आम्ही हॉस्टेलवासी - दर्दवाले मरहम

अंबाजोगईहून व्हाया औरंगाबाद पुण्यात आलो. सध्या पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचा विद्यार्थी आहे. कहाणी आगे जारी हैं. 
‘थ्री इिडयट्स’वाले रॅन्चो जागोजागी अंघोळ करतात. टॉयलेट-बाथरूमबाहेर रांगा आणि एकाच गिझरवर अनेक बादल्यांच्या उड्या रोजच्याच. ‘आपलं ते आपलं, दुसऱ्याचं तेही आपलं’ हे मान्य करावं; आणि रूमच नव्हे; तर जगणंच शेअर करायला शिकावं.बास !. मजा येते !
हॉस्टेलची रुम म्ह्टलं की डोळ्यासमोर येतं, अस्तव्यस्त पडलेलं सामान कचर्‍यातून डोकावणारी सिगारेटची थोटकं, भिंतीवर पालीसारख्या चिटकलेल्या अर्धनग्न नट्या, मळक्या दिवारवर टांगलेले मळकट कपडे, दोरीवर सुकणारी अंडरविअर-बनियन, कागदाच्या ढिगार्‍यातून बाहेर येऊ पाहत असलेलं एखादं पुस्तकाचं पान, पिचकार्‍यांनी कोपरा रंगलेला. त्यात शेवटची घटका मोजत पडलेलं एखादं पेन असा लवाजमा जगातील कोणत्याही हॉस्टेलमध्ये सारखाच असेल. याशिवाय हॉस्टेलचं रुम शक्यता फ़ार कमी. 
सुरवातीला हॉस्टेलचा अन माझा छ्त्तीसचा आंकडा, हॉस्टेल आणि मी केमिस्ट्री जुळली ती औरंगाबादमध्ये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीत पत्रकारितेच्या पदवीसाठी प्रवेश घेतला. अन सोबत हॉस्टेलला. वर उल्लेखित केल्याप्रमाणे काहीच वेगळं नव्हतं. प्रथम रुम बघून मी दचकलोच. प्रथमच घराबाहेर पडलो होतॊ. हे सगळं बघून मला किळस आला. पण पर्याय नव्हता. 
वाचा : विद्यार्थी निवडणूका : नव्या नेतृत्वाची गरज
वाचा : विद्यार्थी जंक फूडच्या आहारी का जातो?
वाचा : पुण्यातील स्थलांतरित विद्यार्थ्यांची दशा
आणि पळ काढला
घरातील सुखसोयी सोडून शिक्षणासाठी बाहेर आलो होतो. बाहेरील या परिस्थितीशी दोन हात करणे भागच होतं. विद्यापीठाचा परिसर फ़ारच सुंदर पण उलटपक्षी विद्यापीठातील वसतीगृह होतं. पहिल्याच दिवशी मी तिथून पळ काढला. शेजारीच असलेल्या विद्युत कॉलनी मधील अलमगीरमध्ये आलो. हे खाजगी हॉस्टेल होतं, इथल्या रुम छोट्या पण व्यवस्थीत व नेटक्या होत्या. 
आम्ही टोटल दहा जण येथे होतो. सगळेच मनमिळावू होते. एकत्र खाण्यापासून ते बसणं उठणं सगळच सोबतच व्हायचं कोणाला यायला उशीर झाल्यास जेवणासाठी सगळेच थांबायचे, (एका ताटात जेवणे मी प्रथम इथं शिकलो.) एका कुटुंबासारखे आम्ही वावरत होतो. आमचे हे हॉस्टेल घराबाहेरच घर होतं. यातच तीन वर्षे कसे गेले कळालेच नाही. 
औरंगाबाद सोडताना मन भरुन आलं होतं. असच एक-एकजण दरवर्षी कमी होऊन नवीन येत असत. पण ती प्रेम व माया आजही अलमगीर जपून आहे. पुढील शिक्षणासाठी मी पुणे गाठलं, इथ यापेक्षा उलट परिस्थीती होती. औरंगाबाद सोडून पुण्यात जाताना मनात अनामिक भीती होती. (साहजिकच हॉस्टेलबद्दल) मराठवाड्यातल्या अंबाजोगाई सारख्या छोट्या शहरापासून व्हाया औरंगाबाद पुण्यापर्यंत येऊन पोहचलो होतो. 
