‘नॉनवर्बल’ कम्यूनिकेशन घडवताना..

“मी औरंगाबादला येतोय..!!” असं फेसबुक स्टेटस मॅपसहीत अपलोड करुन मागील आठवड्यात कुणालसोबत औरंगाबादचा दौरा केला. हे स्टेटस टाकण्यामागे एकमेव कारण असे होते की, कमी वेळात जास्तीत-जास्त लोकांना भेटता यावे आणि झालेही तसेच,आमच्या सुंबरानच्या संपादकाला औरंगाबादला माझे पदवीचे मित्र भेटायला उत्सुक होते. 
बुधवारी सप्टेंबरच्या दहा तारखेला दिवसभर मोबाईलवर मॅसेज येत होते. कधी येणार.. कुठे भेटणार..आल्यास आम्हाला कळव, प्रत्येकांना उत्तरं देऊन वेळ देत होतो. त्याचबरोबर मुंबईहून आलेल्या वैभव छाया व त्यांचे दोन मित्र अनपेक्षितपणे औरंगाबादला केवळ फेसबुकच्या त्या स्टेटसमुळे भेटले. 
वैभव हा माझा समविचारी फेसबुक फ्रेंड, आधुनिक संवाद टेक्नॉलॉजीमुळे आम्ही एकत्र येऊन आलो. आमच्यात ‘नॉनवर्बल’ कम्यूनिकेशनच्या माध्यमातून डेली संवाद होत असे. असे फेसबुकच्या चॅटबॉक्समधून संवाद साधणारे मित्र व त्यादिवशी प्रत्यक्ष भेटलो. तीन-चार तास औरंगाबादच्या दख्खनच्या ताजवर बसून वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारल्या. सदर ‘महती’ सांगण्याचे एकमेव कारण असे की, तंत्रज्ञानाचा योग्य व सकारात्मक वापर केल्याने किती फायदे होऊ शकतात याचे हे उदाहरण.
समविचारी लोकांचा समूह
प्रोग्रेसिव्ह चळवळीच्या माध्यमातून फेसबुकवर समविचारी लोकांचा ‘सोशल कट्टा’मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. अनेक मित्र दररोज एकत्र येवून प्रभावी संवाद प्रणाली चा वापर करतात. चर्चा, सल्ला-मसलत, विचार-विनीमय, मते-मतातंरे, वेगळ्या पैलूंचा अभ्यास दररोज इथं होतो. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राजकारण, धर्म, कृषि,कला, साहित्य,चित्रपट,कविता, मनोरंजन अशा वेगवेगळ्या प्रकारची स्वतंत्र पेजेस आपल्या विषयाला अनुसरुन सखोल माहिती देत असतात. 
ज्यात फक्त माहिती आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होते. इथं चळवळीला वाहलेली असे कितीतरी पेजेस आहेत, या पेजेसच्या माध्यमातून समविचारी लोक एकत्र येवून विधायक कार्यक्रम राबवतात. अशांना फेसबुक कसे वापरायचे यांना चांगलेच उमजले आहे. 
आज प्रभावी व तात्काळ कम्यूनिकेशनसाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हॉट्स अप, फेसबुकवर ग्रूप तयार करुन चर्चा विचारमंथन केले जाते. या ग्रूपवर देशभरातील सांस्कृतीक, राजकीय चळवळी व घटनांची माहिती क्षणार्धात इथं उपलब्ध असते. देशावर प्रभाव टाकणार्‍या घटना घडामोडींची चर्चा इथं केली जाते. 
दिवसभर माहितीप्रधान स्टेटस पोस्ट करुन क्रिया-प्रतिक्रियाच्या माध्यमातूनमोठ्या प्रमाणात विचार प्रसवले जातात.एकूण पाहिले तर विधायक कामासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे केला जाऊ शकतो. परंतु काही समाजविघातक कृत्य करणारी विकृत मनोवृत्तीची लोकं या सोशल माध्यमाचा गैरवापर करुन सामाजिक वातावरण दूषीत करत आहेत. 
