नव्हे कारावास
पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ऒळखलं जातंइथं मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाच्या शिक्षणसंस्था आहेत.  भारताच्या कानाकोपर्‍यातून इथं विद्यार्थी शिक्षणासाठी येतातशिक्षणसंस्था प्रत्येकांना वसतीगृह पुरवेलच असे नसतेपरिणामी बाहेर खाजगी रुम घ्यावी लागते.
पुण्यात खाजगी खोल्या परवडण्यासारखे नसतातपरंतु इलाज नसतोभाड्यासाठी चार-पाच हजार सहज द्यावे लागतातवरुन पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्राची मागणीऒळखपत्रफ़ोटोकरारपत्रचौकशीहजार भानगडी आहेतचऎवढे पुरवूनही, “पुणेरी” वृत्तीचं दर्शन वारंवार घरमालक देत असतात.
दररोज हजार सुचना चालूच असतातमित्रांना रुममध्ये येण्यास मज्जाव केला जातोचोरी-छुपे कोणास आत घेतलं तर खडसावणंभलं-बुरं बोलणं सुरुअसते. यातही आमचे समाधान असते. परंतु मालकांनी मुलभूत सुविधा तरी पुरवाव्यात ना?  पैसे देऊनही एडजस्ट करावे लागतेयासंबधी तक्रार केली तर रुम रिकामं करण्याची विनंतीवजा धमकी” दिली जाते.... या नसत्या कटकटीपासून कोणी संरक्षण देणारं आहे का आम्हाला?????? अशा परिस्थितीत आम्ही उद्याचा भारत कसा घडवणार...??????
रक्तदात्याला पेन ड्राईव्ह
आज पुण्यात एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस साजरा होत आहेत्यानिमित्ताने डेक्कन परिसरातील संभाजी उद्यानात "रक्तसंकलनसुरु आहेयात महत्वाचे म्हणजे तरुण वर्गाला आकर्षीत करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली आहे.  आतापर्यंत मी ऐकीवात होतो की रक्तदानानंतर रक्तदात्याला ग्लासभर दुध आणि बिस्कीट पुडा देण्याची प्रचलीत पद्धत अस्तित्वात  होतीपण आजच्या या "संकलनाच्याकार्यक्रमाने वरील पारंपारिक पद्धत मोडीत काढत चक्क रक्तदात्याला आठ G.B. चे पेन ड्राईव्ह देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहेअसे असूनदेखील रक्तदात्यांनी या शिबीरास पाठ फिरवली.  कल्पना चांगली होती पण तरीही फ़ेल गेली.
पार्कींगचा ताप
पुण्यात अनेक रस्त्यावर पार्किंग झोन आहेतपण वाहनांची संख्या लक्षात घेता हे झोन तोकडे पडतातशहरात दुचाकी एवढीच चारचाकीची संख्या झपाट्याने वाढत असताना मनपा प्रशासनाने पाहिजे तेवढी पार्कींगची व्यवस्था केली नाहीपरिणामी अनेक समस्यांचा सामना करावा लागतोट्यूशनच्या विद्यार्थ्यांचे व बाजारहाट करणार्‍यांचे पार्कींग झोन फुल असल्यामुळे फार हाल होतातस्थळांपासून लांब गाड्या पार्क कराव्या लागतातपरिणामी अशा गाड्या  ट्रफिकवाले जप्त करतात व  नसलेली भुर्दड  व मानसिक त्रास सहन करावा  लागतो.