पुणेरी वातावरणात मला अ‍ॅडजस्ट होता यॆईल का? हा विचार प्रथम डोक्यात खूळ मारुन बसला होता, आता पुणं माझ पुढील भवितव्य ठरविणार होतं. हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी मन सॉलिड पक्क केलं होतं, अजून दुसरा पर्यायही नव्हता, भाड्याच्या खोलीत राहायचं म्हणजे आपली औकात नव्हती. तसेच पुण्यात नातेवाईक मित्रमंडळी खूप होती. पण स्वत:च्या खुद्दारी वर शिकायचं होतं, कोणाच्या कुबड्या घ्यायच्या नव्हत्या आणि मला हुकलेली हॉस्टेल लाईफ़ एंजाय करायची होती. 
पी.जी.चे शिक्षण म्हणजे आयुष्यातील शेवटची हौस हा अलिखित नियम आहे. यानंतर इच्छा असूनही मौज-मजा करायला बॅन असते. म्हणतात या वयात माणूस खूप सॅन्टी होतो. पुणे विद्यापीठात माझं मिशन-अ‍ॅडमिशन पार पडले. वसतीगृह क्र. 6 मला देण्यात आले होते. पुणे विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात एका टोकाला हे हॉस्टेल होतं.
एकाच रुममध्ये दहाजण
पहिल्याच दिवशी खूप मजेदार व अविस्मरणीय प्रसंग घडला. जसं बामुचं हॉस्टेल तसंच पुण्याचं होतं, जराही बदल नाही. हॉस्टेलला रात्री 10 वाजता पोहचलो. कानोसा घेत रुममध्ये शिरलो. 
सकाळी टाकून गेलेल्या बॅगमधून अंथरुण-पांघरुन काढलं. गेटवरुन विद्यापीठाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या हॉस्टेलपर्यंत पोहचेपर्यंत दम निघून गेला होता. रुममध्ये माझ्याव्यतिरिक्त असलेल्या एकाशी जुजबी ओळख करुन मी कॉटवर आडवा झालो. पडताच झोप लागली. 
अचानक रात्री दोनला जाग आली. उठून बसलो, खाली पाहताच दचकलो. फ़ुटपाथवर झोपल्याप्रमाणे बरेच जण झोपले होते. बोटांनी सगळ्यांना मोजलं. मी शॉक झालो...! परत मोजून खात्री केली. गणित बरोबर होतं. एकूण दहाजण एका लायनीत झोपले होते. 
मी सॅकमध्ये हात घालून सकाळी हॉस्टेल ऑफ़िसमधून घेतलेली यादी पडताडून पाहिली. माझ्यासहीत चार जणाला रुम इश्यू करण्यात आली होती. मी तिसराच होतो. अजून चौथा येणं बाकी होतं. आयला ही काय भानगड म्हणून मी वैतागलो. हे दहाजण कोण? मला मध्यरात्री दोनला प्रश्न पडला, मी घामाघूम झालो. झोप येत नव्हती. पण प्रयत्नशील होतो. 
वाचा : आदिवासी मुलांचे शिक्षण आणि मेस
वाचा : वन वे तिकीट - घरदार सोडून स्वप्नामागचा प्रवास
वाचा : वन वे तिकीट - शहरातलं एक खोपटं!
हळूहळू रुळत गेलो
पहाटे चारला लागलेला डोळा सहाला मोराच्या सुंदर आवाजाने उघडला. उठून खिडकीबाहेर पाहिले. मोर दाणे टिपताना दिसत होते. मनाला प्रसन्न वाटले. गुडमॉर्निंग झालं होतं. औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये फ़क्त मोराचे आवाज ऎकले होते. पण प्रत्यक्षात पुणे विद्यापीठात पाहता आले. बाकावर रात्रीचा तोच जुजबी ओळखीवाला एकटाच अभ्यास करत बसला होता. बाकी रुममध्ये सामसुम होती. 
सहा वाजताच ते दहाजण कोठे गेले या विचारात होतो. ते भयान स्वप्नच ठरावे या आशेने त्यास चौकशी केली. ते रात्रीचे दहाजण... माझे वाक्य संपण्याआधीच तो हसू लागला व खुरचट आवाजात बोलला. "धीरे धीरे सब समझ जाओंगे." मी गप्प; माघार घेतली. उठून बाहेर पडलो. 
बाहेर थ्री इडियट्स वाले रॅन्चो जागोजागी अंघॊळ करत होते. टॉयलेट व बाथरुमच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. एकाच गिझरवर बादल्या ऊडी पडल्या होत्या. या सगळ्याबद्दल ऎकूण-बघून होतो. यामुळे काही वाटले नाही. हळूहळू हॉस्टेलमध्ये रुळत गेलो. सामुहिक टॉयलेट- बाथरुमवर रांगा लावणे हे नित्यनियम झाले होते. 
