महिला दिन विशेष : स्त्री मुक्तीचं तत्वभान



व्हॅलंटाईनच्या दिवशी पुण्यातील जे एम रोडवर एक पंचविशीतला तरुण हातात माईक घेऊन वन बिलीयन राईझिंग कॅम्पेनच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि डोमेस्टीक वायलन्सला विरोध करण्यासाठी जीव तोडून गातोय. सोबतीला शंभर-एक तरुण तरुणी बेधूंद होऊन फ्लॅश मॉब करत आहेत. व्हॅलंटाईनला हे काय नवं म्हणून प्रत्येक येणारा-जाणारा पॉझ घेऊन यांच्याकडे बघत होता. तर दुसरीकडे याच तरुण वर्गातील भाऊबंद पॅरलल असलेल्या एफ.सी. रोडवर कमोडिटी मार्केटच्या आहारी जाऊन इमोशन कॅश करत फिरत होता. 
त्या दिवशी अर्थात चौदा फेबला जगभरात वन बिलीयन राईझिंग कॅम्पेन घेऊन दोनशे देशातील कोट्यावधी लोक रस्त्यावर आले नाचले, गायले, मिरवणुका काढल्या. घरकामगार, बचतगटातल्या महिला, महाविद्यालयीन युवक, स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्या, चित्रपट, नाटय, कला, इत्यादी क्षेत्रांतील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक मोठया संख्येनं आणि उत्साहानं या मोहिमेत सामील झाले. हिंसेचा अनुभव घेतलेल्या प्रत्येकीला विश्वास देण्यासाठी, तिच्या हिंसेविरुद्धच्या लढयात साथ द्यायला जगभरातून व्यक्ती आहेत हा विश्वास देण्यासाठी कोट्यावधी लोकं रस्त्यावर आले होते.
येत्या रविवारी दरवर्षी प्रमाणे कॅज्युअली महिला दिन साजरा होईल, काहींसाठी सणावारासारखं नटण्या मुरडण्याचं सेलीब्रेशन किंवा मिळून सार्‍याजणी पिकनीक नाही अथवा लेट नाईट पार्टी असा बेत ठरला असेलच. काहींसाठी व्याख्याने, सभा, संबोधने, चर्चासत्र वाटलच तर एखाद्या वृत्तपत्रात महिलाविषयक कॉलम लिहून मोकळं विषेश व्याख्यानात नेहमीप्रमाणे महिलाकेंद्री भाषणं केली जातील. सानिया मिर्झा, कल्पना चावलासह जगातील कर्तृत्ववान महिलांची यादी वाचून दाखवली जाईल. 
त्यांनी घेतलेल्या उत्तुंग भरारीचे किस्से सांगितले जातील. दिवसभर देशभरातील महिला अत्याचाराच्या घट्ना पढवून दिवसभर चिंतन मोहीम राबवली जाईल. दिवस सरता घरी जाऊन नेहमीप्रमाणे पुरुषांचे बायकावर खेकसणं आणि स्त्रीने निमूटपणे सहन करण्याचे प्रयोग सुरु होतील आणि झालं एकादाचं आठ मार्च, सोपस्कार सरला म्हणून निवांत सुस्कारा सोडला जाईल. पण महिला अत्याचारावर समाजशात्रीय अध्ययन, डोमेस्टीक वायलन्सवर कृतीशील कार्यक्रम तयार करुन ते राबवण्यात आम्ही कुठेच नसू. 
जवळ-पास होत असलेल्या हिंसेवर आपण गप्प असतो. घरात होणार्‍या महिला हिंसेला विरोध करताना आपण कुठेच नसतो. याविषयावर बोलण्यासाठी फक्त आठ मार्च हाच दिवस का उगवावा लागतो. एरवी आपण ग्रुपमधे मित्र-मैत्रिणीत होत असलेल्या चर्चेत मी किती मोकळ्या मनाचा/ची हे सिद्ध करण्यासाठी किंवा पटवून देण्यासाठी समान वागणुकीच्या गप्पा करतोच ना. मग घरी आल्यावर कृतीशील कार्यक्रम का राबविला जात नाही. स्त्रीमुक्तीची घोषणा फक्त सभेत मांडण्यापुरतीच असते का? प्रत्येकांना स्त्रिमुक्ती व्हावी वाटतं पण शेजारच्या घरात. कारण आपल्या कथीत पुरुषी अहगंडाचं आपल्याला प्रेम असतं त्यातून सुप्तपणे का होईना आपणच स्त्री शोषणाचं समर्थन करत असतो.
स्त्रियांना सतत वाटते की, आपण शोषणाचा कधीतरी बळी होतो, त्यामुळे सत्ता हातात आली की मीदेखील शोषणच करणार हे ठरलेलं असतं. खरं म्हणजे अधिकार आणि सत्ता यातून शोषणाला मार्ग मिळतो. पितृसत्ताक व्यवस्थेनं महिलांनी समाजात कसे वावरावं याचा आराखडा आखून ठेवला आहे. व त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा स्त्रीकडेच देवून ठेवली आहे. सोबत या यंत्रणेला संस्कृतीचं अधिष्ठान प्राप्त झाल्यानं समाज म्हणवणार्‍या यंत्रणेचं कडं आणखीण मजबूत झालं. त्यातून पुरुषप्रधान समाजरचनेला अधिक बळ प्राप्त होऊन शोषक समाजाची निर्मीती झाली. मग त्यात महिलांनी आपली स्वनियमाची घुसळन केल्यानं एक नवीन एक्सप्लॉयटेशन कल्चर उदयास आलं. 