वाचा : महानगरे तरुणांसाठी झाली असुरक्षिततेचा कंपू 
पिवळे पोहे अन् कोमट पाणी
पुण्यात चहा व नाष्ट्याच्या कितीतरी टपरीवजा दुकाने आहेतबर्‍याच टपर्‍या अशा आहेतजिथं साधी बसायची सुध्दा सोय नाहीउभा-उभाच इथं चहा-पानाचा कार्यक्रम उरकावा लागतोकाही ठिकाणी इतकं अस्वच्छतेचं वातावरण असते कीत्या परिसरात साधी नजर जरी फिरवली तर किळस येईल.  रस्त्याच्या फुटपाथवरबंद दुकानाच्या समोरनाल्यावर,  निमूळत्या गल्लीत अशा टपर्‍या आढळतातअगदी घाईघाईने इथं चहा व झुरक्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतोचहा व नाष्ट्याचं भांडं जरी बघतलं तर आयुष्यात कधी इथं चहा-नाष्टा घ्यायची इच्छा होणार नाहीनिवांत बसून चहा घ्यायचा म्हटल्यावर एखादं महागडं हॉटेल शोधावं लागतेभिंतीवरच्या सूचना बघूनच आर्धा उत्साह संपतोवरुन भलंमोठं बीलजागेसोबत खिसाही रिकामं करण्यास भाग पाडतो.
अंधार्‍यातील मार्गदर्शिका
पुण्यात एका कोंदट अंधार्‍या खोलीत स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे बरेच आहेतअभ्यासिका लावताना विद्यार्थ्यांचा हेतू फक्त एवढाच कीअभ्यास करण्यासाठी पुस्तके व मार्गदर्शन मिळावेमार्गदर्शन तर सोडाच पण,  या खासगी अभ्यासिकेत हवे तेवढे ग्रंथही वेळेवर मिळत नाहीतया १० ते ५० आसनी अभ्यासिका १०,००० ते ७०,००० हजार रु.  उकळतातफीसच्या बदल्यात या क्लासेस चांगली बैठक व्यवस्थाही पुरवू शकत नाहीतअशा कोंदट क्लासेसची संख्या दिवसेंदिवस पुण्यात वाढत आहे.
पुण्यात सकाळी आठ वाजल्यापासून P.M.T. बसेसना तुडूंब गर्दी असते.
नोकरदारकामगारप्रवासी अन् मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असा लवाजमा
घेऊन मोळकडीस आलेल्या बस धावत असतातयामध्ये अक्षरशपाय ठेवायलाही जागा नसतेतशीच अवस्था थांब्याचीहीऊन-पाऊस तर हमखास अंगावरअशावेळी काही सेकंदासाठी बस स्टॉपवर थांबलीच तरआहे त्या स्थितीत दारात थांबलेल्या मुलांच्या घोळक्यातून बसमध्ये चढावेच लागतेनसता दुसरी बस वेळेवर येईलच याची शाश्वती नसतेकसेबसे चढल्यावर "कंन्फर्ट उभेराहता येईल अशी सोय करावी लागतेमुलींची तर यात दैनाच होतेअवांच्छीत स्पर्शातून होईल तसा बचाव करत (कधीकधी हे शक्यही नसते)  कॉलेजस्थळी पोहचावे लागतेदररोज अशाच प्रकारची मानसीक कुचंबणा सहन करत प्रवास करावा लागतो.  मुलांना तर दारात उभे राहून प्रवास रोजचाच.
पैसा आहे पण जेवायला नाही
पुण्यात पैसे असूनही उपाशी राहावे लागतेकारण विद्यार्थ्यांचे केंद्रबिंदू असलेल्या डेक्कन भागात दुपारी जेवणासाठी कोणत्याही हॉटेलात जा वेटींग असणारटपरीवर जा अन्न संपलेले असेलअशात सपक पोहे किंवा मॅगी शिवाय पर्याय नाहीजेवण "शामभरोसे"........

कलीम अजीम, पुणे 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा
पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiztuF9nZr1KMvp2oEigeUdmy3OfZvHqe_lFW7uP-dJFPoLaXQYVBOS9D57UQMLu0Sq3AxOf1L6V9wvfM4uAGi_jXqdqHHRAimm4JHQxVNu-nhDUknf3CeeQz47eWapzWS6F3VzUyMopS8/s640/univpune3.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiztuF9nZr1KMvp2oEigeUdmy3OfZvHqe_lFW7uP-dJFPoLaXQYVBOS9D57UQMLu0Sq3AxOf1L6V9wvfM4uAGi_jXqdqHHRAimm4JHQxVNu-nhDUknf3CeeQz47eWapzWS6F3VzUyMopS8/s72-c/univpune3.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2013/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2013/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content