उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे

गणपती मंडळं पाहायची तर पुण्याची आणि ढोल‌‌-ताशा ऐकायचा तर तोही पुण्याचाच, असा एक प्रचारी मतप्रवाह गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आढळतो. याला धार्मिक संस्कृती जतनाचं भंपक नाव असलं तरी यामागं मोठं अर्थकारण दडलेलं आहे, हे कळायला अनेक शतकं ओलांडावी लागली. लहानपणी आम्ही ऐकायचो की पुण्यातले व हैदराबादमधील मोहर्रमच्या मिरवणुकांदेखील देखण्या असतात. पश्चिम महाराष्ट्र व या परिसरातील मुसलमानांपर्यंत ते मार्केटिंग येऊन पोहोचलं होतं. तसंच ते आमच्यापर्यंतही पोहोचलं होतं. हैदराबाद निजाम संस्थानाचा महत्त्वाचा भाग; एका अर्थाने हे शहर आम्हा मराठवाडावासीयांसाठी खरेदी व पर्टयनाचे डेस्टिनेशन.
पुण्यातल्या गणपतींबद्दल शाळेत असताना खूप ऐकलं होतं. ‘माऊथ पब्लिसिटीमुळे ते समंध महाराष्ट्रावर बिंबवलं गेलं. धर्मकारणात भक्तिभाव असला तरी यामागं फार मोठं इकोनॉमिक्स’ दडलेलं असतं. असं नसतं तर धार्मिक स्थळांचा प्रचार झाला नसता. गणेशोत्सवाबद्दल बोलायचं झाल्यास मुंबई आणि पुण्यातल्या गणेश मंडळात नेहमीच श्रेष्ठत्वासाठी कॉम्पिटिशन लागलेलं असतं. मग ते देखावे असो की, भव्यदिव्य मूर्त्या. अलीकडच्या काळात तर न्यूज चॅनलवर कुठलं मंडळ जास्तीत-जास्त ‘लाइव्ह’ असतं, त्यावर त्याला दानवीर भक्त मिळत असतात. त्यामुळे आपलं मंडळ प्राईम टाईमला दिसलं पाहिजे असा अट्टाहास प्रत्येक कार्यकर्त्यांचा असतो. यातून मराठी मीडियात गणपती पॅकेजिंगचा जन्म झाला.

पुण्यातील प्रसिद्ध मंडळाच्या पानं भरून बातम्या वृत्तपत्रातून येतात. बाप्पाला थंडीत स्वेटर घातला, आंबे वाहिली, दागिणे चढविली, लेप लावला अशा बातम्या लोकरंजनासाठी नसून त्या मार्केटिंगसाठी असतात. नवसाचा गणपती, मानाचा गणपती हे त्यातलेच फंडे. नवनवीन मार्केटीग व पब्लिसिटी क्लुप्त्या आजमावून मंडळे ‘इकोनॉमिकली स्ट्राँग’  होत असतात. अनेकदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत कुठलं मंडळ पुढं निघून गेलं यावर वाद होत असतात. अनेकदा भांडाभाडीदेखील होते.
पुणे शहरात ३,५०० ‘रजिस्ट्रर्ड गणपती मंडळे आहेत. तर नोंदणीशिवायही अनेक सार्वजनिक मंडळं पुण्यात मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टीव्ह आहेत. नुसत्या पिंपरी चिंचवड भागात एक हजार मंडळं आहेत, त्यात फक्त ६०० रजिस्ट्रर्ड आहेत. ढोल-ताशा पथकाची संख्यादेखील लक्षणीय आहे. ही पथके बाप्पाच्या आगामनापूर्वीच दोन-तीन महिने आधीच श्रीगणेशाच्या स्वागताची तयारीचा सराव करतात. अलीकडच्या काळात ढोल-ताशा पथकांना ग्लॅमर आलं आहे. स्पॉन्सरशीपमधून बक्कळ कमाई केली जाते. दरवर्षी स्पॉन्सरशीपच्या वादातून नवी पथकं स्थापित होतात. ध्वनी प्रदूषणाचे नियम फाट्यावर मारल्याने दरवर्षी पथकांवर कारवाई ठरलेली असते.
