मागील आठवड्यात अवधूत डोंगरे यांच्या दोन वर्षापूर्वी आलेल्या “स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट” या कादंबरीला साहित्य आकादमी पुरस्कार घोषीत झाला. अवधुत हा तरुण लेखक व आमच्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचा माजी विद्यार्थी त्यामुळे हा पुरस्कार जेवढा अवधुतसाठी महत्वाचा तेवढाच आमच्यासाठी देखील होता. फक्त विभागाचा विद्यार्थी म्हणून नव्हे तर आमच्या प्रश्नांना जागा करुन दिल्यामुळे देखील तो आमच्या मनात जागा करुन आहे.
त्याच्या लिखाणावर, वार्तांकनावर आम्ही नेहमी रानडेच्या कट्टयावर बसून अभिमानाने चर्चा केल्या आहेत. त्याने आकारलेल्या “..फालतू” विषयी अनेक मते-मतांतरे मांडली आहेत. त्यामुळेच आम्हाला आमच्या सुंबरान मासिकात त्याविषयी लेखन करावसं वाटलं. सुंबरानच्या लेखकाने “..फालतू..” कादंबरीला मानवी मूल्य देऊन स्वत:ला त्या कादंबरीशी जोडून घेतलं आहे.
वाचा : पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा
वाचा : महिला दिन विशेष : स्त्री मुक्तीचं तत्वभान
मीडिया हाऊसमध्ये कामासाठी गेलेल्या संपत मोरेंना समोरचा माणूस गावंढळ समजून कसा अप्रोच होतो याची रेखाटणी करत रानडेच्या जर्नलिझमशी जोडून लेखकाने सुंदर लिखाण जूनच्या अंकात केलं आहे. तंत्रज्ञान, आधुनिकीकरणानंतर महानगराच्या समस्येसोबत विद्यार्थ्यांचे प्रश्नदेखील अफाट वाढले आहेत. जॉब, करिअरचे स्वरुप बदलले आहे, क्रमवारीत टिकण्याची स्पर्धा, आथिक गणितं बदलली आहेत. बदलत्या सांस्कृतिक चळवळी, राहणीमान, जीवनशैलीत बदल झाला आहे. चंगळवाद, भोगवादाची चलती सुरु झाली आहे.
अशा वेळी “...फालतूला” साहित्य अकादमीचा मिळणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे दखल घेणे होय. यानिमीत्ताने महानगरीय तरुणांचे प्रश्न पुन्हा एकदा ज्वलंत म्हणून पुढे आले आहे. या कादंबरीची दखल दोन वर्षानंतर आज घेतली जात आहे. मागील एक आठवड्यात या कादंबरीची विक्रमी विक्री पुण्यात झाली आहे. या अनुषंगाने मला तरुणांच्या समस्येबद्दल वाच्यता कराविशी वाटली.

महानगरातील विद्यार्थी आयुष्य या कादंबरीपेक्षा फार वेगळं नाही. सतत मानसिक दडपणाखाली वावरणारे तरुण पुण्याच्या सदाशीव पेठेतल्या अपुर्या व कोंदट अभ्यासिकेतून बाहेर पडताना दिसतात. स्पर्धा परिक्षा, एम.पी.एस.सी. आणि यु.पी.एस.सी.च्या फॅडने ग्रासलेले अनेक तरुण पुणे, औरंगाबाद, नाशिक सारख्या शहरात दिसतात. यात मुख्यत: ग्रामीण भागातील तरुणांचा मोठा सामावेश आहे.
अधिकारी, आय.ए.एस. होण्यासाठी धडपडणारे हजारो मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय अशा कॅटेगरीत मोडणारे अनेक तरुण-तरुणी पुण्याच्या चहा व नाष्टा टपरीवर हातात वडापाव, उत्तपा, स्पंज डोसा खाताना दिसतात. मुख्यत: ग्रामीण भागातून आलेल्या मुलांचा सामवेश यात मोठा आहे. घरी आई-वडील पै-पै कमवून स्वत:च्या पोटाला गाठी बांधून मुलांना पैसा पाठवतात. विद्यार्थी इथं कोंदट वातावरण असलेल्या खोलीत वीस-वीस हजार डिपॉझीट व पाच हजार भाडे देऊन राहतात.
या खोलीत स्वच्छ पिण्याची पाणी देखील घरमालक उपलब्ध करुन देत नाहीत. स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय वाईट पण दररोज असंख्य सूचना मात्र न मागता मिळतात. डास, ढेकणांचा उद्व्याप तर कोणत्याही पॉश फ्लॅटवर सुटला नाही. चांगल्या व उत्तम मेसची सुविधा नाही, भक्कम पैसे देऊनही जेमतेम दर्जाचं जेवण मिळतं. त्यातून विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास कसा होणार. त्या अन्नातून हवे तेवढे न्युट्रीशन त्यास मिळते का? मेसचे डबे देणारे अनेक पण क्वालिटी जपणारे एकही नाहीत.
वाचा : उत्सवाचे बाजारीकरण आणि असांस्कृतिक मंडळे
वाचा : नवं वर्ष कि भावनांचे कमोडीफिकेशन
उकडलेला भात, पिवळ्या रंगाच्या पाण्याला वरण म्हणून खावे लागते. एकच मसाला असलेली बटाटे, वांगी, काबुली हरभरा, अख्या मसूर, सोयाबीन, कोबी याच ठराविक पदार्थाची भाजी, चार कागदी चपात्या दररोज मानसिक संतुलन बिघडवतात. विद्यापीठ, महाविद्यालयाच्या मेस, खासगी डबेवाले सर्वांचे सारखेच शेवटी भाऊ-बंदकी यांची. बाहेर शंभर रुपये एका थाळीला देऊनही निवांत जेवू न देणारे हॉटेल पुण्यात अगणित आहेत. पाच पेक्षा एखादी चपाती जास्त मागितली की, “याचे एक्स्ट्रा पडतील बरं का!” म्हणून जेवणाची मजा घालणारे हॉटेल्सची भरभराट सुरु आहे.