गॅझेटनं बदलल्या सवयी
आज तंत्रज्ञानामुळे आपले राहणीमान जीवनशैली पूर्णत: बदलली आहे. मोबाईल गॅझेट शिवाय आमचा दिवस उजाडत नाही. जीएम, जीएन, स्माईली, सिम्बल, इमेज, टेक्स्ट लाईक शेअरने आम्हाला अक्षरश: गुंतवून ठेवले आहे. एखादा दिवस सोशल मीडियावर ‘फेस’नाही दाखवले तर अस्वस्थता वाढते. त्यातून नेट अ‍ॅडिक्शन वाढले आहे. चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टींचा प्रचार, प्रसार नेटीझन्सनी सुरुकेला आहे. 
व्हॉट्स अप नॉनव्हेज मॅसेज,न्यूड व्हीडीओ शेअरिंगचे ‘हब’ बनले आहे. दर दोन दिवसाला कोणीतरी आपली परवानगी न घेता ग्रूपमध्ये अ‍ॅड करत असतो. त्या ग्रूपच्या मध्यमातून फालतू जोक्स, फोटोस, प्रक्षोभक मॅसेजस, पाठवण्याचे काम सुरू असते. काही ग्रूपस् प्रोपोगंडा मॉडल व विशिष्ट भूमिका राबवतात. नुकतीच ‘लव्हजिहादनामकभ्रामक कल्पना मोठ्याप्रमाणात व्हॉट्स अपच्या माध्यमातून पसरवली गेली. 
व्हीडीओ, टेक्स्ट, इमेजेसच्या माध्यमातून भंपक माहिती, भाषणे, कात्रणे प्रचारीत केले गेले. एकाच प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या. नंतरच्या कालात्माध्यमांनी त्याचा फॉलोअपघेऊन सत्य बाहेर काढले पण यासंदर्भात एकही महिती फेसबुक व व्हॉट्स अपच्या माध्यमातून प्रसारीत केली गेली नाही. 
काही ठराविक ग्रूप्स् यासंदर्भात माहिती प्रसारीत करत होते. पण त्यांची रिचनेस कमी होती. सतत एकाच प्रकारचे मजकूर टाकून संमोहनशास्त्राचा आधार घेत मन तयार करण्याचे काम विशिष्ट संघटनाद्वारे चालवले गेले. त्याच्या आहारी आपण सगळेच कळत-नकळत गेलो होतो, हेदेखील आपणास मान्य करायला हवे.
प्रश्रोभक प्रचार
मध्यंतरी पुण्यातल्या घटनेनंतर मला आमच्या औरंगाबादच्या आमच्या अलमगीर वसतीगृहातून एकाने कुठलीशी मस्जिद पाडतानाचा फोटो प्रक्षोभक वाक्यासह पाठवला होता. (ती मस्जिद तुर्कस्थानातील भूकंपामुळे पडलेली होती हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते) मी सदर अ‍ॅडमीनला पर्सनल चॅटमधूनमॅसेज करुनविचारले,सदर फोटोचा सोर्स काय रे भाऊ? म्हणजे तू हा फोटो कुठून घेतला.? दोन तास सलग मॅसेज पाठवून त्याचे काहीच रिप्लाय न आल्याने मी कायदेशीर कारवाई करेन म्हणून धमकीवजा विनंती केली तरी त्या बहाद्दराकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. शेवटी मी त्या फालतू गूपमधून बाहेर पडलो. 
अलमगीर भेटीदरम्यान त्या अ‍ॅडमीनला याबद्दल जाब विचारले असता तो चक्क म्हणाला.. दररोजअशा स्वरुपाच्या हजारो पोस्ट येतात. त्यातलाच एक उचलून ग्रूपमधल्या कुणीतरी टाकला असेन. त्यात काय वाईट अशा घटना इतरांनाही माहीत व्ह्याव्यात ना! तो निर्लज्जपणे बोलत होता. 
मी त्यास म्हटलो तू अ‍ॅडमीन असल्या कारणाने यातून काही बरे-वाईट झाले असता तू जबाबदारी घेणार होता का? तर त्याने चक्क नकार देत म्हटंले मी का घेऊ जबाबदारी माझी चूक नाही यात. त्या बावळटला ऐवढे कळत नव्हते की, अ‍ॅडमीन म्हणून तोच जबाबदार आहे. तुझ्यावर कारवाई केली असती तर, तुला किती महागात पडले असते. याची जाणीव आहे का तुला? म्हणत मी त्यावर शब्द प्रहाराचा केला. तरी त्यावर काहीच फरक पडत नव्हता. 
