1971 साली आमचे आई-वडील
प्रथम भेटले तेव्हा ‘लव्ह जिहाद’ असा
काही शब्द त्यांच्या कानावरुन गेला नव्हता. दोघेही युक्रांदचे कार्यकर्ते होते.
युक्रांद कामगारांचे शोषण, जातीय अत्याचार, आदिवासी जमातींची मुस्कटदाबी असे प्रश्न घेऊन लढणारी एक समाजवादी
विद्यार्थी संघटना होती.
माझी आई संघटनेत
सामील झाली त्यावेळी अठरा वर्षाची होती. ती घाऱ्या डोळ्यांची, गोरीगोमटी,
हसरीखेळती तरुणी. भोवतालचे सगळे तरुण तिच्यापेक्षा बरेच मोठे होते.
ते सगळे ग्रामीण, गरीब, दलित, मुस्लिम अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले होते.
अनेकजण प्रथमदर्शनीच
तिच्या प्रेमात पडत आणि तिच्याशी लग्न करू इच्छित. खरे तर दुसरा एक भिडस्त तरुण
आपल्यातर्फे तिला मागणी घालावी म्हणून आमच्या बाबांकडेच टुमणे लावत असे. आईच्या
माहेरची पार्श्वभूमी होतीच तशी पोटात गोळा आणणारी.
वाचा : ‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला मुस्लिमद्वेषी विरोध
वाचा : लव्ह जिहाद : हिंदुत्ववाद्यांची नसती उठाठेव !
वाचा : लोकसभा २०१४ : मुस्लिम राजकारणाची कोंडी
ती सुप्रसिद्ध
मार्क्सवादी गांधीवादी विचारवंत नलिनी पंडित यांची मुलगी होती. पंडितांचे कुटुंब
अत्यंत सधन आणि नामवंत होते. दादरमध्ये भलामोठा
बंगला,
अनेक गाड्या, (त्यावेळचा दुर्मिळ) टेलिफोन असले
सगळे त्यांच्याकडे होते.
आणि मग चिपळूणहून
आलेल्या एका कोंकणी मुसलमानाशी लग्न करायचे तिने ठरवले तेव्हा दोन्हीं बाजूंनी
धर्मांधता उसळून आलीच. दादरच्या रस्त्यावर ओळखीच्या वयस्कर बायका तिला अडवून
विचारत,
“मुसलमानाशी लग्न करणार तू? सांभाळ
ह्यँ. तीन तलाक पद्धती असते त्यांच्यात.”
बाबांच्या थोरल्या
भावाला लोक विचारत,
“पण त्याला हिंदू पोरीशी कशाला लग्न करायचंय?” आता
हा थोरला भाऊ म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून ते होते मुस्लिम सुधारक हमीद दलवाई! त्यांचे
डोकेच सणकले. त्यांना वाटले आटोपशीर आणि साधा लग्नसमारंभ पार पाडण्याचा आपला
गांधीवादी समाजवादी आदर्श राहू दे बाजूला. म्हणाले, “आपण जंगी लग्न करू. कळू दे सगळ्यांना एकजात!” ठरले
तसे त्यांनी केले लग्न. पुष्कळ लग्नपत्रिका छापल्या आणि भेटेल त्या प्रत्येकाला ते
वाटत सुटले.
आजी सांगते किती लोक
त्या लग्नाला आले होते काही मोजमाप नव्हते बघ. कार्यलय छोटे होते पण गोंधळ जबरदस्त
होता. कोकम सरबताचे तीन हजार प्याले रिचवले गेले. आलेल्या पाहुण्यांना एवढेच काय
ते दिले गेले. बिचाऱ्या माझ्या आईबाबांना इतक्या लोकांशी हसून बोलावे आणि
हस्तांदोलन करावे लागले की गाल आणि हात दुखू लागले दोघांचेही.
नंतर आईच्या
मित्रमैत्रिणी आईला म्हणत,
“बाप रे ,काय ग तो गोंधळ तुझ्या लग्नातला!
सगळ्या अवयवांनिशी बाहेर पडू शकलो हे नशीबच म्हणायचं आमचं!”
वाचा : मुसलमानांचे राजकीय व सांस्कृतिक आत्मभान
वाचा : भारतीय मुस्लिम प्रादेशिक का होतोय?
मिरजोळी या आमच्या खेड्यातही मग पुन्हा समारंभ झाला. मुंबईहून गाड्या घेऊन आलेल्या पंडित कुटुंब आणि इष्टमित्रांना दलवाई मंडळींनी मस्त बिर्याणी खाऊ घातली.
मात्र, आईला तनिष्कसारखे
सुवर्णालंकार काही सासरच्यांनी घातले नव्हते. आई पहिल्यांदा सासरी गेली तेव्हा
चांदीची कानातली बघून तिला धक्काच बसला. “पण
चांदीच्या तर ताटवाट्या,
भांडी असतात.” सारस्वत समाजातील दिवाळीचा फराळ
तिच्या डोळ्यासमोर येऊन ती स्वतःशीच म्हणाली. दोन घरात एवढा वर्गीय भेद होता!
परंतु कुवतीप्रमाणे
द्यायचं आणि गरजेप्रमाणे घ्यायचे हे समाजवादी तत्त्व आचरत तिने आपले विस्तारित
कुटुंब निर्माण केले. मुंबईतल्या कॉलेजात प्राध्यापक म्हणून मिळणाऱ्या पगारातून
तिनेच गावातल्या भावंडांचा खर्च केला. कारण बाबा तर पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून
कामगारांचे मोर्चे,
आदिवासींचे मेळावे यासाठी सतत बाहेरच असत.
