चरित्रकारांनी दुर्लक्षित केलेले टिळक


हिल्या महायुद्ध काळात भारतीय राजकारणात अनेक घटना घडत होत्या. त्याच वेळी देशात ‘स्वराज्य’ मागणाऱ्या चळवळी सुरू झाल्या. याचा भाग म्हणून हसरत मोहानी यांनी ब्रिटिश सरकारवर टीका करणारा एक लेख आपल्या ‘उर्दू ए मुअल्ला’ या वृत्तपत्रात प्रकाशित केला.

इंग्रज सरकारला तो प्रचंड झोंबला. सरकारने मोहानीवर खटला भरला. त्यांना लेखकाचं नाव विचारलं. संपादक म्हणून मोहानी यांनी लेखकाचं नाव उघड करण्यास नकार दिला. परिणामी त्यांच्यावर कारवाई झाली. त्याच काळात देशात स्वराज्य मागणाऱ्या अनेक चळवळी सुरू झाल्या. त्यात टिळकांनीही आपला आवाज सामील केला.

मोहानी टिळकांना मार्गदर्शक मानत होते. मोहानी जहालपंथी होते. विद्यार्थी दशेपासून राजकीय चळवळीशी जोडले गेले होते. आपल्या वृत्तपत्रातून जहाल लेखन करत.

‘संपूर्ण स्वराजा’ची मागणी करणारे हसरत मोहानी पहिले राजकीय पुढारी होते. स्वराज्याच्या मागणीवर त्यांचे टिळक व नंतर गांधी-नेहरूंशी मतभेद झाले. त्यातून त्यांनी काँग्रेस सोडली कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.

‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे....’ ही लोकप्रिय घोषणा त्याच काळात टिळकांनी दिली.



मोहानींनी टिळक विचार उर्दूमधून देशभरात पोहोचवण्यात प्रचंड मेहनत घेतली. उर्दू भाषेतील टिळक विचारांनी ब्रिटिश आमदानीत खळबळ उडवून दिली. मोहानी सर्जनशील लेखक, विचारवंत होते. त्यांनी चिळक विचार आपल्या पद्धतीने मांडले.

वास्तविक, मोहानी यांनी टिळकांना उर्दूमध्ये आणल्याने एक वेगळे टिळक मुसलमानांना दिसले. मोहानी यांनी टिळकांवर विपुल लेखन केलं होतं. या लेखनातून टिळकांची मुस्लिमविरोधी प्रतिमा काहीअंशी शिथिल करण्यात मोहानींचा हातभार लागला.

१९२५च्या आसपास दोन वर्ष मोहानी येरवडा जेलमध्ये होते. त्यांचं कुटुंबीय त्याच काळात पुण्यात येऊन राहिले. अत्यंत हलाखीच्या अवस्थेत त्यांचं कुटुंबीय राहत होतं. समग्र मोहानी वाङ्मय विकून उदरनिर्वाह करत होतं.

परंतु केसरीमध्ये या संदर्भातील कुठलेही वृत्त, पत्रव्यवहार किंवा मोहानी कुटुंबीयांशी संबंधित काही प्रकाशित झालेलं दिसत नाही.

*

‘होमरूल लीग’मार्फत टिळक सामान्य लोकांपर्यंत पोहोचले. त्यांना साथसंगत करणारे अनेक नेते, महिला पुढारी होत्या. मोहानी व त्यांची पत्नी निशात उन निसा या चळवळीचे अग्रणी पुढारी होते. पुढे अली बंधुंच्या वयोवृद्ध माता बी-अम्मा या चळवळीशी जोडल्या आल्या. त्याही होमरुल लिग व महिला काँग्रेसच्या मोठ्या नेत्या होत्या.

*

१८९७ साली पुण्यात प्लेग आला. हा आजार २०२० साली आलेल्या कोरोनासारखाच होता. लागण होताच पटापट लोकं मरत होती. त्यामुळे सरकारने आजारी लोकांचं ‘क्वारंटाईन’ सुरू केलं होतं.

सरकारचे अधिकारी घराघरात जाऊन लपलेले आजारी पेशंट शोधून काढत. त्यामुळे काही लोक चिडले. इंग्रज गोरे आमच्या देवाला बाटवत आहेत, म्हणून चापेकर बंधूंनी पुण्याचे प्लेग कमिशनर ‘रँड’ची हत्या केली. हिंदू धर्माच्या आड आल्याने आम्ही रँडची हत्या केली, असं चापेकर म्हणतात.