गेटवरुन माझं हॉस्टेल 3 किमी लांब होतं हॉस्टेल समोर बस स्टॉप असल्यामुळे P.M.T. आत येत असत. आमचा विभाग डेक्कनला असल्यामुळे दररोज बाहेर जावे लागे, कधी-कधी खूप वैताग यायचा, पण बरं झालं डिपार्टमेंट बाहेर होतं, त्यामानाने बाहेरचे पुणं तर पाहता आले. बाकीजण क्वचीतच बाहेर पडे. आमच्या 6 नंबर वाल्यांना बाहेरचे पुणं फ़क्त गावाकडे जाण्यापुरतं माहीत होतं.
त्या दहाजणाबद्दल एका आठवड्यांनी माहीत झाले. ते जयकर ग्रंथालयाचे मेंबर होते. जयकर बंद झाल्यावर ते रुमवर यायचे व सकाळी परत जयकर हाच त्यांचा उद्योग. म्हणजे अवघे सहा तास ते रूममध्ये असत, तेही झोपण्यापुरते. ते स्पर्धा परिक्षा, सेट-नेट वाले होते, यांना विद्यापीठाच्या भाषेत पॅरासाईड (अनधिकृत) म्हटले जाई. असे पॅरासाईड इथं मोठ्या संख्येने प्रत्येक हॉस्टेलला आहेत. जास्त वसतीगृह क्र. 6 ला असतात. हे हॉस्टेल कधीच रिकामे होत नाही. 26 जानेवारी 2013 ला कुलगुरुंनी मागील पाच वर्षापासून परासाईड असलेल्यांना हॉस्टेलमध्ये राहण्याची अधिकृत मुभा दिली आहे. 
सगळंच हक्काचं
रोज सकाळी इथं तेल-पेस्ट विसरलो, तुझ दे बरं, उद्या आणतो म्हणून दररोज तेच-पेस्ट तेल त्याच वाक्यासोबत वापरलं जाते, कधी हक्कानं बॅगमध्ये हात घालून घेतले जाते. वेळेप्रसंगी पैसा, कपडे वापरणारे फ़ुकटचंद बरेच आहेत. मोठमोठ्या गप्पा मारणारे फ़ेकुचंदही खूप आहेत, नेहमी प्रत्येक वस्तू उसने मागणारे उधारचंद ही मोठ्या प्रमाणात आहेत. एकच इस्त्री पुर्ण हॉस्टेलभर फ़िरते तर कधी एकच बादली सगळ्यांना अंगोळ घालते. कधी कुणाचा सायलेन्सर सहन करावा लागतो तर कोणाचे ट्रॅक्टरसारखे घोरणे.
हॉस्टेलमध्ये शिरताच पहिला प्राणी भेटतो तो रुममेट, या रुममेटसोबत आपण रुम नव्हे जगणे शेअर करत असतो. हा जसा चांगला तेवढाच कधी-कधी वाईट असतो, "हम सही तो जग सही" आपण इतरांशी चांगले वागलो तर बदल्यात तोही चांगला, अन्यथा एकत्र राहणे फ़ार मुश्किल. 
काही रुममेट खूपच भन्नाट असतात. इथं रुममेटच मित्र नसतो, तमाम हॉस्टेल एक मित्रपरिवार असतो. काहीजणांच्या रुम सतत उघड्या असतात. तर काहींच्या नेहमी बंद, काहींना तर शेजारी कोण राहतो त्याचे नाव, डिपार्टमेंटसुध्दा माहित नसते तर काहींना सगळ्यांची नावे तोंडपाठ असतात. 
सध्या हॉस्टेलमध्ये पुस्तकासोबत फ़िल्म शेअरिंग मोठ्या प्रमाणात सुरु झालं आहे. वसतीगॄह आता मोठ-मोठी मल्टिप्लेक्स झाली आहेत. पाहिजे ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फ़िल्म क्षणात सापडते, नसता डाऊनलोड केली जाते. रात्री लॅपटॉप, पी.सी.वर दररोज अनेक फ़िल्म एकत्र बसून पाहिल्या जातात. 
वाचा : अय दिल्ली, तेरे शहर में यादे छोड आए!
वाचा : 'NEET'ची परीक्षा अन् विद्यार्थ्यांशी दुर्व्यवहार
वाचा : आधुनिक मदरसे... एक नवी पहाट!