वर्षानुवर्षापासून याच कथीत रचनेची संस्कृतीच्या नावानं पाठबदली सुरु आहे. तो मुलगा आहे कसाही वागला तरी चालेल तू मुलगी आहे तुला हे शोभत नाही, तू परक्या घरचं धन, त्यामुळे तमकं करु नये. मुलींनी असंच वागायला पाहिजे. असंच राहायला पाहिजे. मुलींचा असा भावनिक कोंडमारा आजतागायत सुरु आहे. नव्वदीनंतर खाजगी टीव्ही चॅनल्सच्या डेली सोप ओपेरामुळे अशा प्रकारच्या सुप्त हिंसेला अधिक बळ प्राप्त झाले. प्रत्येक मालिकेत महिलेचं ग्रे शेड असणारं पात्र हमखास वावरत असते. 
कधी ती महिला बहिण असते तर कधी ननंद-भावजय तर कधी मामी, काकू, मावशी इत्यादि तत्सम पात्रांनी अधिकार, वर्चस्व, कलह संस्कृती वजा विकृती यांचा होमवर्क करुन दिल्यानं सुप्त शोषण अधिकच वाढीस लागलं. या चॅनल्सनी इमोशन व कुटुंबकलह विकून बाजारात भरपूर नफा कमावला त्यामुळेच सुमारे पंधरा वर्षापूर्वी सुरु झालेल्या च्या पठडीतल्या सिरियल्सची अजूनही चलती आहे. नातेसंबधात तुच्छतावाद, पोकळी निर्माण करण्याची परंपरा आजतागायत अविरतपणे सुरु आहे. तुटणारे नातेसंबध, वैवाहिक कलह निर्माण करण्यास अशा मालिकांचा किती टक्के वाटा आहे, याचं वेगळं समाजशात्रीय संशोधन व्हायला हवे. त्यानंतर धक्कादायक रिझल्ट आपल्यासमोर असतील.
सत्ता आणि शोषण या एक नाण्याच्या दोन बाजू असतात. सत्तेच्या अहंगडातून शोषणीय वृत्ती कळत-नकळत आपल्यामध्ये वाढायला लागते. राबवणं, सत्ता गाजवणं, वस्तू म्हणून ट्रीट करणं, गरज म्हणून पाहणं अर्थात हे त्यातूनच आलं आहे. अधिकार गाजवणं, चीड-चीड, उणे-दूणे, आरोप-प्रत्यारोप, सततच्या तक्रारी, तिटकारा, द्वेशभाव या सगळ्या गोष्टी अहंगडातून येतात. त्यातूनच सत्ता गाजवण्याची संप्रेरके उफाळ्या मारु लागतात व शेवटी विचारावर आणि व्यक्तीवर सत्ता प्रस्थापित करुन शोषणाच्या दिशेनं वाटचाल सुरु होते. आणि आपल्याच कॅरेक्टरला नको असलेल्या गोष्टी आपण कळत-नकळत करायला लागतो. कारण आपण व्यवस्थेचे आहारी गेलेलो असतो. त्यातून भोगवाद, पुरुषसत्ताकतेचा पगडा, वर्चस्ववादी दृष्टीकोन रुढ व्हायला लागतो. आणि वर्चस्वाच्या लढाईतून शोषणाचा जन्म झाला होतो.
समाजात महिलांना नेहमी दुय्यम समजलं गेलं आहे, आई, बहिण, बायको, प्रेयसी किंवा मैत्रिण ती कोणत्याही रुपात असेल तरी तिची ही सामाजिक संरचना काही बदलत नसते. डोबळमानाने या सर्व अवस्थेला स्त्रीने स्वत:च खतपाणी घातले असंही म्हणता येईल. कारण मार्केटची विक्रय वस्तु अर्थात कमोडीटी म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेनं महिलेला उभं करुन तिची बोली लगावली. स्त्रीने स्वत:ला त्या व्यवस्थेच्या अधिन करुन स्वतंत्र झाल्याचं जगाला भासवलं. संस्कृतीचं अधिष्ठान समजली जाणारी स्त्री चप्पलापासून थेट रेझर टायर विक्री करु लागली. ग्राहकांना मल्टीब्रँड घेण्यास प्रवृत्त करु लागली. 
कामुकता, स्वप्ने, कुंठा विकू लागली. सोबतच स्वतंत्र असल्याचा कागांवा करु लागली. भरघोस आर्थिक मोबदला देवून पुरुष स्त्रियांचा व्यवसायिक वापर करु लागले. आपण पितृसत्ताक व्यवस्थेचा बळी ठरलोय हे कळायला महिलेला अजूनही उसंत मिळाली नाहीये. जिथं स्त्री स्वत:ला स्वतंत्र समजत असे आज त्याच क्षेत्रात ती मल्टीलेअर्डपणे शोषक म्हणून वावरु लागलीय. एका संशोधनानुसार ग्लॅमर जगातात स्री सर्वात जास्त असुरक्षित असल्याचं धक्कादायक निकाल बाहेर आले आहेत. 
