मोदींचे इस्रायल प्रेम आणि युद्धाची चाहूल

प्रधानसेवकांच्या इस्त्रायल दौरा आणि चीनची भारतीय हद्दीत घुसखोरी; यातलं नेमकं काय वृत्तांकित करावं या द्विधा मनस्थिती भारतीय मीडियाची झाली होती. इस्त्रायलवारीच्या प्रत्येक मुमेंटचे स्नैप वेबपेजला बातमीवाईज पडत होते. तर दुसरीकडे 'सोशल कट्टा' इस्त्रायल मैत्रीचे गोडवे गात होता..
पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल संघर्ष माहिती नसलेली पिढी व्हर्च्युअली राजनायिक चर्चा करत होती. इस्त्रायल सोबत काय डिप्लोमसी करावी याचे सल्ले नेटीझन्स देत होती.. त्यामुळे प्रत्यक्षात प्रधानसेवकांचा यशस्वी होऊ न हो, मात्र, 'सोशल कट्टा' बेस्ट पीएमची पावती देऊन गेला. दौऱ्यामुळे भक्तांनी पुन्हा एकदा लोकशाही देशात राहणाऱ्या मुस्लिमांना डिवचण्याचं काम यथोचित केलं..
गुरुवारी प्रधानसेवक 3 दिवसांचा इस्त्रायल दौरा संपवून जर्मनीला रवाना झाले. पीएमची इस्त्रायलवारी मीडियामुळे चांगलीच चर्चेत राहिली. मोदींनी होलोक्रॉस्ट म्युझीअमला दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली. बुधवारी ५ जुलैला प्रधानसेवक इस्त्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू सोबत पीएम होलोक्रॉस्ट म्यूझिअमला गेले. 1938 साली हिटलरच्या शासन काळात 60 लाख ज्यू धर्मियांच्या कत्तली झाल्या होत्या, त्यांच्या स्मरणार्थ हा म्युझीअम बांधण्यात आलाय.
वाचा : पॅलेस्टाईनचं समर्थन आणि सोशल भान जपणारी तरुणाई
वाचा : मोदींचे इस्त्रायल प्रेम आणि युद्धाची चाहूल
प्रधानसेवक अत्यंत संवेदनशील होऊन म्युझीअम बघत होते. 2002 साली ते गुजरातचे सीएम असताना हजारो मुस्लिमांचं शिरकाण झालं होतं. याबद्दल मोदींना इथं किमानपक्षी पश्चाताप तरी झाला का असा प्रश्न विचारण्यात आला. 2008 साली मुंबईत हल्ला झाला. ताजसोबत ज्यू राहत असलेल्या छाबड हाऊसमध्येदेेखील हल्ला झाला होता. यात एक जोडपं मरण पावलं होतं.. यांचा 3 वर्षीय मुलगा इस्त्राईलमध्ये असल्याने बचावला होता. येरुशलेममध्ये जाऊन या मुलाला मोदी भेटले. गोध्रा दंगलीत 3 हजार मुस्लीम मारले गेले.. यातील किती जणांना मोदी भेटले. हा प्रश्न मीडियाने त्यांना विचारायला हवा होता, असो.
70 वर्षापूर्वी पॅलेस्टिनी भूमीपुत्रांना बेदखल करत नवा यहुदी देश जन्मला.. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटरच्या शासन काळात जर्मनीत 'मॉब लिचिंग' करुन ज्यूंना ठार मारण्यात आले होते. असं सांगितलं जातं की, ज्यू वर झालेल्या अन्यायामुळे जगात त्यांच्या बाजूने एक प्रचंड सहानूभूतीची लाट तयार झाली, या लाटेचा फायदा घेवून, त्या काळाच्या झायनिस्ट लॉबीने अमेरीका व ब्रिटीशांवर दबाव टाकून इस्त्रायल देशाची निर्मीती केली.
मुळात 2 हजार वर्षापूर्वी या जमिनीवर रोमवंशीय ज्यूंच्या रहिवास होता. मात्र ते जमीन सोडून परागंदा झाल्याने अरबी कबीले तिथं येऊन वसले. याच देशात जगातील पहिली मस्जिद येरुशेलममध्ये तयार झाली. ही 'मस्जिदे अक्सा' मुस्लिमांचा पहिला काबा आहे.. अर्थात भौगोलिकदृष्ट्या जगाचा मध्यकेंद्र आहे.