इथं हॉस्टेलमध्ये भविष्याची दिशा ठरवली जाते, इथं कलागुणांना वाव मिळतो. इथं प्रेम संबधापासून ते जागतिक घडामोडींवर चर्चा होते, चळवळी, (भारतात जे.एन.यु. आणि अलीगड विद्यापीठातील हॉस्टेल ‘चळवळी’साठी मोठी प्रसिध्द आहेत.) अंदोलने कार्यकर्ते, वक्ते, अभिनेते, विचारवंत, कवी (अपघाती) हॉस्टेलमध्येच जन्मतात. इथं पवित्र ज्ञानदानासोबत वैचारिक दिशा जन्मते. 
इथं भूमिका ठरविल्या जातात. डी.आर. यु.आर.च्या माध्यमातून नवे नेतृत्व इथेच तयार होते. माझ्या मते हॉस्टेल सर्वात मोठं विद्यापीठ आहे. कास्टीजम इथं पाळलं जात नाही, सर्व इजम इथं गुण्यागोविंदाने नांदतात. एकाच ताटात सर्वजण जेवतात. स्वत:ची कामे स्वत: करावीत हे इथेच येऊन शिकता येते. 
शिस्त काय असती ती इथं शिकता येते. (एखादा रुममेट शिस्तशीर असला तर) तसेच पाण्याची काटकसर करता येणं आम्हाला शक्य झालं (नसता पारुसं बसावं लागे) टॉयलेटमध्ये गेल्यास पुर्ण बकेट भरल्याशिवाय पँट न काढणे हा नियम देखील आम्ही इथंच शिकलो. काटकसर, जुळवून घेण्याची कसब, त्याग अ‍ॅडजस्टमेंट, सेटलमेंट, मित्रभाव ते आम्हाला हॉस्टेल मुळे शिकता आले. इथं भेटलेले मित्र आयुष्यात न विसरण्यासारखे असतात. अगदी जिवाभावाचे मित्र येथे जुळतात.
अनेक गमतीशीर घटना इथं दररोज घडत असतात. नोटीस बोर्डवर नेहमी मजेदार सूचना फ़लक, नोटीसी असतात. कुणाची पँट चोरीला गेली असते, तर कुणाचा दाढी करायचा ब्रश, तर कुणाचे केटरिंगचे कार्ड, तर कुणाची किल्ली, (दररोज एखादं कुलूप तुटतच असतं) नोटीसवर खाली तारांकित अक्षरात परत देण्याची बक्षिस स्वरुपातील विनवणी असते. 
इथं वाढदिवस, ब्रेक-अप, सेटींगचे सेलिब्रेशन दररोज साजरे होतात. हिरवळीच्या (मुलींच्या) गप्पा मध्यरात्रीपर्यंत चालतात. बरेच दर्दी दिल दररोज छलकतात. प्रेमभंगाच्या गोष्टी इथं अनेक आहेत, (याबद्दल मला यशराज बॅनरला सांगावेसे वाटते) असा आमचा छोटेखानी हॉस्टेल परिवार (इथं अनेक खाजगी गोष्टी शेअर करु शकत नाही, प्लिज माफ़ करा) असे आम्ही हॉस्टेलवासी.
आम्ही सगळे हॉस्टेलवासी ऎकमेकांना आपसात बांधलो गेलो आहोत. आमच्यासाठी इथं आम्हीच आहोत. विविध शहर, प्रदेशातून येऊन जात धर्म विसरुन आत्मीय नातं इथं फ़ार लवकर निर्माण होतं. त्यामुळेच सुट्ट्यात सुध्दा घरी जावेसे वाटत नाही. घरी गेलोच तर लवकर येण्याची घाई असते.

(सदरील लेख 21 जून 2013च्या लोकमत ऑक्सीजनमध्ये प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आम्ही हॉस्टेलवासी - दर्दवाले मरहम
आम्ही हॉस्टेलवासी - दर्दवाले मरहम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMaa7KMdmb-Gx3rGO1zD0Q_7C9cxAEt9ys8nHqVeR9qZjvMlf5l2IBOY7oF354lhKPRiZztfcENSyDUfHc-Twc6mEKCQB2NlwfY-6Yx9vNWPpDdAT6Z67q8ArFmC3C2Z6yQQ6rW2DNVjNS/w640-h410/Hostel+UOP.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjMaa7KMdmb-Gx3rGO1zD0Q_7C9cxAEt9ys8nHqVeR9qZjvMlf5l2IBOY7oF354lhKPRiZztfcENSyDUfHc-Twc6mEKCQB2NlwfY-6Yx9vNWPpDdAT6Z67q8ArFmC3C2Z6yQQ6rW2DNVjNS/s72-w640-c-h410/Hostel+UOP.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2013/06/blog-post_21.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2013/06/blog-post_21.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content