धर्मभिमानातून झालेल्या या हत्येनंतर महाराष्ट्र व पुण्यातलं राजकारण तापलं. त्यावर टिळकांनी, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा अग्रलेख लिहिला.

परिणामी ब्रिटिश सरकारने टिळकांना अटक करून राजद्रोहाचा खटला भरला. टिळकांना जामीन मिळू नये अशी व्यवस्था केली.

मुंबई हायकोर्टात हा खटला सुरू होता. परंतु कुठलाही न्यायाधीश केस टेबलवर घेण्यास तयार नव्हता. कारण त्यांना सरकारला नाराज करायचं नव्हतं. अखेर न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांनी ती केस हातावर घेतली.

श्रीयुत तय्यबजी काँग्रेसचे संस्थापक होते. मद्रासला झालेल्या तिसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते पेशाने मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती होते. मुख्य न्यायमूर्ती असलेल्या तय्यबजी यांनी टिळकांना जामीन मिळवून दिला. टिळकांनी आपल्या या विषयीच्या लेखनात केवळ एका शब्दात तय्यबजींचा उल्लेख केलेला आढळतो.

पुढे खटला कोर्टात उभा राहिला. त्यावेळी बॅरिस्टर जिना यांना टिळकांनी आपलं वकीलपत्र दिलं. परंतु कोर्टाने टिळकांना दोषी मानलं. शेवटी त्यांना शिक्षा घोषित करून मंडालेच्या जेलमध्ये पाठवण्यात आलं.

*

पहिल्या महायुद्धकाळात स्वातंत्र्य सेनानी अली बंधुंना सरकारने तुरुंगात टाकलं होतं. त्यांच्या सुटकेसाठी त्यांची आई आबादी बानो बेगम रस्त्यावरचा लढा लढत होत्या. त्या स्वातंत्र्य चळवळीच्या महत्त्वाच्या विदूषी होत्या.



आबादी बानो बेगम म्हणजेच बी अम्मा यांना महात्मा गांधी व टिळकांनी साथसंगत केली. टिळक बीअम्मा यांच्याबरोबर भारतभर फिरले. वयोवृद्ध बीअम्मा ज्यावेळी धारदार भाषण करायच्या, त्यावेळी महिला, वृद्ध आणि तरुण मुली आपले जमा केलेले पैसे, अंगावरचे दागिने काढून बीअम्मा यांच्या पदरात टाकत. हा पैसा स्वातंत्र्य चळवळीसाठी वापरण्यात आला.

गांधी, बी अम्मा व इतर नेत्यांच्या प्रभावामुळे टिळक खिलाफत चळवळीचे पुढारी झाले. हेगडेवारही गांधीच्या प्रभावाने खिलाफत चळवळीचे खंदे पुरस्कर्ते झाले. (आयुष्यातील पहिली जेल त्यांना खिलाफत चळवळीमुळे झाली.)

अद्याप मुसलमानांविषयी पूर्वग्रह बाळगणारे टिळक आता मात्र हिंदू-मुस्लिम एकतेची भाषा बोलू लागले. हा फरक बी-अम्मा व इतर राष्ट्रीय नेत्यांच्या संगतीने घडला होता.

टिळकांचे मराठी चरित्रकार मोहानी, तय्यबजी व बी-अम्मा यांना वगळून टिळक चरित्र मांडतात.

*

टिळक एकाच वेळी बॅरिस्टर, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, लेखक, संपादक व राजकीय पुढारी होते. त्यांची लातूरला ‘कॉटन मिल’ होती. निज़ाम सरकारने त्यांना आपल्या प्रदेशात व्यवसाय करण्यासाठी विशेष सवलत दिली होती. टिळकही धोरणी उद्योजक होते.

ब्रिटिश सरकारचा सतत रोष अंगावर घेतल्याने त्यांना कुठलाही व्यवसाय सरकार करू देत नव्हते. अशावेळी त्यांनी निज़ामी प्रांतात जाऊन धंदा उभा केला. निज़ाम सरकारकडून जागा आणि विशेष आर्थिक सवलती घेतली.

*

टिळक, महात्मा फुले यांचे समकालीन होते. महात्मा फुले बहुजनांच्या शिक्षणासाठी लढत होते. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. पण टिळकांनी सामाजिक सुधारणांना नव्हे तर राजकीय सुधारणांना अधिक महत्त्व दिलं.

