इस्त्रायलमध्ये स्थानिक जनता सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात महिनाभरापासून आंदोलन करत आहे, पण पण पंतप्रधान नेत्यानाहूनी याकडे दुर्लक्ष करत जरूसलेम राजकीयदृष्ट्या बळकावण्याचा डाव आखला. राजधानी तेल अवीवमध्ये जमलेले स्थानिक नागरिक नेत्यानाहूच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. देशात सुरु असलेल्या भ्रष्टाचारापेक्षा कुठलंच संकट मोठं नाही, अशी स्थानिकांनी प्रतिक्रीया दिली आहे. पण सरकार जरूसलेम राजधानीचा मुद्दा पुढे करतंय. भ्रष्टाचाराच्या आरोपातून पळ काढण्यासाठी सरकारने जरूसलेमचं राजकारण करत असल्याचा आरोप इस्त्रायली करत आहेत.जेरूसलेमला इस्त्रायलची राजधानी घोषित करायला संयुक्त राष्ट्राने नकार दिला आहे. या निर्णयाचे जगभरातील इस्लामी राष्ट्रांनी स्वागत केलं आहे. भारताने इस्त्रायलविरोधात मतदान करुन पॅलेस्टाईनसोबतची गेल्या 70 वर्षाची मैत्री राखली आहे. परिणामी धोरणाविरोधात मतदान झाल्याने इस्त्रायल व अमेरिका आणखीन चवताळण्याची भिती आहे.
तूर्तास हा धोका टळला असला तरी येत्या काळात ही भूत पुन्हा उठून पॅलेस्टाईनच्या मानगुटीवर बसू शकतं. या निर्णयाने पॅलेस्टाईन व इस्त्राईल शांती चर्चा विस्कळीत होण्याचे चिन्ह आहेत. याची पहिली प्रतिक्रीया म्हणून पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी अमेरिकेला कडक शब्दात इशारा दिला आहे, पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती म्हणतात, ‘भविष्यात शांती चर्चेसंबधीचा अमेरिकेचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, कारण अमेरिका प्रामाणिक मध्यस्थ नाही, तो पक्षपाती भूमिका घेत असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे’ महमूद अब्बास यांची या प्रतिक्रियेने भविष्यातील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रामधला संघर्ष पुन्हा एकदा वाढू शकतो.
वाचा : पॅलेस्टाईनचं समर्थन आणि सोशल भान जपणारी तरुणाई
वाचा : मोदींचे इस्त्रायल प्रेम आणि युद्धाची चाहूल
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. हे वृत्त मध्यपूर्वेतील इस्लामी राष्ट्रात पोहचताच, अनेक ठिकाणी अमेरिकाविरोधी निदर्शने झाली. अरब राष्ट्रांसह युपोरीय राष्ट्रांनीही डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाचा निषेध नोंदवत संतप्त प्रतिक्रीया दिल्या. जगात इतर ठिकाणी व्यापक निदर्शनं होण्याची भीती अरब नेत्यांनी शक्यता वर्तवली. या निर्णयामुळे जगातील मुस्लिमांच्या भावना भडकतील, यामुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रक्रियेला खीळ बसेल अशी भिती व्यक्त केली.
सौदी व इजिप्त या अरब राष्ट्रांनी इस्त्रायलला गंभीर परिणामाची धमकी देऊन टाकली. 1967 नंतर पहिल्यांदाच अरब राष्ट्रांनी पॅलेस्टाईनसंदर्भात कडक भूमिका घेतली. तर इस्त्रायलने ‘जेरुसलेम हीच इस्त्रायलची राजधानी राहील पॅलेस्टिनी जेवढ्या लवकर ते समजू शकतील तेवढं त्याच्यासाठी बंर आहे’ अशी प्रतिक्रीया दिली. अमेरिका व इस्त्रायलच्या भूमिकेनंतर पॅलेस्टाईनच्या हमास संघटना आक्रमक झाल्या. हमास व पॅलेस्टिनी नागरिकांनी जेरूसलेममध्ये आंदोलने सुरु झाली.
जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता
देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर गुरुवारी (22 डिसेंबर) संयुक्त राष्ट्रात
मतदान झाले. या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या 193 पैकी 128 सदस्य राष्ट्रांनी
पाठिंबा दिला होता, तर 35 राष्ट्रांच्या सदस्यांनी मतदानात
भाग घेतला नाही. तसेच 21 राष्ट्रांचे सदस्य त्यावेळी गैरहजर राहिले आणि केवळ 9
सदस्यांनी अमेरिकेच्या बाजूने मतदान केले.
विरोधी मतदान करणाऱ्यांमध्ये भारतासह ब्रिटन, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यांचाही समावेश होता. ट्रम्प यांनी जेरुसमेलसंदर्भात केलेल्या आवाहनाकडे भारतासहीत 100हून अधिक देशांनी दुर्लक्ष केलं. तर काही देशांनी या प्रकरणातून स्वतःला अलिप्त ठेवल्याचंही पाहायला मिळालं. परिणामी अमेरिकेच्या निर्णयाविरोधातील ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोठ्या बहुमताने संमत झाला.
धोरणाविरोधात मतदान झाल्याने ट्रम्प चवताळले, या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या देशांना अनुदानात कपात करण्याची धमकीदेखील दिली. या धमकीकडे दुर्लक्ष करुन अनेक देशांनी भूमिकेवर ठाम राहणे पसंत केलं आहे.

