अय दिल्ली, तेरे शहर में यादे छोड आए!

चांदणी चौकातील कबाब, दरिया गंज मधील पराठे, एन.सी.आर.टी.मधील सकाळच्या ठोक्याचा चहा, ती पांडेजीची घिरट्या घालणारी बस तो कुणालचा ओला मिसरा, समस्त अभ्यास दौर्‍यातील दिपकची हुल्लडबाजी तो सरकारी ए. सी.कॅबिन मधील समोसा बिस्किटावर मारलेला ताव तो अशोकचा सर्वांवर टपून बसलेला कॅमेरा, अधिका़र्‍याची भाषणे ऐकताना लागलेली डुलकी अशा असंख्य गमतीदार गोष्टी दिल्ली दौर्‍यात घडल्या. या सातदिवसीय अभ्यास दौ़र्‍यात धमाल, मनोरंजन, शेरेबाजी तसेच मोठ्या प्रमाणात माहितीरंजन झाले. दिवस रात्र धमाल करून रविवारी आमचा चमू पुण्यात पोहचला. 
रविवार तारीख 10 ची शुभसकाळ दिल्लीत बोच़र्‍या थंडीने झाली. सकाळच्या 7 वाजता आम्ही दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहचलो. सर्वांचे चेहरे दिवस-रात्रच्या प्रवासाने थकले होते. तरी सर्वांच्या चेहर्‍यांवर उत्साह ओसंडून वाहत होता. 
बसमध्ये बसताच बर्वेबाईच्या सूचनेपासून दिल्ली भ्रमणची सुरुवात झाली. बस एन.सी.आर.टी. (हॉस्टेल) मार्गे धावत होती. ‘शार्प 10 वाजता आवरून बसमध्ये हजर राहयचं’ अशा कडक सूचना देऊन बाई सीटवर विसावल्या. दिल्ली दर्शनने सुरवात होणार होती .रजिस्ट्रेशनचे सोपस्कार पार पडल्यानंतर, सर्वांनी रूमचा ताबा घेतला. सिंगल रूममुळे बर्‍याच जणांचा हिरमोड झाला. कारण गप्पा मारता येणार नव्हते. वेळ कमी असल्यामुळे काळाची गरज म्हणून सामूहिक अंघोळीचा आनंद लुटला. पटापट आवरून नाश्ता घेतला व बसजवळ जमा झालो. सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसत होते. 
प्रथम कुतुबमीनारकडे आमचा पर्यटन मोर्चा होता. प्रथम मुस्लीम शासक कुतुबुद्दीन ऐबकने 1193 साली बांधलेला या मिनारची उंची 72.5 मीटर (23.86 फुट) आहे आणि व्यास 14.3 मीटर आहे. जो वरती जाऊन 2.5 मीटर (9.02 फूट) होतो. हा मिनार डोळ्यांचे पारणे फ़ेडतो. सळसळत्या उन्हात आम्ही फोटो काढण्यात मग्न होतो. पूर्ण परिसर फिरून आम्ही बाहेर आलो. समोर असलेल्या जलजिराच्या स्टॉलवर जाऊन एक-एक ग्लास घशात उतरवल्यामुळे जरा हायसे वाटले. आता पुढचा प्रवास लोटस टेम्पल. उन्हाचा पारा चढत होता. ए.सी. बसमध्ये जरा बरे वाटले . कुणालने ओला मिसरा सुरु केला. 
सदाशिव पेठेत मी जेवलो फिका फिका सा, 

वाटेत मज आईचे पुरण सापडले. 

गजलकार सुनील दुधे -
रंजिश ही दिल दुखाने के लिये आ, 
आ फिर मुझे छोड के जाने के लिये आ. 
म्हणत आमच्या आनंदी मनावर प्रहार करत होता. तर मृगयाची सखू पाण्याला गेली. आणि बसच्या पानवठ्यावर गाण्याची मैफल सुरू झाली . बघता बघता लोटस आले. 
रविवार व महाशिवरात्री असल्यामुळे गर्दी खूप होती. कालकाजीमध्ये असलेले या मंदिरात भेट देण्यासाठी दररोजआठ हज़ार लोक येतात. सदर मंदिर ईरानचे बहाउल्ला यांनी 1863मध्ये बांधले. भारतात या धर्माला मानणारा मोठा वर्ग आहे. भर उन्हात अनवाणी फिरत आवारात फोटो काढले. बाहेर येऊन पुदिना सरबतवर मस्तपणे ताव मारला. 