आधी सामाजिक की राजकीय सुधारणा, यावर टिळकांचा आगरकरांशी अनेक वेळा संघर्ष झाला होता. आगरकर कर्ते सुधारक होते, तर टिळक बोलके... टोकाच्या संघर्षानंतर अगरकरांनी टिळकांची साथ व वृत्तपत्र सोडलं.

खरं पाहता, टिळकांच्या राजकीय सुधारणा बहुजनांसाठी नव्हत्या. कुणबी-माळी संसदेत जाऊन नांगर धरणार का, अशा रितीने त्यांनी बहुजनांची हेटाळणी केली होती. मात्र, फुले एकाच वेळी सामाजिक, संस्कृतिक व राजकीय सुधारणांचा हट्ट धरत होते. बहुजनांचा संपूर्ण उत्थान घडवू पाहात होते. त्यांचा या संदर्भात रानडेंशीही संघर्ष झालेला होता.

टिळकांचं जात-वर्ग-वर्णचरित्र अद्याप अभ्यासले गेले नाही.. त्यावर अभ्यासक मौन बाळगून असतात.. शंभर वर्षानंतर का होईना अशा पद्धतीने टिळकांची जात-वर्ण-वर्ग या अनुषंगाने समीक्षा, चिकित्सा झाली पाहिजे.

पुण्यात प्लेगच्या साथी सतत येत होत्या. अशीच एका साथीत टिळक रोगापासून बचाव करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावर बंगला बांधून राहिले. सोशल डिस्टंस बाळगत त्यांनी स्वत:ला सुरक्षित केलं.

मात्र, सावित्रीमाई रोग्यांच्या सेवेत रुजू झाल्या. रोग्यांची देखरेख केली. त्यांच्यासाठी अन्नछत्र चालवलं. परिणामी सावित्रीमाईंना रोगाचा संसर्ग झाला. त्यातच त्या निवर्तल्या अन् टिळक सिंहगड किल्ल्यावर सुरक्षित राहिले.

फुले दांपत्याच्या चळवळीमुळे देशातील बहुजनांना सामाजिक भान आलं.. ते उच्च शिक्षण घेऊ लागले. परिणामी कालांतराने मोठ्या प्रमाणात बहुजन स्वातंत्र्य चळवळीचा भाग झाले. त्यांनी सामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न व अस्मितेचे विषय घेऊन स्वातंत्र्य चळवळ बळकट केली.

*

टिळकांच्या मृत्युनंतर २७ वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं.

म्हटलं जातं की, टिळकांच्या प्रेतयात्रेत गांधींजींना प्रवेश नाकारला होता.

आज १ ऑगस्ट टिळकांचा स्मृतिदिन..

कलीम अज़ीम, पुणे

१ ऑगस्ट २०२६

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,56,इस्लाम,44,किताब,26,जगभर,132,पत्रव्यवहार,4,राजनीति,311,व्यक्ती,29,संकलन,65,समाज,274,साहित्य,81,सिनेमा,22,हिंदी,55,
ltr
item
नजरिया: चरित्रकारांनी दुर्लक्षित केलेले टिळक
चरित्रकारांनी दुर्लक्षित केलेले टिळक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1Lts0wAI5OhJvTZYpKUlK1I29FAiFyBXxs_QeaAns6xxmp6zMHOzxTIMklspNjufY1wBN_Brpp04MAbUljbi_ZtVthClC8KP0W9YImK52HfJpfj1umj99LInjfRGWgTvrX6TOStUPACGKbI1KfPow5BQgd5j-1EYXklkdq4kUuT-dPC27U5NrRvvPHthW/w640-h280/Abadi_Bano_Begum_(Bi-Amman).jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1Lts0wAI5OhJvTZYpKUlK1I29FAiFyBXxs_QeaAns6xxmp6zMHOzxTIMklspNjufY1wBN_Brpp04MAbUljbi_ZtVthClC8KP0W9YImK52HfJpfj1umj99LInjfRGWgTvrX6TOStUPACGKbI1KfPow5BQgd5j-1EYXklkdq4kUuT-dPC27U5NrRvvPHthW/s72-w640-c-h280/Abadi_Bano_Begum_(Bi-Amman).jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2026/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2026/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content