मागील आठवड्यात दाभोलकर हत्येला वर्ष पूर्ण झाले. या निमीत्ताने पुण्यात दिवसभर 20 ऑगस्ट रोजी टाईट शेड्युल्ड नुसार कार्यक्रम झाली. सकाळी साडे-सात पासून दाभोळकर पूल अर्थात महर्षी रामजी शिंदे पूलावर ज्या पुलावर डॉ. दाभोलकरांची हत्या झाली होती तेथूनच दिवसभरातील पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
इथूनच अंनिसची रिंगण नाट्य ब्रॅडींग टीम फुले, शाहू, आंबेडकर.. आम्ही सारे दाभोलकर, ..सरकारचा निषेध.....,अमुक-तमूक प्रवृत्तीचा निषेध..अशा घोषणा आणि नावाच्या पाट्या, फलके घेऊन शनिवार पेठ, अलका चौक, नवी पेठ, दांडेकर ब्रीज क्रॉस करत म्हात्रे पुलावरुन मनोहर हॉलला आली.
इथं येताच रॅलीतील काहींनी विसावा घेतला तर काहींनी व्यासपीठाचा ताबा. फिल्मी स्टार, तसेच इतर व्ही.आय.पी चेहरे, नाट्यकर्मी, दिग्दर्शकासोबत कार्यकर्ते फोटो काढण्यात मग्न होते. तर काही माईक खांद्यावर घेऊन फिरणारे तरणी कार्यकर्ते इथं एकत्र येऊन अमुक-अमूक कम्यूनिटी मुर्दाबाद..मुर्दाबादच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडत होती.
मला या घोषणेचा संदर्भ कळत नव्हता कारण हत्येला एक वर्ष पुर्ण झाल्याचा आणि ‘त्या’ कम्यूनिटी चा काय संबध, असो. हॉलच्या प्रवेशद्वारावरच,फक्त चेहर्यावर आरसा असलेला मोठा दाभोलकरांचा फोटो फ्रेम करुन लावला होता. बसा स्टॅड वर असतो तशा वजन काटा प्रमाणे याची रचना होती. प्रत्येक त्या फोटोजनिक आरशासमोर जाऊन “मै हूँ दाभोलकर” म्हणत असताना स्वत:चे फोटो काढण्याचे विसरत नव्हते. चांगला फोटो आल्याशिवाय खाली उतरत नसल्यामुळे तिथंबरीच गर्दी जमली होती.
हॉलच्या आतील बाजूस चहा-नाष्ट्याची सोय असल्यामुळे पलिकडे बरीच गर्दी होती. तर काहीजण व्यासपीठावर चहा-नाष्ट्याशिवाय विद्रोही गाणी जीव तोडून गात होती. एकूणसर्व घट्ना-घडामोडी बारकाईने अभ्यासल्या तर लक्षात आले की, दाभोलकरांचा स्मृतीदीन नसून एक मोठा सांस्कृतीक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात समाजवादी, कम्यूनिस्ट, पुरोगामी, गांधीवादी,आंबेडकरवादी,सामाजिक कार्यकर्ते, विविध विद्यार्थी संघटना, फुलेवादी अशा विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होती.
नाट्यकलाकार चॉकलेटी रंगाचे ‘रिंगण नाट्य’ नावाचे टी शर्ट घालून स्वत:ला मिरवत होती. ही रॅली स्मृतीदीनाची नसून ‘वर्षपूर्ततेची’ वाटत होती. त्यामुळे प्रत्येक जण वेगळ्या विश्वात वावरत आहेत. असे प्रत्येक प्रत्यक्षदर्शीला वाटल्याशिवाय राहणार नाही अशीच स्थिती त्यादिवशी होती.
या रॅलीचा‘असा’ वृतांकन करण्याचे कारण तुम्ही शोधत असाल तर उत्तररादाखल माझ्याकडे काहीच नाही. कारण मी काही विचारवंत वगैरे काही नाही, मी संघठना आणि समित्यांचा अभ्यासक नाही. मी फक्त संघठनेच्या कमोडीटी आणि ब्रँड मध्ये समिती का रुपातंरीत झाली या बाबत माझ्या औकातीनुसार भाष्य करणार आहे.