अलीकडे या पथकात कॉर्पोरेट कल्चर फोफावलं आहे, त्यामुळे पथकाची लोकप्रियता वाढली आहे. विरंगुळा म्हणूनही ढोल-ताशा ‘कल्चर पुण्यात चांगलच रुजलं आहे. काही वर्षापूर्वी पुण्यात बोटावर मोजण्याइतकी ‘बँड होती. आज एकट्या पुण्यात सुमारे 150 ढोल-ताशा बँड व वाजविणार्‍यांत 17 ते 18 हजार तरुण-तरुणी आहेत. मराठमोळा पेहरावशिस्तीचा सुरेख संगम असलेले ही ढोल-ताशा पथकं विशिष्ट्य तालनाद व ब्रह्म यांसाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. पुणेकरांसाठी ही पथकं स्टेटस सिंबल’ बनत चालली आहेत. धार्मिक उत्सवे निवडणुकीत व्होट देणारी मशीन्स झाल्यानं त्यांना ‘ग्लॅमरचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळंढोस-ताशा पथकं, रास दांडिया, गरबा, दहीहंडी पथकांना अचानक महत्त्व प्राप्त झालं आहे. प्रसिद्ध नट-नट्यांचे डांस, रोषणाईआतिषबाजीसाऊंड सिस्टीमखर्चिक देखावेडॉल्बी या सर्व प्रकारामुळे पथकं, मंडळं आधुनिकतेचा मुलामा चढवत खर्चिक बनली आहेत.
धार्मिक उत्सवाला पोस्टरबाजीकटआऊटशुभेच्छा संदेशांची प्रायोजकत्व प्राप्त झाल्यामुळे उत्सव समित्यात चंगळवाद फोफावला आहे. अलीकडे ईद ए मिलाद, मुहर्रमलाही मोठा निधी मिळतोय. इज्तेमाच्या नावानंही मोठा बैतुलमाल (लोकनिधी) लाटला जातो. मस्जिद निर्माणच्या नावने काहीजण पावत्या छापून पैसा लुटत फिरतात. दर्गांच्या उरूसात तर अमाप पैसा जमतो. या आर्थिक गुंतवणूकीला श्रद्धेचं स्वरूप दिल्यानं त्यासाठी लोकं वेळेप्रसंगी आपले खिसे रिकामे करतात.
अनेकवेळा या कामासाठी लोकवर्गणीतून पैसा जमा केला जातो. पण वर्गणीच्या तुटपूंज्या रकमेत तामझाम शक्य होत नाही. अशावेळी धाक दाखवून, धमक्या देऊन जास्तीची रक्कम उकळली जाते. व्यवसायिक प्रतिष्ठाणे, कार्यालयेपथारीवालेऑफिसेसनिवासी संकुलातून सक्तीची वर्ग़णी वसूल केली जात आहे. पुण्यातील निवासी अपार्टमेंटमध्ये प्रत्येकी फ्लॅट किमान ५०० रुपये वर्गणी वसूल करण्याची योजना आमलात आणली जाते. ज्यांनी देण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ केली अशावेळी कार्यकर्ते घरमालकाला धमकी देतात. सोसायटीच्या परवानगीशिवाय भाडेकरु कसे ठेवले असं सांगून फ्लॅट रिकामा करायला भाग पाडतात. अशा धमक्यांना मीदेखील अनेकदा बळी पडलो आहे.