सत्तर वर्षापूर्वी पॅलेस्टिनी भूमीपुत्रांना
बेदखल करत इस्त्रायल हा नवा यहुदी देश जन्मास आला. यहुदी या झायोनिस्ट लॉबीने
अमेरीका व ब्रिटीशांवर दबाव टाकून इस्त्रायल देशाची निर्मीती केली. 2 हजार
वर्षापूर्वी या जमिनीवर रोमवंशीय ज्यूंच्या ताबा होता. मात्र ते जमीन सोडून
परागंदा झाल्याने अरबी कबीले तिथं येऊन वसले. याच देशात जगातील पहिली मस्जिद जेरूसलेममध्ये
तयार झाली. ही ‘मस्जिदे अक्सा’ मुस्लिमांचा
पहिला काबा आहे.. अर्थात भौगोलिक दृष्ट्या जगाचा मध्यकेंद्र आहे. इकडे चेहरा करुन
जगभरातील मुस्लीम नमाज अदा करतात. यामुळे आज जगभरातील इस्लामच्या अनुयायांसाठी
पॅलेस्टाईन पवित्र देश आहे.
पण पैगंबर इब्राहीम यांना आपल्या इतिहासाशी जोडत इस्लाम, यहुदी आणि इसाई हे तिन्ही धर्म जेरूसलेमला आपलं पवित्र स्थान मानतात. याच कारणामुळे पिढ्या न पिढ्या इस्लामचे अनुयायी, यहुदी आणि इसाई समुदायाच्या मनात हे शहर वसलं आहे. हिब्रू भाषेत ‘येरूशलायीम’ आणि अरबीत ‘अल-कुद्स’ नावाने हे शहर ओळखलं जातं. जेरूसलेम हा जगातील सर्वात जुन्या शहरापैकी एक आहे. जगातील तिन्ही धर्माने जोडणारे हे स्थळ आहे.

वाचा : सुदानी राज्यक्रांतीची नायिका
वाचा : रशियन कॉन्स्टिट्यूशन गर्ल
संयुक्त राष्ट्रसंघाने सततच्या वादामुळे 1947
साली जेरूसलेम आंतरराष्ट्रीय शहर म्हणून घोषित केलं. एका वर्षानंतर हा शहरासाठी
इस्त्रायल व जॉर्डनमध्ये युद्ध झाले. 1949 हे युद्धसंपलं तेव्हा शहराचा पश्चिमी
भाग इस्त्रायलकडे व पूर्वी भाग जॉर्डनच्या नियंत्रणात आला. जेरूसलेमला हिरवी रेघ
खेचून दोन भागात विभागण्यात आलं. हा हिरवा पट्टा दोन्हीकडील सैन्याला दूर
ठेवण्यासाठी होता. यानंतर पश्चिमी भागात राहणाऱ्या अरबांना आपली जागा सोडून पूर्व
भागात जावं लागलं. तर पूर्वभागात राहणारे यहुदी पश्चिम जेरूसलेममध्ये आले.
वर्ष 1949 ते 1967 या काळात पूर्व जेरूसलेम म्हणजे जुनं शहर जॉर्डनच्या नियंत्रणात होतं. पण 1967 साली जेरूसलेमसाठी पुन्हा युद्ध झालं, सहा दिवस चाललेल्या या युद्धात इस्त्रायलने पूर्व भागावरदेखील ताबा मिळवला.