‘राजकीय पार्श्वभूमी’ असलेल्या त्या अ‍ॅडमीनचा उद्देश मला कळायला वेळ लागला नाही. अशा सडक्या डोक्याच्या वृत्त्तीमुळेच पुण्यात मोहसीन शेखचा बळी गेला होता. या खूनाला तुदेखील जबाबदार आहे म्हणतयेत्या काळात अशा काही पोस्ट ग्रूपमधून किंवा पर्सनल चॅटमधून आल्यास कायदेशीर कारवाई करेन म्हणत मीच माघार घेतली. 
‘कॉन्सपिरंसी’ मॉडेल
आज व्हॉटस अप चा वापरातून प्रक्षोभक भाषणे, व्हीडीओ क्लिप्सची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राज ठाकरे, अकबर ओवेसी, योगी अदित्यनाथ, प्रविण तोगडिया अशा समाजघातकी पुढार्‍यांना मोठे करण्यात या व्हॉट्स अपवाल्याचा मोठा वाटा आहे. शहरात फिरत असताना मला बरेच ओवेसीप्रेमी प्रक्षोभक भाषणे देव-घेव करताना भेटले. 
वेसी म्हणजे क्रांतीकारी नेते आहेत असा प्रचार औरंगाबाद शहरात व्हॉट्स अपच्या माध्यमातून सुरु आहे. हाचखरा समाजसुधारक, समाजाचे प्रश्न तोच हाताळू शकतो असं वाटणारी ‘फॅन क्लब’ शहरात कार्यरत आहेत. आयडियल अशी प्रतिमा फेसबुक, व्हॉट्स अपमधून ओवेसीने साकारली आहे. असा सोशल माध्यमाचा वापर करणारी मंडळी आपल्या आसपास आढळत असतात. कॉलेज, स्पर्धापरिक्षा, अभ्यास, वाचन, सोडून तरुणाई अशा फालतू मॅसेज देव-घेव करण्यात आपला बहूमुल्य वेळ वाया घालवत आहेत. 
तिकडचे प्रक्षोभक मजकूर वाचून, इकडचेही लागतात कामाला. भंपक कल्पकतेच्या जोरावर डेटानिर्मीती करत शेअरिंग सुरु करतातव त्यातून साकारते ‘लव्ह जिहाद’ सारखे भिकारछाप प्रोपोगंडा मॉडेल. हे तुनतूने तुम्ही आम्ही सगळेच कळत-नकळत वाजवत फिरत असतो. त्या ‘कॉन्सपिरंसी’मॉडेलच्या आहारी जाऊन तासंतास चर्चा करत बसतो. असेफालतू वाक्य, मजकूर वाचून स्वत:ला असुरक्षिततेच्या कंपूत सामील करुन घेतो. तिकडेचे असे आहेत.! ते असे का करतात..! अमुक-तमुक बरोबर आहे..! म्हणत समाजद्वेश पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यातून विघातकी घटकांना बळ देऊन समाजमनात विष पेरण्याचे काम आपणच करतो. 
वेळखाऊ तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामाऐवजी वाईट कामासाठीच आपल्याकडे खूप होत आहे,मोबाईल, इंटरनेट, माध्यमं समाजहीत साधण्यापेक्षा समाजद्वेश पसरवत आहेत. इंटरनेट वापरात पोर्नोग्राफिक साईट्सबघण्यात आम्हा भारतीयांचा अग्रक्रम आहे. 
मोबाईलच्या गैर वापरात आमचा झेंडा नेहमी वर असतो. सोशल माध्यमाचावापर इंन्फोटेंन्मेंट ऐवजी टाईमपास म्हणून सुरु आहे. बातम्या, लेख, माहीती, तत्कालिक घटनांचा धाडोंळा घेण्यासाठी केला जाऊ शकतो. सोशल मीडियाच्यामाध्यमातून ‘सिटीजर्नलिस्ट’ होऊन आपल्या भागातील प्रश्न मांडतायेऊ शकतात, लहान-मोठ्या समस्यांना बाहेर आणले जाऊ शकते. 