दाभोलकर हत्येनंतर सुमारे महिनाभर विविध संघटना आणि समित्यांनी जोरदार भाषणे करत ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर घाला आहे, लाजिरवाणी बाब आहे, ही हत्या यांनीच घडवली आहे, त्यांचा धिक्कार असो, सरकार नाकर्ती आहे अशी विधाने सुरु महिनाभर सुरु होती.
सकाळमध्ये मी त्याकाळी बातमीदार म्हणून काम करत असल्यामुळे मला पत्रकांची बातमी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक संघटनेनी प्रेस रिलीज आणि निषेध पत्रके वाटून शोक व्यक्त करत होती. ज्यांच्यावर ‘सोयीस्कर पुरोगाम्यांनी’ संशय आणि आरोप केला होता अशा संघटना हत्येच्या निषेधाची पत्रके काढण्यात अग्रेसर होती.
महिनाभर हत्येच्या तपासाच्या विविधांगी बातम्या येत होत्या सी.सी.टी.व्ही, सामाजिक सुरक्षा,रेखाचित्र, सगळ्या चर्चा संपल्या होत्या. हत्या झालेली जागा या समित्यांच्या कार्यकर्त्याकडून पवित्र घोषीत करण्यात आली. तिथं निषेधाची पत्रके चिटकवण्यात आली ती जागा आरक्षीत करुन जपण्याचा प्रयत्न सुरु झाला.
डॉक्टरांचा भला मोठा फोटोवर उदबत्त्या, पुष्पहार, अबीर, गुलालचेवार सुरु झाले. परिणामी पर्यटनाचे स्वरुप त्या पूलाला आले. याच जागेकवरुन हत्येचा निषेध व्यक्त करणारी रॅलीची सुरवात होऊ लागली. इथूनच निघालेल्या फिल्म इंन्स्टिट्यूटच्या रॅलीवर नक्षलवादी असण्याचा आरोप लावून त्यांना मारहाण केली गेली. हा डाव मारहाणीपर्यंतच संपला अन्यथा खूप काही घडण्याचे संकेत होते. हे फिल्म इंन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी हाणून पाडले. वर्षभर हत्येच्या जागी प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला निषेध सभा, भाषणे, किर्तन, सभा, व्याख्याने सुरु राहिली. परिणामी समितीचा व्याप काम प्रसिध्दी वाढली अचानक समितीचे संस्थापक सदस्यांना फाट्यावर मारत काही व्यक्ती इतक्या मोठ्या झाल्या की,समितीचे वारसदार आणि मालकच झाले.
का काळात डॉक्टरांचे काम आणि चळवळ मागे पडत गेली, परंतु निषेधाच्या नावाने अंनिस आणि कार्यकर्ते त्यास सपोर्ट करणारे सोयीस्कर पुरोगामी अवश्य मोठे झाले. दाभोलकारांची पुस्तके नव्या प्रिंटसहीत बाजारात दाखल झाली व विक्रमी विक्री करु लागली. मासिक आणि वर्तमानपत्रात कॉपी पेस्ट केलीली लेखमाला नवख्या-जुन्या विचारवंत म्हणवणार्या लेखकांनी सुरु केली.
प्रत्येकजण दोभोलकरांना आपल्याशी सलग्नित करण्याचा प्रयत्न करु लागला. वारकर्यांनी ‘विवेक वारी’ करुन स्वत:ची भूमिका व प्रसिध्दी करुन घेतली. ‘विवेकाचा जागर’ करणारे कार्यक्रम महाविद्यालयात सुरु झाली.तरुणाईत अंनिस इतकी लोकप्रीय झाली की, नेहमी व्हॉटस अप, फेसबुक करणारी तरुणाई संघटनेची कार्यकर्ते म्हणवून स्वत:ला मिरवू लागली.
वृत्तपत्रात प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. पत्रके, फेसबुक पेज, व्हॉटस ग्रुप, बल्क मेल मॅसेजचा वापर वाढला. विशिष्ट संघटना व वर्गाचा तिरस्कार वाढत जाऊन,निषेध,राग, काळ्या प्रोफाईलला रंगत चढू लागली. टोप्या, टी शर्ट, डोक्याला बांधायच्या पट्ट्या, दैंनादिनी, वह्या अशांवर डॉक्टरांनी ताबा मिळवला. टीव्ही वर अवजड शब्द फेकत बाईट देऊ लागली. या घटनेनी डॉक्टरांची नव्याने ओळख महाराष्ट्राला करुन दिली म्हणजे असे ही काही महाभाग होते ज्यांना दाभोलकर नावाची व्यक्तीवल्ली माहीत नव्हती.