नाष्ट्याच्या नावाने नुसती हळद लावलेले पोहे पंधरा रुपयात पंधरा चमचे, तेलात शिजवलेला उपमा, तेलातलीच मिसळ, दहा रुपयात पाचचट चहा घेण्याशिवाय कोणताच पर्याय विद्यार्थ्यांकडे उरत नाही. प्रत्येक टपरीवाल्याकडे दुचाकी-चारचाकी सारखी वाहने आहेत. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये दोन-तीन फ्लॅट विद्यार्थ्यांचाच जीवावर यांनी कमविले आहेत. तरी यांना मेसवाल्यांना अन्नाचा दर्जा सुधारावा असे वाटत नाही. खाद्यपदार्थाच्या नावाने मानसिक शोषण मेस, टपरी, हॉटेलवाले करत आहेत.
अभ्यासिकेचा वेगळा ताण, महिना न चुकता फी भरावी लागते नसता बाहेर, पुण्यात मोठी काही मोठ-मोठे अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रे आहेत दरवर्षी लाखोगणिक फीस आकारतात. ग्रामीण भागातील मुलांना विशेषत: निम्नमध्यमवर्गीयांना या अभ्यासिका परवडण्यासारख्या नाहीत. त्यामुळे लहान आणि औकातीला धरुन असणार्या अभ्यासिकेचा शोध घ्यावा लागतो. असा अभ्यासिका वीस बाय वीसच्या खोल्यात मार्गदर्शन केंद्राच्या नावाने चालवले जातात. या अभ्यासिकेत कंजेस्टेड जागेत खूर्च्या थाटलेल्या असतात. मासिके, साप्तहिके तर सोडाच, पण मुख्य दैनिकापैकी कोणतेच दैनिकं या मार्गदर्शन केद्रात नसतात.
मार्गदर्शन, तासिका, व्याख्याने, प्रशिक्षण, सामाजिक व्यक्तिगत विकास, कोणत्या स्वरुपाचा असेल याचा अंदाज अभ्यासिका बघताच येतो. अशा अभ्यासिकेत चार-पाच वर्षापासून असे अनेक विद्यार्थी अभ्यास‘च’ करत आहेत. सावरकर, टिळक, गांधी विरोधी वाचन अभ्यासिकेच्या परंपरेनुसार अभ्यासत आहेत. मार्क्सचं अर्थशास्त्र, आंबेडकर, टॉलस्टॉय, सेक्युलिरझम, सोशालिझम यांचा अभ्यासिकेंना वानवा असतो.
सामाजिक घटनांचे विविध पैलूंची विविधांगी माहिती इथं उपलब्ध होत नाही. अशात सर्वागिंण विकास तर सोडाच, पण सामाजिक व व्यक्तीगत विकास देखील होत नाही. उलट आत्मविश्वास गमावलेली पिढी तयार करण्याची कारखाने या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंदे झाली आहेत. पूर्वेकडचे ऑक्सफोर्ड व स्पर्धा परिक्षांचे हब म्हणून पुण्याला अलिकडच्या काळात माध्यमांनी ओळख दिली आहे. परंतु गुणवत्ता कुठे?
वाचा : लोकसहभागातून माध्यमक्रांती
वाचा : ‘नॉनवर्बल’ कम्यूनिकेशन घडवताना..
गुणवत्ता आहे तर रिझल्ट कुठे? काही बोटावर मोजणारे तरुण स्पर्धा परिक्षेत पास झालीत तर हे आमच्या क्लासेसचे म्हणून मिरवणारे अनेक. बाकींचे काय? या स्पर्धा परिक्षांच्या बाजारीकरणात ग्रामीण भागातील आलेल्या तरुणांनी स्वत:ला गमावून बसली आहेत. अशा वातारणात हा विद्यार्थी अभ्यास करणार तर कसा. अमाप पैसा जाऊन शेवटी उरते ते नैराश्यच, अशा प्रकारे नैराश्याने ग्रासलेले अनेक तरुणं इथं भेटतात.

