या वायरल फोटाचा फॉलोअप घेतला
तर एक वेगळी कथा समोर आली. जिचा वायरल कथेशी नाममात्र योगायोग होता. घटना अगदी साधी
व कौटुंबिक हिंसाचारातून घडलेल्या एका दुर्दैवी प्रसंगाची होती. न्यूयॉर्क टाइम्स प्रकाशित
केलेली खरीखुरी कथा नंतर कुठल्याही मीडियाने फॉलो केली नाही. पण सोशल मीडियात वायरल
वृत्त मात्रअजूनही प्रसारित होतच आहे.
वाचा : तालिबानींचा विरोध करणाऱ्या अफगाणच्या बंडखोर महिला
वाचा : अफगाणिस्तानात स्वस्त व्हेटिलेंटर्स बनविणाऱ्या मुलींची गोष्ट
नेमकी कथा
22 जुलैला न्यूयॉर्क टाइम्सच्या
स्थानिक रिपोर्टरने दिलेली कथा अशी –
अफगाणिस्तानच्या घोर प्रातांतील गिरीहाह गावी नईम आणि रहिमी गुल नावाचे दोन व्यक्ती आपसात मित्र होते. नईमला कर्ज हवं होतं. मित्रत्वाच्या नात्याने रहिमीने त्याला 3 हजार डॉलरचं कर्ज देऊ केलं. पण त्या मोबदल्यात आपल्या मुलीशी लग्नाची अट घातली. नईम तयार झाला. कालांतराने रहिमीची मागणी वाढली आणि त्याने नईमच्या किशोरवयीन भाचीशी लग्नाची इच्छा बोलून दाखवली.
‘कमरसोबत लग्न करायचे असेल तर तुझ्या भाचीचा निकाह माझ्याशी लावावा लागेल’ अशी अट रहीने नईमला घातली.
नईमला उसन्या घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात हा सौदा महाग नव्हता. त्याने होकार दिला.
दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने काही काळ प्रतिक्षा करावी लागली.
अखेर चार वर्षानंतर ही लग्ने
झाली. कालांतराने 40 वर्षीय रहिमी गुलचे नववधूशी पटेनासे झाले. एका दिवशी रहिमीला सोडून
त्याची दूसरी पत्नी म्हणजे नईमची भाची आपल्या घरी निघून गेली. बायको निघून गेल्याने
रहिमी गुल नईमच्या घरी पोहोचला. पत्नी रहिमीसोबत जाण्यास तयार नव्हती. यावरून सासरा
व जावई यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर रहिमीने सूड म्हणून आपल्या मुलीला म्हणजे
नईमच्या पत्नीला कमरला घेऊन आपल्या घरी आला.
नईमने वारंवार बोलणी करत व
सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु रहिमी कुठलीही तडजोड स्वीकारण्यास
तयार नव्हता. त्याला आपली किशोवयीन पत्नी परत हवी होती. पण ती येण्यास तयार नसल्याने
हा वाद वाढतच गेला. दरम्यान रहिमी गुलने नईमला उसने दिलेले पैसे मागण्यास सुरुवात केली.
नईम बेरोजगार होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. रहिमीचा वाढता तगादा पाहता नईमने एक शक्कल
लढविली.
वाचा : लेडी पोलीस फैजा नवाजने वकिलाला घातल्या बेड्या
वाचा : इराणच्या स्टेडियममध्ये दाढ़ी मिशावाल्या मुली
तो थेट स्थानिक तालिबानी सदस्याकडे
गेला. त्याने रहिमी हा सरकार समर्थक असून परदेशाहून आलेला निधी तो गावात वितरित करण्यास
सरकारला मदत करतो, अशी कथा सांगितली. नईम तालिबानी ग्रुपच्या पूर्वीपासून संपर्कात
असल्याने त्याची समस्या त्यांना माहीत होती.
गेल्या वर्षी अमेरिकेसोबत
झालेल्या शांतता समझोत्यानंतर तालिबानी गट सत्तास्थापनेसाठी स्थानिक सरकारविरोधात मोटबांधणी
करत आहेत. या संधीचा फायदा उचलत नईमला सहकार्य करण्याचे आश्वासन सशस्त्र तालिबानी नेत्यांनी
दिलं. तुझी पत्नी कमर तुला परत मिळेल शिवाय तुला रहिमीचे उसने घेतलेले पैसेसुद्धा देण्याची
गरज नाही, असंही त्याला सांगितलं.
17 जुलैच्या मध्यरात्री सशस्त्र
तालिबानी आणि नईमने कमर गुलच्या घराबाहेर येऊन गराडा घातला. नईम बाहेरून रहिमीला चेतवू
लागला. काय गोंधळ आहे हे पाहण्यासाठी रहिमी घराबाहेर आला. तो दिसताच त्याला गोळ्या
घातल्या गेल्या. बंदुकीचा आवाज ऐकून रहिमीची पहिली बायको फातिमा बाहेर आली. तीदेखील
बदुंकीच्या गोळीने टिपली जाऊन कोसळली.
बंदुकीच्या आवाजाने झोपलेली
कमर जागी झाली. तिने खिडकीतून बाहेरचे दृष्य पाहिलं. हातात बापाची रायफल घेऊन ही बाहेर
आली. समोर असलेल्या हल्लेखोरावर तिने गोळ्या झाडल्या. त्यात एक जखमी झाला तर दूसरा
मारला गेला. कमरने पुन्हा स्टेनगन उचलली व फैऱ्या झाडल्या. त्यात तिचा नवरा नईम मारला
गेला.