तिकडे चेहरा करुन जगभरातील मुस्लीम नमाज अदा करतात.. यामुळे आज जगभरातील इस्लामच्या अनुयायांसाठी पॅलेस्टाईन पवित्र देश आहे. मात्र इस्त्रायलच़्या कब्जानंतर 'मस्जिदे अक्सा'च्या ठिकाणी ज्यू आपला पवित्र प्रार्थना स्थळ 'हेकल सुलेमानी' बांधण्याची योजना करत आहेत. त्यासाठी पॅलेस्टिनी मुस्लिमांचे आतोनात छळ इस्त्रायलने सुरु केले आहेत. या धोरणामुळे इस्लामिक राष्ट्राचे सबंध इस्त्रायलशी बिघडलेले आहेत.
जगात कुठेही ज्यू धर्मीय जन्मला की त्याला इस्त्राईलची नागरिकता आपोआप मिळते. असा हा देश आजही पॅलेस्टिनी भूमिपुत्रांविरोधात रॉकेट लाँचरचा वापर करतो. यात दरवर्षी हजारो निष्पाप मारले जातात.. मानवाधिकाराची पायमल्ली करणाऱ्या अशा देशात कुणी भारतीय प्रधानसेवक पहिल्यांदा गेले.. नेहरु पंतप्रधान असताना आईनस्टाईनच्या अनुरोधाला न जुमानता इस्त्रायल स्थापनेचा त्यांनी विरोध केला होता.
वाचा : लोकशाही हक्कासाठी इराणचा भडका 
29 मे 1947 साली भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पॅलेस्टाईन विभाजनाचा विरोधही केला. आत्तापर्यंतच्या सर्व सरकारांनी पॅलेस्टाईनसोबत चांगले संबध प्रस्थापित केलं. मात्र एनडीए सत्तेत येताच पॅलिस्टिनींविरोधात युद्ध छेडणाऱ्या इस्त्रायलसोबत संबध दृढ केले. मोदींच्या इस्त्रायलवारीला मोठा प्रयत्न म्हणत प्रचारित केलं जात आहे.. हे सांगताना काँग्रेस हे करु शकलं नाही असंही सांगितलं जात आहे.
1992 साली काँग्रेसनेच इस्त्रायलसोबत मैत्रीचे संबध सुरु केले होते. यापूर्वी 1977 साली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोरारजी सरकारमधील परराष्ट्रीय मंत्री अटलबिहारी वाजपेयींनी इस्त्रायल मैत्रीचा विरोध केला होता. त्यामुळे आम्ही मैत्री सुरु केली असा आव भक्तांनी आणू नये..
मोदींच्या या इस्त्रायलवारीचा उपयोग भारतातील मुस्लीम समुदायाला डिवचण्याठी करण्यात आला. ओवेसींनी मोदींच्या दौऱ्याचा विरोध केला. हेच निमित्त घेऊन चैनलने प्राईम टाईमची चर्चा घडवून आणली. निष्कर्षाप्रती भारतीय मुस्लिमांना अपेक्षेप्रमाणे खलनायक ठरवण्यात आले. मानवी अधिकारांची पायमल्ली करणारा जगातला सर्वात मोठा देश म्हणून इस्त्रायलची गणना केली जाते..
2014 सालानंतर अनेक इस्लामिक देशांनी इस्त्रायली प्रोडक्टवर बहिष्कार टाकलाय. पॅलेस्टाईनच्या सामान्य नागरिकांविरोधात अत्याधुनिक हत्यारे इस्त्रायल वापरतो. या कारवाईविरोधात 'एमनेस्टी इंटरनेशनल' ने जाब विचारला आहे. एमनेस्टीच्या रिपोर्टमध्ये इस्त्रायली सैनिकांनी सतत पॅलेस्टाईनच्या चिकित्सीय सुविधाना बाधा पोहचवल्याने सामान्य नागरिकांचा जीव गेल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. अशा देशात मोदी जाऊन दहशतवादाशी लढण्याचा करार केला आहे..
