हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी

बंडखोर शायरी आणि जहाल धोरणासाठी इतिहासात प्रसिद्ध आहेत. मौ. हसरत मोहानी प्रखर राष्ट्रवादी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बहुतेक रचना ब्रिटिश सरकारच्या अन्याय आणि जुलुमी धोरणाविरोधात होत्या. राष्ट्रवादी गझलकार म्हणूनही अभ्यासकांनी त्यांना बिरुदावली दिली आहे. या महान स्वातंत्र्य सेनानीची राजकीय इतिहास व कारकीर्द दुर्लक्षित राहिली. शेवटपर्यंत हलाखीचे आयुष्य जगत असलेल्या या अवलीयाचा आज (१३ मे १९५१) ६८वा स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्याचा हा प्रयत्न. 
"तेरी महफ़िल से उठाता ग़ैर मुझको क्या मजाल
देखता था मैं कि तूने भी इशारा कर दिया"


स्वातंत्र्य चळवळीतील राजकारणात दोन प्रवाह होते. एक टिळकपंथीय आणि दुसरे गांधीपंथीय. टिळकांच्या मृत्यूनंतरही ते राजकारणात जिवंत होते. हा जिवंतपणा त्यांच्या अनुयायांमुळे होता. मौलाना हसरत मोहानी हे टिळकपंथीय स्वातंत्र्यसेनानी होते. 
हसरत मोहानींचा जन्म उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील 'मोहान' या गावी १ जानेवारी १८७८ला झाला. त्यांचं पूर्ण नाव फजलुल हसन होतं. हसरत हे त्यांचं उपनाम होतं. मोहान या  गावाच्या नावावरून त्यांचं नाव मोहानी पडलं. पुढे ते हसरत मोहानी नावानेच प्रसिद्ध झाले.
हसरत मोहांनींचं प्राथमिक शिक्षण पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे घरीच झालं. त्यांना शिकवण्यासाठी नावाजलेले 'आलिम' (विद्वान शिक्षक) नेमलेले होते. अब्दुल रहमान मियाजी बल्की नावाचे हे शिक्षक त्यांना घरी येऊन शिकवत. हसरत मोहानींवर लहानपणीच बल्की यांच्या विचाराचा प्रभाव पडला. 
फतेहपुरच्या शासकीय हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झालं. या फतेहपूरच्या पाच वर्षात त्यांना अनेक विद्वान पंडितांचा सहवास लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी, अरेबिक, पर्शियन या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. १८९८मध्ये फतेहपुर कॉलेजच्या परीक्षेत ते साऱ्या प्रांतात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना उच्च शिक्षणासाठी गव्हर्मेंट स्कॉलरशिप मिळाली. अलीगड महाविद्यालयाचे प्राचार्य गणिततज्ज्ञ डॉ. जियाउद्दीन यांनी त्यांना आपल्या महाविद्यालयात बोलावून घेतलं आणि प्रवेश दिला. अशा रीतीने ते अलीगड महाविद्यालयात दाखल झाले.
अलीगड विद्यापीठ त्याकाळी ब्रिटिशांच्या प्रचंड प्रभावाखाली होते. प्राचार्य थिओडर बेक आणि प्राचार्य मॉरिसन यांनी तिथल्या विद्यार्थ्यांवर बारीक नजर ठेवली होती. ते राष्ट्रवादी चळवळीपासून कशा पद्धतीने लांब राहतील, याची काळजी ते वारंवार घेत. एका अर्थाने ते अलीगडमध्ये मुस्लिम युवकांना ब्रिटिशाचे हस्तक बनविण्याचं प्रशिक्षण देत होते. अशा अलीगड महाविद्यालयात हसरत मोहानी दाखल झाले
लहानपणापासूनच बंडखोर स्वभाव आणि निडर वृत्ती असलेले मोहानी विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात सहभाग घेऊ लागले. कॉलेजच्या कार्यक्रमात देशभक्तीपर भाषणे आणि वसाहतवादाचा विरोध करू लागले. त्यामुळे अलीगड विद्यापीठातील ब्रिटिश प्राध्यापकात त्यांच्याविषयी नाराजी होती. त्यांना तिनदा अलीगडमधून निष्कासित करण्यात आलं होतं. परिणामी बीए झाल्यानंतर मोहानी यांना अलीगड विद्यापीठाने कायद्याच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देऊ केली नाही.
"कैसे छुपाऊँ राज--गम-दिदार--तर को क्या करूँ
दिल की तपीश को क्या करँ सोज-ए-जिगर को क्या करूँ"