1980 साली एक कायदा करुन इस्रायलने जेरूसलेमला
अधिकृत राजधानी घोषित केलं. यासह विस्तार वाढवत पूर्ण भागावर ताबा मिळवला. यानंतर
पॅलेस्टाईन व इस्त्रायल संघर्ष आणखीन वाढला.
1993 मध्ये इस्त्रायल व पॅलेस्टाईनमध्ये शांतता करार झाला, यात असा ठराव झाला की शांतता चर्चा पुढे गेल्यानंतर जेरूसलेमच्या स्थितीवर काय तो निर्णय घेण्यात येईल. आजही हे शहर पूर्व व पश्चिम भागात विभागलं आहे. पश्चिमीभागात पाच लाख यहुदींची वस्ती आहे तर पूर्व भागात तीन लाख पॅलेस्टिनी राहतात. इस्त्रायलने अविभाजित जेरूसलेमला आपली राजधानी आहे असा दावा केला आहे, पण संयुक्त राष्ट्राने इस्त्रायलचा ताब्याला कधीही मान्य केलेले नाही. तर पॅलेस्टाईनने आपल्या प्रस्तावित राष्ट्राची राजधानी म्हणून पूर्व जेरूसलेमला मान्यता दिली आहे.

हेच दावे गेल्या अनेक दशकापासून इस्त्रायल-पॅलेस्टिनी
वादाचे प्रमुख कारण राहिलेलं आहे. पूर्वी जेरूसलेमवर ताबा असूनही त्याला
आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाहीये. आंतरराष्ट्रीय समुदायाचे म्हणने आहे की, शांती
करार चर्चेतून हा गुंता सुटला पाहिजे. पण इस्त्रायलनेने अमेरिकेवर वेळोवेळी दबाव
टाकून जेरूसलेममला राजधानी घोषित करण्याची गळ घातली. बिल क्लिंटन, जार्ज
डब्लू बुश आणि बराक ओबामा या तिघांनी या निर्णयाचे भयानक हिंसक परिणाम होतील म्हणत
प्रस्तावाला मंजूरी नाही दिली.
पण 2016 साली झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारासाठी भरीव निधीचा समझौता करत इस्त्रायलशी संगनमत केलं. त्याच भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्त्रायलची राजधानी घोषित केलं. पण केवळ 9 राष्ट्रांनी प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने ट्रम्पला मोठा झटका बसला आहे. हे नऊ राष्ट्रे असे आहेत, ज्याबद्दल फारसं कुणालाही माहित नाही.

भारताचे गेल्या सात दशकापासून पॅलेस्टाईनचे
चांगले संबध आहेत, भाजप सरकार
इस्त्रायल-पॅलेस्टाईन-अमेरिका असं संतुलन साधायचं प्रयत्न करत आहे. जेरूसलेम मुद्द्यावर भारतानेही इस्त्रायलला
पाठिंबा दिलेला नाहीये. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भारतातील भाजप
सरकार व इस्त्रायलची अलिकडची जवळीकता बघता भारताने घेतलेल्या इस्त्रायलविरोधी
भूमिकेचं स्वागत करावं लागेल.
एकिकडे डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाला म्हणतात, ‘जगाला
शांती हवी आहे, अणू बॉम्ब नाही’ संयुक्त
राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर लावलेल्या प्रतिबंधावर ट्रम्पने ही प्रतिक्रीया दिली
आहे, तर दुसरीकडे जेरूसलेमला इस्त्रायलला राजधानी
घोषित करुन जगाला अशांततेत ढकलू पाहात आहेत.
ट्रम्प यांची ही भूमिका संधीसाधूपणा आहे. अमेरिकेसह जगभरात ट्रम्प यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. जगभराचा विरोध डावलून ट्रम्प इस्त्रायलधार्जिणी निर्णय घेऊ पाहात आहेत. ट्रम्प यांची ही भूमिका पॅलेस्टाईन-इस्त्रायल शांतता चर्चेला हानी पोहचवणारं आहे. स्थानिकांचा संघर्ष हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. पण अशावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत.

Twitter@kalimajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com