नेहाया धाहेर या ५२ वर्षीय इराकी महिलेला कुस्तीचे प्रचंड वेड. युद्धग्रस्त इराकमध्ये त्या आपला छंद जोपासतात. आहे ना आश्चर्य.! चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा लवपत त्या मागास समुदायातील मुलीना कुस्तीचे धडे देतात. दिवस उगवताच १५ ते ३० वयोगटातील अनेक मुली त्यांच्या या ट्रेनिंग अॅकेडमीत जमतात. हिजाब, स्कार्फ आणि स्टोलसारख्या पारंपरिक पोशाखात जमणाऱ्या मुली देशभरात कुतुहलाचा विषय.
नेहाया शाळेच्या वयापासून कुस्ती खेळतात. पण इस्लामच्या नावानं कथित मूलतत्त्व विचार पोसणाऱ्या इराकमध्ये एका महिलेनं कुस्तीचा छंद जोपासणे तसं सोपं काम नव्हतं. दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, बंडखोरी वृत्ती आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी स्वप्न सत्यात उतरवलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या या प्रशिक्षण केंद्रानं अनेक मुलींना जगण्याचं बळ दिलं आहे.
वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका
वाचा : इराकचा लोकशाही लढा
दोन वर्षापूर्वी इराक रेसलिंग फेडरेशननं त्यांना प्रशिक्षण सेंटर उघडण्याची विनंती केली. गेल्या काही वर्षांपासून इराकच्या महिला अॅथलीटनं ऑलंम्पिक खेळात प्राविण्य मिळविण्यास सुरुवात केली. या खेळाला प्रोत्साहन म्हणून सरकारला कुस्ती खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार आला. अशा प्रकारे इराकच्या दिवानियाह शहरात रेसलिंगचं सुसज्ज प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. यावर नेहाया म्हणतात, 'मी कधी कल्पनाही केली नव्हती की इराकसारख्या देशात अशा प्रकारचं सेंटर सुरू होईल. पण काळ बदलतो हे यावरून सिद्ध होतं.'
एबीसी न्यूजला दिलेल्या एका प्रतिक्रियेत त्या म्हणतात, 'प्रशिक्षण सेंटर सुरू करणे सोप काम होतं, पण त्याहून अवघड त्यात प्रशिक्षार्थी कुठून आणणार असा प्रश्न माझ्यासमोर होता, या समाजाला समजावणे कठीण होतं, कारण आमच्या कुठल्याही परंपरा खरोखरच त्या दिशेने जात नव्हत्या.'
बऱ्याच प्रयत्नानंतर ५ ट्रायबल प्रशिक्षणार्थी सापडले. या ५ मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिलं. हळूहळू त्यांच्या ट्रेनिंग अॅकेडमीची परिसरात चर्चा सुरू झाली. आज त्यांच्या अॅकेडमीत २० सदस्य आहेत जे शाळेनंतर दोन तासांच्या सत्रात आठवड्यातून तीन वेळा कुस्तीची ट्रेनिंग घेतात. इथं केवळ कुस्तीचेच प्रशिक्षण दिलं जात नाही तर या ट्रायबल मुलींना शालेय शिक्षणासाठीदेखील विषेश प्रयत्न केलेले आहेत.
इथं बऱ्याच तरुणी शॉर्ट्स, टाईट्स आणि टी-शर्ट सारखे कपडे घालून प्रॅक्टीस करतात. परंतु प्रशिक्षण संपल्यावर सेंटरच्या मोठ्या इमारतीमधून बाहेर पडताना मात्र बहुतेकजण डोक्यावर पूर्ण कपडे पांघरतात. बहुतेक मुली काळ्या रंगाचा मोठा कपडा आपल्या अंगाभोवती गुंडाळतात. मुलींना त्यांच्या घरातून एका व्हैननं सेंटरला आणलं जातं, प्रशिक्षणानंतर पुन्हा त्यांना सुखरुप घरी सोडलं जातं.
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल
वाचा : व्हिनसचा पराभव करणारी १५ वर्षीय कोको
नेहाया यावर म्हणतात, "मला अनेकदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्या मिळाल्या आहेत, अशा वातावरणातही आम्ही अनेक पुरस्कार पटकावले आहेत.'' नेहाया म्हणतात, या मुलींवर सामान्य मुलींपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागते. नाव व प्रतिष्ठा असतानादेखील त्यांना कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यासाठी बऱ्या खेटा माराव्या लागल्या.
गेल्या दोन वर्षात ट्रेनिंग सेंटरनं लोकांची मते बदलली आहेत. आज कुस्ती स्पर्धकांना पाठिंबा देणे व त्यांचे समर्थन करण्यासाठी बाहेरून बरीच लोकं येतात. या यशाने इराकमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रशिक्षण सेंटरमधून महिलांची टीम कुस्तीपटू म्हणून सज्ज झाली आहे. किर्कुक शहर तसेच दक्षिणेकडील बसरा शहरातील अनेक कुस्तीपटू इथे प्रशिक्षणासाठी येतात.
लेबनॉनमध्ये आयोजित जागतिक चॅम्पियनशिपमध्ये इथल्या खेळाडूंनी रौप्य पदके पटकावली आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये एका कुस्तीपटूनं ७५ किलो वर्गटात बेरूतमधील क्लासिक इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत मोठं यश खेचून आणणे हीी नक्कीच गौरवास्पद गोष्ट आहे.
(हा लेख लोकमतच्या सखीमध्ये 27 नोव्हेंबर 2018ला प्रकाशित झालेला आहे.)

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com