जे डॉक्टरांना विकीवर शोधत होती. त्यांना दाभोलकर नावाचं माहात्म्य माहीत झालं. तरुणाई महाविद्यालयात अंनिसवर आणि जादूटोणा विरोधी कार्यक्रमे, एकांकिका, नाटके, व्याख्याने घेऊ लागली. कॉलेजेसमध्ये ‘जागर’ नावाचे कट्टे सुरु झाले. अशा तरुणाईने डॉक्टर पुत्रांना मोठे करत व्यासपीठ उपलब्ध दिली. हेच डॉक्टर पुत्र आज चळवळीचा चेहरा ठरली. संस्थापक सदस्याचे काय झाले माहित नाही वर्षभरानंतर काही काही सदस्य दिसले ते काही वेळापुरतेच.
आज चळवळी आणि खुनीचे काय झाले माहीत नाही पण निषेधाची प्रसिध्दी मात्र झोतात सुरु आहे.या निषेधाच्या प्रसिध्दीमुळे समितीला ब्रँड व्हॅल्यू आली. खूनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या खंडेलवाल आणि नागोरीने आम्हाला पैशाचे आमिष दाखवून खून केल्याची कबुली द्या म्हणणार्या पोलिसाची भर कोर्टात टर उडवली. मुळात हे दोन आरोपी विद्यापीठात दोन वर्षापूर्वी झालेल्या सुरक्षारक्षकाच्या खूनासाठी हत्यार पुरवल्याचा गुन्हा घेऊन तुरुंगात आहेत. याशिवाय अजून कोणताच गुन्हा त्यांवर सिध्द झाला नाही.
जादूटोणा, अंधश्रध्देला विरोध करणार्या दाभोलकरांच्या खून्यांचा तपास लागावा यासाठी प्लॅचेंट नावाची भानामती करण्याचं धाडस गुलाबराव पोळने दाखवल्याची बातमी लिक झाली व पोळ प्रसिध्दी झोतात आले. या सर्व घटना दाभोलकर हत्येला वलयांकित करुन प्रसिध्द झाल्या. पण अजून खरा खुनी किंवा मास्टरमांईड हाती आला नाही आणि येणारही नाही; हे कधीपर्यंत तर, जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती नाही तोपर्यंत. पण तोपर्यंत निषेधसभा गाजणार, संमलने भरवली जाणार, इंटेलेक्चुअल म्हणवणारी पिढी भाषणे ठोकणार, गळ्यात, हातात गंडे-दोरे बांधलेले तरुण कार्यकर्ते दाभोलकरांच्या पुस्तकांची ‘साधना’ करणार.
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटत नाही म्हणून अंगठ्या घालणारे तरुण-तरुणी अंधश्रध्दा निर्मूलनाचा प्रचार करणार. वाचन-अभ्यास बाजूला ठेवून चळवळीत वर्चस्व गाजवणार, काही तरुण पदे मिळाली नाहीत म्हणून बाहेर पडणार. जाति-भाषा, अभिजन, बहूजन, विषय, छंद, स्तर,फॅकल्टीवर महाविद्यालयात गट, समूह निर्माण करणारी तरुणाई चळवळीचा चेहरा बनणार. आणि येणार्या काळात पुरोगामी महाराष्ट्राची धुरा सांभळणार.. धन्य ती चळवळ धन्य तो महाराष्ट्र..
दाभोलकर गेले सोडून संगठन नावे जाहले लोक मोठेजाहला वारकर्यांचा विवेक जागाआजही भजनीपुजतातती जागा पडले डॉक्टर त्या जागीउभ्या आमूच्या समित्या निषेध कशाचा रे कलीम वर्ष पुर्याचा की, खुनाचा?
लेखाची मूळ लिंक-http://www.dailyprajapatra.com/oldedition/p-6-m.php?i=25AUG2014
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com