1958 सालीच साहीरने म्हंटलं होतं “औरतो ने मर्दोको जनम दिया, मर्दोने औरतो को बाजार दिया” असे असतानाही स्त्रीनं आपला व्यवसायिक वापर होऊ दिला. आर्थिक सुबत्तता आलीय परंतु विचारांची आणि वागण्याची स्वतंत्रत्तेचं काय? स्त्रीमुक्तीचं काय? ते शेकडो वर्षे झालीत अजूनही महिलेला जाचकतेचं जोखंड तोडता आलं नाही. अलिकडे आलेल्या पाश्चिमात्य अनुकरणाने हे जोखंड आणखीण दृढ केलं आहे.
जगातील तीनपैकी एका महिलेला शारिरीक मारहाण किंवा बलात्काराला समोरं जावं लागतं, असं संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाहणीत समोर आलं आहे. आतापर्यंत जगातील एक अब्ज महिला अशा प्रकारच्या छळांला सामोऱ्या गेल्याचा अंदाज आहे. स्त्रियांवरील हिंसा हा जगभरात सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र कोणत्याच देशासाठी हा सर्वात महत्त्वाचा विषय कधीच झाला नाही, सहनशक्तीची परिसीमा झाल्यावर त्याविरुद्ध आवाज उठवलेल्या, त्याला विरोध करणार्‍या महिलांपुरताच हा विषय मर्यादित राहिला आहे. 
प्रत्यक्षात याहून कित्येक पटीनं जास्त महिला या गर्तेतून स्वत:ला बाहेर काढू शकत नाहीत. उच्चशिक्षित, नोकरदार महिला डोमेस्टीक वायलन्सला बळी पडल्याच्या बातम्या माध्यमात सिंगल कॉलम ले-आऊटचा भाग बनून जातात. अशा महिला अन्यायाला आपलं दैव व नशीब म्हणून हिंसा सहन करत राहतात. एखादा धीर देणारा खांदा (तो परपुरुषाचा खांदा असला तर महिला अजून शारिरिक व भावनिकदृष्ट्या लुटले जातात) पाठिंब्याचा हात मिळाल्यावरच या अन्याय-अत्याचारांना वाचा फुटते, अन्यथा अन्याय सहन करण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत असल्याचे दाखले घरातील वरीष्ठ महिला मंडळाकडून मिळत राहतात. 
अत्याचाराला वाचा फुटल्यास मुली व महिलांवर होत असलेल्या हिंसाचारावर प्रकाश पडतो. त्यांना पोलीस, कायदा, वैद्यकीय मदत मिळते. बाकी प्रकरणांचा आवाज निर्भयासारखा बुलंद केला जात नाही, किंवा सोयीस्कररित्या माध्यमं विस्मृतीत ढकलण्यास भाग पाडतात. महिला चळवळीदेखील निवडक प्रकरणावर आंदोलने करतात. अजूनही कितीतरी निर्भया न्याय्य मागणीसाठी रडत आहेत त्याची दखल घेण्यास संघटना पुढे येतील का? हा प्रश्न अजुनतरी अनुत्तरीत आहे.  

कलीम अजीम, पुणे

Follow On Twitter @kalimajeem


याच आशयाचे दोन लेख आजच्या दैनिक प्रजापत्र आणि दैनिक विवेक सिंधु मधे प्रकाशित

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: महिला दिन विशेष : स्त्री मुक्तीचं तत्वभान
महिला दिन विशेष : स्त्री मुक्तीचं तत्वभान
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBvJCF6J0V-WrmvH1TnIrQQI37XLGi0TdidOyZMrt7Vz2XmcVRmaNVd7ak3l4f5-ppAyeS3u3SJuu90nUIOZId0-fg90OfBCaSXoXt3n7xhHb9G9KjfWlMfUiWbPH6fnsfl6kwsydDVHD7/s640/womensday1583643243016.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBvJCF6J0V-WrmvH1TnIrQQI37XLGi0TdidOyZMrt7Vz2XmcVRmaNVd7ak3l4f5-ppAyeS3u3SJuu90nUIOZId0-fg90OfBCaSXoXt3n7xhHb9G9KjfWlMfUiWbPH6fnsfl6kwsydDVHD7/s72-c/womensday1583643243016.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_8.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/03/blog-post_8.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content