२०१३ साली एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलच्या यंगिस्तान कार्यक्रमात धार्मिक उत्सवाचे ग्लॅमरायझेशनया विषयावर तरुणांची चर्चा आयोजीत केली होती. त्यात मी निमंत्रितांपैकी होतो. या कार्यक्रमात अनेक बडी मंडळी होती. सिनेअभिनेत्री अमिता नाईक, आनंदराज आंबेडकरअंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मुंबईतील दहीहंडीचे पथकाचे पदधिकारीलालबाग संस्थेचे विश्वस्त; तसेच महाविद्यालयीन प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री अमिता नाईक यांनी लालबाग दर्शनासंबधीचा अनुभव कॅमेऱ्यासमोर सांगितला. 
लालबागच्या गणपतीसाठी दोन दिवस रांग लावूनदेखील दर्शन न मिळाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी व्हीआयपी कोट्यातील मोठ्या चित्रपट कलाकारांना तात्काळ दर्शन दिल्याचे दाखले त्यांनी दिले. देवाचं दर्शन सामान्यांना सहज का दिले जात नाही हा अन्याय नाही का?’ असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. यात सहभागी झालेल्या काही मुलींनी बघ्यासोबत पथकातील मुलांदेखील आमची छेड काढली असल्याची धक्कादायक कबुली दिली होती.
नोंदणी न झालेल्या गणपती मंडळानं वर्गणीसाठी जबरदस्ती केली तर त्यांच्यावर खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. त्याची रितसर तक्रारदाखल करावी असा इशारा पुण्याचे पोलीस सहआयुक्तांनी गणेश मंडळासह झालेल्या बैठकीत दिला होता. वर्गणीच्या नावाने खंडणी मागताना आढळून आल्यास संबधीतावर कायदेशीर कारवाईचा इशारादेखील त्यांनी देण्यात आला होता. 
तरीदेखील अशा खंडणीखोर व अनरजिस्ट्रर्ड गणपती मंडळाच्या विरोधात कोणी तक्रार करण्यास धजावलं नाही. कारण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला जावं लागलं असतं. त्यांनी कॉलनीत, सोसायटीत राहणं मुश्कील केलं असतं. त्यामुळे सर्वजण मूग गिळून गप्प होतात. भीतीमुळे कोणीच कंम्पेलन देण्यासाठी पुढे येत नाही.
महाराष्ट्राची विशेष ओळख असलेल्या गणेशोत्सवाला आज असांस्कृतिक वातावरणाने ग्रासलं आहे. एकत्रिकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेले हे उत्सव समाजात द्वेश व तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. मंदिर वही बनायेगें सारखी प्रक्षोभक गाणी वाजवून समाजमनात विष पेरण्याचं काम धार्मिक उत्सवाच्या वतीनं सुरू असतं. 
केवळ एका गाण्यामुळे मिरज दंगल घडली होती. धार्मिक उत्सव समाजाला एकत्र आणतात, ना की त्यात दूफळी निर्माण करतात. धार्मिक सणांतून विद्वेश का पसरत जातोय, याची कारणे तपासायची गरज आहे. साऊंडच्या भींतीवर भींती चढवून उत्सव समितींना काय साध्य करायचे असते, या प्रश्नांचा गुंता अजूनही सुटलेला नाहीये.
पुण्यात ऐकेकाळी मुहर्रमलाही मोठं मान होतं, ऐतिहासिक संदर्भकोशात टिळकांनी गणेशोत्सवाची प्रेरणा मुहर्रममधून घेतल्याचे पुरावे आढळतात. म्हणजे असंही म्हणता येऊ शकतं की आज गणेशोत्सव मंडळाला आलेलं विकृतीकरणाचं स्वरूप मुहर्रम मिरवणुकीतून आलं असावं. पण हेदेखील खरं आहे की, देखादेखी आणि आधुनिकतेच्या कचाट्यातून आज मुस्लिमांचे सण-उत्सवदेखील सुटू शकलेले नाहीये. त्यांनी गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये पाच साऊंड सिस्टीमची भींत लावली होती, भीम जयंतीला सात लागले होते. मग आपण दहाची लावू आणि उडवून देऊ बार.. अशा प्रकारचा चंगळवादी शानशौकीपणा मुसलमानातही वाढला आहे.