अभ्यास साहित्याची देवाण-घेवाण, लेक्चर, टाईमटेबल, कॉलेज विषेश,लेक्चर रेकॉर्डींग,नोटीस बोर्ड शेअरींग, तसेच अभ्यासासंबधीत माहिती,आपल्या भागातील सांस्कृतिक घडामोडीची माहिती प्रसारित करता येऊ शकते. जॉब अलर्टच्या माध्यमातून नोकरी देता व मिळवता येऊ शकते. 
सकारात्मक वापर
सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापार वाढवण्यास मदत करता येऊ शकते. उत्पादनाची जाहिरात, प्रमोशन करता येऊ शकते. दररोज जीएम म्हणण्यापेक्षा एखादी चांगली कविता सकाळ प्रसन्न करुन जाते. चांगले सुविचार जगण्याची उर्मी देतात, एखादा सकारात्मक विचार समाजातील स्थान वाढविते. सोशल मीडियाचा चांगला वापर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊ शकतो. त्यामुळे आपणास ठरवायचे आहे चांगला कसा वापर करता यईल, वाईट वापर करताना कुठेतरी मोहसीन शेख घडला होता याचा विचार प्रथम डोक्यात आणावा.
अशा घटकांना प्रसिध्दी देण्याऐवजी त्याची रितसर तक्रार दाखल करता येऊ शकते. फेसबुकने याची सोय करुन दिली आहे. रिपोर्ट स्टेटस, अनफ्रेंड, ब्लॉक, सारखे पर्याय उपलब्ध असून त्याचा वापर वाढविता येऊ शकतो. पुण्यातल्या घटनेनंतर प्रत्येक शंभर शब्दाचे स्टेटस फिल्टर करण्याचे काम सुरु आहे, ही फिल्टर करणारी यंत्रणा आहोरात्र राबून कंट्रोवर्सल पोस्ट काढून टाकण्याचे काम करत आहे.
सतत एक सारख्या येणार्‍या पोस्टला वॉच ठेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करण्याचा बडगा पोलिसांनी उचलत आहेत. महापुरुषाचे अवमान,देव-देवतांविरुध्द अपशब्द वापरणे,धर्म-जातीवर लांछने, राजकीय नेत्याचे अवहेलना करणे अशा प्रकाराला आपण आळा घालू शकतो. कोणतेही सामाजिक व धार्मिक भावना दुखावणारीपोस्टअसेल तर त्यास तात्काळ रिपोर्ट करता येऊ शकते. रिपोर्ट म्हणजे त्या पोस्ट संदर्भात तक्रार दाखल करणे होय. व्हॉट्सअपच्या अशा पोस्टसंबधीत तक्रार दाखल करता येऊ शकते. 
मोबाईल नंबर,अ‍ॅडमीनचे नाव, सदर पोस्ट घेऊन जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार दाखल करता येऊ शकते. अशा पोस्टला वेळीच रोखले तर भविष्यकाळात होणारी हानी टाळता येऊ शकते. अन्यथा उत्पन्न होणारे वाद आणि जीवीत व वित्तहानीला सामोरे जावे लागेल. विज्ञानाने दिलेल्या तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता योग्य वापर कसा करायचा हे आपल्यावरच अवलंबून आहे. 

कलीम अजीम, पुणे 

(लेखाची मूळ लिंक http://www.dailyprajapatra.com/page8S.php)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: ‘नॉनवर्बल’ कम्यूनिकेशन घडवताना..
‘नॉनवर्बल’ कम्यूनिकेशन घडवताना..
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVfF2ZvB48ggucv5D8ND-cGjK2Z66r-axSwJJzARHP1vnEewVxrC8-AfMjLfxmM6dx-b0su_0nnROhyphenhyphenos5Psrs8wJk66BoThZ-OJV6hsp3DRDpDw49P3pornyImdfwIhyphenhyphenYQPpjL4CrEySU/s640/images.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgVfF2ZvB48ggucv5D8ND-cGjK2Z66r-axSwJJzARHP1vnEewVxrC8-AfMjLfxmM6dx-b0su_0nnROhyphenhyphenos5Psrs8wJk66BoThZ-OJV6hsp3DRDpDw49P3pornyImdfwIhyphenhyphenYQPpjL4CrEySU/s72-c/images.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2014/09/blog-post_21.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2014/09/blog-post_21.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content