थर्टी फर्स्ट ची रात्र आणि ओसंडून वाहणारी तरुणाई, सगळेच रात्री बाराचा ठोक्याची आतुरतेनं वाट पाहाताहेत. पुण्यातील एफ.सी. रोड रोडवर तरुण जोडपी हातात हात घालून बाजारहाट करण्यात मग्न आहेत तर काहीजण शहरातील इतर भागात कायमस्वरुपी व तत्कालिक पब्स् मध्ये सेलिब्रेशनसाठी गर्दी करत आहेत. याच रस्त्यावर चॅनलची ओबी व्हॅनची अँकर हुर्रे करणारा तरुणांचा घोळका करुन उभी आहे.
नेहमी मळकट कपड्यावर फुगे विकणार्या मुली आज स्वच्छ कपड्यात सिनेमातल्या लव्ह आकाराचे फुगे विकताहेत. पानीपुरी, वडा पाव व इतर एक्स्ट्रा चाटच्या स्टॉल्सधारकांनी बर्यापैकी गर्दी यशस्वीरित्या आपल्याकडे खेचलीय. कपडे, पादत्राणे, शोभेच्या वस्तु, कॉस्मेटिक नेहमीप्रमाणे आज जरा जास्तच भरभररुन गर्दी खेचताहेत.
दहा डिग्रीच्या घसरणाऱ्या तापमानात तोकड्या कपड्यातल्या मुली आईस्क्रीमच्या स्टॉलवर घोळक्यानं उभी आहेत. प्रत्येकांनी टिव्हीतल्या ओनिडासारखे शिंगं डोक्यावर चढवलीत. सेल, स्पेशल ऑफर, सुट, डिस्काऊंट, घेऊन चारीकडे ‘वेलकम बाजार’ चांगलाच सजलाय. हॉटेल्स, कॉफी शॉप्स, मॉल्स, आपली डेडलाईन वाढवून तरुणांची ‘आवभगत’ करत आहेत. एकूण पाहता ‘न्यू इअर सेलेब्रेशन्स्’चा बाजार उत्तमरित्या सुरु आहे.
बाजाराने बदलल्या सवयी
विसावं शतक येताच उत्सवं साजरा करण्याच्या आमच्या सवयी, पद्धती बदलल्या, आपण बाजारधिसष्ठीत कधी झालो हे आपणास सुद्धा कळालं नाही. ओपन मार्केटमुळे अनेकांच्या हातात पैसा आला, तसा बाजाराने तो काढून घेण्यासाठी ‘मटेरिअल मार्केट’ उभं करुन तुमच्या नकळत खिशातून पैसा चोरी करुन घेतला. किंवा तुमच्या संमतीनं ती दारं तुम्ही ओपन करुन दिलं. त्याचवेळी कमोडीफाय बाजार तुमच्या सायकोलॉजीवर स्वार होण्यास यशस्वी ठरला.
पश्चिमेकडून मुक्त बाजार भारतात एकटाआला नसून तिकडचे सण, उत्सव, डेज घेऊन आला. दहा-बारा वर्षापूर्वी ख्रिसमस साजरा करणारा एक विशिष्ट समुदाय होता. पण आज बहूसांस्कृतिक भारतात, ख्रिसमसच्या बाजारासोबत सेलिब्रेट करणार्यांची संख्या वर्षागणिक वाढत आहेत.
फ्रेंडशिप, रोझ, व्हॅलेंटाईन, मदर्स-फादर्स, अॅनिव्हर्सरी, बर्थ डे अशा अमुक-तमुक डेज बाजाराने जन-सामान्यांत बाजारधिष्ठीत सायकोलॉजी तयार करुन असे उत्सव साजरा करण्यास बांधील केलंय. सुरुवातीच्या काळात दिवाळी, नववर्ष, लग्न, शुभकार्याला शुभेच्छा पत्र दिलं जायचे, आज या वस्तु गिफ्ट्सच्या बाजारातून कधीचे हद्दपार झाले असून त्यांची जागा, मोमेंटोज, ट्रेंडीज, बुके यांनी घेतली. काळ बदलता याही वस्तु बाजारातून बाहेर पडायच्या मार्गावर आहेत.
इंटरनेट व व्हॉटस् अप नामक तंत्रज्ञानाने बाजारातून खर्या सारख्या दिसणार्या वस्तु बाद करत आभासी वस्तु देऊ केल्या आहेत. त्यामुळे नेटबाजाराने मानवी इमोशन्स् आपल्या कवेत घेण्याचे यशस्वी प्रयत्न सुरु केलं आहे. परिणामी सण-उत्सवं सेलिब्रेट करण्याच्या पद्धती अमुलाग्र बदलल्या जात आहेत. प्रेम भावनांचे ‘कमोडीफिकेशन’ उत्पादन गटाने सुरु केलं आहे. यातून बाजारधिष्ठीत समाज म्हणून आपली ओळख ओपन मार्केटनं निर्माण केली आहे.
भावना मार्केटच्या आहारी
शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्स् ह्यूमन सायकॉलॉजीच्या मानगुटीवर स्वार होत असल्याने, नकळत आपण प्रॉडक्ट व मार्केटच्या आहारी गेलो आहोत त्यामुळे कोणतेही सेलेब्रेशन बाजाराशिवाय पूर्णच होत नाही. सेल, डिस्काऊंट, ऑफर्सच्या कचाट्यात मार्केटने ओढले असून गरज नसताना केवळ समोर मांडल्या आहेत म्हणून खरेदी करण्याची प्रवृती वाढली आहे.