अश्लाघ्य सिनेगीतावर बिभत्स नृत्य करुन तरुणाईत विकृती वाढविण्याचं काम या उत्सवामार्फत चालविलं जात आहेत. उरूस, ईद-ए-मिलादमुहर्रमच्या नावाखाली असे बिभत्स प्रकार सुरू असतात. काही मंडळं तर मुहर्रमच्या शुभेच्छा देणारी मोठं-मोठी फलकं लावतात. मुळात मुहर्रम हा दुखवटा पाळण्याच्या महिना आहे. या महिन्यात मुहमंद (स) प्रेषितांचे नातू हसन आणि हुसेन यांचा अमानुषपणे खून करण्यात आला होता, त्याचा निषेध म्हणून लोकांना जेवणावळी देणंशरबत पाजण्यात येतं. हा इतिहास मुहर्रम साजरा करणार्‍या समिती व मंडळांना माहीत का असू नये?
मुस्लिमांनी पुण्यात गणपती मूर्तीची स्थापना केल्याची छायाचित्रे वर्तमानपत्रात येवून गेले. त्याच मुस्लिमांना मिरवणुकीमध्ये समावून घेण्यासाठी का प्रयत्न होत नाही. तसेच, मस्जिदी पुढे नमाज सुरू असताना तासंतास कर्णकर्कश: आवाजात ढोल बडविले जातात. अश्लिल गाणी वाजवली जातात. असे का व्हावे? हा माझ्यासहीत अनेकांना पडलेला प्रश्न आहे. याचे उत्तर आपण विवेकीपमातून का शोधू शकत नाही. घरातला देव रस्त्यावर आणून त्याचे प्रदर्शन भरवण्यात दोन्हीकडची मंडळी धन्यता मानते.
वाचा : तरुणाईच्या अभिव्यक्तीचं संमेलन
वाचा : नवं वर्षे, जुनी आव्हानं
धार्मिक शक्ती प्रदर्शनाच्या नावाखाली उत्सव समितीत स्पर्धा निर्माण केली जात आहे. यातून दरवर्षी उत्सव मिरवणुकीत मारामारीदगडफेक, दंगलवाद उत्पन्न होतात. परिणामी सामाजिक वातावरण दूषीत होण्याचे प्रकार वाढली आहेत. अर्थातच समाजविघातक कृत्य व हेतूला बळकटी देण्याचं काम या उत्सवामार्फत चालवलं जात आहेत. असं न होता सर्व धार्मिक उत्सव सर्वधर्मियांसाठी का असू नये? हा विचार जनमाणसात रुजवण्याची गरज आहे. राष्ट्रीय सणासारखं स्वरूप धार्मिक सणांना का येऊ शकत नाही. यातून भारताच्या बहूसांस्कृतिक परंपरेला बळकटी मिळू शकेल.

कलीम अजीम, पुणे
(लेखक सुंबरान मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे
उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJWcXHQwHbD6WLl79bnLHLJ6Leb_Vf8GsMo_XIIf-15K3fx3lbxzSsOEZf8mD4bvSi7pjGuhKNze6E9tHO43SVbjXMFFHJwIzufjoLwPgBk82gQl0-MKpHPgFlI_5m1BJiNwjp6SpSLfev/s640/maxresdefault-750x375.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJWcXHQwHbD6WLl79bnLHLJ6Leb_Vf8GsMo_XIIf-15K3fx3lbxzSsOEZf8mD4bvSi7pjGuhKNze6E9tHO43SVbjXMFFHJwIzufjoLwPgBk82gQl0-MKpHPgFlI_5m1BJiNwjp6SpSLfev/s72-c/maxresdefault-750x375.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2014/09/blog-post_14.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2014/09/blog-post_14.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content