ग्लासभरात अख्खा लिंबू पिळून केलेला सरबत पिऊन तर्र झालो. बसच्या पानवठ्यावर पुन्हा गाण्याची मैफल सुरु झाली. मैफलीच्या सुरात अक्षरधाम कधी आले कळालेच नाही. सुरक्षा व्यवस्था पार पाडून आत गेलो. अक्षरधामचा भौगोलिक विस्तार खूप मोठा होता. ज्योतीर्धर भगवान स्वामिनारायण यांच्या स्मृती मध्ये बांधण्यात आलेले हे मंदिर होते. मंदिराचा परिसर 100 एकरात विस्तारला आहे. या मंदिराची 2007 मध्ये गिनीज बुकात नोंद झाली असून जगातील सर्वात मोठे मंदिराचा मान या मंदिरास मिळाला आहे. 356 फुट लांब, 316 फुट रुंद आणि 141 फुट उंच असे मंदिराचे क्षेत्रफळ आहे. 
दर्शन आटोपून तेथील भोजनावळीत आम्ही जेवणे केली. त्यानंतर दिल्लीची शान असलेल्या लाल किल्याकडे निघालो, बस ड्रायव्हर पांडेजीच्या घिरट्या घालणारी बस आम्हास लाल किल्ल्याच्या दर्शनापासून वंचित ठेवले. त्यामुळे दोन वेळा लाल किल्ला बसमधूनच पाहिला, अशातच वेळ निघून गेली. उशीर झाल्याने पर्यटकांसाठी किल्ल्याची दारे बंद झाली होती. परिणामी आमचा उत्साह मावळला. मन मारून किमान आत तरी जाता येईल यासाठीरात्री सातच्या लेझर शो चे तिकिटे घेत आम्ही चहा साठी बाहेर पडलो. 
शो सुरु होण्यास अवधी असल्याने आम्ही चांदणी चौकात फिरून खरेदी उरकून घेतली. खरेदीनंतर सातपर्यंत किल्यात पोहचलो. शो सुरु झाला लाल किल्ल्यानिर्मिती मागची भूमिका ते मोगल शासकांच्या पतनापर्यंतचा इतिहासाचा प्रवास रेडिओ रूपकाच्या माध्यमातून ऐकला. त्यात ठिकाण दर्शवण्यासाठी लेझर लाईट चा वापर करण्यात आला होता. सरतेशेवटी शो संपल्यावर आम्ही हास्टेलच्या मार्गाला लागलो. हास्टेलमध्ये जेवण संपवून गप्पांची मैफल रात्री 12 पर्यंत रंगली. 
दुसर्‍या दिवशी दहाच्या सुमारास आमची बस हास्टेलहून मस्जिद मोड कडे निघाली. मग काय, पुन्हा कुणालचा ओला मिसरा आणि मृगयाची सखू बसमध्ये अवतरल्याने पुन्हा तीच धमाल. पहिली स्टडी व्हिजिट वर्ल्ड मीडिया अ‍ॅकडमी मध्ये होती.येथे आमच्या विभागाचे विद्यार्था अमेय पालोदकर होते. त्यांनी ही भेट घडवून आणली होती. व्या‘यान ऐकून आम्ही सुचना भवनाकडे निघालो. 
प्रेस कौन्सिलचे चेअरमन माजी न्यायमूर्ता मार्केडेय काटजू यांची भेट घेतली, सुमारे दीड तास दिलखुलास प्रश्न उत्तरे झाली. पत्रकारासाठी शैक्षणिक योग्यता व सनद असणे ही आमची निर्मिती संकल्पना घेऊन काटजूंनी तात्काळ समिती स्थापन करून माध्यमाना चर्चेचा मुद्दा दिला. येथूनच आमच्या यशस्वी अभ्यास दौर्‍याची खर्‍या अर्थाने सुरवात झाली, यानंतर दिल्ली मेट्रोचा प्रवास केला व मेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनुज दयाल यांच्याशी गप्पा मारल्यानंतर सरोजिनी मार्केटला गेलो. खरेदीसोबत आलू चाट, कबाबचा आस्वाद घेतला. 