सौंदर्यप्रसाधने, फर्निचर्स, गॅझेट्सने आमचे आयुष्य अक्षरश: व्यापून टाकले आहे. मॉल व मल्टिप्लेक्स संस्कृती आमच्या जीवनपद्धतीचा आमुलाग्र भाग बनलीय. नकळतपणे आपलं आयुष्य व जगणं गॅझेट्स नी काबीज केलंय. प्रत्येकांना महागड्या वस्तु, उत्पादने, नवे फिचर्स, लेटेस्ट मॉडेल, अत्याधुनिक सुविधांनी ग्रासलं आहे. आपण कॅरिअर, कॉम्पिटीशन, पॅकेजस् या बाजाराने निर्माण केलेल्या मटेरियलच्या आहारी गेलोय.
मल्टीनॅशनल कंपन्या, आयटी मॉल्स, कॉरपोरेट वर्ल्ड, सेवा सेंटर्स, हॉटेल्स, रेव्ह पार्टीज, पब्स, रिसॉर्ट असे कल्चर बाजाराने दिलेलं अनौरस अपत्य आहे. या चंगळवादी वृत्तीचा तिटकारा सुद्धा येतो आणि त्याशिवाय राहूदेखील शकत नाही, अशा अवस्थेत सध्या आपण पोहोचलोय.
चंगळवादी वृत्तीच्या कचाट्यात आपण अडकलोय, असं वारंवार वाटतंय पण यातून उपायदेखील मिळत नाही असं म्हणणारे अनेकजण दररोज भेटत असतात. मार्केट आणि प्रॉडक्टसाठी इमोशन्सचे हायजॅकीकरण करणारी यंत्रणा आपल्या जवळपास वावरत असते.
आपणच कळत-नकळत त्यांच्या स्वाधीन व आधीन झालोय. साखळी उद्योगसमुह आपल्या एम्प्लॉयींना भरमसाठ पगारी देऊन तोच पैसा आपल्या इतर प्रॉडक्टच्या माध्यमातून काढून घेतात. अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर पगारवाढ आणि बाजारवाढ यात बरंच साम्य आढळते. सतत नव-नविन उत्पादनं बाजारात दाखल होत आहेत. उदा. पूर्वीचा लेटेस्ट म्हणून बाजारात दाखल झालेला सोनीचा मोठा टिव्ही, कंपनीने बाद ठरवून नवा कोरा अतिशय कमी जागेत बसणारा एलसीडी बाजारात आणलाय.
वाचा : महानगरे तरुणांसाठी झाली असुरक्षिततेचा कंपू
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
वाचा : महानगरे तरुणांसाठी झाली असुरक्षिततेचा कंपू
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
आपण लगेच जुना नातेवाईकांना देऊन किंवा प्रसंगी भंगारमध्ये काढून नवा एलसीडी आणतो. तसा जुना टिव्हीदेखील उत्तमरित्या सुरु होता. पण मार्केटने तुम्हाला वारंवार सांगून व पटवून देऊन तुम्हाला गरज आहे असं भासवलं आणि तुम्ही लगेच हजारो रुपये खर्च करायला तयार झालात. तसेच मोबाईल हँडसेटच्या बाबतीत आहे. नवे फिचर्स असलेला तुमचा स्मार्ट फोन तीन महिन्यात बाद होतो. कारण कंपनीने त्याहून चांगला मॉडेल मार्केटमध्ये आणलाय.
सतत मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करुन मोबाईल गॅझेट्स बाजारात येत आहेत. त्यामुळे दर तीन महिन्याला तुम्हाला नविन मोबाईल्स् घेणे अपरिहार्य आहे. असं मार्केटनं तुमच्या मनावर ठासवलंय. अशा गॅझेट्स बदलणार्यांची संख्या लक्षणीय आहे. म्हणजे एकूण काय तर, बाजाराने तुम्हाला व तुमच्या इमोशन्संना विकत घेतलंय.
वाचा : लोकसहभागातून माध्यमक्रांती
भावनांचे वस्तुकीकरण
ऑनलाईन शॉपींग एक नवा फंडा सध्या इ-समाजात खुपच रुजतोय, तुमच्या क्षयनगृहातही तुम्ही एकटे नाहीत. तुमची प्रायव्हसी भंग करणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. नको असताना इ-शॉपींग करण्याचा कल वाढत आहे. कपडे, गॅझेट्स, ईलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदी करण्याचा कल वाढत असून वाढती नेटीझन्सची संख्या लक्षात घेता येणार्या काळात ऑनलाईन शॉपींग आपल्या खासगीपणाला मारक तर ठरणारच आहे.
परंतु मोठ्या प्रमाणात खिशाला देखील चाट पाडणार आहे. म्हणजे ओपन मार्केटच्या नावानं आपलेच इमोशन व खासगीपण आपणच कमोडीफाय करत आहोत. चंगळवाद शब्ददेखील अपुरा पडेल अशा स्वरुपात आपण भावनांचे वस्तुकीकरण करुन बसलो आहोत. येणार्या काळात याचे भयाण वास्तव आपल्यापुढे असेन. त्यामुळे गरज का चंगळ हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवावा लागेल.
आपण आपल्याच जगण्यासंदर्भातल्या कथीत अपेक्षा प्रचंड वाढविल्या आहेत. आपल्याभोवती आपणच अपेक्षा व इच्छाचं वर्तुळ करुन बसलो आहोत. त्यामुळे येणार्या काळात हे कडं आपणास तोडायचे का नाही का चंग़ळवादी बाजारकेंद्री लाटेला बळी जायचे हे आपल्यालाच ठरवायेच आहे.
कलीम अजीम, पुणे
लेखाची मूळ लिंक-
http://www.dailyprajapatra.com/oldedition/p-8-m.php?i=04JAN2015
http://www.dailyprajapatra.com/oldedition/p-8-m.php?i=04JAN2015
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com