सध्या भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. अशात मा. प्रधानसेवक इस्त्रायलवारीवर आहेत.. मीडियाच्या बातम्यांकडे लक्ष दिले तर चीन भारतावर युद्ध लादण्याच्या तयारीत आहे. भारत इस्त्रायलचा मोठा शस्त्रात्र खरेदीदार देश आहे.. चीनही इस्त्राईलचा तेव्हढाच मोठा ग्राहक आहे.. हे सांगण्याचा उद्देश ऐव्हढाच की मीडियाच्या सांगण्यानुसार जर 'भारत-चीन' युद्ध झालं तर इस्त्रायलची भारतासोबत काय भूमिका असेल.
दुसरं असं की 1962च्या चीन युद्धात इस्त्रायलने भारताला शस्त्रात्रांची मदत देऊ केली होती. पण भारताने काही अटी लादल्याने इस्त्रायलने माघार घेतली.. आता भारताने मोठी युद्ध साम्रगी इस्त्रायलकडून खरेदी केलीय.. अत्यानुधिक युद्ध सामग्री परिक्षणासाठी अलिकडे एखादे युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीन सीमेवर गेल्या महिनाभरापासून सीमा वादाचा मुद्दा पेटलाय..
1962 साली याच सीमावादावरुन युद्ध झालं होतं. चीनने भारताच्या हद्दीत घसून डोकलाम भागात रस्ता बनवण्याचं काम सुरु केलं. भारताच्या विरोधानंतर हे काम थांबलंय. पण चीनने या भागात सैन्य तैनात केलंय.. आणि अप्रत्यक्षरित्या सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'मधून चीनने धमकीही दिलीय.
वाचा : इराकी तरुणांचा  हुकुमशाहीविरोधातलढा 
मोदींच्या या इस्त्रायलवारीत दोन्ही देशात एकूण सात करार झाले. त्यात सायन्स आणि टेक्नॉलॉजी, पाणी व्यवस्थापन, रिसर्च आणि आंतराळ विज्ञान क्षेत्रात व्यावसायिक संबध प्रस्थापित झाले. दहशतवादाशी लढण्यासाठी संयुक्तरित्या आय फ़ॉर आय अर्थात इस्रायलसाठी इंडिया आणि इंडियासाठी इस्रायल करार झाले. ही झाली व्यवहाराची बाजू.. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राने बातमी दिलीय की नुकतंच इस्त्रायलने आडाणीसोबत मोठी बिझनेस डील केलीय.. दुसरं असं की भाजप आणि संघ समर्थकांना नेहमीच इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा 'मोसाद'शी जवळीक राहिलीय.
या संघटनेसोबत मिळून भारतातील मुस्लिमांविरोधात षडयंत्र रचल्याचेही संघावर आरोप झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात पीएमच्या इस्त्रायलवारीचं गुपीतांची कवणे उघडू शकतात.. तोपर्यंत इस्त्रायलकडून खरेदी केलेल्या युद्ध सामग्रीची गरज तुर्तास न पडो अशी अपेक्षा करूया..

कलीम अजीम, पुणे
Twitter @kalimajeem

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,45,इस्लाम,38,किताब,20,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,285,व्यक्ती,13,संकलन,62,समाज,239,साहित्य,74,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: मोदींचे इस्रायल प्रेम आणि युद्धाची चाहूल
मोदींचे इस्रायल प्रेम आणि युद्धाची चाहूल
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAgXyoJLJ7IZEaayH9qwHndFWJrTkayC2l5bE7d_ZHmMIyanT7FFk-DIDixZak4B-T9SoKgdod28RhTLIxTNFgBdcBA10O5QBOEjx5LNODDLdVo3Gr1T4cmWLPPQM_47ei5R3lbUrKp0JY/s1600/Modo+Holocast.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAgXyoJLJ7IZEaayH9qwHndFWJrTkayC2l5bE7d_ZHmMIyanT7FFk-DIDixZak4B-T9SoKgdod28RhTLIxTNFgBdcBA10O5QBOEjx5LNODDLdVo3Gr1T4cmWLPPQM_47ei5R3lbUrKp0JY/s72-c/Modo+Holocast.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2017/07/blog-post_8.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2017/07/blog-post_8.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content