मंगळवारी पार्लमेंट साठी आम्ही आतुर होतो. सकाळी फ्रेश मूडमध्ये फार्मल वेश परिधान करत आवश्यक ती काळजी घेत आम्ही मार्गस्थ झालो. त्याही आधी, राष्ट्रीय कृषि विज्ञान संग्रहालय पाहिल्यानंतर लोकसभेत जाऊन कामकाज पहायचे होते. संग्रहालय पाहून लोकसभेकडे निघालो. कडक सुरक्षा व्यवस्था पार करून लोकसभा संग्रहालयात पोहचलो. 
इतक्यात बातमी आली कानावर आली की लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. निर्भया बलात्कार खटल्यातील आरोपी मुकेश कुमाने आत्मह्ताय कली होती हा मुद्दा विरोधकांनी संसदेत लावून धरला.. परिणामी गोंधळ वाढल्याने संसदेचं कामकाज तहकूब झालं होतं. या बातमीनेच आमच्या उत्साहाला उतरती कळा लागली. 
दाराजवळ येऊन लोकसभा पाहता आली नाही, याची खंत वाटली. ही खंत आयुष्यभर राहिल, भविष्यकाळात टीव्ही वरुन लोकसभेचे कामकाज पाहण्याची संधी अनेकवेळा येईल, पण देशाचा रहाटगाडा हाकणार्‍या या सभेच्या प्रत्यक्षदर्शी होण्याच्या संधीला आम्ही मुकलो होतो. महाराष्ट्र परिचय केंद्र, ऑस्ट्रेलियन हाय कमिशन, योजना भवन, पीटीआय, कृषि भवन, एन.डी.ए., इलेक्ट्रानिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर, निर्वाचन सदन, एन.डी.टी.व्ही. न्यूजरुम अशा विविध ठिकाणी भेटी या चार दिवसात देता आल्या. 
या अभ्यास दौर्‍यात व्यक्ती व अधिकार्‍यांच्या भेटी लक्षात राहितीलच पण, बस आणि बाहेरील धमाल, माहिती व ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरेल अशी आहे. अभ्यास दौरा म्हटले की असाईण्ट्मेट, अहवाल, चर्चा, मुलाखती नुसती कटकट वाटते पण आम्ही उत्साहाने यात सहभागी झालो. 
आमची बसमधील शेरेबाजी हॉस्टेल मधील रात्री उशिरापर्यंत चाललेली गप्पाची मैफल आयुष्यातील अविस्मरणीय घटना ठरतील. संपूर्ण अभ्यास दौर्‍यात खूप मजा केली. शेवटचा दिवस म्हणजे आग्रा टूर आमच्यासाठी विविध कारणासाठी आठवणीत राहण्यासारखी आहे. यात फतेहपुर सिक्री, आगरा किल्ला, (शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे ताज पाहता आला नाही याची खंत लोकसभे सारखीच राहिल.) तसेच वर्गात अधून मधून येणारा मित्रांचा सहवास या आठ दिवसात दिर्घकाळ लाभला अनेकांची मने जुळली काही होते तसेच राहिले. 

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अय दिल्ली, तेरे शहर में यादे छोड आए!
अय दिल्ली, तेरे शहर में यादे छोड आए!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6kqA3PEDVbGxjv2ld8nYgo_4ZQMNurDpplG0CS-QAyiEEfD7MHuM0CSQAbbwDdwZQ_HVSairLg25gd_Eudwozf14v6M3dUYxhL0Tg0m8v0Um0JPHn6sfqPT-tUB9cpEiQAGPFHHyNxLEb/s640/UOP+Delhi+Toor.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6kqA3PEDVbGxjv2ld8nYgo_4ZQMNurDpplG0CS-QAyiEEfD7MHuM0CSQAbbwDdwZQ_HVSairLg25gd_Eudwozf14v6M3dUYxhL0Tg0m8v0Um0JPHn6sfqPT-tUB9cpEiQAGPFHHyNxLEb/s72-c/UOP+Delhi+Toor.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2013/04/normal-0-false-false-false-en-us-x-none_17.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2013/04/normal-0-false-false-false-en-us-x-none_17.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content