पुढे हसरत मोहनींना ग्वाल्हेरच्या विक्टोरिया कॉलेजमध्ये अरबी भाषा आणि गणिताचे शिक्षकाच्या नोकरीचा प्रस्ताव आला. मोहानी यांनी ब्रिटिश सरकारची कोणतीही नोकरी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी नोकरीचा प्रस्ताव नाकारला. मोहानींनी १९०४मध्ये काँग्रेसचं अधिकृत सदस्यपद स्वीकारलं. बीएला असताना त्यांनी 'उर्दू ए मुअल्ला' या मासिकाची नोंदणी करून ठेवली होती. ब्रिटिशांनी शिक्षणाची दारे बंद केल्याने त्यांनी पूर्णवेळ मासिक चालवण्याचा निर्णय घेतला. मोहानी यांनी आपल्या मासिकातून ब्रिटिशाविरोधात आणि त्यांच्या वसाहतवादी धोरणाचा सडेतोड समाचार घेतला. आपल्या वृत्तपत्रातून मोहानींनी सामाजिक आणि राजकीय प्रश्न समाजापुढे मांडले. उर्दू काव्य, साहित्य याबरोबर त्यांनी राजकीय लेख आपल्या मासिकातून प्रसिद्ध केले.
मोहानी यांनी आपल्या लेखातून राष्ट्रीय काँग्रेसचा प्रचार करायला सुरुवात केली. अलीगड चळवळीच्या दृष्टिकोनावर टीका सुरू केली. मोहानींचं प्रतिपादन होतं की, सुशिक्षित मुसलमानांच्या वैचारिक आणि राजकीय गोंधळामुळे व राजकीय मतभेदामुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांचा फायदा होतो आहे. सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे ब्रिटिशांनी त्यांच्या वृत्तपत्रावर बंदी आणली. जहाल लेखनाबद्दल त्यांना शिक्षा करण्यात आली. परिणामी काही काळासाठी मासिक बंद पडलं. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी पुन्हा मासिक सुरू केलं. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नावाखाली वृत्तपत्रे चालविली. 'तजकिरे शुरा' हे त्रैमासिक तर 'मुस्तकबिल' नावाचं दैनिक देखील त्यांनी चालवलं. त्यांनी आपल्या लेखनातून मुसलमानांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होणे, कशी काळाची गरज आहे, याचा प्रचार त्यांनी सातत्याने केला.
वाचा : रफीक झकेरिया : एक सुलझे हुए राजनितिज्ज्ञ
वाचा : मौलाना आजाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया
मौलाना मोहानी स्वदेशी चळवळीचे जनक होते. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी स्वदेशी चळवळीवर भरभरून लिहिलं आहे. वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ स्वदेशी चळवळीचा पुरस्कार करणारे सामाजिक कार्य सुरू केलं. यासाठी त्यांनी १९१३मध्ये अलीगडच्या रसूल गंज भागात 'मोहानी स्वदेशी स्टोअर' नावाचे दुकान सुरू केलं होतं.
अलीगडमध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात अपप्रचार सुरू केला होता. अलीगडप्रणित लाभधारक गटाने त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केल्याने त्यांचा स्वदेशी स्टोअर जेमतेम चालत असे. तरीही ते बधले नाहीत. त्यांची स्वदेशी चळवळ त्यांनी सुरूच ठेवली. या चळवळीत त्यांनी आपल्या पत्नी निशात उन निसा हिलादेखील सहभागी करून घेतलं. मोहानींची पत्नी निष्ठेने त्यांच्याबरोबर राहिली. तिनं त्यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. बुरखा आणि पडद्याचा त्याग करून स्वातंत्र्य चळवळीत मोहानींबरोबर सक्रिय झाल्या. महात्मा गांधींनी 'यंग इंडिया'मधून निशात उल निसावर एक गौरवास्पद लेख लिहिलेला होता. १९३७ साली कानपुरमध्ये निशात उन निसा यांचा मृत्यू झाला.