दरम्यान गावातील लोक व सरकार
समर्थक स्वयंसेवक (मिलिशिया) जमा झाले. त्यांनी तालिबानी गटाला चिथावणी दिली. उरलेल्या
तालिबानी सदस्यांनी पळ काढला. दूसऱ्या दिवशी सकाळी अफगाण सरकारच्या अधिकाऱ्यांनी कमरचा
रायफलसोबतचा फोटो काढून प्रेस रिलीज जारी केलं. त्या दोन ओळीच्या कथेत लिहिलं होतं,
‘या धाडसी अल्पवयीन मुलीने
दोन तालिबानी दहशतवाद्यांना ठार केलं.’
हीच कथा सर्व मीडियाने चालवली.
कमरच्या एका गोळीनं तिचा पती नईम मारला गेला होता. एकीकडे आई-बाप गमावले तर दूसरीकडे
पतीच्या मरणाचं दुख कमरच्या नशिबी आलं. कमरचं कुटुंब गमावल्याचं दुख शौर्यकथा म्हणून
प्रसारित झालं. दि गार्जियनच्या मते कमर गुल आपल्या12 वर्षाच्या भावासोबत सरकारी सुरक्षेच्या
देखरेखीत आहे.
एका पारिवारिक वादामुळे कमर
गुलचं आयुष्य व कुटुंब दोन्ही उद्ध्वस्त झाले. एकीकडे तिच्या शौर्याच्या कहाण्या जगभर
प्रकाशित केल्या जात होत्या. तर दूसरीकडे ती पोरकी व अनाथ झाल्याचं दुख पचवत होती.
हिसेंचं उदात्तीकरण करणारी माध्यमे या वादाला धर्मयुद्ध म्हणून प्रचारित करत होती.
पण कमर गुल या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं दुख कोणीही टिपलं नाही.
वाचा : सुदानची पॅशनेट ब्रॉडकास्टर नलायाह
शौर्याच्या कहाण्या ऐकून राष्ट्रपती
अशरफ गणी यांनी कमरला राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले. इथूनच तिच्या मुलाखती जगभरात
प्रसिद्ध झाल्या. आई-बापाच्या हत्येचा सूड घेतला, अशी प्रतिक्रिया तिनं एएफपी य़ा वृत्तसंस्थेला
दिली.
याच सुडाच्या भावनेपोटी कमर गुलवर पुन्हा तालिबानी गटाने हल्ला केला होता. परंतु ग्रामस्थामुळे ती बचावली. पुन्हा असा हल्ला होईल अशी भिती तिने आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली आहे. बचावासाठी तिने दिलेल्या झुंजीच्या कथा जगभरात प्रसारित होत आहेत.
विशेष नोंद घेण्यासारखी बाब
अशी की तालिबानी संघटनांना अफगाणिस्थानात सत्ताधिश होण्याच्या विरोधात सर्वप्रथम अफगाणी
मुलींनीच आवाज उठवलेला आहे. 2018मध्ये झालेल्या तालिबान व अमेरिका शांतता बैठकीत स्थानिक
महिला प्रतिनीधींना सहभागी करून घ्यावे अशी मागणी या तरुणींनी केली होती. त्यांच्या
मते तालिबानी गटांनी महिला हक्क व सुरक्षेसंदर्भात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे व ती
शांतता करार होण्यापूर्वी आम्हाला मान्य झाली पाहिजे, अशी अट त्यांनी घातली होती.
आपल्या मागणीला जगभरातून प्रतिसाद
मिळावा यासाठी त्यांनी ‘माय रेड लाईन’ नावाची मोहीमही चालवली होती.
परंतु दुर्दैव असे की महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने तालिबानी गटांना
काबूल करारामार्फत अफगाणिस्थानात सत्ता संपादनाला संमती दर्शवली. विशेष म्हणजे भारतासारख्या
राष्ट्रानेदेखील या कथित शांतता कराराला मान्यता दिलेली आहे.
वाचा : हिजाबधारी एथलिट : मुस्लिम महिलांचं बदलतं वास्तव
अमेरिकेसोबत झालेल्या या समझोत्यानंतर
अफगाणमध्ये तालिबानी गटांचे हल्ले वाढल्याचे रिपोर्ट आहेत. सरकार समर्थक गटांना लक्ष्य
केलं जात आहेत. त्यात अधिकाऱ्यांसमवेत स्थानिकांनादेखील आपला जीव गमवावा लागला आहे.
दी गार्जियनच्या मते 2001 पासून
अमेरिकेने तालिबानांना
सत्तेवरून काढून
टाकल्यापासून झालेल्या संघर्षात
किमान 10,00,000
अफगाणांचा मृत्यू
झाल्याचा अंदाज
आहे. आता पुन्हा अफगाणमध्ये
तालिबानी दृष्कृत्याच्या घटना घडतील, अशी भिती मनावी हक्क संघटना व्यक्त आहेत. दुर्दैवाने
असे झाले तालिबानी शक्ती अमेरिकापुरस्कृत दहशतवादाचा नवा प्यादा म्हणून मानवतेसाठी
कर्दनकाळ ठरतील.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com