भावंडांच्या शिक्षणाला
आर्थिक मदत करत,
नातेवाइकांच्या आजारपणात किंवा लग्नकार्याच्या खरेदीसाठी त्यांना
आपल्या मुंबईतल्या फ्लॅटमध्ये आणत तिने सारे सांभाळले. त्या एकत्र कुटुंबाची ती
कर्ती बाई बनली.
वाचा : ‘धर्मनिरपेक्षतेचे कुली आम्हीच का व्हावे?’
वाचा : ख्रिश्चन साजी चेरियन जेव्हा बनवतात मस्जिद
तनिष्कच्या जाहिरातीवर
बेलगाम हल्ला करणाऱ्यांना हे कळत नाही की त्या जाहिरातीतील लुकलुकत्या डोळ्यांची
ती शेलाटी सून मुसलमान घरात सामावून गेली आहे. केवळ बाईच हे करू जाणे! ट्रोलर्सच्या
भाषेत बोलायचे झाल्यास हा लव्ह जिहाद नव्हे ही तर मुसलमानांची घरवापसीच. हे ट्रोल्स
केवळ मुस्लिम विरोधी नाहीत, ते महिला विरोधी आहेत.
त्यांना वाटते मुलगी
देणे म्हणजे पराभव,
शरणागती. उलट या जाहिरातीतील मुस्लिम कुटुंब आता हिंदू कुळाचार पाळत
आहे, हिंदू संस्कार घडवत आहे. माझ्या कुटुंबात दोन्हीकडच्या
नातेवाईकांसह दिवाळी साजरी होते आणि ईदही साजरी होते. प्रत्येकाला खावे, प्यावे, रंग उडवावेत आणि सणासुदीचे कपडे घालावेत असे
वाटते. यात न आवडण्यासारखे काय आहे?
माझी आई आजही हिंदू
आहे आणि बाबा मुसलमान. कर्मकांडे दोघेही करत नाहीत पण सांस्कृतिक उत्सव दोघेही
आवडीने साजरे करतात. अगदी सुरुवातीला आईच्या सासरचे वयस्क नातेवाईक तिने इस्लाम
स्वीकारावा म्हणजे तिला ‘जन्नत’ प्राप्त
होईल असे सुचवत. यावर ती हसून म्हणे, “मी इहवादी आहे. आत्ता
आणि येथे, याच आयुष्यात मला काय मिळणार आहे ते सांगा!”
खरे तर लग्नानंतर काहीच महिन्यात तिने ठसठशीत कुंकू लावायला सुरुवात केली. आपली ओळख तिला ठसवायची होती. हे कुंकू आणि साडी यामुळे ती अधिक भारदस्त, धीरगंभीर प्राध्यापकही दिसू लागली. अर्थशास्त्र शिकवू लागली. आपल्या विद्यार्थ्यांच्या वयाचीच दिसे. तिने आपला क्रांतिकारक बाणा सोडला नाही आणि नव्या मूल्यव्यवस्थेचे संस्कार पाळत आणि करत आम्हाला मोठे केले.
वाढत्या सांप्रदायिक वातावरणात आपली मुले कसे निभावून नेतील याबद्दल आईबाबांना काळजी होती. आम्हाला रशियन पुस्तके देऊन आणि मिश्रधर्मीय कुटुंबे, मित्रपरिवारात आमचा वावर ठेवून त्यांनी यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पण तरीही दंगे, वैरभाव आणि सहजलक्ष्य होण्यापासून ते आम्हाला वाचवू शकले नाहीत.
पण अशा द्वंद्वरेषेवर असण्यानेच आम्हाला अधिक बळ मिळाले. आम्ही देशाबाहेर फिरलो, आपली माणसे मिळवली, अभ्यास आणि पुस्तके यातून आनंद घेतला आणि आमच्या कुटुंबाची बहुलता अधिकच व्यापक केली.
वाचा : आयोध्येत भूमीपूजन झाले आता द्वेशाची भूल उतरेल!
वाचा : जिवघेणा कोण? कोरोना की मराठी मीडिया
माझ्या भावाने हैनन (Hainan)राज्यातल्या एका चिनी मुलीशी लग्न केले आणि मी एका तेलंगणी रेड्डीशी जोडी जमवली. भरीला मी नागालँडमधील मॉन नावाची एक मुलगीही दत्तक घेतली. आता एक निम्मा चिनी मुलगा, एक मराठी-तेलगू मुलगी आणि एक चिमुकली नागा योद्धा अशी आमची सगळी मुले सार्वजनिक बागेत खेळतात तेव्हा लोक आश्चर्याने पाहू लागतात. आमच्या कुटुंबात आम्ही सगळे इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलगू, मँडरिन आणि कोंकणी अशा विविध भाषा बोलतो.
आणि मग एकारलेल्या कल्पनाशक्तीची ‘नॉर्मल’ माणसे “पण हे कसं काय?” किंवा “अस्सं होय?” असे प्रश्न विचारत आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही फक्त मंद हसतो.
आमचे जगणे हेच त्या ट्रोल्सना, चिंतातुर जंतूंना उत्तर आहे. आम्ही आहोत. भिन्नवंशीय नुसते सहजीवन जगतात असे नव्हे तर ते सहसमृद्ध होत होत जगतात.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com