आधुनिक भारताच्या इतिहासात प्रखर राष्ट्रवादी म्हणून मौ. हसरत मोहानींची नोंद आहे. आपल्या जहाल राष्ट्रवादातून मोहानींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. एक वेळ अशी आली की कुठलाही गुन्हा, कुठलंही कृत्य केलेलं नसताना ब्रिटिशांनी त्यांना अटक करण्याचं धोरण स्वीकारलं. मोहानींना अनेकदा अटक झाली. त्यांची संपत्ती जप्त झाली. त्यांची पुस्तके, लिखाणाचे कागद, हस्तलिखित, प्रकाशित लेख आदी जप्त करून नष्ट करण्यात आले. असं अनेकदा घडलं. तरी मोहानींनी ब्रिटिशांविरोधातला लढा शिथील केला नाही. लिखाण आणि साहित्य नष्ट झाल्याच्या त्यांचा मनावर खोलवर आघात झाला होता. या व्यथा त्यांनी गझलांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. उपासमार दारिद्र्य आणि हलाखीच्या काळात ते जगले पण आपल्या तत्त्वांशी कधीही समझोता त्यांनी केला नाही. ज्यावेळी मोहानी तुरूंगात जात त्यावेळी त्यांच्या पत्नी निशात उन निसा स्वातंत्र्य चळवळीत रस्त्यावर उतरून सहभाग घेत.
"हज़ार खौफ़ हों पर ज़ुबां हो सच की रफ़ीक
यही रहा है अजल से कलंदरों का तरीक
संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे हसरत मोहानी हे पहिले स्वातंत्र्यसेनानी होते. १९२१ला अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा दिली. १९२१ साली 'इन्कलाब जिंदाबाद'ची घोषणादेखील सर्वप्रथम मोहांनींनीच दिली. हा नारा त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीचा केंद्रबिंदू होता. नंतर भगतसिंगांनी ही घोषणा प्रसिद्ध केली. 
वाचा : लेखक व कवी होता मुघल सम्राट बाबर
वाचा : कमोडिटी शिवबा 
मोहानी एक निष्ठावंत काँग्रेसी होते. मुस्लिम लीगच्या धर्मवादी राजकारणाला त्यांनी सतत विरोध केला. बॅ. जीना यांची धोरणे त्यांना कदापि मान्य नव्हती. डिसेंबर १९१५मध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांची अधिवेशने एकाच वेळी मुंबई शहरात भरली होती. त्यावेळी मोहानी मुस्लिम लीगच्या मुंबईच्या हिंदु-मुस्लिम ऐक्याच्या एका अधिवेशनात पाहुणे होते. त्यावेळी त्यांनी इंग्रजी भाषेवरून जीनांना बरच सुनावलं होतं. हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये मुस्लिम लीगचे पुढारी का बोलत नसावे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी लीगच्या नेत्यांचा समाचार घेतला होता.
मोहानी कम्युनिस्ट नेते म्हणूनही वावरले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते संस्थापक सदस्य होते. १९२१ साली झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ते जमियतूल उलेमाचेदेखील संस्थापक सदस्य होते. काँग्रेस आणि मुस्लिम लिगच्या जवळ असले तरी ते हयातभर कम्युनिस्ट म्हणूनच वावरले. 'मुस्लिम कम्युनिस्ट' स्वत:ला घोषित केलं होतं.
स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्याची त्यांचं धोरण वेगळं होतं. त्यामुळेच महात्मा गांधी आणि मोहानी यांचे मतभेद झाल्याचं निरिक्षण काही अभ्यासकांनी नोंदवलं आहे. याबद्दल महात्मा गांधींनी 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात याबद्दल लिहिलं आहे.  (४५४-४५६).
"हाल मेरा जब बुरा तब न हुई तुम्हे खबर
बाद में हुआ असर अब मैं असर को क्या करूँ"
मोहानी साहित्यिक व गझलकार म्हणूनही नावाजलेले होते. त्यांनी सुमारे ७०० गझला लिहिल्या आहेत. त्यातील बहुतेक गझला या स्वातंत्र्य आंदोलनाला समर्पित आहेत. तसंच इतिहासातील वाद, समाजरचना आदी विषय त्यांच्या गझलामधून डोकावतात. 'कुल्लियात ए हसरत' नावाने त्यांच्या समग्र गझल प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांची 'शरहे कलामे गालीब', 'नुकाते सुखन', 'मसुशाहते जिंदा' अशी पुस्तके प्रकाशित आहेत. 'चुपके, चपके रात दिन' ही गझल त्यांचीच. गुलाम अलींनी त्याला आपला मधूर आवाज दिला आहे. नंतर ही गझल बी.आर. चोपडा यांच्या राज बब्बर अभिनित' निकाह' सिनेमात सामील करण्यात आली होती.

चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है
चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

तुझ से मिलते ही वो कुछ बेबाक हो जाना मेरा
और तेरा दांतों में वो उंगली दबाना याद है

हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है
चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

चोरी-चोरी हम से तुम आ कर मिले थे जिस जगह
चोरी-चोरी हम से तुम आ कर मिले थे जिस जगह
मुद्दतें गुजरीं पर अब तक वो ठिकाना याद है

हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है
चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

खैंच लेना वो मेरा परदे का कोना दफ्फातन
खैंच लेना वो मेरा परदे का कोना दफ्फातन
और दुपट्टे से तेरा वो मुंह छुपाना याद है

हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है
चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

दोपहर की धुप में मेरे बुलाने के लिए
दोपहर की धुप में मेरे बुलाने के लिए
वो तेरा कोठे पे नंगे पांव आना याद है

हम को अब तक आशिकी का वो ज़माना याद है
चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है

मोहानींनी आपल्या समाज प्रबोधनाचं काम केलं. पण दुःखद बाब ही की, मुसलमानांनी मुहंमद इकबाल सारखं मौलाना मोहानी यांनादेखील रोमँटिक शायरी पुरतच बंदिस्त करून टाकलं. त्यामुळे मोहानींच्या व्यक्तिचित्रणाचे वेगवेगळे पैलू बाहेर येऊ शकले नाहीत. उर्दू भाषेतही त्यांच्यावर फारसं लिखाण झालेलं नाही. गझल वगळता इतर बाबतीत त्यांचं व्यक्तिचित्र पडद्यातच राहीलं. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी हसरत मोहानी यांच्यावर मुहाजिरनामा या संग्रहात एक शेर लिहिला आहे,  
"वो पतली सडक जो उन्नाव से मोहान जाती हैं,
वही हसरत के ख्वाब को भटकता छोड आए हैं."
मोहानी एक पत्रकार आणि संपादकही होते. त्यांनी तीन ते चार नियतकालिकांनी दैनिक सुरू केली होती. त्यातून ते स्वत: राजकीय प्रश्नावर लिहीत असत. आपल्या लेखणीतून त्यांनी ब्रिटिशांविरोधात जाहीर भूमिका घेतलेली होती. त्यांचं लिखाण जहाल स्वरूपाचे होतं. त्यामुळे त्यांचे वृत्तपत्र अलीगडमधील कुठलेही प्रेस छापण्यास पुढे येत नसत. त्यांनी वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेलं राजकीय लिखाण प्रचंड आहे. त्याचं संकलन होण्याची गरज आहे. मराठीत त्यांच्यावर फारसं लिखाण झालेलं नाही. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी 'मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद' या त्यांच्या ग्रंथात मोहानींवर ३५ पानी लेख लिहिलेला आहे. यातून मोहानींच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू समोर येतात.
वाचा : संभ्रमित करणारा तलाकबंदी कायदा
भारत सरकराने २०१४ साली मोहानींच्या स्मरमार्थ टपाल तिकिट जारी केलं. २५ फेब्रुवारी २०१४ला दिल्लीत एका सोहळ्यात तत्कालीन उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा झाला होता. पाकिस्तान सरकारनेही यापूर्वीच २३ जानेवारी १९८९मध्ये मोहानी यांच्यावर एक टपाल तिकीट काढलं आहे. पाकिस्तांनमध्ये हसरत मोहानी अभ्यासक्रमात शिकवले जातात. आधुनिक भारताच्या इतिहासात हा थोर स्वातंत्र्यसेनानी व प्रखर राष्ट्रवादी दुर्लक्षित राहिला. या थोर क्रांतिकारकाला पुन्हा एकदा अभिवादन..

कलीम अजीम, पुणे

संदर्भ:
१) प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद, डायमंड प्रकाशन-२०१८
२) सियासत, २ मे २०१८
३) महात्मा गांधी, माझे सत्याचे प्रयोग, नवजीवन ट्रस्ट-एप्रिल२०११
४) सीपीआयपीएम ओआरजी
५) रझा नईम, दि वायर, १३ मे २०१८
६) असद शेख, ट्रिब्युन हिंदी, १३ मे २०१८
७)Syed Nazeer Ahmad, The immortals, Azad House Publication, Vijaywada-2014

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,42,इस्लाम,37,किताब,15,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,271,व्यक्ती,4,संकलन,61,समाज,222,साहित्य,68,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी
हसरत मोहानी : संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे पहिले राष्ट्रवादी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihTNWO0Tm7_Tt5fskaIoLJSYuiIAOlmjpfH56U-wI9xeB5CPAPC5DHwW3l0FifcIbB45eVkOGtY3LNO9XA3s4WhN5DUNcZ-VzoehGrIhizragA0f5y0ISm5FgHKEaglLOALbLjt_pA2418/s640/maulana-hasrat-mohani-696x355.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihTNWO0Tm7_Tt5fskaIoLJSYuiIAOlmjpfH56U-wI9xeB5CPAPC5DHwW3l0FifcIbB45eVkOGtY3LNO9XA3s4WhN5DUNcZ-VzoehGrIhizragA0f5y0ISm5FgHKEaglLOALbLjt_pA2418/s72-c/maulana-hasrat-mohani-696x355.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2019/05/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content