एकीकडे तुटपूंज्या पैशात दिवस काढणारे विद्यार्थी आहेत तर दुसरीकडे पैसा व वेळ उडवणारी तरुण-तरुणी इथं आढळतात. महिन्याला दहा हजाराची मद्य पिणारे तरुण देखील इथं आहेत. पाश्चिमात्य धाटणीचे परिधान स्विकारुन एफ.सी. रोड, जे.एम. रोडवर मनसोक्त जीवनाचा आनंद घेत फिरणारी तरुणाई देखील इथं आहे. कॉलेज-महाविद्यालयात दररोज डेज् साजरा करणे स्टेटस सिंबल बनले आहे.
वाढदिवसाला हजारो रुपयाचा केक व गिफ्ट वस्तु स्विकारणारी ही तरुणाई, पेट्रोल व पैशाचा धूर करणारे, मद्य व तत्सम नशाधारी पदार्थ्यात लोळणारी मंडळी, गुडलक, वाडेश्वर, रुपाली मध्ये पाचशे रुपयाचा नाष्टा करणारे तरुणं इथं दिसतात. एफ.सी. रोडवर पन्नास रुपयाचा चॉकलेट पान खाणार्या तरुणी. दोन-तीनशे रुपये सहज आईसस्क्रीमवर उडवण्यास यांनाकाहीच वाटत नाही. किती विरोधाभास आहे या शहराचा. चोहीकडे, तुच्छतावाद, हिणकसपणा, कमी लेखण्याचे प्रकार सहज घडत आहेत.

ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला इंग्रजाळलेली ही तरुणाई, भाषिक अल्पसंख्यत्वाच्या पठडीत बसविते. यातून भाषेवर समूह-ग्रुप पडतात. लाजर्या-बुजर्या तरुणांना नेहमी तुच्छतावादाच्या दृष्टीने बघणारी नजर तयार होते. अशात ग्रामीण भागातून आलेला तरुण एकटा पडतो. या असुरक्षिततेच्या वातावरणात असे व्यक्ती आपला सुरक्षा झोन शोधू लागतात. मग त्यातून तयार होतो विभागवार कंपू. ज्यात जिल्हेवार, प्रदेशवार तरुणं एकत्र येतात व आपले गट तयार करतात. वैदर्भीय अस्मिता, पश्चिम महाराष्ट्रीय अस्मिता, मराठवाडी अस्मिता सारखे सुरक्षा कंपू तयार होतात. त्यातून भौगोलिक अस्मिता, सांस्कृतिक अस्मिता दृढ होत जातात.
एकाच व सम विचारी लोकं एकत्र आल्यामुळे एकच विचार डोक्यात खुळ मारुन बसतो. वेगळा विचार मेंदूत शिरत नाही. पुण्यात राहून काय कमावतात तर प्रादेशिक अस्मिता. लोकांना जोडून घेण्याचा हा काळ असतो. लोकांना समजून घेणे, भौगोलिक, सांस्कृतिक देवाण-घेवाण, वैचारिक मते, जुळवून घेणे इथं होत नाही. त्यामुळे सुरक्षा चौकट तुच्छतावाद बळावला जातो. सामंजस्यपणाला जागा उरत नाही. त्यामुळे सांस्कृतीक चळवळीलादेखील विभागवार सुरक्षा चौकट प्राप्त झाली आहे.
अशा महानगरात स्वत्वाचा शोध घेणारे दरवर्षी येतात आणि याच सुरक्षा कंपूचा भाग म्हणून राहतात. शेवटी उरतात ती फक्त प्रश्न.. आणि प्रश्नच.. म्हणजे स्वत:ला फालतू समजण्याची क्रिया सतत चालू आहे आणि राहणार. कंपू बनून राहयचा की सर्वागिंण विकास घडवायचा हा निर्णय आपल्यावर डिपेंड आहे. नाहीतर करत रहा अभ्यास यामुळे वेळ आणि पैसा वाया जाणार पण हाताला काय लागेल.?

कलीम अजीम, पुणे
(लेखक सुंबरान मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत)
लेखाची मुळ लिंक-http://www.dailyprajapatra.com/page6S.php
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com